Monday, August 22, 2011

शरीर स्वास्थ्यासाठी मन शांत ठेवणे गरजेचे



- डॊ. ह.वि. सरदेसाई

पुणे- `बहुतेक पेशंट आपल्याला त्रास काय होतो ते स्वतःच सांगतात, यामुळे डॊक्टरांना निदान योग्य करता येत नाही. म्हणून निट उपचार होत नाहीत. नेमके कारण जर सांगितले तर उपचारही नेमका होतो. `धन्वंतरी घरोघरी`या पुस्तकात काही मूलभूत गोष्टी सर्वांना कळाव्यात असा प्रयत्न केला आहे. ८५ टक्के रोग हे मनातून निर्माण होतात. म्हणूनच शरीर टिकवायचे असेल तर मन शांत ठेवणे गरजेचे आहे,` असे मत डॊ. ह वि सरदेसाई यांनी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी केलेल्या आपल्या भाषणात व्यक्त केले. प्रकृती चांगली ठेवायची असेल तर सकस संतुलीत आहार, नियमीत व्यायाम आणि स्वच्छता ह्या त्रिसूत्रींची गरज असल्याचे डॊ. सरदेसाई सांगतात.

डॉ. सरदेसाई आणि डॉ. अनिल गांधी लिखित "धन्वंतरी घरोघरी' या पुस्तकाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते शनिवारी, २० ऒगस्टला पुण्यात एस. एम. जोशी सभागृहात करण्यात आले. त्या वेळी डॉ. सरदेसाई बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती होते. मेहता प्रकाशनचे सुनील मेहता, डॉ. प्रदीप गांधी, डॉ. शशांक शहा, डॉ. गांधी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

आजारी पडल्यानंतर काय करावे यापेक्षा आजारी पडूच नये यासाठी प्रत्येकाने काय काळजी घ्यावी हे सांगण्याचा या पुस्तकात प्रयत्न केला असल्याचे सांगून डॊ. अनिल गांधी यांनी `घरोघरी` हे पुस्तक `धन्वंतरी`चे काम करील असा विश्वास याप्रसंगी बोलताना प्रकट केला.

आज डॊक्टर पेशंट नात्याची घसरण झाली आहे. समाजाची नितिमत्ताच घसरली आहे. याला हा व्यवसाय तरी कसा वेगळा राहू शकेल? असा प्रश्न निर्माण करून फॅमिली डॊक्टर ही संस्था एकेकाळी बळकट होती. आज तीचे अस्तीत्व नाहीसे झाल्यासारखे आहे. ती संस्था पुन्हा टिकविण्याची गरज असल्याचे मत डॊ. गाधी यांनी बोलून दाखविली.

एक निरोगी पेंशंट म्हणून या कार्यक्रमाला आपण आल्याचे सांगून शिवशाहिर बाबासाबेब पुरंदरे यांनी डॊक्टर हे देव आहेत ही भावना आजही आपल्या मनात असल्याचे सांगून आपल्याला काहीतरी होतेय ही भिती सतत मनात असते ती दूर करण्याचा मंत्र या डॊक्टरांकडेच असतो. डॊक्टर ही संस्था कीती उपयुक्त आहे याचा अभ्यास इतिहासाच्या अभ्यास करताना आपल्याला लक्षात आल्याचे ते उदाहरणातून पटवून देतात.
औषधांबराबरच पेशंटना आज दिलासा देणे गरजचे आहे. पेशंटच्या मनात डॊक्टरांविषयी विश्वास निर्माण होण्याची गरज आहे. एके काळ आम्ही वैध्यक शास्त्रात प्रगत होतो याचे दाखले इतिहासात आहेत. आजही नवे शोध या शास्त्रात होत आहेत. मधुमेह, जलोदर याच्यावर आपल्याकडे प्रयोग का होत नाहीत ही वेदना जाणवते. ते जर होत असतील तर त्यावर अभ्यासपूर्वक लिहले जावे अशी इच्छा पुरंदरे यांनी व्यक्त केली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॊ. एच.के .संचेती यांनी पुर्वी फॅमिली डॊक्टर हाच घरातलाच एक सभासद होता. तोच निर्णय घ्यायचा. ते वर्चस्व आम्ही डॊक्टर मंडळींनी घालविले आहे. जो व्यवसाय होता त्याचा आज धंदा झालाय. देवमाणूस ऐवजी कसाई असल्याची डॊक्टरांवीषयीची भावना माणसांच्या मनातून काढून टाकणे आणि ती जुनी संकल्पना पुन्हा निर्माण करण्याची गरज असल्याचे मत डॊक्टर संचेती यांनी व्यक्त केले.
यावेळी नुकताच पुण्यभूषण पुरस्कारप्राप्त डॊ. ह.वि. सरदेसाई यांचा सत्कार मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनिल मेहता यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदिता दाते यांनी केले.

No comments:

Post a Comment