Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Wednesday, July 4, 2012
अनलाईकली हिरो...ओम पुरी
अनलाईकली हिरो ओम पुरी...
या पुस्तकात ओम पुरी यांचे खासगी आयुष्य, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांची अस्वस्थता, त्यांच्या ह्दयातील वेदना यांचे दर्शन घडते.
पंजाबातून डोळ्यात स्वप्ने घेऊन आलेला मुखदुर्बळ कलाकार, एनएसडीमधील जातिवंत `फ्लर्ट`, खाण्याचा शौकीन व उत्तम कूक आणि पूर्णतः कुटुंबवत्सल माणूस..ओम पुरी यांची विविध रुपे या पुस्तकात पाहायला मिळतील.
कुटुंबातील सदस्यांबरोबरच्या गमतीदार प्रसंगाची मालिका, भारतीय आणि ब्रिटिश चित्रपटसृष्टीतील व्यक्तिंच्या सहवासातील अनेक धक्कादायक घडामोडी,प्रेमप्रकराणातील रहस्य यांचा उलगडा या पुस्तकातून होईल. अतिशय दुर्मिळ आणि वैशिष्ठ्यपूर्ण छायाचित्रांचाही आस्वाद घेता येईल.
मार्मिक,प्रामाणिक आणि उत्साहपूर्ण शौलीत लिहलेली ही कहाणी म्हणजे देशातील एका गुणवंत कलाकाराच्या कार्याचा गौरव आहे.
`सिटी ऒफ जॊय` या चित्रपटात ओम पुरी सोबत काम केलेल्या पॅट्रिक स्वेझ या दिवंगत अभिनेत्याने त्यांच्या त्याच्या आयुष्यावर पडलेला प्रभाव पुस्तकात सांगितला आहे.
प्रसिध्द समीक्षक डेरेक माल्कम यांनी ओम पुरी यांची गुणवत्ता आणि कलेचा प्रचंड परीघ यांचा आढावा घेतला आहे.
नसरुद्दीन शाह यांनी `नॅशनल स्कूल ऒफ ड्रामा`पासून सुरु झालेल्या त्यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या क्षितिजावर ओम पुरी या ता-याचा उदय होण्याची कहाणीही पुस्तकात वाचावयास मिळेल.
मूळ लेखिका- नंदिता सी. पुरी.
अनुवाद- अभिजित पेंढारकर
पृष्ठ- १८४
किंमत- २२० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
Subscribe to:
Posts (Atom)