Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Saturday, July 14, 2012
इंटरव्ह्यू टेक्निक्स आणि प्रेझेन्टेशन स्किल्स
इंटरव्ह्यू म्हटले की, इंग्रजीतील बोलणे, टाय लावणे, कडक शेकहॅंड करणे, अशा गोष्टींनाच अनावश्यक महत्व दिले जाते. इंग्रजी माध्यमाच्या शाळा-कॉलेजात शिकलेली मुले जे काही इंग्रजी बौलतात, त्यामुळे लहान शहरातील, गावांतील मुले-मुली भारावून जातात. आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही याची न्यूनगंड त्यांच्या मनात तयार होतो...
नोकरीसाठी अर्ज कसा लिहावयाचा,
स्पर्धा परीक्षेसाठी ग्रुप डिस्कशनची तयारी कशी करायची ..
या सर्व गोष्टींबद्दल त्यांच्यामध्ये अनभिनज्ञता असते. त्यामुळे अनेकदा ते आपली माहितती प्रभावीपणे मांडू शकत नाहीत. म्हणूनच हे पुस्तक महाराष्ट्रातल्या सर्व लहान-मोठ्या गावांमध्ये, शहरांमध्ये राहणा-या; स्पर्धा परीक्षांची,
इंटरव्ह्यूची तयारी करत असेलेल्या मुला-मुलींसाठी लिहलेले आहे.
इंटरव्ह्यूच्या वेळेला विविध प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची, इंटरव्ह्यूच्या वेळेला पाळायचे शिष्टाचार आणि
आवश्यक देहबोली (Body Language) याबद्दलची सविस्तर माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
लेखिका- डॉ. अरुणा कौलगुड
पृष्ठे – ८४
किंमत- ९५ रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
Friday, July 13, 2012
ई.ई.सी.पी.तंत्र
-हदयावर काबू मिळविण्याचा एकमेव शस्त्रक्रिया-विरहित उपाय
-हदयाचे पुनरुज्जीवन करणारे ई.ई.सी.पी.तंत्र
एनहान्स्ड एक्स्टर्नल काउंटर पल्सेशनबद्दलचे पहिले सर्वसमावेशक गाईड
पेशंटच्या ह्दयात अक्षरशः जान भरणारी शस्त्रक्रियाविरहित उपचारपध्दती....
ई.ई.सी.पी. म्हणजे एनहान्सड एक्सटर्नल काउंटर पल्सेशन, ई.ई.सी.पी. बद्दल मी यापूर्वी का ऐकले नाही?
साशंकता, क्षोभ, आश्चर्य व आनंद अशा संमिश्र भावना मिसळलेला हा प्रश्न ह्दयरोग्याचे पेशंट व स्नेहीजन सतत आम्हाला विचारत असतात.
संपूर्ण रक्ताभिसरण संस्थेच्या कामाला चालना देऊन ह्दयरोगावर उपचार करणारी ही शस्त्रक्रियाविरहित बाह्य उपचारपध्दती सर्वांना लाभदायक ठरावी. शंभरावर शोधनिबंधांमधून हीचे फायदे निर्विवादपणे सिध्द झालेले आहेत. अशी ही ई.ई.सी.पी. सर्वांपर्यंत पोहोचावी. बायपास-ऑँजिओप्लास्टी इतकीच कार्यक्षमता असणारी ई.ई.सी.पी. अनेक ह्दयग्रस्तांना माहीत व्हावी, हा या अनुवादामागचा मूळ हेतू आहे.
“मी अगदी याचीच वाट पहात होते. मला एक नवजीवन मिळाल्यासारखं वाटतं आहे. अंजायना पूर्ण गायब झाला आहे. बरं झालं मी ई.ई.सी.पी. घेतली ”, मधुमेह, रक्तदाब व हार्ट फेल्युअरने त्रस्त असणा-या
चौ-याहत्तर वर्षाच्या मॅडेलिन बाईंचे उदगार असंख्य ह्दयरुग्णांना आशेचा किरण दाखवतील, अशी आशा आहे.
मूळ लेखक- डेबरा ब्रेव्हरमन( एम.डी)
अनुवाद- डॉ. अश्विनी घैसास
पृष्ठे- १५२
किंमत-१६० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
Wednesday, July 11, 2012
नेव्हर टू रिटर्न
भटक्या जमातीतील मुलाच्या होरपळलेल्या बालपणाची सत्यकथा
एका हिरावलेल्या बालपणाची अंतःकरण पिळवटून टाकणारी सत्यकथा!
समाजकल्याण खात्यानं सॅंडी रिडला आपल्या ताब्यात घेतलं, तेव्हा तो फक्त एक वर्षाचा होता. त्या वेळी त्याच्या आईला कल्पनाही नव्हती की, तो तिच्या नजरेला जन्मात परत कधी पडणार नव्हता.
नेव्हर टू रिटर्न ही स्कॉटलंडमधील टिंकर ह्या भटक्या जमातीत जन्मलेल्या सॅंडी रिड व त्याची मोठी बहीण मॅगी ह्यांची एक विलक्षण गोष्ट आहे. कोवळ्या वयात त्यांना त्यांच्या आई-वडिलांपासून व विशिष्ट जीवनपध्दतीपासून दूर केल्यानंतर त्यांच्या आयुशष्याची काय आणि कशी परवड झाली ह्याची ही गोष्ट आहे.
एका हिवाळ्यातील रात्री समाजकल्याण खात्याच्या अधिका-यांनी भटक्या जमातीच्या ह्या लोकांच्या जंगलातील तंबूवर छापा घातला. त्यांच्या छाप्याचा उद्देश होता, त्यांच्या सगळ्यात लहान मुलांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांना चांगले जीवन देणे, पण त्यांनी विचार केला होता तसे जास्त चांगले आयुष्य ह्या मुलांना मिळालेच नाही. शेवटी तर तो आपल्या ताब्यात असणा-या मुलांचे पध्दतशीर शोषण करणा-या कुप्रसिध्द `अंकल डेव्ह`च्या मगरमिठीत अडकला.
या एका पिढीतील मुलांची आयुष्ये कशी उद्ध्वस्त केली गेली,एक संपूर्ण पिढीच आपले बालपण कसे हरवून बसली, याची ही एक धक्कादायक कहाणी आहे..या परिस्थितीवर आणि शोषणावर मात करुन एका मुलाने कशी तग धरली, ह्याचेही यात चित्रण आहे.
मूळ लेखक- सॅंडी रीड
अनुवाद- सुनिता कट्टी
पृष्ठे- २३०
किंमत- २४० रुपये
मुखपृष्ठ- फाल्गुन ग्राफिक्स
Tuesday, July 10, 2012
अण्णा हजारे
भ्रष्टाचाराच्या विरोधातील भारतीय लढ्याचा चेहरा
भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचा आणि तो दूर करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या एकहाती लढ्याचा सर्वांगीण उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.
भ्रष्टाचाराविरुध्द कडक पावले उचलण्यासाठी , भ्रष्ट नोकरशहांना लगाम घालण्यासाठी आत्तापर्यंत कोणती विधेयके आणण्यात आली, नेमके काय प्रयत्न करण्यात आले, याचा इतिहास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराविरुध्द कडक कायदा आणण्यात ज्यांनी अडथळे आणले त्यांच्याविरुध्द नागरी समाजाचा असलेला रागसुध्दा येथे नोंदविण्यात आला आहे.
नागरी समाजाच्या संतापाचे अण्णा हजारे यांनी व्यापक जनआंदोलनात रुपांतर केले. यामुळे यासंदर्भातील विधेयक संसदेत मांडणे किती ताताडीचे आणि आवश्यक आहे, हे खासदारांना उमगले. भारतातील उच्च स्तरावरील भ्रष्टाचार आणि यामुळे देशातील अर्थव्यवस्थेचा आणि लोकांच्या कल्याणाचा कसा लचका तोडला जात आहे, याचा समग्र आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचाराचा गंभीर गुन्हा करण्या-या लोकांविरुध्द कारवाई करण्यास सध्याच्या कायद्यात कशा त्रुटी आहेत, यावरही हे पुस्तक झगझगीत प्रकाश टाकते.
आधी केले ; मग सांगितले, या न्यायाने अण्णांनी आयुष्यभर कार्य केले. ज्या माणसाला स्वतःचे कुटुंब नाही, संपत्ती नाही, बॅंकेत ठेव नाही, त्याने स्वतःला `फकीर` म्हणवून घेण्यात काहीही आश्चर्य नाही.
संपादक- प्रदीप ठाकूर आणि पूजा राणा
अनुवाद- धनंजय बिजले
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
पृष्ठे- १३६
किंमत- १२५ रुपये
Subscribe to:
Posts (Atom)