Saturday, July 9, 2011

नीलांगिनी


लेखक : स्मिता पोतनीस

ब्राह्मणत्वाला काळिमा फासणा-या हीन अश्वत्थामाचा बळी हवाय तिला.
एवढा क्रोध तिचाच असू शकतो!
अग्निसारख्या तेजस्वी आणि कृष्णाची सखी असलेल्या नील वर्णाच्या नीलांगिनीच्या क्रोधाची ही कहाणी...

मी आग्नशिखा आहे. मला बळी हवाय; अश्वत्थामाचा! तो ब्राह्मण असला तरी!
त्याच्या ब्राह्मण्यत्वाला काळिमा फासलाय त्याने!
अती शूद्र,अती हीन झालाय तो!
तो जगायच्या लायकीचा नाही. त्याला पुरुषार्थाचं मरण द्यायचं नाही तर छळूनछळून मारायला हवं.
त्याला जाणवायला हवं की माझ्या पुत्रांना मारून त्याने घोर अपराध केलेला आहे.
त्या नीचाच्या डोक्यावरचा मांसल मणी कापून मला आणून द्या.छछ एवढा क्रोध तिचाच असू शकतो!
अग्निसारख्या तेजस्वी आणि कृष्णाची सखी असलेल्या नील वर्णाच्या नीलांगिनीचा!
...द्रौपदीला महाभारत कसं जाणवलं त्याबाबतचं तिचं हे कथन!

Friday, July 8, 2011

मी का नाही?


लेखक : पारू मदन नाईक

"मी का नाही?' हा प्रश्न विचारू­ धजणा-या तृतीयपंथी समाजाची ही कहाणी! या कादंबरीची नायिका असलेल्या नाझच्या वाट्यालाही हे दु:ख येते. पण तिचे वडील सोडून सगळे कुटुंब, विशेषत: तिची आई तिला भक्कम पाठबळ देते. या पाठबळाच्या जोरावर नाझ "हिजडा समाज' स्थापन करते. यातून ती या समाजाला स्वावलंबी आणि सुसंघटित तर करतेच; पण प्रसंगी कठोर भूमिका घेऊन त्यांचे प्रश्नही सोडवते. हिजडा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एक चळवळ उभारते. समाजात पदोपदी होणारा अपमान, टिंगलटवाळी यांना दाद न देता निर्भीडपणे स्वत:च्या प्रश्नांसाठी न्यायालयापर्यंत ­धडक मारते. "मी का नाही' हा एक शोध आहे. तो किती भेदक आहे, हे कादंबरी वाचताना उमगत जाते. त्याचे उत्तर शोधताना वाचक अस्वस्थ तर होतोच; पण निरुत्तरही होतो!

पृष्ठे : 110 किंमत : 110

Monday, July 4, 2011

गूढ..प्रणयरम्य कादंबरी... स्क्रीम फॉर मी


काळजाचा थरकाप उडविणा-या आपल्या प्रत्येक लोकप्रिय कादंबरीतून वाचकांच्या अंगावर काटा उभा करत,
आपण सस्पेन्स कादंबरीची सम्राज्ञी आहोत हे करेन रोझ ह्या प्रतिभासंपन्न लेखिकेने आता निर्विवादपणे सिध्द केले आहे. डाय फॉर मी या गाजलेल्या कादंबरीची ही लेखिका आता आणखी एक काळजाचा ठोका चुकाविणारे कथानक घेऊन
वाचकांच्या समोर येत आहे.
एका छोट्याशा गावात अचानक एक भयप्रद खूनसत्र सुरू होतं. गाव पार हादरून जातं.
आपल्या कामात निष्णात असणारा एक धाडसी गुप्तचर अधिकारी आणि एक पिसाट विकृत खुनी ह्यांची आमने-सामने टक्कर होते..
मरणाच्या दारात उभ्या केलेल्या आपल्या सावजाला, तो विकृत खुनी वेडावत म्हणतो...
तुला वेदना असह्य होत असतील ना, तेव्हा माझ्या नावाने एक किंकाळी फोड....
स्पेशल एजंट डॅनियल व्हार्टानियन हा, तेरा वर्षापूर्वी घडलेल्या एका खुनाची सहीसही नक्कल करणा-या त्या खुन्याला
शोधून काढण्याचा विडा उचलतो..
नुकताच मारला गेलेल्या आपल्या कुविख्यात खुनी भावाजवळ सापडलेली काही छायाचित्रं, हाच डॅनियलपाशी एकमेव धागा असतो. खुनी इसमाचा शोध घेण्याच्या प्रवासात, त्याला आपल्याच कुंटुबातल्या काळ्या काळ्याकुट्ट इतिहासाचे दर्शन घडते आणि त्याचबरोबर मानवी अभद्र मनाच्या गूढडोहाचा तळही सापडतो.
ह्याच प्रवासात अलेक्स फॅलन ह्या सुंदर परिचारिकेची त्याची भेट होते.
तिची कहाणी ऐकून त्याला आपलाच भूतकाळ आठवतो. विशेष म्हणजे अलेक्सचा चेहरा आणि तेरा वर्षापूर्वी खून झालेल्या त्या मुलीच्या
चेह-यात कमालीचे साधर्म्य असते. गावातील प्रतिष्टित व्यक्ति या प्रकरणात गुंतलेल्या आहेत, त्या विकृत खुनी इसमांच्या यादीत अलेक्सचेही नाव आहे , हे डॅनियला समजते. दिवसागणित बळी
जाणा-या स्त्रीयांची संख्य़ा वाढू लागते. आता डॅनियलपाशी फारच थोडा अवधी राहिलेला असतो. त्या क्रुरकर्म्याला लवकरात लवकर शोधणं जितकं महत्वाचं असतं तितकं महत्वाचं असतं , अलेक्सचा जिव वाचविणे. कारण ते आता अलेक्सच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो....

लेखक- करेन रोझ
अनुवाद- दीपक कुलकर्णी

पुष्ठे- ५०९
किंमत ४८०

द प्राइस ऑफ लव्ह


विकृत, पाशवी वृत्तिच्या नव-याच्या कचाट्यात सापडलेल्या तरूणीच्या संघर्षाची सत्यकथा...

वडिलांच्या हिंसाचाराचा व्रण, त्यातच शाळेत गुंड मुलांनी धाकदपटशा दाखवून केलेला लैंगिक अत्याचार, बलात्कार..अशा अवस्थेत निकोलाकडे मदतीसाठी कोणताच मार्ग नव्हता. स्वास्थ्य हरवलेल्या तिच्या वर्तनाक़डे तिच्या अवतीभवती असणा-या वडिलधा-याकडे दुर्लक्ष केले.
तिची आत्मप्रतिष्ठा, आत्मसन्मान रसातळाला गेला. त्यानंतर थरकाप उडविणा-या एका अनोळखी माणसाच्या छळाची ती शिकार झाली. त्याने तिचे आयुष्य जिवंत नरक केले .
नील देखणा आणि भुरळ पाडणारा होता. पण धोक्याचा इशारा ओळखण्याच्या वयाची ती नव्हती. तिच्या या नव-याने तिला टोकाच्या यातना दिल्या. आपले तिच्यावर प्रेम आहे, म्हणून हे सारे आपण करीत आहोत, असेही तो उलट आग्रहपूर्वक सांगत होता.
अत्यंत प्रतिकूल स्थितीत भयानक छळाच्या यातनातून जाऊनही आपले स्वत्व आणि आंतरिक शक्ती कायम ठेवणा-या एका स्त्रीची अंतःकरण पुळवटून टाकणारी कहाणी म्हणजे द प्राइस ऑफ लव्ह ही कादंबरी..

लेखक- निकोला टी. जेम्स
अनुवाद- मीना टाकळकर

पृष्ठे -२०४ किंमत २२०