
तुमच्या मूर्ती म्हणजे काय असते... आदिवासी
मूर्ती दगडाची, धातूची प्रतिकृती...चेतन
प्रतिकृती कोणची...आदिवासी
माणसांची...चेतन
माणसांच्या मदतीला येतात ते देव.
आमच्या मदतीला आमची झाडं येतात म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो.
झाडात जीव असतो. ती पुनःपुन्हा उगवतात.
तुमचे धातूचे देव असे पुनःपुन्हा उगवतात का..
किमान मातीच्या मूर्ती तरी तुम्ही करायला हव्यात. माती गर्भार रहाते.
मूर्ती फुटली, तर त्या मातीतून काही ना काही जन्माला येतं. झाडं, किडे, प्राणी..
कारण मूर्तिरुपात असताना आपण श्रध्दा पेरलेली असते.
धातू साधा ध्वनी स्वीकारु शकत नाही. त्याचा प्रतिध्वनी तो परत करून टाकतो.
तो तुमच्या प्रार्थना काय स्वीकारेल....
ह्या त-हेची कादंबरी नसली, तरी कथा मराठीत आहे. रुपक-बंधात जी.ए. कुलकर्णींनी आपले अनेक विचार मांडले. माझ्या सर्व लिखाणात कदाचित सर्वाधिक मला आवडलेलं हे लेखन असेल. कारण अनेक विचार जे मनाच्या अंधा-या कोप-यात होते, जे मलाही माहित नव्हते असे लिखाणात अचानक अवतरले.
अज्ञेय..हा स्त्रीवादापलिकडच्या मनुष्याचा शोध आहे. भावनिक व वैचारिक. त्या प्रवासात माझ्यासोबत वाचकांनीही असावं, ह्याहून अधिक आनंद कोणता...
(अज्ञेयच्या निमित्ताने.....सौ. रेखा बैजल)
रेखा बैजल
पृष्ठे- १०६ किंमत- १००
No comments:
Post a Comment