
आपले मनोगत व्यक्त करताना शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे

-डॉ. ह. वि. सरदेसाई
पुणे - 'शरीर टिकविण्यासाठी मनःशांती आवश्यक आहे. शरीराच्या 85 टक्के तक्रारींचा उगम मनातून होतो,'' असे प्रतिपादन ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी शनिवारी येथे केले.
डॉ. सरदेसाई आणि डॉ. अनिल गांधी लिखित "धन्वंतरी घरोघरी' या पुस्तकाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी डॉ. सरदेसाई बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती होते. मेहता प्रकाशनचे सुनील मेहता, डॉ. प्रदीप गांधी, डॉ. शशांक शहा, डॉ. गांधी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. सरदेसाई म्हणाले, 'रुग्णाने नेमके काय होते, ते सांगितले पाहिजे. त्यावर डॉक्टरांचे निदान अवलंबून असते. रुग्णांच्या काही तक्रारी खऱ्या, तर काही खोट्या असतात. त्यामुळे डॉक्टरांना अचूक निदान करणे अवघड असते. पोटात गॅस होणे किंवा ऍसिडिटी होणे अशा काही खोट्या तक्रारींची उदाहरणे आहेत. सामान्य रुग्णांना आरोग्याबाबत मूलभूत गोष्टी कळाव्यात, यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे.''
डॉ. गांधी म्हणाले, 'डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते विश्वासाच्या पायावर उभारलेले असते. आधुनिक काळात या नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हे नाते पूर्ववत करण्यासाठी रुग्णांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि डॉक्टरांनीही तो सार्थ ठरविला पाहिजे.''
पुरंदरे यांनी इतिहासकाळातील वैद्यकीय सेवेचे दाखले दिले. प्राचीन वैद्यकशास्त्राचा प्रसार युरोपपर्यंत झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण आपल्याकडे आधुनिक काळात वैद्यकीय प्रयोग का होत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. डॉ. संचेती यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदिता दाते यांनी केले.
http://72.78.249.107/esakal/20110821/5591405946940966055.htm
No comments:
Post a Comment