Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Saturday, March 31, 2012
TATA
एका कॉर्पोरेट ब्रॅंडची उत्क्रांती
टाटांचे वेगळेपण यात आहे की, त्यांचे सामाजिक कार्य हे त्यांच्या एकूण ध्येयामध्ये एक कळीचा मुद्दा आहे. टाटांची कंपनी जिथे काम करते, त्या प्रदेशातल्या सामाजिक गरजा टाटा शोधून काढतात. प्रत्येक सुटी कंपनी ज्या समाजात काम करते, तो समाज कशावर उभा आहे, ते शोधून काढतात. आणि हेही शोधतात की, कशामुळे समाजात आशा आणि मूळ्ये निर्माण होतील. तसेच भागधारक आणि कर्मचारी, भागीदार आणि नंतर सहयोगी घटकांसाठी आर्थिक मूल्यांची निर्मिती कशी होईल हेही बघीतले जाते.
मूळ लेखक- मॉर्गन विटझेल
प्रस्तावना- राम चरण
अनुवाद- विदुला टोकेकर
पृष्ठे- २१६
किंमत- २२० रुपये.
टाटा ब्रॅंड म्हणजे आहे तरी काय़?
काय आहेत त्यांची मूल्ये?
जगातील आणि भारतातील लोकांना त्यातून काय समजत?
या रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तकात मॉर्गन विटझेल टांटांच्या ह्दयाचा ठाव घेतात,
त्याचे मूळ समजावून सांगतात, टाटांचं नाव आणि प्रतिमा कशी निर्माण होत गेली,
आणि या प्रतिमेचं रुपांतर एक बलवान आणि मौल्यावान ब्रॅंडमध्ये करण्यासाठी
या उद्योगसमूहाने काय केलें, याचे वर्णन करतात.
व्हिदर जस्टिस
तुरुंगातील स्त्रीयांच्या कथा
अनेक शतके परीघाबाहेर राहिल्यानंतर आज भारतीय स्त्रियांनी सार्वजनिक क्षेत्रात आघाडीवर स्थान मिळवलं आहे. स्वतंत्र आणि निर्भय झाल्यामुळे आज स्त्रिया दररोज नवनवीन अडथळे ओलांडताहेत, अधिकाधिक सबल बनताहेत. द्या पुस्तकात अशा स्त्रीया नाहीत.
हे पुस्तक मूळ स्त्रियांचे बोल मांडते, विस्मृतित गेलेल्यांच्या नावांना उजाळा देते आणि शोषित स्त्रिया ज्यासाठी झुरतात तो न्याय त्यांना देते.
`व्हिदर जस्टिस` हा भारतातील तुरुंगातील स्त्रियांवर टाकलेला एक भयभीत आणि अस्वस्थ करणारा दृष्टिक्षेप आहे. ह्यात हकीकती आहेत त्यांनी दिलेल्या विविध लढ्यांच्या- सरकारविरुध्द, कुटुंबियांविरुध्द, गरीबीविरुध्द, समाज स्वतःच खलप्रवृत्तींना जन्मास घालतो आणि त्यांना विनाविलंब सजाहि देतो. ह्या बिनचेह-याच्या, बिनआवाजाच्या आणि विस्मृतीत गेलेल्या स्त्रिया अशा समाजात राहून लढा देत राहतात.
चूरुचूरु झालेली स्वप्ने आणि तरीही मागे रेंगाळणा-या आशा यांच्या हकीकती येथे कथारुपात मांडलेल्या आहेत. ही मांडणी झाली आहे एका अशा व्यक्तीच्या दृष्टीकोनातून जी प्रत्यक्ष त्यांच्यासोबत राहिलेली आहे.
मूळ लेखिका- नंदिनी ओझा
अनुवाद- प्रियंका कुलकर्णी
पृष्ठे- ११६
किंमत- ११० रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
आय एम अ टॅक्सी
तुरुंगातली कळकट कोठडी हेच दिएगोचं घर आणि जगण्यासाठी...
स्वतःच्या दोन पायांची चाकं करत, दिएगो शहरभर लहानमोठी कामं करत फिरायचा.....
मूळ लेखिका- डेबोरा एलिस
अनुवाद- मेघना ढोके
पृष्ठे- ११६
किंमत- १२० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
काळीकुट्ट रात्रं...
मिट्ट काळोख आणि घनदाट जंगल, पायाखालची अनोळखी वाट तुडवत दिएगो चालत होता.. तो कुठं जातोय,
काय करणार याची त्याला काही कल्पना नव्हती. जंगलातून माकडांच्या भयाण किंकाळ्या कानावर पडत होत्या,
बेडकांचे कर्कश्य डरॉंव..ऐकून पोटात कालवत होतं. हे असं भयाण जंगल त्यानं आजवर कधी पाहिलंही नव्हतं..
पहाडी भागातली हा मुलगा, द-याखो-यात त्याचं लहानसं कुटुंब राहायचं. पण काळानं असा काही घात केला की,
सारं कुटुंबच तुरुंगाच्या चार भिंतीआड रवाना झालं. दिएगोही तुंरुंगात राहायचा, शहरातल्या तुरुंगात.
शहरभर पायाला चाकं लावून फिरायचा. त्या तुरुंगात रात्र झाली तरी दिवस सरायचा नाही,
रात्रभर तुरुंगातही दिवे उजळायचे. पहारेकरणी काठ्या आपटत इकडून तिकडे फिरायच्या.
कोठड्यांच्या दारांना घातलेली कुलुपं इघडायची- बंद व्हायची.
चाव्याचा किलकिलाट कानावर पडायचा. त्यात तुरुंगातली कच्ची-बच्ची रात्री भोकाड पसरायची,
कैदी म्हणून जगणा-या त्यांच्या आयाही आरडायच्या, रडायच्या....
लेफ्ट टू टेल
रवांडाच्या प्रलयंकारी हत्याकांडात एका तरुणीने अनुभवलेली ईश्वरनिष्ठेची प्रचंड शक्ती!
अफ्रिकेतील रवांडा या देशात १९९४ साली `हुतू` आणि `तुस्सी` या जमातीमध्ये भीषण हत्याकांड घडून आले.
जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठीत धरुन तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती.
या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणा-या इम्माकुली इलिबागिझाची ही कहाणी.
माणसांमधील असीम कुरुपता आणि क्रौर्य पाहुनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणीवांना आवाहन करणारी ही इम्माकुली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे.
मुळ लेखन- इम्माकुली इलिबागिझा, स्टीव्ह एर्विन
अनुवाद- ज्योत्स्ना लेले
पृष्ठे- २२२
किंमत- २९५ रुपये.
मारेकरी घरापासून दूर गेले आणि आम्ही पुन्हा मोकळा श्वास घेऊ लागलो. या वेळी ते निघून गेले होते, पण पुढील तीन महिन्यांच्या काळात अनेकदा परतणार होते. देवानं माझे प्राण वाचविले, यावर माझा विश्वास आहे. पण त्या एक्क्याण्णव दिवसांत त्या कपाटाएवढ्या आकाराच्या बाथरुममध्ये इतर सात जणींबरोबर भीतीनं थरकाप झालेल्या अवस्थेत घालविलेले क्षण मला बरचं काही शीकवून गेले. `सुरक्षित ठेवणं `आणि `वाचविणं` यामधला फरक मला समाजला आणि या अनुभूतीनं मला अंतर्बाह्य बदललं. त्या सामुदायिक हत्याकांडातही मी नव्यानं शिकले, ज्यांनी माझा द्वेष केला, मला मारण्यासाठी पाठलाग केला; त्यांच्यावरही प्रेम कसं करावं आणि ज्यांनी माझ्या कुटुंबाची कत्तल केली, त्यांनाही माफ कसं कराव!`
Sunday, March 25, 2012
नो कम बॅक्स
स्टार्ट टू फिनिश- टोटल सस्पेन्स!
मार्क सॅंडरसन-
एक अतिशय श्रीमंत, लक्षाधीश उद्योगपती. पण एकाकीपणा हे त्याला सतत टोचणारं शल्य होतं. अशातच रुपसुंदर अंजेला समर्स त्याच्या आयुष्यात आली. पण... पण ती विवाहीत होती. हवी ती गोष्ट काहीही करुन मिळवायचीच हा मार्कचा स्वभाव!
आपल्या प्रियतमेच्या प्राप्तीसाठी तिच्या नव-याचा काटा काढायचा अत्यंत योजनाबध्द कट त्यानं आखला..पण प्रत्यक्षात काय़ घडल?....
सॅम्युएल नॅटकिन-
एक सामान्य कारकून.
बायकोच्या आजारपणामुळे शरीरसुखाला पारखा झालेला!
ही भुक भागविण्याची एक अकल्पित संधी एक दिवस त्याच्यासमोर आली..
पण विलक्षण विषयसुखाच्या मोहापायी तो महाबिलंदर ब्लॅकमेलर्सच्या जाळ्यात सापडला...!
त्यांच्या तावडीतून त्याची सुटका झाली का ?
टिमोथी हॅन्सन-
लंडनमधला एक धनाढ्य लक्षाधीश. असाध्य दुखणं जडल्यामुळे मृत्युपत्राव्दारे आपली अफाट संपत्ती त्यानं आपल्या एकमेव नावडत्या बहिणीच्या नावे केली..
पण नंतर काय घडलं?
हायजॅकर मर्फी-
ब्रॅंडीच्या नउ हजार बाटल्य़ा चोरुन हजारो पौंड्स कमावण्यासाठी हायजॅकर मर्फीनं एक अफलातून घाट घातला. त्यासाठी एक अख्खा जॅगरनॉट ट्रेलर त्यानं चक्क पळवून नेला..! त्याचा तो धाडसी बेत यशस्वी झाला का?
हॅर्बर्ट लार्किन-
जुनं घर पाडून त्यांच्या मोबदल्यात नवीन घर दिलं जात असतानाही हॅर्बर्ट लार्किन आपलं घर सोडायला तयार नव्हता, म्हणून डब्लिन सिटी कौन्सिलनं या हट्टी म्हाता-याला बळजबरीनं त्याच्या घरातून बाहेर काढलं. त्याचं घर पाडण्यात आलं तेव्हा घरातल्या एका भिंतीमधून एका स्त्रीचा मृतदेह बाहेर पडला!
कोण हेती ती?....लार्किनची बायको?...
म्हणून तो आपलं जुनं घर सोडायला तयार नव्हता का ?
वेडी अभिलाषा, खून, फसवणूक, सूड, अलौलिक बुध्दिचातुर्य अशा विविध रहस्यांनी ओतप्रोत भरलेल्या सनसनाटी दहा रहस्याकथांचा जबरदस्त कथासंग्रह...
मूळ लेखक- फ्रेडरिक फॉर्सिथ
अनुवाद- विजय देवधर
पृष्ठे- ४६४
किंमत- ४४५ रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
मराठीतील बारामास काव्ये
“दिवसामागून दिवस चालले
ऋतुमागुनी ऋतू
जिवलगा कधी रे येशील तू...”
अशी कविवर्य ग.दि.माडगूळकर यांच्यासारखी रसिक ह्दयात विरह वेदनेची कळ उमटविणारी दिर्घ विरह गीते मराठीत फारशी लिहली गेली नाहीत.
स्वतंत्र निसर्ग कविताही प्राचीन कवींनी लिहलेली दिसत नाहीत. तथापी उत्तर भारतातील पंजाबी, राजस्थानी, गुजराती, बंगाली, भोजपुरी इ. भाषातून पती जवळ नसल्याने विरहाने ग्रासलेल्या नायिकेच्या भावना व्यक्त करणारी पदे विपुल प्रमाणात लिहली गेली आहेत.
त्यांना बारामास काव्ये असे म्हणतात. हा लोकभाषेतील एक प्रकार आहे. आणि काही ठिकाणी तो समूहरुपातही गायिला जातो.
त्या-त्या भाषेत या काव्यांवर अभ्यासपूर्ण समीक्षा ग्रंथ लिहले गेले आहेत. त्या दृष्टीने मराठीतील अशा विरहगीतांचा शोध धुळ्यापासून तंजावरपर्यंतच्या ग्रंथसंग्रहातून घेतला असता फार थोडी काव्ये उपलब्ध झाली.
तीच प्रस्तुत संग्रहात समाविष्ट केली आहेत.
रसिकांपुढे हा अल्पज्ञात काव्यप्रकार ठेवला आहे.
हा अभिनव काव्यप्रकार मराठी वाचकांनी आवडेल, अशी अपेक्षा आहे.
लेखक- डॉ. वसंत स. जोशी
पृष्ठे- ९६
किंमत- १२० रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
Subscribe to:
Posts (Atom)