Tuesday, January 18, 2011

अनुवादित साहित्य ही काळाची गरज



आपल्याकडे अनेकांना अजूनही इंग्रजी येत नाही. त्यांच्यासाठी इंग्रजी भाषेतले चांगले साहित्य मराठीत रूपातंरित केले तर फायदेशीरच ठरले. अनुवादित साहित्य ही आजची गरज आहे. भाषांतरामुळे विश्व जवळ येते. त्यामुळे भाषांतराला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी केले.

मेहता पब्लिशिंग हाऊसछच्या `द स्टार प्रिन्सिपल` या रिचर्ड कोच लिखित आणि श्याम भुर्के अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते समारंभात सोमवारी (17जाने. 2011) मराठा चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात झाले. यावेळी अध्यक्षपदावरून डॉ. मुजुमदार यांनी भाषांतरित साहित्याची गरज या विषयावर आपले मनोगतं व्यक्त केले .
समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध डीएसके उद्योगसमूहाचे डी.एस. कुलकर्णी, तसेच अनुवादक श्याम भुर्के आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक श्री. सुनील मेहता उपस्थित होते.

डॉ. मुजुमदार म्हणाले, जगात 53 टक्के साहित्य भाषांतरित असते. त्यातले भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे नगण्य आहे. त्यातून मराठी भाषांतर होणे अधिक कठीण. आज भाषांतरित साहित्याची गरज आहे. भाषांतर करणार्याला दोन भाषा येतात; म्हणजे तो दोन आयुष्ये जगतो. अनुवादकाला साहित्यिकांचे गुणही लागतात. भाषेची पत शब्दांत नसते; तर ती अर्थात असते. जगातले विविध विषय भाषांतरामुळे मराठीत येतील. भाषांतराचे महत्त्व मोठे आहे. आज ही काळाची गरज आहे. आपल्या भाषणात डॉ. मुजुमदारांनी मेहतांना भाषातंराचे स्वतंत्र दालन निर्माण करण्याची विनंती केली.

डीएसके समूहाचे संस्थापक आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी कुठलाही व्यवसाय पैशाकडे पाहून करू नका, त्यातून समाधान मिळणार नाही. हे सांगताना, प्रामाणिकपणा आणि आपला सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. व्यवसायात ग्राहकांच्या खिशात हात घालू नका. त्यांच्या हृदयाला हात घाला, असा सल्ला उदाहरणासह दिला. संधी ही अपॉइंटमेंट घेऊन येत नसते, ती कुठे, कधी येईल ते सांगता येत नाही. ती संधी घ्या. तिला प्रामाणिकपणे स्वीकारा. तुम्हाला नक्की यश मिळेल.छ असे पटवून दिले.

आपल्या भाषणात अनुवादक श्याम भुर्के यांनी `द स्टार प्रिन्सिपल` या रिचर्ड कोच यांच्या पुस्तकाने स्टार व्यवसाय शोधायचा कसा? याचे 32 मार्ग पुस्तकात दिल्याचे सांगितले. तरुणांनी कुठला व्यवसाय करावा. याचे मार्गदर्शनही या पुस्तकांतून मिळेल असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

जगामधले महत्त्वपूर्ण ज्ञान मराठीत आणण्याचे काम मेहता पब्लिशिंग हाऊस करीत आहेत तेही प्रकाशनव्यवसायातले ङस्टारछ असल्याचा उल्लेखही श्याम भुर्के यांनी केला.

कार्यक्रमात सुनील मेहता यांनी पाहुण्यांचे आणि अध्यक्षांची माहिती आपल्या प्रास्ताविकात सांगितली, तर मान्यवरांचे स्वागत अखिल मेहता यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
प्रकाशन समारंभाचे संपूर्ण सूत्रसंचालन विनिता आपटे यांनी केले.

चिकन सूप


चिकन सूप फॉर द कपल्स सोल -

देवाने गाठी जरी स्वर्गात बांधल्या, तरी विवाह साजरे होतात इथे पृथ्वीवरच! ते निभवावेही लागतात आपल्या तुपल्यालाच! कसं निभावतो आपण हे नातं? - त्याच्या या कथा!
एकांड्या आयुष्यात दुसर्‍याच्या प्रवेश झाला, की जीवनाचे आयाम बदलतात.
मग प्रेमाच्या बहरात सप्तरंगी स्वप्न फुलतात. रोमान्स, स्फूर्ती, उत्साहाची कारंजी उडतात. जबाबदारी वाढली की संघर्ष आला - संकटं आली!
एकमेकांच्या मदतीनं त्यांनाही तोंड देण्याची हिंमत येते.
प्रेम कार्यप्रवण बनवतं - प्रेम व्यक्तिला स्वतंत्र करतं.
कधी भानावर आणायचं कर्तव्य पार पाडतं - कधी आत्मभान जागृत करतं!
एकमेकाला गृहीत धरलं तरी एकमेकाचा आदर करायला शिकवतं.
मुरलेले प्रेम जन्मोजन्मीची साथ करतं. हळुवार प्रेम तितकंच कणखरही असतं.
कुटुंब-समाज अशा अवघ्या पसार्यात स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घ्यायला प्रवृत्त करतं.
पती-पत्नीच्या सहजीवनाच्या अशा या कथा आपल्या प्रत्येक भावनेला स्पर्श करतात. काही कथा जुन्या - पण आजही तितक्याच ताज्या वाटणार्‍या - कालातीत! देशातीतही. फरक फक्त संस्कृतीचा आहे.
पाश्चात्य संस्कृतीच्या चष्म्यातून कथा वाचल्या, की लक्षात येतं, अरे या तर आपल्याच कथा -
आपल्या आयुष्यात आपल्या आसपास घडणार्‍या!
कपल्ससाठी असणारं हे "चिकन सूप', "तुमचं - आमचं सेम असतं' याची प्रचीती देणार्‍या!
अनुवाद : अवंती महाजन

१६० रु. पोस्टेज : २५ रु.


चिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल -

आपल्याला बहीण असणं आणि आपण कुणाची तरी बहीण असणं किती भाग्याचं आहे याचा साक्षात्कार घडवणार्‍या हृद्य कथा!
""ती नेहमीच माझ्या पाठीशी उभी असते.''
""तिच्याविना मी सैरभैर होईन!''
""मी तिला काहीही सांगू शकते.''
""मी तिच्याशी दिवसा-रात्री कधीही बोलू शकते.''
"चिकन सूप फॉर द सिस्टर्स सोल' मधल्या कथांमधून वारंवार येणारी
ही वाक्यं खूपच बोलकी आहेत.
हे पुस्तक म्हणजे ह्या अनोख्या नात्याची थोरवी मानण्याचा एक उत्सवच आहे!
बहिणी असतात आपल्या अत्यंत मौल्यवान अनुभवांच्या खजिनदार.
आपली सुख-दु:ख वाटून घेणार्‍या साक्षीदार. कुटुंबाच्या वाट्याला आलेले काळेकुट्ट क्षण जोडीनं भोगणार्‍या सख्या.
आपल्याला सर्वाधिक ओळखणार्‍या आपल्या मैत्रिणी.
विविध अनुभवांद्वारे या कोमल नात्याचे अनेक तलम पदर उलगडून दाखवणार्‍या
ह्या प्रेरणादायी कथा आपल्या मनाच्या सहसंवेदनेची तार झंकारत ठेवतात!
अनुवाद : सुनीति काणे

२५० रु. पोस्टेज : ३०रु

सर्कल ऑफ लाइट


किरणजीत अहलुवालियाची कहाणी ही फार भयानक आणि धक्कादायक असली, तरी कहाणीचा शेवट मात्र विजयोत्सवाचा आहे. अतिशय कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच ही जीवनगाथा!


कुटुंबात घडलेल्या एका खळबळजनक घटनेमुळे तिला जन्मठेपेची शिक्षा झाली. मात्र त्यातून ती निर्दोष सुटली.

अनुवादक : उषा महाजन
मूळ लेखक : राहिला गुप्ता
किरणजीत अहलुवालिया