Tuesday, August 23, 2011

ऐतिहासिक कादंबरी म्हणजे तारेवरची कसरत

- लीना सोहोनी


कादंबरीचे प्रकाशन करताना माधवराव चितळे.


ऐतिहासिक घटना , घडामोडी आणि व्यकितरेखांबाबत समाज जागरूक असतो. त्यामुळे ऐतिहासिक कादंबरी लिहिताना संबंधीत व्यक्तिरेखेबाबत आजपर्यंतचे संदर्भग्रंथ, त्याबाबतची मते, याचा सारासार विचार करून ती लिहावी लागते. अशा प्रकारची कादंबरी लिहिणे म्हणजे तारेवरची कसरत असते,असे मत ख्यातनाम लेखिका लिना सोहोनी यांनी व्यक्त केले.
सुवर्णा ढोबळे लिखित मी रूक्मिणी या कादंबरीचे पकाशन औरंगाबाद इथे मराठवाडा महसूल प्रबोधिनीत रविवारी झाले.
ऐतिहासिक कादंबरी लिहिताना लेखकास इतिहास आणि साहित्याचे भान ठेवून करावे लागते. असेही लिना सोहोनी यांनी म्हटले.
कार्यक्रमाचा समारोप ककताना माधवराव चितळे म्हणाले, रामायण, महाभारत या ऐतिहासिक ग्रंथांची अनेक भाषांतरे झाली आहेत. यातून जीवनमूल्ये प्रत्यक्षात आचरणात आणताना कशा प्रकारच्या अडचणी येतात आणि त्यावर मात कशी करावी याबाबतची शिकवण मिळते.
लेखिका ढोबळे यांनी आपल्या मनोगतात कादंबरी लिहिण्याची प्रेरणा स्वाध्याय परिवाराच्या संपर्कामुळे लाभल्याचे सांगितले.

(लोकमत दि. २२ .८.२०११ च्या औरंगाबाद अंकातून साभार)

अस्वस्थ समाजाचे लेखन करणारी `संधीकाल`



-विक्रम गोखले

पुणे दि.१२- आजच्या अस्वस्थ समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे कादंबरीतले प्रत्येक पान आहे. जगातला आजचा समाज कुठे चालला आहे याचा शोध या कादंबरीत घेतला आहे. मनःपूर्वक वाचायला आवडणा-या वाचकाकडून हे लेखन दुर्लक्ष होवू नये असे मला आवर्जून वाटते. संधीकाल या मिलिंद गाडगीळ लिखित कादंबरीच्या प्रकाशन प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपल्या भाषणात कादंबरीबद्दल मत मांडताना केलेले विधान पुस्तकाचे महत्व सांगणारे आहे.

मेहता पब्विशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या संधीकाल या पुस्तकाचे प्रकाशन विक्रम गोखले यांच्या हस्ते शुक्रवार १२ ला पुण्यात
पत्रकार संघाच्या सभागृहात झाले. या प्रसंगी अविनाश पंडीत, मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनिल मेहता आणि ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर उपस्थित होते.

विक्रम गोखले यांच्या मते आजच्या गतीमान जीवनात सामान्य माणूस कसा संभ्रमात पडलाय याचा प्रखर अनुभव सांगणारी ही कादंबरी आहे. ती वाचकाला अस्वस्थ करते.कुठल्याही कलाकृतीचे यश तो अनुभव वाचकाला किंवा रसिकाला कितपत अस्वस्थ
करते यावर आहे. संधीकाल तुम्हाला अस्वस्थ करते यातच तीचे श्रेय असल्यचे ते सांगतात. `काय आहे हे जिवन ह्याचे कुतूहल माणसाला असते. माणसाच्या जगण्याचा शोध ललित साहित्यात घेतला जातो.

संकटातून सुटका करण्यासाठी वाचन आवश्यक असल्याचे मत, ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी आपल्या भाषणात सविस्तरपणे मांडले.
आपल्या पहिल्या कादंहरीला मेहतांसारखे प्रकाशक लाभल्यामुळे वाचकांपर्यत आपले लेखन पोहचेल याची खात्री व्यक्त करून आपला नवोदितपणा मेहतांकडे कुठोही आड आला नाही. याला प्रतिसाद कसा मिळतोय याबद्दल आपण उत्सुक असल्याचे
लेखक मिलिंद गाडगीळ यांनी सांगितले.

मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या संधीकाल मध्ये लेखकाने आपल्या विचार प्रभावीपणे मांडल्याचे आणि त्यातूनच आशय, निर्मिती आणि् मुखपृष्ठ सारेच उच्च गुणवत्तेचे झाल्याचे मत संपादकीय संस्कार करणारे श्री. अविनाश पंडीत यांनी व्यक्त केले.

प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.

Monday, August 22, 2011

पुस्तकांची हंडी


सुमारे ३०१७ पुस्तकातून प्रत्यक्षात अवतरेलीली ही पुस्ताकांची हंडी मेहता पब्लिशिंग हाउसच्या पुण्यातल्या दुकानात सजली आहे.



गेली चार वर्ष अशी पुस्तकांची मांडणी करून दहीहंडीची लाकप्रियता याही रुपाने वाचकांना आकर्षित करेल.


बाजीराव रोडवरच्या दुकानात तीन-चार दिवस ती सर्वांना पाहता येईल.
दुकानातल्या सर्वांचीच मदत घेऊन सौ. सेध्या कुलकर्णी यांनी ती रचली आहे.

शरीर स्वास्थ्यासाठी मन शांत ठेवणे गरजेचे



- डॊ. ह.वि. सरदेसाई

पुणे- `बहुतेक पेशंट आपल्याला त्रास काय होतो ते स्वतःच सांगतात, यामुळे डॊक्टरांना निदान योग्य करता येत नाही. म्हणून निट उपचार होत नाहीत. नेमके कारण जर सांगितले तर उपचारही नेमका होतो. `धन्वंतरी घरोघरी`या पुस्तकात काही मूलभूत गोष्टी सर्वांना कळाव्यात असा प्रयत्न केला आहे. ८५ टक्के रोग हे मनातून निर्माण होतात. म्हणूनच शरीर टिकवायचे असेल तर मन शांत ठेवणे गरजेचे आहे,` असे मत डॊ. ह वि सरदेसाई यांनी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी केलेल्या आपल्या भाषणात व्यक्त केले. प्रकृती चांगली ठेवायची असेल तर सकस संतुलीत आहार, नियमीत व्यायाम आणि स्वच्छता ह्या त्रिसूत्रींची गरज असल्याचे डॊ. सरदेसाई सांगतात.

डॉ. सरदेसाई आणि डॉ. अनिल गांधी लिखित "धन्वंतरी घरोघरी' या पुस्तकाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते शनिवारी, २० ऒगस्टला पुण्यात एस. एम. जोशी सभागृहात करण्यात आले. त्या वेळी डॉ. सरदेसाई बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती होते. मेहता प्रकाशनचे सुनील मेहता, डॉ. प्रदीप गांधी, डॉ. शशांक शहा, डॉ. गांधी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

आजारी पडल्यानंतर काय करावे यापेक्षा आजारी पडूच नये यासाठी प्रत्येकाने काय काळजी घ्यावी हे सांगण्याचा या पुस्तकात प्रयत्न केला असल्याचे सांगून डॊ. अनिल गांधी यांनी `घरोघरी` हे पुस्तक `धन्वंतरी`चे काम करील असा विश्वास याप्रसंगी बोलताना प्रकट केला.

आज डॊक्टर पेशंट नात्याची घसरण झाली आहे. समाजाची नितिमत्ताच घसरली आहे. याला हा व्यवसाय तरी कसा वेगळा राहू शकेल? असा प्रश्न निर्माण करून फॅमिली डॊक्टर ही संस्था एकेकाळी बळकट होती. आज तीचे अस्तीत्व नाहीसे झाल्यासारखे आहे. ती संस्था पुन्हा टिकविण्याची गरज असल्याचे मत डॊ. गाधी यांनी बोलून दाखविली.

एक निरोगी पेंशंट म्हणून या कार्यक्रमाला आपण आल्याचे सांगून शिवशाहिर बाबासाबेब पुरंदरे यांनी डॊक्टर हे देव आहेत ही भावना आजही आपल्या मनात असल्याचे सांगून आपल्याला काहीतरी होतेय ही भिती सतत मनात असते ती दूर करण्याचा मंत्र या डॊक्टरांकडेच असतो. डॊक्टर ही संस्था कीती उपयुक्त आहे याचा अभ्यास इतिहासाच्या अभ्यास करताना आपल्याला लक्षात आल्याचे ते उदाहरणातून पटवून देतात.
औषधांबराबरच पेशंटना आज दिलासा देणे गरजचे आहे. पेशंटच्या मनात डॊक्टरांविषयी विश्वास निर्माण होण्याची गरज आहे. एके काळ आम्ही वैध्यक शास्त्रात प्रगत होतो याचे दाखले इतिहासात आहेत. आजही नवे शोध या शास्त्रात होत आहेत. मधुमेह, जलोदर याच्यावर आपल्याकडे प्रयोग का होत नाहीत ही वेदना जाणवते. ते जर होत असतील तर त्यावर अभ्यासपूर्वक लिहले जावे अशी इच्छा पुरंदरे यांनी व्यक्त केली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॊ. एच.के .संचेती यांनी पुर्वी फॅमिली डॊक्टर हाच घरातलाच एक सभासद होता. तोच निर्णय घ्यायचा. ते वर्चस्व आम्ही डॊक्टर मंडळींनी घालविले आहे. जो व्यवसाय होता त्याचा आज धंदा झालाय. देवमाणूस ऐवजी कसाई असल्याची डॊक्टरांवीषयीची भावना माणसांच्या मनातून काढून टाकणे आणि ती जुनी संकल्पना पुन्हा निर्माण करण्याची गरज असल्याचे मत डॊक्टर संचेती यांनी व्यक्त केले.
यावेळी नुकताच पुण्यभूषण पुरस्कारप्राप्त डॊ. ह.वि. सरदेसाई यांचा सत्कार मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनिल मेहता यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदिता दाते यांनी केले.

Sunday, August 21, 2011

शरीर टिकविण्यासाठी मनःशांती आवश्‍यक


आपले मनोगत व्यक्त करताना शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे



-डॉ. ह. वि. सरदेसाई

पुणे - 'शरीर टिकविण्यासाठी मनःशांती आवश्‍यक आहे. शरीराच्या 85 टक्के तक्रारींचा उगम मनातून होतो,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी शनिवारी येथे केले.

डॉ. सरदेसाई आणि डॉ. अनिल गांधी लिखित "धन्वंतरी घरोघरी' या पुस्तकाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी डॉ. सरदेसाई बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती होते. मेहता प्रकाशनचे सुनील मेहता, डॉ. प्रदीप गांधी, डॉ. शशांक शहा, डॉ. गांधी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. सरदेसाई म्हणाले, 'रुग्णाने नेमके काय होते, ते सांगितले पाहिजे. त्यावर डॉक्‍टरांचे निदान अवलंबून असते. रुग्णांच्या काही तक्रारी खऱ्या, तर काही खोट्या असतात. त्यामुळे डॉक्‍टरांना अचूक निदान करणे अवघड असते. पोटात गॅस होणे किंवा ऍसिडिटी होणे अशा काही खोट्या तक्रारींची उदाहरणे आहेत. सामान्य रुग्णांना आरोग्याबाबत मूलभूत गोष्टी कळाव्यात, यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे.''

डॉ. गांधी म्हणाले, 'डॉक्‍टर आणि रुग्ण यांचे नाते विश्‍वासाच्या पायावर उभारलेले असते. आधुनिक काळात या नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हे नाते पूर्ववत करण्यासाठी रुग्णांनी डॉक्‍टरांवर विश्‍वास ठेवला पाहिजे आणि डॉक्‍टरांनीही तो सार्थ ठरविला पाहिजे.''

पुरंदरे यांनी इतिहासकाळातील वैद्यकीय सेवेचे दाखले दिले. प्राचीन वैद्यकशास्त्राचा प्रसार युरोपपर्यंत झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण आपल्याकडे आधुनिक काळात वैद्यकीय प्रयोग का होत नाहीत, असा प्रश्‍नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. डॉ. संचेती यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदिता दाते यांनी केले.

http://72.78.249.107/esakal/20110821/5591405946940966055.htm