Monday, July 25, 2011

ती दोघं, डॉ. रमा मराठे



पुस्तकाच्या मागील पानावर पुस्तकाचा कथाविषय सांगणाऱ्या आशयाचा सारांश मांडणाऱ्या- मोजक्या ओळी असतात निर्मितीच्या प्रक्रियेत ‘मागे’ राहून ‘बोलकी’ आणि मोलाची कामगिरी करणारे हे समर्थ सारांश..

ती दोघं!

वेगवेगळ्या स्वभावांची.. वेगवेगळ्या काळातली..

नातं एकच-पती-पत्नी, नर-मादी, प्रियकर-प्रेयसीचं!
पण भावबंध अनेकविध..

.. कधी यौवनाचं, सौंदर्याचं आकर्षण

कधी तिचं विशाल आईपण
कधी त्याच्या मनाचं मोठेपण
कधी त्याचं फक्त व्यवहारी मन
कधी दोघांचं एकमेकांत विरघळून जाणं
कधी एकमेकांना पुरतं ओळखून असणं
कधी त्रिकोण प्रेमाचा.. कधी खेळ दुर्दैवाचा
कधी न संपणारं रितेपण तर कधी जगावेगळं समर्पण
कधी प्रेमाला झालर मनमोकळेपणाची
कधी किनार काळी, संशयाची, प्रतारणेची
कधी ती दोघं फक्त समांतर रेषा,
कधी शब्दावीण फक्त डोळ्यांचीच भाषा
कधी ओढ फक्त शरीराची- भोगवादी
कधी ती दोघं फक्त नर आणि मादी..
क्वचित इतर कोणतंही नातं इतकं विविधरंगी असेल..

हे नातं व्यक्त करणारी भाषा काळानुरूप, संदर्भ आणि प्रसंग त्या त्या वेळच्या सामाजिक संकेतानुसार!
पण ‘भावना’ त्याच.. आदिम!
एकविसाव्या शतकात वावरणाऱ्या तरुणतरुणींसाठी नात्यांचे अर्थच धूसर झाले आहेत.

मेहता प्रकाशन
पृष्ठे - १५४,
मूल्य - १३० रुपये

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=112&Itemid=125