Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Friday, August 12, 2011
अल्टीमेटम
पर्यावरणाच्या राजकारणात दोन महाशाक्तिंची टक्कर
पर्यावरणातील बदलांमुळे जागतिक तापमानवाढीचे परिणाम महासागरातील पाण्याची पातळी वाढण्यात दिसू लागले होते. प्रचंड वेगाने घडणार्या या बदलांना वायुवेगाने आळा न घातल्यास जगाचा विनाश अटळ होता. या जागतिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी सवा|त जास्त प्रदुषण निर्माण करणार्या चीन या देशाच्या शासनाबरोबर अमेरिकेच्या नवनिर्वाचित अयक्षाने ज्यो बेंटनने बोलणी चालू केली. परंतु पुढे त्याची परिणती निर्दयी कारस्थानांनी बजबजलेल्या अण्वस्त्रांच्या महायुद्धात झाली. या युद्धातील मनोबलाच्या आणि तत्त्वनितेच्या कसोटीला बेंटन पुरेपूर उतरला. पर्यावरणाच्या राजकारणाची आणि त्यापासून जगाला वाचवण्याची शर्थ करणार्या अमेरिकेच्या येयवादी प्रेसिडेंटची मनाला अस्वस्थ करणारी ही खळबळजनक कथा!
मूळ लेखक : मॅत्यू ग्लास
अनुवादक : सुदर्शन आठवले
पृष्ठे : 484 किंमत : 440
Thursday, August 11, 2011
स्मार्ट लीडरशिप
भारतीय नेतृत्वाचा जागतिक चेहरा
बहुराष्ट्रीय उद्योगाच्या प्रमुखांना कार्यक्षमता वाढवायचे नवनवे मार्ग शोधावे लागतात.
`स्मार्ट लीडरशिप - सीईओसाठी नवी दृष्टी' या पुस्तकामये बारा यशस्वी सीईओंनी
(चीफ एक्झिक्युटिह ऑफिसर म्हणजे प्रमुख कार्यकारी अधिकारी ) आपले मनोगत यक्त केलेले आहे.
या सर्वांनी विकासाचे आणि कार्यक्षमतेचे नवे मापदंड निर्माण केले, आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
सर्वश्री कुमारमंगलम् बिर्ला, एन. आर. नारायण मूर्ती, राहुल बजाज, के. व्ही. कामत यांनी वर्षानुवर्षे गुणवत्ता राखून विकासाच्या वेगात सातत्य राखता येते, हे दाखवून दिले. त्यांच्या अनुभवसमृद्धतेतून उद्योगक्षेत्रातील यवहाराबद्दल काही मूलभूत धडे शिकता येतात. नेतृत्व करणे, निर्णय घेणे, योग्य माणसे निवडून टीम बांधणे, गुणवत्ता ओळखून उत्तेजन देणे, बदल पचवणे आणि हे सर्व करताना विकासावरील लक्ष ढळू न देण्याचे मर्म सांगितले आहे.
परिवर्तन घडवण्यासाठी `स्मार्ट लीडरशिप' सर्व स्तरांवरच्या यवस्थापकांना काही अनुभवसिद्ध यवहार्य सूचना देऊ पाहते.
मूळ लेखक : गीता पिरामल
जेनिफर नेतरवाला
अनुवादक : माधुरी शानभाग
पृष्ठे : 176 किंमत : 150
स्क्रीम फॉर मी
अत्याचार करून, ब्लैंकेट मध्ये गुंडालून, तरुण मुलींची प्रेत रस्त्याच्या कडेला वेगवेगल्या ठिकाणी टाकली जातात...
एका सूड सत्राचा घेतलेला शोध.
काळजाचा थरकाप उडवणा-या आपल्या प्रत्येक लोकप्रिय कादंबरीतून, वाचकांच्या अंगावर काटा उभा करत, आपण सस्पेन्स कादंबरीची सम्राज्ञी आहोत हे करेन रोझ ह्या प्रतिभासंपन्न लेखिकेने आता निर्विवादपणे सिद्ध केले आहे. "डाय फॉर मी' या गाजलेल्या कादंबरीची ही लेखिका आता आणखी एक काळजाचा ठोका चुकवणारे कथानक घेऊन, वाचकांच्या समोर येत आहे. एका छोट्याशा गावात अचानक एक भयप्रद खूनसत्र सुरूहोतं. गाव पार हादरून जातं. आपल्या कामात निष्णात असणारा एक धाडसी गुप्तचर अधीकारी आणि एक पिसाट, विकृत खुनी ह्यांची आमने-सामने टक्कर होते. मरणाच्या दारात उभ्या केलेल्या आपल्या सावजाला, तो विकृत खुनी वेडावत म्हणतो, ""तुला जेव्हा वेदना असह्य होतील ना, तेव्हा माझ्या नावाने एक किंकाळी फोड.'' स्पेशल एजंट डॅनियल हार्टानियन हा, तेरा वषा|पूर्वी घडलेल्या एका खुनाची सहीसही नक्कल करणार्या त्या खुन्याला शोधून काढण्याचा विडा उचलतो. नुकताच मारला गेलेल्या आपल्या कुविख्यात खुनी भावाजवळ सापडलेली काही छायाचित्रं, हाच डॅनियलपाशी एकमेव धागा असतो. खुनी इसमाचा शोध घेण्याच्या त्या विलक्षण प्रवासात, त्याला आपल्याच कुटुंबाच्या काळ्याकुट्ट इतिहासाचे दर्शन घडते आणि त्याचबरोबर मानवी अभद्र मनाच्या गूढडोहाचा तळही सापडतो. ह्याच प्रवासात, अॅलेक्स फॅलन ह्या एका सुंदर परिचारिकेची त्याची भेट होते. तिची कहाणी ऐकून, त्याला आपलाच भूतकाळ आठवतो. विशेष म्हणजे अॅलेक्सचा चेहरा आणि तेरा वषा|पूर्वी खून झालेल्या त्या मुलीच्या चेह-यात कमालीचे साधर्म्य असते. गावातील प्रतिष्टित व्यक्ति ह्या प्रकरणात गुंतलेल्या आहेत. त्या विकृत खुनी इसमांच्या यादीत अॅलेक्सचेही नाव आहे, हे डॅनियलला समजते. दिवसागणिक बळी जाणा-या स्त्रियांची संख्या वाढू लागते. आता डॅनियलपाशी फारच थोडा अवधी राहिलेला असतो. त्या क्रूर कर्म्याला लवकरात लवकर शोधणं जितकं महत्त्वाचं असतं तितकं महत्त्वाचं असतं, अॅलेक्सचा जीव वाचवणं. कारण तो आता अॅलेक्सच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो.
मूळ लेखक : करेन रोझ
अनुवादक : दीपक कुळकर्णी
पृष्ठे : 509 किंमत : 480
शब्दचर्चा
लेखक : डॉ. म. बा. कुलकर्णी
अठरा विश्वे दारिद्र्य' असे सर्रास बोलले, लिहिले जाते. कोणती अठरा विश्वे? नावे सांगता येतील?
नाहीतच, तर कोठून सांगणार?
मग हा शब्दप्रयोग आला कोठून? डॉ.म.बा. कुलकर्णी सांगतात, "अठराविसे' असा शब्दप्रयोग असायला हवा.
अठराविसे = 360. म्हणजे बाराही महिने दारिद्र्य!
"शब्द' हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. शब्दाला रंग-रूप असते. रस-गंध असतो. त्यामुळे ते जाणीवपूर्वक वापरता आले पाहिजेत.
शब्दकोशामये तर सर्वच शब्द असतात, पण तेथे ते एक प्रकारे निर्गुण-निराकार अवस्थेत असतात.
देवळांमये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जसे दगडाच्या मूर्तीला "देवत्व' प्राप्त होते, तसेच शब्दांचे आहे.
वापरातून त्यांच्यात प्राणप्रतिष्ठा होते. ते सजीव होतात. बोलू लागतात, डोलू लागतात.
ही किमया डॉ.म.बा. कुलकर्णी यांनी या पुस्तकात उलगडून दाखवली आहे.
पृष्ठे : 440
किंमत : 350
कृष्णायन
माणूस होउन जगलेल्या, ईश्वराची भावकथा!
"स्त्रिया एकमेकींपेक्षा वेगळ्या का बरं नसतात....?'' अश्वत्थाखाली बसलेल्या कृष्णाच्या मनात द्रौपदीच्या महालात घडलेली घटना डोळ्यांसमोर येऊन, अनेक विचार येत होते.... "
"कोणत्याही युगात, कोणत्याही वयाची स्त्री का बरं एकसारखाच विचार करते? एकसारखाच अनुभव घेते? समान बाबतीत वेदना अनुभवते? का बरं एकसारख्या गोष्टींबद्दल रागावते? राग यक्त करण्याची रीत पण का बरं एकसारखीच असते....?
'' कृष्णाच्या मनात प्रश्न आले आणि त्यावर तो स्वत:च हसलाही. या प्रश्नांना आता काही अर्थ होता का? आयुष्य जगून झालं होतं...
""आपल्या जीवनात आलेल्या महत्त्वाच्या तीनही स्त्रिया आपल्याबद्दल का बरं एकसारख्याच संवेदना अनुभवत होत्या? का बरं एकाच पद्धतीनं दु:खी होत होत्या? आणि का एकसारख्याच तीव्रतेनं आपल्यावर प्रेम करत होत्या?...
'' खरं तर असा विचार करण्याची वेळही आता निघून गेली होती. आता होतं ते... केवळ स्मरण...! प्रत्यक्ष दृष्टीसमोर त्या स्त्रिया नव्हत्याच. तरीही त्या तिघींचे डोळे त्याच्याकडे बघत होते... आशेनं, अपेक्षेनं, उपहासानं आणि ...
निखळ प्रेमानंही!
तीन नद्यांचा प्रवाह मिळून त्याच्या दृष्टीसमोरून सागराकडे जात होता. लाटांवर खाली-वर नाचणारे प्रकाश-किरण जणू अस्पष्ट रेषांद्वारा त्या तिनही स्त्रियांचे चेहरे चितारीत होते.... प्रेयसी...पत्नी... आणि सखी... त्या तिघी जणी...
खळाळणा-या प्रवाहाबरोबर वाहात जणू म्हणत होत्या...
""तुझ्यात विलीन होण्यातच आमच्या जीवनाचं सार्थक आहे. तुझा खारटपणा स्वीकार्य आहे. कारण तूच आम्हाला विशालता दिलीस, अमर्याद पसरण्याचा तो अस्तित्वबोधही तूच दिलास... आमचं प्रखर तेज सामावून घेऊन आम्हाला शीतलता दिलीस तू... आमचं स्त्रीत्व स्वीकारून अखंड प्रेम दिलंस तू....''
मूळ लेखक : काजल ओझा - वैद्य
अनुवादक : प्रा. सुधीर कौठालकर
पृष्ठे : 216 किंमत : 200
Wednesday, August 10, 2011
'तृतीयपंथीयांबाबतचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे'
पुणे - "समाजाने तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. "मी का नाही' या कादंबरीच्या निमित्ताने या दुर्लक्षित समाजाचे प्रश्न समोर आले आहेत. कादंबरीमध्ये सुचविलेल्या उपाययोजनांचा तृतीयपंथी समाजाला खूप उपयोग होणार आहे,'' असे मत मानसोपचारतज्ञ डॉ. विद्याधर वाटवे यांनी येथे व्यक्त केले.
"मी का नाही' या कादंबरीचे प्रकाशन महाराष्ट्र तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. वाटवे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव, चित्रपट अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, "मेहता पब्लिशिंग हाऊस'चे सुनील मेहता उपस्थित होते.
कादंबरीविषयी माहिती देताना लेखिका पारू मदन नाईक म्हणाल्या ""कादंबरीतील नायिका आईच्या पाठिंब्यामुळे तृतीयपंथीय समाजाची स्थापना करते. समाजाला स्वावलंबी आणि सुसंघटित करते. त्यांचे प्रश्न सोडविते. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ उभारते. तृतीयपंथीयांनी माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला समाजाची साथ मिळणे आवश्यक आहे.''
डॉ. यादव म्हणाले, ""वेगवेगळ्या भागांत तृतीयपंथी समाजाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. त्यांची सतत उपेक्षा केली जाते. त्यांना उपेक्षितांप्रमाणे वागवले जाते. या पुस्तकाच्या रूपाने या समाजाचे प्रश्न समोर आले आहेत.''
""या समाजाकडे तुच्छतेने बघितले जाते. त्यांच्याविषयी अनेक समज-गैरसमज पसरले आहेत. मात्र, त्यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्याविषयी जास्त माहिती मिळाली व त्यांच्याबद्दल अनेक अफवा पसरल्या असल्याचे कळले,'' असे आठल्ये यांनी सांगितले. मेहता यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
http://www.esakal.com/esakal/20110810/5179277502990800741.htm
Tuesday, August 9, 2011
माझा हक्क हवा आहे...
- लक्ष्मीनारायण त्रिपाठी
पुणे- दि. ९- मला सहानुभूती नको आहे. मला माझा हक्क हवा आहे. मला स्वतःचा समाज घडवायचा आहे. समाज आम्हाला नाकारतो. हे बदलण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत.. आमच्या बद्दल समाजाची मनस्थिती बदलण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करेल...असा विश्वास महाराष्ट्र तृतीयपंथी समाजाच्या अध्यक्ष लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी व्यकत केला.
मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने प्रकाशित झालेल्या पारू नाईक लिखित ‘मी का नाही?’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (८.८.२०११) पत्रकार संघाच्या सभागृहात त्रिपाठी यांच्या हस्ते झाले.
तृतीयपंथी असणे ही प्रकृतीतीलच एक गोष्ट असली तरी त्याकडे समाज तुच्छतेने पाहतो आहे. अंध व अपंग व्यक्तींना समाज स्वीकारतो. पण वेगळी लैंगिकता आहे, म्हणून आम्ही आयुष्यभर समाजाच्या नावाने चीड-चीड करत जगतो. आम्ही आमचे हक्क मिळवू, पण त्याआधी समाजाने आम्हाला ‘माणूस’ म्हणून स्वीकारा, अशी विनंती करताना तृतियपंथीचे प्रश्न उपस्थितांसमोर मांडले. ह्या पुस्तकामुळे आमचे दुःख समाजासमोर मांडल्यामुळे पारू मदन नाईक यांचे आभार मानताना ह्या पुस्तकाचे इंग्रजी आणि हिंदीसह इतर भाषात भाषांतर करण्याची विनंती मेहता प्रकाशनाला त्रिपाठींसह सर्वच वक्त्यांनी केली.
त्रिपाठी म्हणाल्या की, माझे आयुष्य जसे आहे तसे मी जगायचे ठरवले तरी त्याला कुटुंब एका मर्यादेपर्यंत स्वीकारते. त्यांना समाज काय म्हणेल याची अधिक भीती असते. त्यामुळे समाजाच्या मानसिकतेत पहिल्यांदा बदल होण्याची गरज आहे. मी तृतीयपंथी असूनही माझ्या आई-वडिलांनी मला वेगळी वागणूक दिली नाही. त्यांनी मला चांगले शिक्षण आणि प्रेम दिले. त्यांनी माझा जशास तसा स्वीकार केला. तृतीयपंथीयांना जुनी परंपरा आहे तसेच त्यांच्याकडे नृत्यादी कलाही आहेत. त्याचा समाजाने फायदा करून घेतला पाहिजे. ब्रिटिशांनी आणलेल्या जाचक कायद्यातूनही हा पंथ नामशेष होऊ शकला नाही. त्या परिस्थितीत आम्ही जगलो, अजूनही जगतो आहे आणि पुढेही जगणार आहोत. या प्रकृतीतला एक घटक आम्ही आहोत,समाजाने आम्हाला ‘माणूस’ म्हणून जगू दिले पाहिजे.
`या समाजावर मराठी साहित्यात अजून एकही पुस्तक झालेले नाही. हा विषय समाजापुढे आणून या पुस्तकाने एक इतिहास घडविला आहे.आपण या समाजाला अजून न्याय देउ शकलो नाही याबद्दल खेद वाटत असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.आनंद यादव यांनी जाहिरपणे कबूल केले.
अनेक वर्षे संशोधन करून हे पुस्तक लिहल्याचे सांगून लेखिका पारू मदन नाईक यांनी या सर्वांना समाजात माणूस म्हणून जगता यावे याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन केले.
पत्रकार वैशाली रोडे यांनी आपण लक्षमीनारायण त्रिपाठी यांचेवर आत्मचरित्र लिहित असल्याचे सांगून हिजड्यांची वाईट बाजूच समाजासमोर आली आहे. त्यांची चांगली आणि न्याय बाजू मांडली गेली पाहिजे असे मत मांडले.
यावेळी डॉ. वाटवे यांनी ,ही ही माणसे आहेत. घाणीतली डुकरे नाहीत. पारूताईंनी ह्या दुर्लक्षित समाजाच्या व्यथा आणि त्यावरील उपायांचा अत्यंत प्रभावीपणे शोध या कादंबरीत घेतला आहे. यामुळे समाजाचा त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.
`हे पुस्तक वाचल्यामुळे या समाजाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला आहे. माझ्याकडूबन तरी या लोकांना सहानूभूतीचा वागणूक मिळेल असा शब्द अभिनेत्री कुबल-आठल्ये यांनी दिला.
वेगळ्या वाटेने जाणारी ही वास्तववादी कलाकृती असल्याचे सांगून मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनिल मेहता यांनी आपण अशी वेगळ्या विषयाची पुस्तके प्रकाशित करत असल्याची आठवण वाचकांना करून दिली.
मृण्मयी भजक यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले.
`मी का नाही?` पुस्तकाचा प्रकाशन समारंभ
.. ‘माणूस’ म्हणून आम्हाला स्वीकारा
तृतीयपंथीयांची समाजाला विनंती
पुणे, ८ ऑगस्ट -तृतीयपंथी असणे ही प्रकृतीतीलच एक गोष्ट असली तरी त्याकडे समाज तुच्छतेने पाहतो आहे. अंध व अपंग व्यक्तींना समाज स्वीकारतो. पण वेगळी लैंगिकता आहे, म्हणून आम्ही आयुष्यभर समाजाच्या नावाने चीड-चीड करत जगतो. आम्ही आमचे हक्क मिळवू, पण त्याआधी समाजाने आम्हाला ‘माणूस’ म्हणून स्वीकारा, अशी विनंती महाराष्ट्र तृतीयपंथी समाजाच्या अध्यक्ष लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी आज केली.
पारू नाईक लिखित ‘मी का नाही?’ या पुस्तकाचे प्रकाशन त्रिपाठी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी अध्यक्षस्थानी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विद्याधर वाटवे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव, सिने अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, पत्रकार वैशाली रोडे, मेहता पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक सुनील मेहता उपस्थित होते.
त्रिपाठी म्हणाल्या की, माझे आयुष्य जसे आहे तसे मी जगायचे ठरवले तरी त्याला कुटुंब एका मर्यादेपर्यंत स्वीकारते. त्यांना समाज काय म्हणेल याची अधिक भीती असते. त्यामुळे समाजाच्या मानसिकतेत पहिल्यांदा बदल होण्याची गरज आहे. मी तृतीयपंथी असूनही माझ्या आई-वडिलांनी मला वेगळी वागणूक दिली नाही. त्यांनी मला चांगले शिक्षण आणि प्रेम दिले. त्यांनी माझा जशास तसा स्वीकार केला. तृतीयपंथीयांना जुनी परंपरा आहे तसेच त्यांच्याकडे नृत्यादी कलाही आहेत. त्याचा समाजाने फायदा करून घेतला पाहिजे. ब्रिटिशांनी आणलेल्या जाचक कायद्यातूनही हा पंथ नामशेष होऊ शकला नाही. त्या परिस्थितीत आम्ही जगलो, अजूनही जगतो आहे आणि पुढेही जगणार आहोत. या प्रकृतीतला एक घटक आम्ही आहोत, त्यामुळे समाजाने आम्हाला ‘माणूस’ म्हणून जगू दिले पाहिजे.
यावेळी डॉ. वाटवे, कुबल-आठल्ये, डॉ. यादव, पारू नाईक, रोडे यांची भाषणे झाली. मृण्मयी भजक यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=175481:2011-08-08-19-08-53&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212
Monday, August 8, 2011
जीवनमरणाचा चाकोरीबाहेरील धांडोळा
' युथनेशिया' या इंग्रजी शब्दाचा अर्थ दयामरण किंवा रोगजर्जर व्यक्तीचे घडवून आणलेले वेदनारहित निधन असा केला जातो. त्यालाच 'मर्सी किलिंग'ही म्हणतात.
' युथनेशिया' आता एका मराठी कादंबरीचा विषय बनला आहे. या कादंबरीचे नायक आहेत डॉक्टर वेदांत घैसास, हार्ट सर्जन. 'गोल्ड मेडलिस्ट' डॉ. घैसास मोठ्या हॉस्पिटल्समधून आलेल्या आमंत्रणांना नकार देऊन, 'नोकरी' न करण्याचा निश्चय करून मुंबईच्या बाहेर ग्रामीण काशीमीरा परिसरात फक्त एक खोली बांधून तीत आठ वर्षं क्लिनिक चालवितात. शहरीकरणाबरोबर काशीमीरा या खेड्याचे क्रमश: रुपांतर शहरात होणार याचा पक्का ठोकताळा डॉक्टरांनी मांडलेला असतो. अथक परिश्रम करून ते आपल्या वैद्यकीय सेवेचा विस्तार करतात. कालांतराने त्र्याऐंशी बेड्सचे 'घैसास हॉस्पिटल' उभारतात. पंधरा जनरल वॉर्ड्स, पाच स्पेशल वॉर्ड्स, इमर्जन्सीज, ऑपरेशन थिएटर, 'आयसीयु' रूम, पाच डॉक्टरांचा स्टाफ, तीन नसेर्स, वीस वॉर्ड बॉईज, चार वॉचमन, दोन अॅम्ब्युलन्स असा जामानिमा उभारतात. स्टाफची उत्तम देखभाल, औषधांची उपलब्धता, हॉस्पिटलची स्वच्छता यावर कटाक्ष असणारे काशीमीरातील ते एकमेव हॉस्पिटल बनते. पैशाच्या मागे न धावणाऱ्या घैसासांकडे पैसा आपल्या पायांनी चालत येतो. काशीमीरात ते प्रशस्त बंगला बांधतात. प्रेमळ पत्नी वसुधा, एकमेव अपत्य असलेली लाडकी कन्या विशाखा. पण डॉक्टरांची सुखी संसाराची वषेर् मोजकीच ठरतात. 'देवमाणूस' अशी ओळख असलेले घैसास अनाथाश्रमालाही मदत करतात. प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करणाऱ्या युवा क्लबला सढळ हाताने मदत, सक्रिय सहकार्य देतात.
विशाखाला ते युनायटेड स्टेट्सला इंजिनीअरिंग शिकायला पाठवतात. विशाखा एके दिवशी पत्र पाठवून आपण शिकागोच्या रौशन खान नावाच्या तरुणाशी लग्न करणार असल्याचे कळवते. घैसास पतीपत्नीना धक्का बसतो. विशाखा तिकडेच लग्न करते. वसुधा धसका घेते. हार्ट प्रॉब्लेम! हजारो रुग्णांना बरे करणारे डॉक्टर घैसास पत्नीला वाचवू शकत नाहीत. ते एकटे पडतात. तरीही धक्क्यातून सावरतात.
विशाखा एका पुत्राला जन्म देते. कालांतराने डॉक्टर नातवाला, रेहानला पहायला 'युएस'ला जाऊन येतात. रेहानचा लळा लागतो. ते नव्या उमेदीने उभे राहतात. दरम्यान काशीमीरा भागातील एका कारखान्यातील शेवंता नावाच्या सोळा वषेर् वयाच्या कामगार मुलीवर त्याच कारखान्याचा वॉचमन बलात्कार करतो. सात्विक डॉक्टर घैसासांना धक्का बसतो. अस्वस्थ होऊन ते त्या वॉचमनला कोर्टात शिक्षा होईल हे पाहतात. कुटुंबियांनी टाकून दिलेल्या, उघड्यावर आलेल्या शेवंताला आधार देतात. शिक्षण देतात. हुशार शेवंता 'एमबीबीएस' होऊन डॉक्टरांनी दिलेल्या आधाराचे चीज करते. दरम्यान घैसास अनाथाश्रमातील एका रघु नावाच्या मुलाला दत्तक घेतात. दुसरीकडे नातवामध्येही त्यांचा जीव गुंतलेला असतो. डॉक्टरांवर दुदैर्वाचा आणखी एक आघात कोसळतो. विशाखा आणि जावई रौशन अमेरिकेत एका मोटार अपघातात मरण पावतात. सहीसलामत राहिलेला रेहान नंतर भारतात आजोबांकडे येतो. आता डॉक्टरांना आणखी एक धक्का बसतो. रेहान ड्रग अॅडिक्ट बनलेला असतो. त्याचे भरकटलेले आयुष्य सावरण्यासाठी घैसास एका सायकिअॅट्रिस्ट मित्राची मदत घेतात. सायकिअॅट्रिस्टनी रेहानच्या केलेल्या 'डायग्नोसिस'मधून डॉक्टरांना कळते की रौशन विशाखाला छळत होता. ते पाहून रेहान भरकटला. अनाथाश्रमातून दत्तक घेतलेल्या रघुच्या शिक्षणासाठी घैसास मदत करतात. रघु, शेवंता शिक्षणात उत्तम प्रगती करतात. दोघेही डॉक्टर होतात. रघुपेक्षा वयाने थोडी मोठी असलेली शेवंता त्याच्या आधी 'एमबीबीएस', नंतर 'एम. एस.' होते. डॉक्टर घैसास रघु आणि शेवंता यांचे लग्न थाटात लावून देतात.
आपल्या हॉस्पटलमधील, घरातील नोकरांची आस्थेने काळजी घेणारे डॉक्टर पेशंटांसाठीही देवमाणूस असतात. फडणीस नावाचे एक वृद्ध पेशंट 'घैसास हॉस्पिटल'मध्ये उपचार घेऊन बरे होतात. डॉक्टरांच्या उपचारांवर, आपुलकीच्या वागणुकीवर खूश होऊन आपल्या बचतीच्या पूंजीतील पन्नास हजार रुपये हॉस्पिटलला देणगी म्हणून देतात. हेच फडणीस पुन्हा गंभीर आजारी पडल्यानंतर त्यांचे तीन मुलगे, एक मुलगी मिळून त्यांना 'घैसास हॉस्पिटल'मध्ये दाखल करतात. आता परिस्थिती बदललेली असते. वयोवृद्ध फडणीस बरे होण्याची शक्यता नसते. अंथरुणाला खिळलेल्या फडणिसांना घरी ठेवून त्यांची काळजी घेण्यास त्यांचे मुलगे नाखूश असतात. जबाबदारी फडणिसांच्या सर्वात मोठ्या मुलावर पडते. अन्य भाऊ, बहीण अंग काढून घेतात. मोठा मुलगा असहाय्य होतो. डॉक्टरांना ही हकीकत कळाल्यानंतर ते फडणिसांनी देणगी म्हणून दिलेले पन्नास हजार रुपये व्याजासह त्यांच्या मोठ्या मुलाला देतात.
आपल्या हॉस्पिटलमध्ये दाखल होणारे, आथिर्क परिस्थिती जेमतेम असलेले अनेक पेशंट डॉक्टर घैसास पाहत असतात. अनेक रोगजर्जर पेशंट बरे होण्याच्या पलीकडे गेलेले असतात. मृत्यूही त्यांच्यावर दया करीत नाही. काही पेशंटांचे कंटाळलेले कुटुंबीय त्यांना पहायला पुन्हा हॉस्पिटलकडे फिरकतही नाहीत. त्यांचे पत्ते शोधून संपर्क साधण्याचा डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरतात. अनेक रुग्णांची, त्यांच्या कुटंबियांची उपचार चालू ठेवण्याची ऐपत नसते.
आता डॉक्टर पूर्ण विचाराअंती निर्णयच घेतात. फडणिसांपासून ते गैरमार्गाला लागून त्यांनाच छळणाऱ्या, दुर्धर रोगाने केविलवाणा झालेल्या रेहानपर्यंत अनेक मरणासन्न रुग्णांना डॉक्टर 'मुक्ती' देतात. तज्ज्ञ डॉक्टर असलेल्या घैसासांनी किती कौशल्याने, दयाभावनेने हे काम केले हे फक्त त्यांनाच माहित असते. हे सर्व घडते 'घैसास हॉस्पिटल'च्या 'आयसीयु कॉट नंबर चार'वर! नंतर थकलेल्या डॉक्टर घैसासांना आपल्याच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ होते. 'ओपन हार्ट सर्जरी' होऊन तेच 'आयसीयु कॉट नंबर चार'वर येतात. दरम्यान एम. एस. झालेल्या शेवंताला 'आयसीयु कॉट नंबर चार'वरील पेशटांच्या सलग होत असलेल्या मृत्यूंबद्दल शंका येऊ लागते. ती शोध घेतल्यावर तिला खात्री पटते. पुढे? ...
लेखिकेने हा विषय अप्रतिम हाताळला आहे. स्वत: डॉक्टर नसताना हॉस्पिटलच्या कामकाजाबद्दलची, उपचार पद्धतींची आत्मसात केलेली माहिती, बारकावे, त्यांचे कादंबरीतील प्रकटीकरण निविर्वाद कौतुकास्पद. कादंबरीची छपाई, विषय प्रकट करणारे मुखपृष्ठावरील बोलके चित्र उत्तम. लेखिकेचा परिचय, छायाचित्र छापण्याचे सौजन्य, औचित्य प्रकाशकानी (मराठी प्रकाशक असूनही!) साधले आहे. एकंदरित, 'युथनेशिया' ही जीवनमरणाच्या प्रश्ानंचा शोध घेणारी एक चाकोरीबाहेरील उत्कृष्ट कादंबरी आहे.
- विश्वास डिग्गीकर
.............................................................
युथनेशिया
लेखिका : स्वाती चांदोरकर
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस
पृष्ठं : २२५, किंमत: २२० रु.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9509488.cms
Subscribe to:
Posts (Atom)