Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Saturday, September 17, 2011
मेल्टडाऊन
तुमच्या देखत तुमचं जग कोलमडून पडत असताना तुम्ही पळणार तरी कुठे...
सॅम्युएल स्पेन्डलव्ह फार घातक खेळ खेळत आहे. बर्टनच्या साम्राज्याशी टक्कर घेतलेल्या दलालाची, त्या गूढव्यक्तिमत्वाच्या खानची गुप्तपणे माहिती मिळवण्याचं काम प्रसारमाध्यमांच्या अनभिषिक्त सम्राटासाठी करण्याचं त्याने मान्य केलं होतं, कारण बर्टनला खानचा सूड घ्यायचा होता.
हे काम त्याला पॅरिसच्या शेअर बाजारातून करायचं होतं. सुरवातीला तिथलं तणावग्रस्त वातावरण सॅम्युएलला भावलं नाही, पण नंतर तो रुळला आणि त्याला ते आवडायला लागलं. काही काळ सगळं सुरळीत चाललेलं होतं...
पण प्रसंगी एकमेकांचे गळेसुध्दा कापणा-या या आंतरराष्ट्रीय आर्थिक बाजारातल्या धसमुसळ्या वातावरणात काहीच गृहित धरून चालत नाही. जेव्हा त्याची आकर्षक सहकारी, गुढरित्या अचानक नाहीशी होते, तेव्हा त्याचं जग एक एक तुकड्यानी कोलमडायला लागतं.
जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था कोसळायला लागली, तेव्हा त्यासाठी सॅम्युएलला जबाबदार ठरवण्यात आलं आणि मग सगळेच त्याच्या मागे लागले...शत्रु, सहकारी आणि अर्थातच पोलीसही...
लपण्यासाठी जेव्हा त्याने पॅरिसच्या अंडरवर्ल्डमध्ये आसरा घेतला, तेव्हा तिथे कपल्पनेपेक्षाही भयानक प्रकार चालत असल्याचं त्याच्या लक्षात आलं.
त्याने सुरवातीला जो खेळ मांडला होता, त्याचे नियम आता पार बदलले होते.
त्याचं जग कोलमडून पडयच्या आधी त्याला सत्य समजणार होतं कां.
....कारण एक गोष्ट अटळ होती.....
,.......मेल्टडाऊन.
मुळ लेखक- मार्टिन बेकर
अनुवाद- सुभाष जोशी
पृष्ठे-३३६ किंमत- ३००
शेअरबाजारात असणारे खळबळजनक वातावरण, खून, जगाची आर्थिक व्यवस्था उलथून टाकण्य़ाचा प्रयत्न .....हे सगळं या कादंबरीत आहे...
- द टाइम्स
कॅन्सर रोखू या
एक सजग जीनवशैलीसह
Anticancer. A New Way of Life या पुस्तकाचा मराठी अनुवाद
निरोगी पेशी कॅन्सरग्रस्त होतात कशा...आणि कोणामध्ये
मुळ लेखक- डॉ. डेव्हिड सर्व्हन-श्रायबर
अनुवाद- वन्दना अत्रे. डॉ. चंद्रकांत संकलेचा
वैद्यकशास्त्राने कितीही प्रगती केली असली तरी
कॅन्सर हा विकार आजही असाध्य समजला जातो.
कारण मानसिक व शारीरिकदृष्ट्या रुग्णावर
मोठा आघात करणा-या या आजारावर अजून तरी
रामबाण उपाय साहडलेला नाही...
अधुनिक जीवनशैलीचा शाप म्हणून आज
मोठ्या प्रमाणात कॅन्सर आपल्यासमोर येत आहे.
अधुनिक उपचार आणि मानसिक संतुलन शिकविणारे
पारंपारिक भारतीय शिक्षण व आहारपध्दती या दोघांचा
मेळ साधल्यास कॅन्सरशी सामना करणे तुलनेने
सोपे जाते, ही वेगळी द्ष्टी या पुस्तकातून मिळते.
पृष्ठे- १८४
किंमत- १८०
नॉट पेड
हिंदीत पुष्कळ लेखक व्यंगलेखन करतात. त्यांच्यातले सर्वोत्कृष्ट म्हणजे हरिशंकर परसाई होत, असे म्हटले तर ती अतिशयोक्ति ठरणार नाही. हरिशंकरजींच्या काही उत्कृष्ट व्यंगरचनांच्या मराठी अनुवादांचा हा संग्रह ही श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी मराठी वाचकांना दिलेली एक नाविन्यपूर्ण भेट आहे.
भारतीय समाजजीवनाची सर्वच अंगे भ्रष्ट झाली आहेत. त्याचे स्वरुप पूर्णपणे गढूळ झाले आहे.
या सार्वत्रिक गढूळपणाचे विदारक दर्शन तीक्ष्ण उपहासाद्वारे लेखकाने आपल्या व्यंगलेखनातून घडविले आहे.
त्यातून कोणतेच क्षेत्र सुटलेले नाही. लोकशाही, निवडणुका, राजकारण यांच्यापासून साहित्य, सरकारी पुरस्कार, प्रशासन, पोलीसयंत्रणा, शिक्षण आणि अध्यात्मसुध्दा..
अशी सर्वच क्षेत्रे उपहासाच्या धारदार सुरीने सोलून काढून, नागडीउघडी करून लेखकाने वाचकांसमोर ठेवली आहेत. हरिशंकरजींचा उपहास झोंबरा आहे. व्यंग बोचरे आहे. पण सार्वत्रिक गढूळपणाबद्दलची खंत आणि चीड अस्सल आहे. उपहासासाठी त्यांनी कधी पुराणकथांचे विडंबन केले आहे, तर कधी मार्मिक अभिप्रायांतून वाचकांना हसताहसता विचार करायला लावले आहे.
हरिशंकरजींच्या हिंदीतील व्यंगलेखनाचे तेवढेच धारदार मराठीकरण करण्याचे कठीण काम श्रीमती केळकर यांनी समर्थपणे पार पाडले आहे.
-ह.मो.मराठे
लेखक- हरिशंकर परसाई
अनुवाद- उज्ज्वला केळकर
पृष्ठे- १४० किंमत-१४०
अज्ञेय
तुमच्या मूर्ती म्हणजे काय असते... आदिवासी
मूर्ती दगडाची, धातूची प्रतिकृती...चेतन
प्रतिकृती कोणची...आदिवासी
माणसांची...चेतन
माणसांच्या मदतीला येतात ते देव.
आमच्या मदतीला आमची झाडं येतात म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो.
झाडात जीव असतो. ती पुनःपुन्हा उगवतात.
तुमचे धातूचे देव असे पुनःपुन्हा उगवतात का..
किमान मातीच्या मूर्ती तरी तुम्ही करायला हव्यात. माती गर्भार रहाते.
मूर्ती फुटली, तर त्या मातीतून काही ना काही जन्माला येतं. झाडं, किडे, प्राणी..
कारण मूर्तिरुपात असताना आपण श्रध्दा पेरलेली असते.
धातू साधा ध्वनी स्वीकारु शकत नाही. त्याचा प्रतिध्वनी तो परत करून टाकतो.
तो तुमच्या प्रार्थना काय स्वीकारेल....
ह्या त-हेची कादंबरी नसली, तरी कथा मराठीत आहे. रुपक-बंधात जी.ए. कुलकर्णींनी आपले अनेक विचार मांडले. माझ्या सर्व लिखाणात कदाचित सर्वाधिक मला आवडलेलं हे लेखन असेल. कारण अनेक विचार जे मनाच्या अंधा-या कोप-यात होते, जे मलाही माहित नव्हते असे लिखाणात अचानक अवतरले.
अज्ञेय..हा स्त्रीवादापलिकडच्या मनुष्याचा शोध आहे. भावनिक व वैचारिक. त्या प्रवासात माझ्यासोबत वाचकांनीही असावं, ह्याहून अधिक आनंद कोणता...
(अज्ञेयच्या निमित्ताने.....सौ. रेखा बैजल)
रेखा बैजल
पृष्ठे- १०६ किंमत- १००
शास्त्रज्ञांचे जग
-निरंजन घाटे
सर डेव्हीड ब्रुस्टर. मायकेल फॅरेडे. मॅक्स प्लॅक. निकोला तेस्ला. जोसेफ स्वान. जॉन कॅंपेबल. कार्ल सागन. आर्थर क्लार्क. बार्बरा मॅकलिंटॉक. अल्बर्ट आइनस्टाइन. सर ख्रिस्तोफर रेन. विक्रम साराभाई. निकोलस लिओनार्द सादी कार्नोत. हेन्री ग्रेटहेड. सर रिचर्ड बर्टन. निकोलस कोपर्निकस. बेंजामिन फ्रॅकलिन.........
अशा एकूण ९४ शास्त्रज्ञांची माहिती देणारे हे पुस्तक.......
आपण ब-याचदा कुणाकडूनतरी स्फूर्ती घेतो. ही स्फूर्तिस्थाने प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असतात. विज्ञानक्षेतातल्या व्यक्तिच्या दृष्टीने वेगवेगळे शास्त्रज्ञ हेच इतर वैज्ञानिकांचे स्फूर्तिदाते असतात. शास्त्रज्ञांचे वर्णन करायचे तर आपल्या मंद प्रकाशाने तेवत राहणा-या या ज्योती पुढच्या अनेक पिढ्यांना वाट दाखवित असतात.
या पुस्तकात केवळ शास्त्रज्ञांचीच चरित्रे आहेत असे नाही, तर काही विज्ञानलेखकांच्या चरित्रांचासुध्दा समावेश आहे. कारण त्यांच्या लेखनाने अनेक तरूणांना विज्ञानक्षेत्राकडे आकर्षित केले आहे.
पृष्ठे-२२२
किंमत-२००
Tuesday, September 13, 2011
मी, संपत पाल
गुलाबी साडीवाली रणरागिणी
आमच्या गॅंगचं अस्तित्व ज्या गावात आहे तिथं गेल्या दोन वर्षापासून वृत्ती बदलू लागली आहे. आम्ही दररोज नवी केस लढतो. त्यातून आपण किती दूरचा पल्ला गाठलाय, हे मला समजतं. आमच्या संघटनेबाबतीत पुरूषांची वृत्तीही बदलली आहे. आमच्या गुलाबी साडीवाल्या बायकांचा ताफा मोहिमवर निघतो तेव्हा लोकांच्या मनावर त्याची छाप पडलीय हे लक्षात येतं. एखाद्या विशिष्ठ उद्देशाच्या समर्थनार्थ आमचं इकत्र येणं त्यांना विचार करायला लावतंय.
मला मनापासून वाटतं की, बायकांची एकी झाली , तर त्या जग बदलू शकतील. त्यांच्यामध्ये द्ढ ऐक्यभावना उपजतच असते आणि मोठी चळवळ उभारण्यासाठी हा अत्यावश्यक गुण आहे. याचा पुरावा म्हणजे गुलाबी साडीवाल्यांचे नवे गट स्थापन करण्यासाठी बायका मला दूरवरुन कुठून कुठून येऊन भेटतात. माझी थोरली मुलगी हिल्लीला- आतारीपासून ८० कि,मि, वर रहाते. तिनं मला सांगितलं की, तिचे बरेचसे शेजारी मी त्यांना संघटीत करावं म्हणून विशेष सहाय्य करायला सांगतात. माझ्या मुली एक दिवस माझ्याच पाऊलखुणा गिरवतील, याची मला खात्री आहे. आमच्या धमन्यात एकच रक्त वाहतयं. त्याही सामाजिक प्रश्नांविरुध्द लढा देतीच. त्या सगळ्या जणी शिवणकामाचे धडे आधीपासून घेत आहेत. ही कुठं सुरवात आहे.
नुकतेच मला काही प्रधान आणि NGO मॅनेजर भेटायला आले होते. माझ्या गॅंगच्या मॉडेलवर आधारित स्त्री-संघटनांबद्दलच्या त्यांच्या कल्पनांबद्दल त्यांना माझ्याशी सल्लामसलत करायची होती. पण आता या टप्प्यावर माझं प्रभावक्षेत्र विस्तारण्याला माझं प्राधान्य नाही. सध्याचं नेटवर्क मजबूत करण्यासाठी अजून बरचं काही करायचं आहे.
मी, संपत पाल
मूळ शब्दांकन. अनी बरथॉड
अनुवाद- सुप्रिया वकील
द गार्डियन ने जगातील शंभर स्फूर्तिदायक स्त्रियांमध्ये संपत पाल यांची निवड केली आहे.
गुलाबी गॅंग..गुलाबी गॅंग....
या साडीनचं आम्हाला लोकप्रिय बनवलं आहे....
पृष्ठे १९२ किंमत १७०
क्लाराज वॉर
नाझीच्या तावडीतून आश्चर्यकारकरित्या वाचलेल्या तरूण ज्यू मुलीची सत्यकथा
अमेरिकेतल्या कीन विद्यापीठाच्या होलोकॉस्ट रिसार्स फौंडेशनच्या अध्यक्ष असणा-या क्लारा क्रेमर जन्माने पोलिश आहेत. लहानपणी नाझीपासून वाचविण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने एका गुप्त बॅंकरमध्ये आश्रय घेतला. त्यांच्याकडे आगोदर घरकाम करणा-या बाईने व तिच्या नव-याने या ज्यू कुटुंबाला मदत केली. हा दारूडा माणूस गावात ज्यूद्वेषी म्हणून प्रसिध्द होता पण क्लाराच्या कुटुंबासाठी तो देवदूतच ठरला. नाझीच्या हाती सापडण्याचे भय, अपु-या अन्नामुळे होणारी उपासमार, सतत कोणी ना कोणी नातेवाईक ठार झाल्याची बातमी कळल्यावर होणारे दुःख हे सगळे सहन करून जवळजवळ एखाद्या थडग्यात राहिल्याप्रमाणे काढलेल्या भयंकर दिवसांच्या अद्याप ताज्या वाटणा-या व त्यांना मदत करणा-या सह्दय माणसांच्या धैर्याला सलाम करावा अशीच ही सत्यकथा आहे.
-पब्लिशर्स विकली
---------------------------------------
जिद्दीने जगणाच्या चिवट झुंजीच्या विलक्षण आठवणी.......नाझी राजवटीच्या वंशविच्छेदाच्या सैतानी कृत्यांची भयंकर कहाणी सांगणा-या या युध्दाच्या आठवणींवर आधारित जबरदस्त पुस्तक.
-डेली टेलिग्राफ, लंडन
-----------------------------------------------
ऐंशी वय पार केलेल्या क्लारा क्रेमर न्यूजर्सीत राहतात. पोलंडमध्ये तळघरात लपून राहत असताना क्लारा क्रेमरनी ठेवलेल्या दैनंदिनीवर हे पुस्तक आधारित आहे. नाझींनी झोल्कीन हे गाव १९४२ मध्ये ताब्यात घेतल्यानंतर लपलेल्या ज्यू कुटुंबामधल्या ताणतणावाचे अतिशय स्पष्ट वर्णन यात आहे. ज्यूद्वेषी घरमालकाने त्यांच्या तळघरात ज्यू कुटंबाना लपविण्याचे विलक्षण धाडस दाखविणे हा भाग फारच ह्दयद्रावक आहे.
-फ्रेडरीक क्रोम लायब्ररी जर्नल
-------------------------------------------------
मूळ लेखिका- क्लारा क्रेमर
अनुवाद- डॉ.प्रमोद जोगळेकर
२१ जुलै,१९४२ रोजी नाझी सैन्यानं पोलंडवर आक्रमण केलं आणि झोल्कीव या छोट्या गावातल्या पंधरा वर्षीय ज्यू मुलीचं, क्लारा क्रेमरचं आयुष्य बदलून गेलं. तिचे मित्र-नातेवाईक ठार केले जात असताना किंवा भट्टीत जळून खाक होण्यासाठी नेले जात असताना ,
क्लारा नि तिचे कुटुंबीय एका तळघरात लपवून जीव वाचविण्यासाठी झगडले. तेदेखील कुठं तर वरकरणी ज्यूद्रेष्टा वाटणा-या बेक नावाच्या जर्मन माणसाच्या घराखाली. साठ वर्षानंतर आता क्लारा क्रेमर तिची करूण कहाणी सांगते आहे.
पृष्ठे- ३०६
किंमत- ३०० रूपये.
काठ
अमृता आणि सोमशेखर यांच्या नात्याच्या माध्यमातून लेखक काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतो.
व्यक्तिला आयुष्यात नक्की काय हवे असते...
स्त्री-पुरूषांना परस्परांकडून नक्की काय हवे असते...
खरे प्रेम म्हणजे काय...
मनोविकारांना आरंभ कसा होतो...
अशा प्रकारच्या नात्यांना आपण एका साच्यात किंवा विवाहाच्या चौकटीत बसवू शकतो का.....
असे असेल, तर मग या नात्यांचे भवितव्य काय.....
अशा अनेक मूलभूत प्रश्नांचा विचार करायला लावण्यातच या कादंवरीच्या यशाचे खरे गमक दडलेले आहे.
डॉ. अंजली जोशी
मानसोपचार तज्ञ
एका संपन्न, सुस्वरूप आणि सुविद्य स्त्रीच्या स्वभावाचे आणि परिस्थितीच्या मानसिक दडपणामुळे आत्महत्येसाठी प्रवृत्त होणा-या तिच्या अंतर्मनाचे चित्रण यात आहे.. स्त्रीच्या मनस्वीतेबरोबरच पुरुषमनाचाही वेध घेण्याच्या लेखकाच्या प्रयत्नामुळे ही केवळ मनोरूगण स्त्रीची आणि उमद्या, कर्तबगार पुरुषाची प्रेमकथा न राहता त्यापलिकडे जाऊन एक सृजनात्मक, मनोवेधी कादंबरी झाली आहे, हे लेखकाचे य़श आहे.
सौ. उमा वि. कुलकर्णी.....अनुवादकाच्या ..चार शब्द.. मधून
मुळ लेखक- डॉ. एस.एल.भैरप्पा
अनुवाद- उमा वि कुलकर्णी
पृष्ठे- ३९२
किंमत- २५०
तिसरी अवृत्ती
खळाळ
लेखक- आनंद यादव
आनंद यादव यांनी कथालेखनाला प्रारंभ केला
तेव्हा त्यांची बरीचशी काव्यरचना झालेली होती.
कविप्रकृतीचे ग्रामीण कथाकार असा त्यांचा पिंड बनला,
त्यांची ग्रामीण जीवनाची आत्मानुभूती,
दीन-दुबळ्यांबद्दलची कणव, मातीची ओढ
हे सर्व गुण जातीवंत व कसदार होते
पण त्याचबरोबर गुणांना व जाणिवेला
कलात्मक संघटन व आकार प्राप्त करून द्यावा,
असा उत्कट ध्यासही त्यांना होता.
या कलात्मकतेसाठी ग्रामीण बोली भाषेच्या सामर्थ्याची
कसोशीने व कल्पकतेने उकल करावी असे त्यांच्या मनाने घेतले.
या तन्मयतेत व तंद्रीत खोलवर शिरताना चिंतनालाच एक नाद व लय असते याचा शोध त्यांना लागला.
या शोधाच्या आधारे ग्रामीण दुखाःच्या चिंतनात्मक निवेदनाचा
जाणीवपूर्क प्रयत्न त्यांनी आपल्या कथातून केला.
या प्रयोगातून ग्रामीण जीवनाचे जे दर्शन घडले ते अभिनव, रोमांचकारी वाटले.
मराठी ग्रामिण कथेच्या विकासातला हा महत्वाचा टप्पा आहे.....
-प्रा. म. द. हातकणंगलेकर
आवृत्ती चौथी
पृष्ठे- १५८
किंमत- १४०
ब्रेन प्रोग्रॅमिंग
नकारात्मक विधानं उलच करा,...सकारात्मक बनवा.
• माझ्या नशीबात सुखच नाही. मी कमनशीबी आहे.
(उलट विधान) मी नशीबवान आहे. मी नेहमी आनंदात असते. मी समाधानी आहे.
*मला लोक खूप त्रास देतात.
(उलट विधान) मला कुणी ना कुणी मदत करणारं भेटतंच. त्रासदायक लोक जगात असले तरी मला मदत करणारीही खूप माणसं भेटतात.
• मी गरीबातच खितपत पडणार.
(उलट विधान) मी श्रीमंत होत आहे. अनेक श्रीमंत लोक गरिबीतून वर आलेले असतात. ही सुरवातीची गरिबीच त्यांना प्रेरणा देते. मलाही काही मार्ग सापडेलच आणि मी श्रीमंत होणारच.
*मी बुध्दीमान, हुशार नाही.
(उलट विधान) परमेश्वर रिकाम्या हातानी कुणालाच पाठवित नाही. मलाही त्यानं काही देणग्या दिलेल्या असतीलच. कदाचित अजून माझ्यातल्या गुणवैशिष्ठ्य़ांची जाणीव मला झालेली नसेल, पण माझ्यातही अशी गुणवैशिष्ठ्ये कोणती, हे मी शोधून काढीनच. परमेश्वरानं जी काही बुध्दी, गुण दिले आहेत. त्यांचा उपयोग करून देण्याचा शहाणपणा माझ्याकडे आहे.
*माझं व्यक्तिमत्व प्रभावशीली नाही.
(उलट विधान) माझ्यात काहीतरी वेगळेपणा निश्तिच आहे. माझ्यातल्या गुणवैशिष्ठ्यांचा शोध घेऊन मी माझं व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवीत आहे.
*माझे मित्र मला नेहमी फसवितात.
(उलट विधान) मी इतरांना फसवीत नाही आणि इतरांकडून फसवूनही घेत नाही. तेवढं चातुर्य़ माझ्यात निश्चित आहे. मी हितैषी व्यक्तीशीच मैत्री करतो....
ब्रेन प्रोग्रॅमिंग
डॉ. रमा मराठे
ब्रेन प्रोग्रॅमिंगमुळे आयुष्यात घडू शकणारे चमत्कार उलगडून दाखविणारे पुस्तक
पृष्ठे- १६०
किंमत- १५०
मी रूक्मिणी
श्रीकृष्णाच्या पट्टराणीने उलगडलेल्या तिच्या मनातील भावभावनांचे आत्मनिवेदन
लेखिका- सुवर्णा ढोबळे
श्रीकृष्णावरचे अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध असले, तरी रुक्मिणीवर रूक्मिणीस्वयंवराचा प्रसंग वगळता अन्य प्रकारे फारसे लेखन झाल्याचे नाही. रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहून आपले हरण करण्यास सांगितले, हे सर्वश्रुत असले तरी श्रीकृष्ण प्रदीर्घकाल व्दारकेबाहेर असताना व्दारकेचा राज्यकारभार खंबीरपणे हाताळणारी आणि उत्तम निर्णयक्षमता असलेली राज्यकर्ती ही रुक्मिणीची ओळख या पुस्तकातून समोर येते. अन्य सात राज्यांवर आपल्या पट्टराणीपदाचा पुरेसा वचक ठेऊनही त्यांच्याशी स्नेहाचे संबंध राखून राणीवशातील वातावरण शांत व स्थिर ठेवण्याचे कर्तव्यही रुक्मिणीने पार पाडले.
रुक्मिणीच्या भावभावना व्यक्त करत श्रीकृष्णाच्या जीवनातील संपूर्ण घटनाक्रम तिच्याच शब्दत उलगडत नेण्यात आला आहे.
रुक्मिणीचा जन्म, तिच्या जीवनातील घटना या संपूर्णपणे वास्तवाशी संबंधीत आहेत. महाराणी द्रौपदी किंवा राजमाता कुंतीयाच्या जीवनातील अनेक प्रसंगाभोवती मंत्र, तंत्र, चमत्काराचे वलय आहे. तसे या व्यक्तिरेखेच्या जीवनप्रवासातील घटानांशी नाही. तिला मनःशक्तीच्या सामर्थ्याने काही घटनांचा प्रत्यय किंवा पूर्वसूचनांची प्रचिती काही प्रसंगी आली होती. पण ते तिच्या मनःशक्तीचे बळ होते.
महाभारत, यादवांचा कुलसंहार येथपर्यंत संपूर्ण जीवनपट रुक्मिणी स्वतःच आत्मकथनाच्या स्वरुपात मांडते. तिचे अन्य सर्वांशी असलेले नाते उलगडता उलगडताच अखेरीस तिला आपण स्वतः लक्ष्मी देवतेचा दिव्यत्वापर्यंत झालेला हा प्रवास आहे.
पृष्ठे- ३५८
किंमत- ३२०
Monday, September 12, 2011
क्लाराज वॉर
नाझीच्या तावडीतून आश्चर्यकारकरित्या वाचलेल्या तरूण ज्यू मुलीची सत्यकथा
मूळ लेखिका- क्लारा क्रेमर
अनुवाद- डॉ.प्रमोद जोगळेकर
२१ जुलै,१९४२ रोजी नाझी सैन्यानं पोलंडवर आक्रमण केलं आणि झोल्कीव या छोट्या गावातल्या पंधरा वर्षीय ज्यू मुलीचं, क्लारा क्रेमरचं आयुष्य बदलून गेलं. तिचे मित्र-नातेवाईक ठार केले जात असताना किंवा भट्टीत जळून खाक होण्यासाठी नेले जात असताना ,
क्लारा नि तिचे कुटुंबीय एका तळघरात लपवून जीव वाचविण्यासाठी झगडले. तेदेखील कुठं तर वरकरणी ज्यूद्रेष्टा वाटणा-या बेक नावाच्या जर्मन माणसाच्या घराखाली. साठ वर्षानंतर आता क्लारा क्रेमर तिची करूण कहाणी सांगते आहे.
हे पुस्तक लिहिताना मी माझ्या न्यूजर्सीतल्या एलिझाबेथ येथील घराच्या किचनमधून बाहेर पडून माझ्या झोल्किवमधल्या घरात गेले आहे असं सारखं वाटत होतं. या पुस्तकात मी लिहलेल्या घटना जरी साठ वर्षापूर्वी घडलेल्या असल्या तरी, या एवढ्या काळात त्या माझ्या मनातून क्षणभरासाठी दूर झाल्या नव्हत्या. त्यावेळच्या हत्त्याकांडातून माझ्यासारखे जे लोक वाचले आहेत, त्यांच्याप्रमाणे मलाही ते सगळं अगदी कालपरवा घडलं असावं असं वाटतं.
मी आज ८३ वर्षाची आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजते. ज्या दिवशी मी बंकरमधून बाहेर पडले त्या दिवसापासून मी उत्तम जीवन जगण्यासाठी जे जे करावं लागेल ते सर्वतोपरी केलं आहे. होलोकॉस्टबद्दल लोकांमध्ये जागृती करण्यसाठी मी माझं सार जीवन समर्पित केले आहे. मी वाचले, ही माझ्यावर झालेली कृपा आहे. म्हणूनच जे वाचू शकले नाहीत त्यांची कहाणी जगाला सांगायची जबाबदाही माझ्यावर आहे, असं मी मानते.
मी बंकरमध्ये १८ महिने काढले होते. त्यावेळी मी जी डायरी लिहीत असे, ती आता वॉशिंग्टन डी.सी. इथल्या होलोकॉस्ट म्युझियममध्ये ठेवलेली आहे. बंकरमध्ये असताना माझ्याकडे कागदांचा तुटवडा होता. पेन्सिलचं अवघं एक थोटूक माझ्यापाशी तेव्हा होते. शिवाय बंकरमद्ये उजेड जवळपास नसायचाय तरीदेखील मला जमेल तेवढ्या घटनांच्या नोंदी ठवण्याचा प्रयत्न मी केला होता.
(क्लारा क्रेमर यांनी लिहलेल्या पुस्तकातील टिपणातून)
पृष्ठे- ३०६
किंमत- ३०० रूपये.
Subscribe to:
Posts (Atom)