Saturday, April 2, 2011

लोकल माझी सखी



लोकल्स हा मुंबईकरांच्या जीवनातील अविभाज्य भाग...
मुंबईकरांची रक्तवाहिनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचे गालबोट जेव्हा या रक्तवाहिनीला लागते, तेव्हा ती सामान्यांचे दैनंदिन जीवन प्रभावित करते.

लेखक : मधुवंती सप्रे
-------------


मुंबईच्या एस.एन.डी.टी विद्यापीठात पर्यावरणावर झालेल्या चर्चासत्रात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला गेला.
तो होता, मुंबईचा लोकल-प्रवास लोकल प्रवासावर संशोधन करून वाचलेला पेपर.
त्यात म्हटलं होतं की
मुंबईचा लोकल-प्रवास हे संथ मरणाचं सावट आहे.
या एका वाक्याने लेखिका दचकली. कारण तीही रोज लोकलने प्रवास करत होती.
लोकलमध्ये रोज घडणार्या, घाबरवणार्या घटनांची ती साक्षीदार होती.
त्यामुळे संथ मरणाचं सावट या संकल्पनेनं ती मुळापासून हादरली.
मुंबईसारख्या प्रचंड गर्दीच्या महानगरात, सामाजिक, राजकीय अशा बेमुर्वत घटनांनी लोकल-प्रवाशांना बसणारा फटका,
उदा. रेलरोको, बॉम्बस्फोट, आगी लागणे, झोपडपट्टीवाल्यांची दादागिरी, सिग्नल-यंत्रणा ठप्प होणे.
परिणामी चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचायला होणारा उशीर, लेटमार्क होणे वगैरे.
या गोष्टी प्रवाशांच्या आवाक्यातल्या नसतात. यातून वैयक्तिक समस्या निर्माण होतात.
आयुष्याचा समतोल बिघडत जातो.

सत्य घटनांवर आधारित कादंबरी.
पृष्ठे : 176
किंमत : 180

Friday, April 1, 2011

युथनेशिया



नौनं छिन्दन्ति शस्त्राणि नौनं दहति पावक:। न चौनं क्लेद्यन्त्यापो न शोषयति मारूत:।।
असं जरी असलं तरीही ङमृत्यूछ म्हटलं की भय, दु:ख, वेदना काही टळत नाहीत.
जगण्यावरचं अपरंपार प्रेम, मोह सुटत नाही.
आयुष्य नको आता असं म्हणणारी माणसं जास्तीत जास्त काळ जगतात.
हे असं चित्रं सर्वत्र दिसतं. विकलांग झालेली शरीरंही खितपत पडतात,
ती अंतर्मनातल्या जगण्याच्या हव्यासापोटीच. नकोशी झालेली ही शरीरं त्रास,
अपमान सहन करतात आणि मग अशांना शांत-चित्त मरण द्यावं अशा विचारांना प्राधान्य दिलं जातं...
आपणहूनच. निर्णय घेतला जातो... मुक्ती दिली जाते...
दयामरण... युथनेशिया...
लेखक : स्वाती चांदोरकर

पृष्ठे : 225
किंमत : 220

कॅरी मी डाउन


जॉनच्या विचित्र मानसिक अवस्थेमुळे घरातील नाते-संबंध बिघडतात.तो आपल्या आईचा खून करण्याचा प्रयत्न करतो. त्याची रवानगी सुधारगृहात होते. पौगंडावस्थेतील मुलाच्या मनाचा ठाव घेण्याचा कौशल्यपूर्ण प्रयत्न!...
जॉन इगन या बाराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या मुलाला आपल्यातील अचाट शक्तीची जाणीव होते.
ती म्हणजे लोकांनी केलेले 'असत्य-कथन' शोधून काढण्याची...
या अचाट शक्तीच्या आधारे जॉन आपले नाव 'गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंदविण्याचा प्रयत्न करतो...
पौंगडावस्थेतील जॉनच्या अशा वागण्यामुळे घरातील नातेसंबंध बिघडतात...
त्याचे वागणे इतके पराकोटीला पोहचते की, तो आपल्या आईचा खून करण्याचा प्रयत्न!...
करतो... त्यातून त्याची रवानगी सुधारगृहात होते...
...एवढं सगळं घडतं ते जॉनच्या विचित्र मानसिक अवस्थेमुळे...
या अवस्थेतील म्हणजे पौंगडावस्थेतील मुलाच्या मनाचा ठाव घेण्याचा केलेला
कौशल्यपूर्ण प्रयत्न!...

मूळ लेखक : एम. जे. हायलंड
अनुवादक : पुलिंद सामंत