Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Saturday, October 22, 2011
मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा
How to Win Friends and Influence People
या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद
तुम्हाला तुमच्या पसंतीचे कम हवे आहे का? ते तुम्हाला सहज मिळेल. तुम्हाला जे काम मिळाले आहे ते तुम्ही आवश्य घ्या आणि त्यामध्ये अधिक सुधारणा करा.
तुम्ही कोणत्याही संकटात सापडला असाल तर त्याचा उपयोग संधी म्हणून करा. - डेल कार्नेजी ह्यांच्या अजरामर आणि काळाच्या कसोटीला उतरलेल्या उपदेशांमुळे आज अगणित लोकांनी यशाचे शिखर गाठले आहे. त्यांना व्यावसायिक यश तर मिळालेच पण त्यांचे व्यक्तिगत आयुष्यही समृध्द झाले. त्यांच्या काळातील अनेक उत्तम मार्गदर्शनपर पुस्तकांपैकी ` मित्र जोडा आणि लोकंवर प्रभाव पाडा `हे पुस्तक तुम्हाला पुढील गोष्टी शिकवते.
• लोकांना तुम्ही आवडावे म्हणून करायच्या सहा युक्त्या.
• लोक तुमच्याशी सहमत व्हावेत म्हणून करायच्या बारा युक्त्या.
• लोकांना राग येऊ न देता त्यांच्यात बदल घडवून आणण्याच्या सहा युक्त्या. आणि आणखीही सूप काही.
`मित्र जोडा आणि लोकंवर प्रभाव पाडा` ह्या पुस्तकाचा जास्तीत जास्त लाभ घ्या.
एकविसाव्या शतकातील प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक.
पन्नास लाखांपेक्षाही अधिक प्रतिंची विक्री!
मूळ लेखक- डेल कार्नेजी
अमुवाद- शुभदा विद्वांस
पृष्ठे- २५८
किंमत- २०० रुपये
चिंता सोडा सुखाने जगा
How to Stop Warrying and Start Living
या इंग्रजी पुस्तकाचा मरीठी अनुवाद
चिंतेवर विजय मिळवून देणारे, काळाच्या कसोटीवर उतरलेले प्रभावी उपचार
डेल कार्नेजी ह्यांच्या सहा लाख बेस्टसेलर्स कॉपीज नुकत्याच सुधारित प्रकाशित झाल्या., लाखो लोकांना आपल्या चिंता करण्याच्या सवयीतून मुक्तता मिलाली. डेल कार्नेजींनी १९९० साली आपल्याला व्यावहारिक पातळीवर आचार विचारांची जी सूत्रे सांगितली होती ती आज सुद्दा तेवढीच उपयुक्त आहेत.
• तुमच्या व्यवसायासंबंधीच्या पन्नास टक्के चिंता तुम्ही ताबडतोब कमी करु शकता.
• तुमच्या आर्थिक चिंता तुम्ही मिटवू शकता.
• `निंदकाचे घर असावे शेजारी` ह्या उक्तीप्रमाणे टिकेचा फायदा करुन घ्या.
• दमणूक टाळा आणि चिरतरूण दिसा.
• तुमच्या जागृतावस्थेतच तुम्ही एक तास जादा मिळवा आणि स्वतःला जाणून घ्या, स्वतः म्हणून जगा.
• लक्षात ठेवा ह्या पृथ्वीतलावर तुमच्या सारखे दुसरे कुणीच नाही.
` चिंता सोडा सुखाने जगा` ह पुस्तक मुलभूत मानवी भावना आणि विचार ह्यांना हळुवारपणे हाताळते. हे पुस्तक वाचणे म्हणजे एक रोमांचकारी अनुभव आहे. यातील सूचना आचरणात आणणे फार सोपे आहे. असे करण्याने तुमच्यात अमुलाग्र बदल होईल. एवढेच नाही, तर तुम्ही अधिक उच्च प्रतीचे आयुष्य जगाल. ज्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य पूर्णत्वाने आणि आनंदाने जगू शकणार नाही, असे चिंतांनी आणि काळज्यांनी भरलेले आयुष्य जगण्याची काय गरज आहे?
मूळ लेखक- डेल कार्नेजी
आनुवाद- शुभदा विद्वंस
पृष्ठे- ३१२
किंमत- २०० रुपये.
आमेन
तटबंदीआडच्या आयुष्याचा धीट आणि थक्क करुन सोडणारा लेखाजोखा
३१ ऑगस्ट, २००८ रोजी सिस्टर जेस्मी यांनी कॉन्व्हेंट सोडलं.
`नन` म्हणून कॉन्व्हेंटमध्ये राहत असताना तेहतीस वर्षात आलेल्या अनुभवांचं भारतातलं हे पहिलंच पुस्तक आहे.
जेस्सी एका चांगल्या घराण्यातील, उत्साही, सुखवस्तू मुलगी. अल्लड, फुलपाखरी वृत्तीची,. घरात पहिल्यापासून कॅथॉलिक धर्मश्रध्दा जपलेल्या. वयाच्या सतराव्या वर्षी ज्युनिअर कॉलेजमधील एका प्रार्थना शिबिराच्या वेळी धार्मिक जीवनाकडे आकृष्ट झाली. सात वर्षांनी व्यवसायिक नन झाल्यानंतर, कॉन्व्हेंटमध्ये वाढीस लागलेले अनेक गैरप्रकार तिच्या लक्षात आले, पण त्याबद्दल चकार शब्दानेही बोलण्यास बंदी असल्यामुळे तिची मनातल्या मनात घुसमट झाली.
कॉलेजमध्ये प्रवेश देताना होणारा भ्रष्टाचार, प्रिस्टस् आणि नन्स यांच्यातील लैंगिक संबंध, तसेच न्नसचे आपापसांतील समलिंगी संबंध, गरीब आणि अशिक्षित सिस्टर्सना कमी लेखून शरीरिक कष्टाची कामे करवून घेणं, प्रीस्ट आणि नन्स यांना मिळणा-या सुखसोयी आणि स्वातंत्र्य यातील कमालीची तफावत हे सगळं पाहून तिच्या जिवाची तडफड होई.
`आमेन` हे एक संवेदनशील, प्रांजळ आत्मकथन आहे. ते वाचणा-याला थक्क करुन सोडते. नन्स आणि प्रीस्टस् यांच्या वास्तव जीवनाबद्दलची हकिकत वाचून चर्चची पुनर्रचना होणं किती गरजेचं आहे या मुद्दावर प्रकाश पडतो. कॉन्व्हेंटच्या किल्ल्याबाहेर राहूनसुध्दा जोगिणीचं जीवन जगणा-या सिस्टर जेस्मीचं अभंग चैतन्य, चर्चवर आणि येशूवर असलेली असीम श्रध्दा यांमुळे वाचक भारावून जातो.
मूळ लेखिका- सिस्टर जेस्मी
अमुवाद- सुनंदा अमरापूरकर
पृष्ठे- १६०
किंमत- १८० रुपये
Friday, October 21, 2011
अ विल दू विन
अवघ्या अठराव्या वर्षी झालेल्या –हुमॅटॉईड आर्थ्रायटिस आणि त्याच्या असह्य वेदनांशी एका टेनिस स्त्री खेळाडूंनं दिलेली यशस्वी झुंज
जेव्हा –हुमॅटॉईड आर्थ्रायटिसचं निदान झालं, तेव्हा ती सर्वात वाईट गोष्ट होती, असं वाटलं होतं. कशाला मी टेनिस खेळलेय़ ते कधीच खेळले नसते, तर जास्त बरं झालं असतं.
एकतर आजारपणाचं दुःख आणि टेनिस खेळण्यात इतकं प्रावीण्य असून तो खेळता येत नाही याचं आणखी एक दुःख!
माझ्या स्मृतिंच्या कोशातनू मला टेनिसचे दिवस पूसून काढायचे होते.
जणू ते दिवस कधी अस्तित्वात नव्हते, असं स्वतःला भासवायचं होतं ;
पण आता व लिहिताना स्पर्धेच्या आठवणी जाग्या झाल्या. स्पर्धेतला थरार, चुरस, गंमत, टेनिस कोर्टावरचे आनंदाचे क्षण तर मला आठवलेच,
पण मी किती जिद्दीने खेळत होते, जिंकण्याच्या इर्षेन खेळत होते तेही आठवलं.
मला जिंकायचं आहे, दुस-या क्रमांकावर यायचं नाही, पहिलाच क्रमांक पाहिजे हेच धेय्य असायचं,.
हे आठवलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं, टेनिस खेळण्याचा माझा अनुभव अतिशय अनमोल होता.
टेनिस कोर्टावर जी जिद्द, उत्साह, धडाडी मी दाखवत होते ; तीच आता या आजाराशी लढताना उपयोगी पडत होती.
मी आजाराला कधीच शरण गेले नाही, कारण....
टेनिसच्या प्रशिक्षणाने माझ्यात लढण्याचा आवेश आला होता. त्यामुळेच कदाचित मी स्वतःचा बचाव करू शकले...
मूळ लेखक- Alice Peterson
अनुवाद- उदय कुलकर्णी
पृष्ठे- २४२
किंमत- २४० रुपये
बऊठाकुरानीर हाट
या लिखाणात अधूनमधून चैतन्याची लहर दिसून येते, याचा एक पुरावा की, ही कादंबरी प्रकाशित झाल्यावर बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्याकडून न मागता एक प्रशंसापत्र मिळालं होतं. ते इंग्रजी भाषेत लिहलेलं होतं. कोणा मित्राच्या निष्काळजीपणामुळे ते पत्र हरवून गेलंय. बंकिमांनी त्यात असं मत व्यक्त केलं होतं की, ही कादंबरी जरी लहान वयात लिहलेली पहिलीवहिलीच कादंबरी असली, तरी तिच्यात प्रतिभेचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी ह्या कादंबरीची निंदा केली नाही. अल्लडपणातून आनंद मिळविण्याजोगं असं काहीतरी त्यांना आढळलं होतं की, त्यानं त्यांना अचानक एका अपरिचित मुलाला पत्र लिहायला प्रवृत्त केलं. भविष्यात या लिखाणाची परिणीती काय होईल, हे अज्ञात असूनही त्यात त्यांना काहीतरी आश्वासक, आशादायी आढळलं. त्यांच्याकडून मिळालेले हे कौतुकाचे शब्द माझ्यालेखी बहुमोल होते.
-रवींद्रनाथ टागोर
प्रत्येक दीर्घ निःश्वासावर विस्तृत टिका आणि स्पष्टीकरणे दिली जात होती.
विभेला अगदी हे सहन होईना, म्हणून ती निसटून बागेत आली होती.
सूर्य आज ढगांआडूनच उगवला होता, ढगांआडचं अस्तास गेला होता.
दिवस कधी मावळला आणि संध्याकाळ झाली हे समजले नाही.
संध्याकाळच्या वेळी पश्चिम दिशेला सोनेरी रेषा उमटली होती, पण दिवस मावळताना ती विरुन गेली. अंधार घनटात होऊ लागला होता. दशदिशा झाकोळून गेल्या होत्या.
ओळीने असलेल्या सुरूच्या दाट बनातून फांद्याच्या वर इतका अंधार दाटला की, फांद्या एकमेकीत मिसळून गेल्या अन् सहस्त्र लांबलचक पायांवर भार देऊन प्रचंड विस्तृत निःस्तब्ध अंधार त्यावर रेलला आहे असं वाटत होतं.
हळूहळू रात्र होऊ लागली. राजवाड्यातले दिवे एकेक करुन मालवले गेले.
लेखक- रवींद्रनाथ टागोर
अनुवाद- मेधा बाळकृष्ण तासकर
पृष्ठे- १६०
किंमत- १६० रुपये
Monday, October 17, 2011
डेली इन्सिरेशन फॉर विमेन
चिकन सूप फॉर द सोल
डेली इन्सिरेशन फॉर विमेन
स्त्रियांना दररोज प्रेरणादायी ठरणारे अनुभव या चिकनसूप मालिकेतील पुस्तकातील त्या त्या तारखेच्या कहाणीचं तुम्ही दिवस संपता संपता वाचन केलंत तर, तुम्हाला आयुष्यात महत्वाचं काय याचा बोध होईन.
या निवडक, चिमुकल्या कथा जगभरातील विसंवादी कोलाहालानं उद्विग्न झालेल्या मनांना थंडावा देतात. आपल्याला लाभलेलं आयुष्य किती बहुमोल आहे, याची आठवण करुन देतात.
मनुष्यमात्राच्या ठायीच्या चांगुलपणाचं दर्शन घडवून, आपल्या जगण्यासाठी नवी उमेद मिळवून देतात.
या पुस्तकातील एक कथा वाचायला एकच क्षण पुरेसा होतो, पण त्यानं तुमचा पूर्ण दिवस सोन्याचा बनतो!
लेखन व संकलन- जॅक कॅनफिल्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन, मर्सिया हिगिन्स व्हाईट
अनुवाद- सुनिता काणे
किंमत- २८०
चिकन सूप फॉर द सोलःभाग ६
अंतःकरणला भिडणा-या आणि भावना जागविणा-या कथा
आत्मिक बळ वाढविणा-या या `चिकन सूप फॉर द सोल`च्या मालिकेमधला हा सूपचा सहावा कप. सहा कप भरुन असलेलं हे चिकन सूपचं भलमोठं वाडगं आता रिकामं होत आलयं, पण त्यामधले पहिले पाच कप सूप पिऊन वाचकांच्या मनाला अपरमित शांती, समाधानाची अनुभूती लाभली आहे व त्यांचा आशावादही चांगलाच फोफावायला लागलाय, हेही तेवढचं खरं!
केवळ सूप पिऊनचच ख-या अर्थानं पोट भरल्याचा, तृप्तीचा व ह्दय भारावून गेल्याचा आनंद मिळालाय हेच मोठं आश्चर्य!
अनंत काळापर्यंत टिकून राहणा-या प्रेमाची, शिक्षणाची, कौटुंबिक जिव्हाळ्याची, संकटावर मात करण्याची शक्ती या सहाव्या कपातल्याही सूपमध्ये दडलेली आहे.
या भागातली प्रत्येक कथानकथा तुमचें ह्दय हेलावून सोडेल. तुमच्यामधली सद्सद्विवेकबुध्दी जागृत करण्यासाठी प्रोत्साहन देईल आणि आयुष्य भरभरुन जगण्याची नव्यानं उमेदही देईल.
या सहाव्या कपातलं सूप प्राशन करुन स्वतःचं सामर्थ्य़ तर वाढवाच आणि त्याबरोबर आपल्या प्रियजनांनाही याचा आस्वाद देऊन त्यांचंही मनोबल, आशावाद वाढविण्यास मौलिक हातभार लावा.
लेखन व संकलन- जॅक कॅनफिल्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन
अनुवाद- उषा महाजन
पृष्ठे- २९८
किंमत- २५०
ग्रॅड पेरेंटस्
चिकन सूप फॉर द सोल
ह्दयाची कवाडं उघडणा-या आणि आजी-आजोबांच्या मनाचं चैतन्य जागृत करणा-या गोष्टी
लेखन व संकलन- जॅक कॅनफिल्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन, मेलडी मॅकार्टी, हॅनॉक मॅकार्टी
आजी-आजोबा नातवंडं यांच्यातल्या ह्द्य नात्यातले अनेक लोभस पदर उलगडून दाखवणा-या या सुंदर सत्यकथा!
या कथा अमेरिकेतील असल्या तरी अगदी आपल्या वाटतात. कारण या नात्याला स्थळ-काळचं बंधन नाही. आजकालच्या जीवनपध्दतीमुळे आजी-आजोबा आणि नातवंडं एकमेकांपासून कितीही दूर रहात असली तरी टेलिफोन, कॉम्प्युटर, व्हिडीओ, कॅमेरा या अधुनिक साधनांमुळे ती कायम एकमेकांच्या जवळ असतात. संस्कार करणारे, दुःखात मनाला उभारी व धीर देणारे, नातवंडांबरोबर हसणारे-खेळणारे,
खाऊ-पिऊ घालणारे आजी-आजोबा ज्यांना लाभतात, ती भाग्यवान मुलं आयुष्यात पुढे जाऊन उत्तम माणूस व नागरिक बनतात.
सकारात्मक दृष्टी ठेवून आयुष्यातल्या विविध घटनांना तोंड दिलेल्या साध्यासुध्या सामान्य माणसांच्या या सत्यघटना.
या कथा तुमच्या ह्दयाला नक्कीच स्पर्श करतील आणि नातवंडांच्या रुपानं केवढी मोठी देणगी परमेश्वर आपल्याला देत असतो, याची परत एकदा नव्यानं जाणीव करुन देतील.
पृष्ठे- ३२०
किंमत- २८० रुपये
अनुलाद- शीला कारखानीस
हे पुस्तक तयार करताना प्रत्येक कथेकडे आम्ही आजी-आजोबांच्या नजरेनं आणि हदयानं बघितलं. आमच्या नजरेसमोर उलगडणा-या या निष्ठा, सन्मान, प्रतिष्ठा, श्रध्दा आणि आयुष्यातल्या जबाबदा-या पूर्ण करण्याची वचनबद्धता सांगणा-या या गोष्टींनी आम्ही भारावून गेलो. आयुष्यभर केलेले अविश्रांत कष्ट आणि धडपड आणि त्यातुन मिळविलंलं निश्चल धैर्य आणि शहाणपणा यांच्या कथांनी आम्हाला प्रेरणा मिळाली. ज्या क्षणी योग्य तेच करुन आजी-आजोबा प्रेम दर्शवतात त्यानं आम्ही हेलावून गेलो. जगात अनेक प्रकारचे आजी-आजोबा आहेत. `नॉर्मन रॉकवेल इलस्ट्रेशन्स` मधल्या गोष्टीतल्या आजी-आजोबांपासुन ते विश्वास ठेवता येऊ नये इतक्या कार्यक्षम आजी-आजोबांबर्यंत, हे उद्यमशील लोक सतत विमानप्रवास करीत असतात, ते जी कामं करीत असतात त्यातून निवृत्त होण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. इंटरनेट,ई-मेलचं नवं तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करुन घेतलयं. ते त्यांच्या समाजासाठी कुणीही करु शकणार नाही असं आवश्यक कार्य करत असतात. या आजी-आजोबांची आयुर्मयादाही वाढलेली आहे. कुठलीही परिसीमा न बाळगता त्यांना सतत अधिकाधिक कार्य करायचं असतं, परंतु तरीही त्यातला प्रत्येक जण त्यांच्या नातवंडांसाठी अतिशय महत्वाचा असतो. आजकालच्या या अस्थिर युगात ते आपल्या नातवंडांपासून खूप दुर रहात असतील, पण तरीही ते आपल्या नाववंडांच्या आयुष्याला अर्थ, स्थिरता आणि सुरक्षितता प्राप्त करुन देणा-या बोटीच्या नांगराचं काम करीत असतात. काही आजी-आजोबा अत्यंत धैर्याने आपल्या नातवंडांना स्वतः वाढवत आहेत. आम्ही त्यांची प्रशंसा करतो.
( पुस्तकाच्या प्रस्तावनेतून)
तुला आठवताना....
तुला आठवताना....
` Mars And Venus Starting Over`
A Practical Guide for Finding Love Again
After a Painful Breakup, Divorce, or the Loss of a Loved One
या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद
तुम्ही सहज तरुन जाल!
एखादी गोष्ट गमावण्याचे दुःख हे जरी अटळ असले तरी त्यापासून होणारे नुकसान मात्र आपण टाळू शकतो.
तुम्ही तुमच्या भूतकाळातील वेदनांवर उपचार करु शकता आणि त्या अनुभवाकडे सकारात्मक नजरेने पाहून नवीन काही शिकू शकता.
तुमचे आयुष्य अधिक वाईट होण्याऐवजी ते अधिक चांगले बनवू शकता. ` Mars And Venus Starting Over` हे पुस्तक प्रेमातून उद्भवणा-या प्रसववेदनांवर आहे. ही माझ्याकडून जगाला दिलेली भेट आहे आणि अठ्ठावीस वर्षे तुमच्यासारख्या लोकांची सेवा करण्याचे फलित आहे.
मला अशी आशा आहे की, याचा तुम्हालाही नक्कीच उपयोग होईल. तुमच्या निराशेच्या अंधकारात हे पुस्तक एखाद्या मेणबत्तीप्रमाणे तुम्हाला प्रकाश देईल, तुमच्या एकाकीपणात फुंकर घालणा-या समजूतदार मित्राप्रमाणे हे पुस्तक तुम्हाला वाटेल.
तुमच्या अतिशय वेदनामय अशा काळात हे पुस्तक तुमच्या जिवाभावाच्या मित्राप्रमाणे उपयोगी ठरेल.
हे पुस्तक पुन्हा-पुन्हा वाचा आणि लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही. इतरही पुष्कळ लोक या रस्त्यावरुन गेले आहेत आणि त्यांचे ठीक चालले आहे.
पुन्हा प्रेम करण्यासाठीच ते जिवंत राहिले आहेत आणि तुम्हीसुध्दा राहाल!
मूळ लेखक- जॉन ग्रे
अनुवाद- शुभदा विद्वांस
पृष्ठे- ३२८
किंमत- ३०० रुपये
ADAM -लेखक- रत्नाकर मतकरी
ADAM अडम
लेखक- रत्नाकर मतकरी
पृष्ठे- ३१६
किंमत- २८०
`अडम` ही माझी, आत्तापर्यंत सर्वात धाकटी कादंबरी. थोरली ` जौळ` - ती नावाजली गेली, तिच्यावर आधारलेलं `माझं काय चुकलं` हे नाटक जोरात चाललं. तिच्यावर चित्रपटही झाला. थोडक्यात, ती सुस्थळी पडली. मधली ` पानगळीचं झाड` , तिच्यावर नाटक झालं. ते ब-यापैकी चाललं. तिसरी `अडम` , तिच्यावर ना नाटक झालं, ना चित्रपट. रसिकांनी ती आवडल्याचं एकमेकांना सांगितलं तरी कुजबुजून. पण धाकटी आणि धड मार्गाला ना लागलेली मुलगी बापाला अधिक आपलीशी वाटते म्हणून माझं `अडम` वर प्रेम आहे, असं नाही. अगदी त्रयस्थपणे, तटस्थपणे पाहिले तरी या कादंबरीचे गुण स्पष्ट दिसतात. मलाच नाही, तर मुद्दाम डोळे झाकून न घेतल्यास, कुणालाही.
`अडम`मध्ये सुमारे चाळीस वर्षाचा कालखंड येतो. त्याचबरोबर दक्षिण भारतातील नानाविध स्थळे आणि अनेक व्यक्तिरेखा, कितीतरी पात्रे या कादंबरीत भेटतात, त्यांच्या आयुष्यातल्या विविधरंगी प्रसंगांनी `अडम` भरगच्च आणि नाट्यपूर्ण झाली आहे.
`अडम` अधिक वाचकांपर्य़ंत पोहोचायला हवी होती, याचे शल्य माझ्यापेक्षा, माझ्या वाचंकांना अधिक बोचत असावे. कारण, माझ्या प्रत्येक जाहिर मुलाखतीत प्रेक्षकांकडून `अडम विषयक प्रश्न येतात. कदाचित साहित्यदिशादर्शकांनी शिफारस न करता या कादंबरीचा शोध आपला आपल्यालाच लागला, याचे त्यांना अधिक अप्रुप वाटत असावे. मला खात्री आहे- ती नव्याने वाचली जाणा-यांची संख्या वाढतेय. ती इंग्रजीत रुपांतरीत व्हावी, अशाही सूचना अनेकांकडून येताहेत. कधी ना कधी नव्या काळाप्रमाणे समीक्षेचे पारंपारिक संकेत मोडीत काढून तिचे नव्याने मूल्यमापन केले जाईल, याविषयी मला बिलकूल शंका नाही!
-रत्नाकर मतकरी
(नव्या आवृत्तीच्या निमित्ताने लिहलेल्या प्रस्तावनेतून)
Subscribe to:
Posts (Atom)