Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Friday, June 10, 2011
दर्पणी पाहता रूप
कथांना कॅनडाच्या पश्चिम तीरावरचा संदर्भ आहे. अशा संक्रमण कालातील स्थलकाला पलिकडच्या कथा
-----------
कॅथलीनचा तो एक छंदच आहे. स्वत:ला सगळीकडून न्याहाळण्याचा. गंमत म्हणजे प्रत्येक वेळी त्या आरशात तिला आपलं रूप वेगळंच दिसतं.... स्वत:चं असं वेगवेगळं रूप बघताबघता ती अनेकदा भूतकाळात हरवून जाते. लहानपणच्या आशा-आकांक्षा, आपली जुनी स्वप्नं, यातलं काय आपण पुरं केलं, काय राहून गेलं, याचा शोध घेत राहते.... अलीकडे आरसे तिचे मित्र बनलेत आणि आपल्या मनोरंजनासाठी आरशाचे हवे तसे खेळ करायलादेखील ती शिकली आहे. आरसा निर्लेप असतो, आपणच त्यात आपल्याला हवं तसं प्रतिबिंब पाहू शकतो, हे आतां तिला उमजलेलं आहे.
लेखक : विद्युल्लेखा अकलूजकर
पृष्ठे : 102 किंमत : 100
Wednesday, June 8, 2011
द असोशिएट
बलाढ्य लॉ फर्म्सच्या युध्दात लॉ च्या हुशार विद्यार्थ्याला दावणीला लावताना होणारी काइलची ससेहोलपट ...
पेनिसिल्वानिया मधील यार्क गावातल्या वकीलांचा मुलगा काईल मॅकअवॉय येल कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतो. "येल लॉ जर्नल'' चा मुख्यसंपादक म्हणून शेवटच्या वर्षी मान पटकावतो. कॉलेजच्या चार वषा|मधले त्याचे आणि त्याच्या मित्रांचे एक काळे गुपित काही लोकांच्या हाती लागते आणि ते काईलला जाळ्यात अडकवतात. वरवर चांगला वाटणारा, लॉच्या अनेक विद्याथ्या|ना हवाहवासा वाटणारा पण काईलला नको असणारा जॉब त्याला घ्यावा लागतो. एका मोठ्या फर्मचा असोसिएट बनण्याचे आमिष त्याला - दाखविले जाते. स्कली अॅण्ड पशि|ग या मोठ्या लॉ फर्ममध्ये तो जॉब स्वीकारतो. अमेरिकेसाठी एअरक्राफ्" बनविणाऱ्या कंपनीकरता ही फर्म काम करीत असते. आपल्या आस्तत्वासाठी काईलला परिस्थितीशी जबरदस्त झगडावे लागते. मोठ्या निग्रहाने सामना करावा लागतो. त्यात तो यशस्वी होतो का? हे या कादंबरीतच वाचायलाच हवे.
मूळ लेखक : जॉन ग्रिशॅम
अनुवादक : अशोक पाथरकर
पृष्ठे : 340 किंमत : 300
Subscribe to:
Posts (Atom)