Thursday, May 31, 2012

चरित्ररंग




`आजचे राजे, महाराजे लेखकाला स्फूर्ती देणारे नाहीतच.
देवदेवता तूर्त रजेवर आहेत.
आज नायक व्हायला उरले आहेत- गरीब लोक आणि शास्त्रज्ञ.
गरीब लोक जेव्हा लढा देतात,
तेव्हा तो उपासमारीशी केलेला नायकी लढाच असतो.
त्यात हरलं की दंड भरावा लागतो;
तो तुरुंगवासाचा किंवा मरणाचा.
सहाजिकच लेखक लढाऊ-वृती जिथं आढळते,
तिथे ओढला जाणारच.
आता ही लढाई-वृत्ती त्याला फक्त गोरगरींबांच्यातच अढळतेय....`

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ८८
किंमत- ९० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
दुसरी आवृत्ती- मे, २०१२


...अशाच देश-विदेशातील लेखक, चित्रकार...
आणि कलावंतांना अवगत करून देणार...`चरित्ररंग...`

जांभळाचे दिवस




जेव्हा..

मनाला भुरळ घालणारे `जांभळाचे दिवस` लवकर संपतात,
टेकडीचा उतार उतरायलाही वामनरावांना फार वेळ लागतो,
पोस्टमनच्या अनवाणी पायांना वहाणा मिळतात,
मनात आणि घरात कोणालाही शिरकाव करु न देणा-या बाई बदलतात,
मर्यादशील वंचा बाजारची वाट चालताना मन मोकळे करते,
विस्मृतीत गेलेल प्रेम `सकाळची पाहुणी` बनून अनंतरावांकडे येते,
ओढग्रस्त परिस्थितीत मुलासाठी घेतलेली सायकल हरवल्यानतरही काळे मास्तर सुटकेचा निःश्र्वास सोडतात,

तेव्हा..
काय घडते ? या अनुभूतीचा अवीट बहर म्हणजेच `जांभळाचे दिवस.`

लेखक- व्य़ंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ११२
किंमत- १२० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे, २०१२

एक एकर





माणसानं आपल्या आयुष्यात केलेल्या कोणत्याही ब-यावाईट कृत्यापेक्षा, त्यानं लावलेले वृक्ष जास्त काळ टिकतात.
संस्मरणीय असं वाईट कृत्य हातून घडाव, अशी सत्ता किंवा सामर्थ्य माझ्यापाशी कधीच नव्हतं.
बरी म्हणावीत अशी भाविक कृत्ये मात्र हातून पार पडली आहेत.

पण आज मला वाटतं, माझ्या गाजलेल्या पुस्तकांपेक्षा,
मी लावलेले आणि जोपासलेले आंबा आणि चिंच
यासारखे महावृक्षच जास्त काळ टिकतील...

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ६६
किंमत- ७० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
दुसरी आवृत्ती- मे, २०१२


अशीच आहे ही लेखकाची `एक एकरा`तील सर्जनशीलता...

सिंहाच्या देशात



बर्नाड आणि मायकेल ग्रझीमिक यांनी विहवेल्या
`Serengeti Shall Not Die!
या ग्रंथाचा संक्षिप्त अनुवाद



हिटलरने लक्षावधी लोकांना धाकात ठेवले. त्याच्यासाठी लक्षावधी लोकांनी प्राण दिले आणि लक्षावधी लोक त्याच्याशी लढून मेले. आज जर्मनीमधल्या शाळकरी मुलांना हिटलरविषयी प्रश्न विचारले, तर त्यांना फार थोडे माहित आहे, असे दिसून येते. हिटलरच्या अनुयायांची तर नावेसुध्दा मुलांना माहित नाहीत.
मानवी ध्येयाने लोक लवकर ही ध्येये विसरतात. आपण नाश केला नाही, तर निसर्ग चिरंतन आहे!
आज ज्या परिषदेच्या बातम्यांनी वृत्तपत्रे भरून गेली आहेत, त्या परिषदेसंबंधी आणखी पन्नास वर्षांनी मावळत्या सूर्याने लालेलाल केलेल्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर उभा राहून सिहं गर्जना करेल, तेव्हा ऐकणारा थरारून जाईल. मग तो डेमोक्रॅट असो, बोल्शेव्हिक असो, इंग्लिश, जर्मन, रशियन, स्वाहिली कोणतीही भाषा बोलणारा असो.
आणखी पन्नास वर्षांनी, शंभर-दोनशे वर्षांनीसुध्दा कुरणावर दिसणा-य् ह्या सिंहासाठी, झेंब्र्यांसाठी आज काही करणे, हा खरोखरीच वेडेपणा ठरेल का?

अनुवाद- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ७६
किंमत- ८० रुपये
मुखपृष्ठ व मांड़णी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे, २०१२