Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Thursday, May 24, 2012
पारितोषिक
साहित्यसंमेलनं कशासाठी भरतात?
यावर अनेक विवाद निर्माण होतात;
मात्र या आनंदमेळ्याचं नक्की प्रयोजन काय?
याचं लेखकानं केलेलं समर्पक विवेचन...
लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १३६
किंमत- १६० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे, २०१२
`माणसाचं सारं अस्तित्व म्हणजे भोवतालच्या
जगाशी तो प्रस्थापित करीत असलेल्या
अनेकविध संबंधांची एक मालिका असते.
साहित्य म्हणजे मुलतः अशा प्रकारचा एक संबंध.
साहित्यसंमेलनासारख्या आनंदमेळ्यात
मायभाषेसंबंधाचं प्रेम उजळून निघतं,
रसिक वृत्तीचा परिपोष होतो आणि
वाड्.मयीन व्यवहाराशी असलेला संबंधही
अधिक जिव्हाळ्याचा व जवळचा होतो.
आपल्या सांस्कृतिक जीवनातील
ती एक महत्वपूर्ण घटना असते.`
उंबरठा
लेखन हे कधी आपण आयुष्याचे वेड बनविले आहे का?
एखाद्या मुसलमानी गवयाप्रमाणे
आपले आयुष्या कधी उधळून दिले आहे का?
चोवीस तास आपण आपल्या नशेत राहिलो आहोत काय?
मुळीच नाही! आपण जीवन जगलो नाही ,जीवन पाहिले नाही. कारण आपली हिंमत झाली नाही!
जोपर्य़त आपण प्रतिष्टा, धन, शाश्वती यांना सांभाळायचा प्रयत्न करीत आहोत,
तोपर्य़त दिव्य-भव्य असे आपल्या हातून
काहीच निर्माण होण शक्य नाही.
एखादा जबरा माणूस व्याकरणाला लाथ मारील आणि भाषेला पुढे नईल.
एखादा कलावंत लौकिक नीतीला लाथ मारील, पण लोकांना अलौकिक नीतीचं दर्शन घडवील.
दरोडेखोरही नीतीला ठोकारतो आणि कलावंतही ठोकरतो..
पण दरोडेखोर समाजाला खाली नेतो आणि
कलावंत समाजाला वर घेऊन जातो!
लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ११२
किंमत- १२० रुपये
मुखपृष्ठ म मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
आवृत्ती पाचवी- मे, २०१२
वावटळ
आपल्या घरांना लागून असलेली घरे,
अडीनडीला आपली मदत घेणारी,
आपल्याला मदत करणारी,
आपल्याच गावातील ही माणसे आपली `शत्रू` होतील..
असे त्यांना कधी वाटले नव्हते.
त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे,
ही जाणीव त्यांना प्रथमच होत होती.
हा धक्का अगदी अनपेक्षित होता.
त्याने ही मंडळी मूळापासून कलली होती.
कधी नव्हे ते त्यांना वाटत होते की, आपण अनाथ आहोत...
आपले असे म्हणायला कोणी नाही.
आता कशाची शाश्वती नाही.
केव्हा काय होईल याचा नेम नाही!
एका `वावटळी`मुळे हे सर्व घडले होते...
लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ८८
किंमत- ९० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
पाचवी आवृत्ती- मे, २०१२
नागझिरा
`पहाट होई ती दयाळ पक्ष्याच्या भूपाळीने.
क्षितिजापलिकडे कललेला ;चांदोबा दिसे. झाडांचे उंच-उंच बुंधे,
पर्णहीन असा त्यांचा विस्तार- यावर आभाळ हळूहळू उजळत जाई.
माझ्या निवासापुढे कडीला टांगलेला कंदील फिकट पिवळा दिसू लागे.
मग झटपट अंथरूण गुंडाळून मी आयुष्यातल्या
या नव्या दिवसाचे सार्थक करण्यासाटी बाहेर पडत असे....`
महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन–महिने राहावे; प्राणिजीवन, पक्षिजीवन, झाडेझुडे पाहात मनमुराद भटकावे आणि ह्या अनुभवाला शब्दरुप द्यावे, हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता.
परदेशात ह्या विषयांसंबंधी आस्था आहे, अब्यासक आहे. अभ्यासकांना मदत करणारी विद्यापीठे आणि संस्था आहेत. आपल्याकडे तसे कुठे आहे ?
एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मे महिन्यात मी नागझिराला गेलो, राहिलो. त्या मुक्कामात मी जे पाहिले, लिहले, जे रेखाटले, ते हे पुस्तक.
लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ९०
किंमत- ९० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
सातवी आवृत्ती- मे,२०१२
भंडारा जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यात गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था;
केवळ या अल्पशा भांडवलावर लेखकाने मुक्काम ठोकला. काय सापडले या जंगसफारीत...
त्याचा हा वृत्तांत!
Wednesday, May 23, 2012
प्रवासः एका लेखकाचा
साहित्यिक असतो, होत नाही.
जितक्या स्वाभाविकपणे केळीला घड येतो.
तितक्याच स्वाभाविकपणे त्याच्याकडून लेखन होते.
जमिनीचं कवच फोडून वर उफाळून येणा-या
केळीच्या रसरशीत कोंभातच घडाचं आश्वासन असतं
असा ते मुळातच असला, म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाचा लाभ त्याला मिळतो.
व्यंकटेश माडगूळकर यांच्या ४० वर्षातील लेखन प्रवासाचं मनोज्ञ दर्शन.
लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १५६
किंमत- १५० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे, २०१२
मी आणि माझा बाप
रुपांतरीत कथासंग्रह
कार्लो बुलोसान नावाच्या एका फिलिपिनो लेखकाचे `लाफ्टर वुईथ माय फादर` हे पुस्तक कै. सदानंद रेगे यांनी ब-याच वर्षापूर्वी माझ्याकडे पाठवून दिले आणि लिहले की, `तुम्हाला आवडेल`. हे पुस्तक मला इतके आवडले की ह्या लेखकाचा परिचय मराठी वाचकांना करुन द्यावा, असे वाटले म्हणून मी हे रुपांतर केले आहे.
बापलेकाचे इतके माकळे नाते आपल्याकडे मंजूर नाही.
तरीपण ह्या पुस्तकाततील बेरकीपणा, खट्याळपणा, गावरान विनोद आपल्यासारखाच आहे.
वातावरणही फारसे परके नाही, काही चेहरेही वाचकांना ओळखीचे वाटतील.
लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे-७२
किंमत- ८० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती- मे, २०१२
मंतरलेले बेट
`Big City Little Boy` या मॅम्युअल कॉन्युअल कॉमरॉफ लिखित कादंबरीचा अनुवाद
जन्माला यावे, ते एखाद्या रम्य बेटावर, हे भाग्य मला लाभले.
न्यूयॉर्कमधल्या मॅनहटन या रम्य बेटावर माझा जन्म झाला.
`मॅनहटन` म्हणजे एक लहानसे जगच होते.
अशा या जगात मी जन्माला आलो आणि
अगदी सुरवातीपासून त्याच्यावर माझा जीव जडला.
कळू लागल्यापासून मला वाटू लागले की, हे गाव माझे आहे आणि मी या गावाचा आहे.
..आणि मग या माझ्या गावात मोकळ्या अंगाने कुठेही हिंडायला मला काधी काही वाटले नाही.
मन मानेल तसे भटकावे, पाहिजे ते बघावे,
पाहिजे त्याची चौकशी करावी, अर्थात नाकळता होतो
तेव्हा मी फार लांब भटकत नव्हतो;
पण लवकरच मी कळता झालो.
धीट झालो आणि न्यूयॉर्कची गल्लीनगल्ली पालथी घातली.
अनुवाद- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १२४
किंमत- १२० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे, २०१२
ओझं
दलित जीवनावरील कथा
काठीच्या टोकावर टेकलेल्या दोन्ही हातांच्या पंजावर हनुवटी टेकून; देवा टक लावून साहेबाकडे पाहात होता. बघता-बघता त्याचे डोळे वटारले, तांबडे-लाल झाले, नाकपुड्या फुरफुरु लागल्या, दातांवर दात घट्ट बसले आणि दंडांना कापरे भरले.
डागदर ओरडला,
“ऐकतोस. काय, भ्यॅंचोत..”
देवा सटक्याने खाली वाकला आणि पायातले धुळीने भरलेले तुटके पायताण उपसून घेऊन ओरडला,
“अरं ए बांबलीच्या, चावडीचं जोतं उतरुन खाली ये. शिव्या देणारं तुजं थोबाड फोडतो ह्या तुटक्या जोड्यानं !”
दलित वाड्.मय ही संज्ञा आज ज्या अर्थाने रुढ झालेली आहे, त्यांच्या कितीतरी अगोदर एका दलिताच्या मनातील विद्रोहाची भावना टिपणारी `देवा सटवा महार` ही या संग्रहातील एक कथा.
या व अशा इतर अनेक कथांमधून व्यंकटेश माडगूळकर गावरहाटीतील दलित जीवन त्यातील दारिद्र्य, दुःख, संताप आणि अगतिकता यांसहित समर्थपणे रेखाटतात.
ग्रामीण आणि दलित असा एक बराचसा कृत्रिम भेद अलीकडील काळात मराठी साहित्यात रुढ होऊ पाहात आहे. माडगूळकरांच्या दलित जीवनावरील कथांचा हा संग्रह त्याल छेद देऊन मराठी ग्रामजीवनाच्या संदर्भात त्यांची एकसंघ अशी जाणीव निर्माण करणारा आहे.
संपादक
गो.म.पवार
पृष्ठे- १२६
किंमत-१५५ रुपये.
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती- मे, २०१२
Monday, May 21, 2012
परवचा
मुंग्या या पृथ्वीवर माणसाच्या अगोदरपासूनच्या रहिवासी आहेत आणि एक मुंगी कधी नसते. समाज असतो.
मोठं अदभुत असं सामाजिक जीनव आहे मुग्यांचं.
शेती करणा-या, प्राणिसंवर्धन करणा-या, लढणा-या, गुलामगिरी करणा-या, चोरी करणा-या, भीक मागणा-या मुंग्या आहेत.
काही कामकरी मुंग्यांची पोटं शरीराच्या मानानं अवाढव्य असतात. त्या हालचाली कमी करतात.
इतर साध्या कामकरी मुंग्या बाहेरुन मध आणून यांना खाऊ घालतात.
मोठ्या पोटाच्या मुंग्या मिळेल तेवढा मघ पिऊन घेतात. तो पचत नाही. तसात राहातो.
वारुळातल्या मुंग्यांना जेव्हा खायला मिळत नाही, तेव्हा त्या या मधमुंग्यांना ठार करतात.
आणि त्यांच्या पोटात साठलेला मध खातात.
आपल्याकडे काही आदिवासी या मुंग्या द्रोण भरुन बाजारात विकायला आणतात.
लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- २२२
किंमत- २२५ रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती- मे, २०१२
चित्रकथी
हजार वर्षामागे `चित्रकथी` होते.
चित्र, गीत आणि वाद्य या तिन्हीच्या मेळातून, श्रोत्यांना रंगविणारी कथा सांगणारे `चित्रकथी`.
जुन्यापिढीने हे लोक पाहिले आहेत.
आता मात्र काळाच्या लोंढ्यात ते वाहून गेलेत.
पण पूर्णपणे काहीच नाहीसे होत नाही...
....त्याप्रमाणे चित्रकथीचं आधुनिक रुप घेऊनच जणू `सिनेमा` जन्माला आला आहे.
या सिनेसृष्टीतील अनुभव माडगूळकरांनी कथन केले आहेत.
स्वतः `चित्रकथी` बनूनू...
लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ९२
किंमत- ९० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे, २०१२
Subscribe to:
Posts (Atom)