Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Wednesday, May 11, 2011
ग्रोईंग अप बिन लादेन
ओसामा बिन लादेनची पत्नी आणि मुलगा यांनी त्यांच्या गुप्त
आणि खासगी आयुष्याची देलेली माहिती
मूळ लेखक : जीन सॅसन
अनुवादक : बाळ भागवत
11 सप्टेंबर, 2001 रोजी आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेत चार प्रवासी विमानांचे
अपहरण करून ती अमेरिकन लक्ष्यांवर आदळवतात.
त्या पौकी दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या गगनचुंबी इमारतींना धडक देतात
आणि त्या कोसळतात हे जगभर प्रसारित झालेले दृश्य कोणीच विसरूशकत नाही.
तीन एक हजार निरपराध लोक जीव गमावतात. त्या वेळेपासून दहशतवाद हा शब्द उच्चारताच
प्रथम एकच चेहरा डोळ्यांसमोर येतो, ओसामा बिन लादेन!
हा इतका कट्टर दहशतवादी बनला कसा हे कळणे अवघड होते;
कारण अत्यंत धनाढ्य अशा कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. पण आता त्याला ओळखणारे
त्याच्या कुटुंबामधले कुणीही त्याच्याबद्दल बोलायला तोंड उघडायलाच तयार नहते.
आणि मग खरे तर आश्चर्यच घडले, ओसामाची पहिली पत्नी नज्वा आणि
त्यांचा चौथा मुलगा ओमर यांनी बोलण्याची तयारी दर्शवली.
कट्टर धर्मवेडा, दहशतवादी, स्वत:च्या मुलांनीही आत्मघातकी हल्लेखोर बनावे
अशी आशा बाळगणा-या ओसामा बिन लादेनच्या
यक्तिमत्त्वाचे वेगळेच पौलू उलगडले. त्यांनी सांगितलेली चित्तवेधक कथा म्हणजेच
-ग्रोईंग अप बिन लादेन!
पृष्ठे : 392 किंमत : 400
शेम - जसविंदर संघेरा
14 वर्षांची जसविंदर संघेरा...
बळजबरीने तीचं लग्न ठरवलं, प्रेमाच्या माणसांनीच तिला नाकारल,
एका मुलीने जगण्यासाठी केलेल्या अखंड संघर्षाची सत्यकथा...
तू आम्हाला मेलीस... तू आम्हाला मेलीस... मेलीस.
जन्मदात्या आईबापांनी मला स्वत:पासून कायमचं तोडून टाकावं,
एवढा भयंकर अपराध खरोखरच घडला होता का माझ्या हातून?
त्यांचा माझ्याविषयीचा जिव्हाळा करपून गेला होता?
माझ्या अवघ्या आयुष्याची आहुती देण्याइतका मोठा आहे का हा गुन्हा...?
मूळ लेखक : जसविंदर संघेरा अनुवादक : सुनंदा अमरापूरकर
पृष्ठे : 251 किंमत : 250
Tuesday, May 10, 2011
सर्चिंग फॉर डॅडी
ख-या वडिलांचा शोध घेण्याच्या धुंदीत मोठ्या हिकमतीन तीन फाइल मिळवली.
त्याच्या आधारान एक फोटो आणि तिला दोघांच्यात साम्य दिसू लागल.
पण खरच ते तिचे वडील होते? की....?
ती चार वर्षांची असताना तिला मरून जावंसं वाटलं. आपल्यावर प्रेम करणारे आईवडील आपल्याला मिळतील अशी लहानग्या ख्रिस्तीनची अपेक्षा होती, पण आधी आनाथालयांमध्ये आणि नंतर बाहेरच्या जगात ठोकरा खाताना तिच्या वाट्याला काय आलं, तर फक्त अवहेलना, तिरस्कार, अपमान आणि विलक्षण एकाकीपणा. एकाकी ख्रिस्तीननं इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात भयंकर खुन्याशी आपलं नातं आहे असं मानलं. त्या परिस्थितीपेक्षा आयुष्यात आणखी भीषण ते काय असणार असं तिला वाटलं खरं, पण सत्य काय ते तिला लवकरच कळणार होतं.
मूळ लेखक : ख्रिस्तीन जोआना हार्ट
अनुवादक : डॉ. प्रमोद जोगळेकर
पृष्ठे : 260 किंमत : 250
Subscribe to:
Posts (Atom)