Friday, July 15, 2011

मेहता ग्रंथजगत -दिवाळी अंकासाठी स्पर्धा

दिवाळी अंक २०११ साठी वाचकांसाठी जाहीर केली आहे.

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. अट एवढीच २०१०-२-११ मध्ये तुम्ही एका पेक्षा जास्त पुस्तके विकत घेऊन वाचलेली असावी.

किमान दोन पुस्तके तरी दोन वर्षात विकत घेतली असली पाहिजे.

आपण खरेदी केलेल्या पुस्तकांची नावे (जास्तीत जास्त दहा) पोस्टकार्डावर लिहून कळवा.

त्यातल्या तुम्हाला आवडलेल्या सर्वात जास्त पुस्तकाबद्दल तीन-चार ओळीत माहिती द्या.

स्पर्धत भाग घेणा-यांची नावे दिवाळी अंकात प्रसिध्द करण्यात येतील.

चिठ्ठ्या टाकून यशस्वी ठरणा-या दोन स्पर्धकांना प्रत्येकी १,००० रूपयांची पुस्तके बक्षीत म्हणून देण्यात येतील.

पत्र पोचण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०११

अमचा पत्ता-

मेहता पब्लिशिंग हाउस ,
संपादक ,मेहता ग्रंथजगत
१९४१ माडीवाले कॉलनी,
सदाशिव पेठ,
पुणे- ४११ ०३०
फोन- ०२०- २४४७६९२४

,

Thursday, July 14, 2011

पुस्तकांच्या बनावट प्रतींची विक्री

मुंबईत पाच दुकानदारांवर कारवाई

स्वामित्त्व हक्काचा भंग करून मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांच्या बनावट प्रती विकणाऱ्यांवर नुकतीच मुंबईत कारवाई करण्यात आली. दादरसारख्या प्रतिष्ठित भागात बनावट पुस्तकांची विक्री करणाऱ्या पाच दुकानदारांवर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

स्वामी, ययाति, श्रीमान योगी, अमृतवेल, सिक्रेट आणि मॅजिक ऑफ थिकिंग बिग या पुस्तकांच्या बनावट प्रती बाजारात उपलब्ध असल्याचे लक्षात आले होते, अशी माहिती मेहता पब्लिशिंग हाऊसच्या सुनील मेहता यांनी दिली. यासंदर्भात 'युआरपीआर कन्सल्टन्सी'चे संचालक मोहम्मद शेख यांनी माटुंगा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. संतोष बुक स्टॉल माटुंगा; दादर बुक शॉप, रेल्वे स्टेशनजवळ आणि स्वामीनारायण मंदिराजवळील दादर बुक शॉप या विक्रेत्यांवर याबाबत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६० हजारांहून अधिक किंमतीची पुस्तके जप्त करण्यात आली आहेत.

स्वामित्त्व हक्क संरक्षण अधिकार असलेल्या मूळ पुस्तकांच्या बनावट प्रतींची बाजारात विक्री करणे, कंपनी आणि ग्राहकांची फसवणूक करणे या कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये बनावट पुस्तक विक्री करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, याबाबत ग्राहकांनीही सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रकाशकांतर्फे करण्यात आले आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9216398.cms

Tuesday, July 12, 2011

बनावट पुस्तकांची विक्री करणा-या तिघांवर गुन्हा



साठ हजारांची पुस्तके जप्त

पुणे, दि.१२ जुलै- स्वामित्वाच्या हक्काचा भंग करून मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या काही पुस्तकांच्या बनावट प्रती तयार करून त्याची विक्रि मुंबईत करणा-या पाच दुकान धारकांवर कारवाई करून त्यांच्याकडची साठ हजारांची पुस्तके जप्त करून पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुंबईत बनावट पुस्तकांची विक्री होत असल्याची तक्रार यु आर पी आर कन्सलटन्सीचे संचालक मोहम्हद शेख यांनी केली हीती.
यावरून माटुंगा पोलिस स्थानकाच्या पोलिस पथकाने संतोष कुमार बी सिंग (संतोष बुक स्टॅाल ,माटुंगा), अनिलकुमार जीतलाल यादव (दादर बुक शॉप , दादर रेल्वे स्ठेशन जवळ , दादर) आणि अमिर अरिझुल खान
(दादर बुक शॉप , स्वामी नारायण मंदिराजवळ, दादर (E),मुंबई ) यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडूल स्वामी, ययाति, श्रीमान योगी, अमृतवेल, सिक्रेट आणि मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या पुस्तकांच्या बनावट प्रती जप्त केल्या.

या तिघांवर संगनमतांनी स्वामीत्व हक्क, संरक्षण अधिकार असलेल्या मूळ पुस्तकांची पायरेटेड पुस्तकांची बाजारात विक्रि करण्यासाठी जवळ बाळगणे , कंपनीची व ग्राहकांची फसवणूक केल्याचा गुन्हा कलम ५ ख कलम ५१, ६३ कॉपी राईट अॅक्ट १९५७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.