Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Saturday, October 22, 2011
आमेन
तटबंदीआडच्या आयुष्याचा धीट आणि थक्क करुन सोडणारा लेखाजोखा
३१ ऑगस्ट, २००८ रोजी सिस्टर जेस्मी यांनी कॉन्व्हेंट सोडलं.
`नन` म्हणून कॉन्व्हेंटमध्ये राहत असताना तेहतीस वर्षात आलेल्या अनुभवांचं भारतातलं हे पहिलंच पुस्तक आहे.
जेस्सी एका चांगल्या घराण्यातील, उत्साही, सुखवस्तू मुलगी. अल्लड, फुलपाखरी वृत्तीची,. घरात पहिल्यापासून कॅथॉलिक धर्मश्रध्दा जपलेल्या. वयाच्या सतराव्या वर्षी ज्युनिअर कॉलेजमधील एका प्रार्थना शिबिराच्या वेळी धार्मिक जीवनाकडे आकृष्ट झाली. सात वर्षांनी व्यवसायिक नन झाल्यानंतर, कॉन्व्हेंटमध्ये वाढीस लागलेले अनेक गैरप्रकार तिच्या लक्षात आले, पण त्याबद्दल चकार शब्दानेही बोलण्यास बंदी असल्यामुळे तिची मनातल्या मनात घुसमट झाली.
कॉलेजमध्ये प्रवेश देताना होणारा भ्रष्टाचार, प्रिस्टस् आणि नन्स यांच्यातील लैंगिक संबंध, तसेच न्नसचे आपापसांतील समलिंगी संबंध, गरीब आणि अशिक्षित सिस्टर्सना कमी लेखून शरीरिक कष्टाची कामे करवून घेणं, प्रीस्ट आणि नन्स यांना मिळणा-या सुखसोयी आणि स्वातंत्र्य यातील कमालीची तफावत हे सगळं पाहून तिच्या जिवाची तडफड होई.
`आमेन` हे एक संवेदनशील, प्रांजळ आत्मकथन आहे. ते वाचणा-याला थक्क करुन सोडते. नन्स आणि प्रीस्टस् यांच्या वास्तव जीवनाबद्दलची हकिकत वाचून चर्चची पुनर्रचना होणं किती गरजेचं आहे या मुद्दावर प्रकाश पडतो. कॉन्व्हेंटच्या किल्ल्याबाहेर राहूनसुध्दा जोगिणीचं जीवन जगणा-या सिस्टर जेस्मीचं अभंग चैतन्य, चर्चवर आणि येशूवर असलेली असीम श्रध्दा यांमुळे वाचक भारावून जातो.
मूळ लेखिका- सिस्टर जेस्मी
अमुवाद- सुनंदा अमरापूरकर
पृष्ठे- १६०
किंमत- १८० रुपये
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment