Thursday, August 18, 2011

अनकंडीशनल लव्ह


एका तरुण स्त्रीची, क्षमाशीलतेच्या दिशेन केलेल्या वाटचालीची काळीज हेलावून टाकणारी सत्यकथा
जितकी प्रेरणादायक, तितकीच ह्रदयस्पर्शी

एल्हा अगियानोचा खून दहा वर्षापूर्वी तिचा नवरा ब्रुनो यानं केला. त्यांच्या चार मुलांपौकी तिघांनी वडिलांशी संबंध ठेवणं नाकारलं, त्यांना वडिलांबरोबर एक शब्दही बोलायची इच्छा नहती. नवलाची बाब म्हणजे त्यांच्या तिस-या अपत्यानं नतालियानं आपले वडिलांबरोबरचे संबंध कायम ठेवले. एवढंच नहे, तर तुरुंगात त्यांना वरचेवर भेटून तिनं त्यांचा विश्वास, प्रेम आणि मैत्री संपादन केली. 2006 साली ब्रूनोला तुरुंगातच मूत्रपिंडाच्या कर्करोगानं मृत्यू आला.
ही कहाणी या नतालियाची अचंबित करून सोडणारी! प्रेमळ आणि एकनिष्ठ एल्हा समुद्रकिना-यावरच्या एका छोट्याशा गावात लहानाची मोठी झाली. तिच्यापेक्षा वयानं ब-याच मोठ्या असलेल्या एका देखण्या तरुणाशी तिचे प्रेमाचे धागे बांधले गेले. प्रेमात आकंठ बुडालेल्या एल्हाची एकच इच्छा होती ब्रुनोशी लग्न करून प्रेमळ पत्नी आणि कर्तयदक्ष आई म्हणून जगायचं. परंतु तिच्या पूर्वायुष्यातल्या एका काळ्याकुट्ट गुपितामुळे ती आपल्या नव-याच्या शंकेखोर, कुढणा-या, स्वार्थी, आत्मकेंद्रित स्वभावाला बळी पडली. घराच्या चार भिंतींच्या आड तिचं आयुष्य बंदिस्त झालं. तिच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.
नव-याच्या जुलमी स्वभावाचा केवळ तीच नहे तर तिची मुलंही बळी ठरली. त्यानं या सगळ्यांची शारीरिक, तसंच मानसिक छळवणूक केली. या सगळ्याला कंटाळून वयाच्या 17 या वर्षी नतालिया घराबाहेर पडली. पण तिथेही तिच्या वाट्याला दुर्दैवाचे दशावतारच आले. आयुष्य एकटीच्या हिमतीवर जगायचं आहान तिनं स्वीकारलं खरं; पण तसं करताना तिची अनेकवेळा, अनेक प्रकारे फरफट झाली. शेवटी तिनं एल्हाला घर सोडून बाहेर पडण्यास उद्युक्त केलं. सगळ्यात धाकट्या मुलाला डॅनियलला घेऊन एल्हा बाहेर पडली अन आयुष्यात पहिल्यांदाच तिला स्वातंत्र्याची गोडी चाखायला मिळाली. पण तिचं नशीब बलवत्तर नहतं, हेच खरं! ब्रुनोनं तिला विनंती केली, `डॅनियलला भेटायची फार इच्छा आहे, एकदा त्याला घेऊन ये ना!' भोळ्याभाबड्या; परंतु भयशंकित एल्हानं त्याची विनंती मान्य केली. ती नव-याच्या घरी गेली अन त्यानं सुरीचे वार करून तिचा निर्घृण खून केला. अनेक अडचणींना तोंड देऊन नतालियानं वडिलांना आधार देण्याचं अपरिमित धैर्य दाखवलं. परिणामी, तिच्या उरल्यासुरल्या कुटुंबाची भावंडांची अन् तिची फारकत झाली. एक मानसिक रुग्ण असलेल्या ब्रूनोला कडक सुरक्षायवस्था असलेल्या मनोरुग्णालयात रॅम्पटन या गावी ठेवण्यात आलं. तिथेच त्यांना भेटताना नतालियाला हरवलेलं पितृप्रेम पुन्हा एकदा हळूहळू गवसलं. या प्रदीर्घ वाटचालीत तिला आईच्या एकमेव, परंतु मौल्यवान उपदेशाची साथ लाभली प्रेम करायचं तर निरपेक्ष आणि नि:स्वार्थी भावनेनं! तेच खरं प्रेम!

मूळ लेखक : नतालिया अगियानो
अनुवादक : नीला चांदोरकर

पृष्ठे : 272 किंमत : 260

कीप ऑफ़ द ग्रास



अमेरिकेतून बंगलोरमध्ये शिकायला आलेला सम्राट रतन आपला वेळ मारिजुआना ओढण्यात विपश्यना, ध्यानधारणा करण्यात घालवतो. हा सगळा उतरणीचा प्रवास त्याला कुठे घेऊन जातो ?..त्यातून तो सावरतो का ?...वाचा करण बजाज यांच्या पहिल्या-वहिल्या गतिमान कादंबरीत..

मूळ लेखक : करण बजाज
अनुवादक : माधुरी शानभाग
पृष्ठे : 174 किंमत : 160

Wednesday, August 17, 2011

येस!


मन:परिवर्तन शास्त्रातील ५० गुपितं

छोटेसे बदल तुमच्या मन:परिवर्तक शक्तीत मोठा बदल करू शकतात.
-लेखन साहित्यातील कोणत्या वस्तू, इतरांचे मन:परिवर्तन
प्रकर्षाने करण्याचे तुमचे प्रयत्न, अधिक परिणामकारक ठरू शकतात?
- तुमच्यातील मन:परिवर्तकता इतरांपेक्षा 50टक्के ने वाढविण्यासाठी
तुम्ही आज कोणता एक शब्द वापरण्याची सुरुवात करू शकता?
-कारणावली दिल्यानंतर लोक `मर्सिडीज'ची निवड करतील;
की लोक बीएमडब्ल्यू पसंत करतील?
-आणि बहुतांश `डेन्टिस्ट' हे डेनीस का म्हणविले जातात?

तुमच्या सहका-यांनी तुमच्याशी अधिक वेळा सहमत होणे, तुमच्या पाल्यांनी गृहपाठ करणे आणि शेजा-यांनी तुमच्यावर कचरा न टाकणे हे बहुतेक तुम्ही निश्चितपणे पसंत कराल.
`आपल्याला हवे ते इतरांनी करावे' असे मन:परिवर्तन करण्याच्या आवाहनास आम्हाला रोजच सामोरे जावे लागते. पण लोक कशामुळे आपल्या विनंतीस `होकार' देतात?
मन:परिवर्तनाच्या मानसशास्त्रावर 60 वर्षापासून केलेल्या संशो­धनाच्या आधीन राहून या पुस्तकात ब-याच लक्षणीय अंतरंगाच्या यथार्थ ज्ञानाचा उलगडा केला आहे. त्याचा निश्चितच तुम्हाला घर व कार्यालय दोन्ही ठिकाणी अधिक
मन:परिवर्तन होण्यासाठी मदत होईल.
`प्रभाव' या विषयाचे तज्ज्ञ म्हणून जगात ज्यांचा संदर्भ दिला जातो असे प्रोफेसर रॉबर्ट सियाल्दीनि याच्या साहच-याने लिहिलेल्या `येस!' या पुस्तकातून वौज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेल्या मन:परिवर्तनाच्या अनेक सूचना दिल्या आहेत,
ज्या तुमच्या मन:परिवर्तन शक्तीस पुष्टी देतील त्या गमावणे तुम्हाला नक्कीच आवडणार नाहीत. एखाद्याला त्याचे औष­ध घेण्यासाठी असो, त्याचा रस्ता कमी करावयाचा असो किंवा त्याला मत देण्यासाठी असो, तुम्हाला जर प्रेरित करावयाचे असेल तर, "येस!'ने तुमच्या विनंतीत छोटेसे बदल केल्यामुळे तुमच्या यशात कसे नाट्यपूर्ण परिणाम होऊ शकतात,
हे दाखवून दिले आहेत.

मूळ लेखक : रॉबर्ट बी. सीअलडिनी
अनुवादक : डॉ. धरणीधर रत्नालिकर

पृष्ठे : 192 किंमत : 200

अग्ली


आईने सख्ख्या मुलीवर केलेल्या अनन्वित अत्याचारांची कथा, मुलीच्या स्वताच्या शब्दात

मी माझा शाळेचा फोटो आईला दिला. तिने माझ्या फोटोकडे नीट निरखून पाहिले. नंतर माझ्याकडेही बारकाईने पाहिले. ""देवाऽ, ही कार्टी इतकी कुरूप कशी जन्माला आली? अरे देवा, किती कुरूप आहे ही... कुरूप. कुरूप.'' क्रूर, विद्ध करणारे हे शब्द ही केवळ सुरुवात आहे.

कॉन्स्टन्सच्या आईने अतिशय पद्धतशीरपणे, कायम आपल्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. सततची मारझोड आणि उपासमार ह्यामुळे पराकोटीची निराश होऊन तिने शेवटी सामाजिक सेवाभावी संस्थेमध्ये आश्रय घेण्याचाही प्रयत्न करून पाहिला. तिला अक्षरश: वा-यावर सोडून तिची आई चक्क दुसरीकडे राहायला निघून गेली. घरात गॅस नाही, वीज नाही, खायला अन्न नाही अशा बिकट परिस्थितीशी मुकाबला करीत कॉन्स्टन्सने दिवस काढले. सुरुवातीच्या अत्यंत यातनामय जीवनाला कॉन्स्टन्सने कमालीच्या धैर्याने तोंड दिले. कॉन्स्टन्सच्या हृदयद्रावक आणि यशस्वी जीवनसंग्रामाची ही कथा.

मूळ लेखक : कॉन्स्टन्स ब्रिस्को
अनुवादक : उल्का राऊत

पृष्ठे : 280 किंमत : 250

दॅट थिंग कॉल्ड लव्ह


मुंबईच्या पावसात बहरलेली आगळी प्रेमकहाणी

पावसाच्या पार्श्वभूमिवर, मुंबईसारख्या
मायानगरीत उलगडलेल्या प्रेमकहाण्या.

आपली आदर्श पत्नी, सखी
एका विवाहितेमध्ये शोधणारा उमदा, तरुण,
जाहिरात यवस्थापक.

पत्नीला पूर्वाश्रमीच्या प्रियकराला विसरता यावे,
म्हणून वाट बघणारा सहनशील पती.

स्त्रीलंपट पण दिलदार पुरुष आणि प्रत्यक्षात
कॉलगर्ल असलेली रिसेप्शनिस्ट यांच्यात सुरू
असलेल्या प्रेमाच्या शोधाचे भेदक दर्शन
करणारी कादंबरी.

मूळ लेखक : तुहिन ए सिन्हा
अनुवादक : श्यामला घारपुरे

पृष्ठे : 208 किंमत : 200

ब्लड मनी




गुप्तहेर खात्यातील उपायुक्त मरिनर सुट्टी घेणार, इतक्यात "डे' नर्सरीच्या पाळणाघरातून सहा आठवड्यांच्या जेसिका क्लिनमानचे अपहरण होते. त्याची रजा रद्द होते. या पब्लिक केसमध्ये मरिनर पुढाकार घेतो. सुरुवातीला केवळ एक अपहरण वाटणारी ती घटना नंतर नियोजनबद्ध योजना वाटू लागली. हेतू स्पष्ट होईपर्यंतच मरिनरला शोध लागतो की, अपहरण झालेल्या मुलीचे वडील शास्त्रीय संशोधन कंपनीत काम करत आहेत आणि प्राणी हक्कांसाठी लढणा-यांचे ते लक्ष्य आहेत. दोन दिवसांनी ही घटना जेव्हा आश्चर्यजनकपणे समोर येते, तेहा एका तुटक मजकूराच्या चिठ्ठीमुळे निश्चित होते की, प्राणी हक्क संरक्षण करणारेच लोक या भीती घालण्यामागे आहेत. पण पाळणाघरातील एक कर्मचारी जेहा एका गाडीखाली मारली जाते, तेहा ही केस ख-या अर्थाने खुलते.... वातावरण आणि यक्तिरेखेचे मार्मिक आणि चटपटीत वर्णन करणारी, कोलेट एक उत्तम लेखिका आहे... तिचे अधिक लेखन स्वागतार्ह....!

-यॉर्कशायर पोस्ट.

मूळ लेखक : क्रिस कोलेट
अनुवादक : वैशाली कार्लेकर

पृष्ठे : 224 किंमत : 200

माय स्ट्रोक ऑफ़ इन्साइट


मेंदू शास्त्रातील संशोधिकेने स्वताच्याच मेंदू विकाराशी दिलेली कड़वी झुंज

दैनंदिन जीवनात विचारांचे ओझे घेऊन वावरत असताना आपण डाव्या मेंदूच्या प्रभावाखाली असतो. डाव्या मेंदूचा प्रभाव कमी होऊन जरा उजव्या मेंदूच्या अधिपत्याखाली वावरल्यावर आपले शारीरिक स्वास्थ्य आणि आंतरिक मानसिक शांतता यांचे विविध स्तर उलगडले जातात. मानवी मनाच्या या प्रवासाचा अभूतपूर्व आणि उत्कंठावर्धक आलेख डॊ. जिल बोल्त टेलर यांनी `माय स्ट्रोक ऒफ इन्साइट`मध्ये मांडलेला आहे.

हे झटका किंवा मेंदूला झालेल्या दुखापतीवरील शस्त्रक्रियेनंतर पूर्ववत तंदुरूस्त होण्याकरिता मार्गदर्शक आणि अत्यंत उपयुक्त असे पुस्तक आहे.

मूळ लेखक : डॉ. जिल बोल्त टेलर
अनुवादक : दिगंबर बेहेरे

पृष्ठे : 208 किंमत : 200

संधीकाल


..अशाश्वतेकडून शाश्वतेकडे नेणारी कालरेषा. मन्वंतराची राघववेळ..अंधार-प्रकाशीचा प्रदोषकाल ... संधीकाल

काळाच्या प्रवाहात आजपर्यंत प्रत्येक जीनवप्रणाली अयशस्वी ठरली आहे. कुठल्याच तत्वज्ञानावर विश्वास उरलेला नाही. हा संधीकाल या कादंबरीतला महात्वाचा मुद्दा आहे.
विज्ञानाने जीवनाच्या प्रत्येक अंगाला निश्चितता देण्याचा प्रयत्न केला आहे,पण सुख वाट्याला येण्याऐवजी विवंचनाच आली. अशा काळाच्या विचित्र धारेवर अपला प्रवास चालू आहे. त्या संधिकाल अवस्थेची कहाणी या पुस्तकात आहे.

लौकिक जीवनात अशांतता..पारलौकिक जीवनाच्या अस्तित्वाविषयी खात्री नाही.. कुणीतरी सांगतय म्हणून विश्वास ठेवण्याइतका अडाणीपणा नाही.. जगण्या-मरण्यातील गुढता उकललेली नाही..

-लेखक : मिलिंद गाडगीळ

पृष्ठे : 368 किंमत : 320