

-विक्रम गोखले
पुणे दि.१२- आजच्या अस्वस्थ समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे कादंबरीतले प्रत्येक पान आहे. जगातला आजचा समाज कुठे चालला आहे याचा शोध या कादंबरीत घेतला आहे. मनःपूर्वक वाचायला आवडणा-या वाचकाकडून हे लेखन दुर्लक्ष होवू नये असे मला आवर्जून वाटते. संधीकाल या मिलिंद गाडगीळ लिखित कादंबरीच्या प्रकाशन प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपल्या भाषणात कादंबरीबद्दल मत मांडताना केलेले विधान पुस्तकाचे महत्व सांगणारे आहे.
मेहता पब्विशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या संधीकाल या पुस्तकाचे प्रकाशन विक्रम गोखले यांच्या हस्ते शुक्रवार १२ ला पुण्यात
पत्रकार संघाच्या सभागृहात झाले. या प्रसंगी अविनाश पंडीत, मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनिल मेहता आणि ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर उपस्थित होते.
विक्रम गोखले यांच्या मते आजच्या गतीमान जीवनात सामान्य माणूस कसा संभ्रमात पडलाय याचा प्रखर अनुभव सांगणारी ही कादंबरी आहे. ती वाचकाला अस्वस्थ करते.कुठल्याही कलाकृतीचे यश तो अनुभव वाचकाला किंवा रसिकाला कितपत अस्वस्थ
करते यावर आहे. संधीकाल तुम्हाला अस्वस्थ करते यातच तीचे श्रेय असल्यचे ते सांगतात. `काय आहे हे जिवन ह्याचे कुतूहल माणसाला असते. माणसाच्या जगण्याचा शोध ललित साहित्यात घेतला जातो.
संकटातून सुटका करण्यासाठी वाचन आवश्यक असल्याचे मत, ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी आपल्या भाषणात सविस्तरपणे मांडले.
आपल्या पहिल्या कादंहरीला मेहतांसारखे प्रकाशक लाभल्यामुळे वाचकांपर्यत आपले लेखन पोहचेल याची खात्री व्यक्त करून आपला नवोदितपणा मेहतांकडे कुठोही आड आला नाही. याला प्रतिसाद कसा मिळतोय याबद्दल आपण उत्सुक असल्याचे
लेखक मिलिंद गाडगीळ यांनी सांगितले.
मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या संधीकाल मध्ये लेखकाने आपल्या विचार प्रभावीपणे मांडल्याचे आणि त्यातूनच आशय, निर्मिती आणि् मुखपृष्ठ सारेच उच्च गुणवत्तेचे झाल्याचे मत संपादकीय संस्कार करणारे श्री. अविनाश पंडीत यांनी व्यक्त केले.
प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.
No comments:
Post a Comment