Tuesday, January 18, 2011

अनुवादित साहित्य ही काळाची गरज



आपल्याकडे अनेकांना अजूनही इंग्रजी येत नाही. त्यांच्यासाठी इंग्रजी भाषेतले चांगले साहित्य मराठीत रूपातंरित केले तर फायदेशीरच ठरले. अनुवादित साहित्य ही आजची गरज आहे. भाषांतरामुळे विश्व जवळ येते. त्यामुळे भाषांतराला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी केले.

मेहता पब्लिशिंग हाऊसछच्या `द स्टार प्रिन्सिपल` या रिचर्ड कोच लिखित आणि श्याम भुर्के अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते समारंभात सोमवारी (17जाने. 2011) मराठा चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात झाले. यावेळी अध्यक्षपदावरून डॉ. मुजुमदार यांनी भाषांतरित साहित्याची गरज या विषयावर आपले मनोगतं व्यक्त केले .
समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध डीएसके उद्योगसमूहाचे डी.एस. कुलकर्णी, तसेच अनुवादक श्याम भुर्के आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक श्री. सुनील मेहता उपस्थित होते.

डॉ. मुजुमदार म्हणाले, जगात 53 टक्के साहित्य भाषांतरित असते. त्यातले भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे नगण्य आहे. त्यातून मराठी भाषांतर होणे अधिक कठीण. आज भाषांतरित साहित्याची गरज आहे. भाषांतर करणार्याला दोन भाषा येतात; म्हणजे तो दोन आयुष्ये जगतो. अनुवादकाला साहित्यिकांचे गुणही लागतात. भाषेची पत शब्दांत नसते; तर ती अर्थात असते. जगातले विविध विषय भाषांतरामुळे मराठीत येतील. भाषांतराचे महत्त्व मोठे आहे. आज ही काळाची गरज आहे. आपल्या भाषणात डॉ. मुजुमदारांनी मेहतांना भाषातंराचे स्वतंत्र दालन निर्माण करण्याची विनंती केली.

डीएसके समूहाचे संस्थापक आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी कुठलाही व्यवसाय पैशाकडे पाहून करू नका, त्यातून समाधान मिळणार नाही. हे सांगताना, प्रामाणिकपणा आणि आपला सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. व्यवसायात ग्राहकांच्या खिशात हात घालू नका. त्यांच्या हृदयाला हात घाला, असा सल्ला उदाहरणासह दिला. संधी ही अपॉइंटमेंट घेऊन येत नसते, ती कुठे, कधी येईल ते सांगता येत नाही. ती संधी घ्या. तिला प्रामाणिकपणे स्वीकारा. तुम्हाला नक्की यश मिळेल.छ असे पटवून दिले.

आपल्या भाषणात अनुवादक श्याम भुर्के यांनी `द स्टार प्रिन्सिपल` या रिचर्ड कोच यांच्या पुस्तकाने स्टार व्यवसाय शोधायचा कसा? याचे 32 मार्ग पुस्तकात दिल्याचे सांगितले. तरुणांनी कुठला व्यवसाय करावा. याचे मार्गदर्शनही या पुस्तकांतून मिळेल असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

जगामधले महत्त्वपूर्ण ज्ञान मराठीत आणण्याचे काम मेहता पब्लिशिंग हाऊस करीत आहेत तेही प्रकाशनव्यवसायातले ङस्टारछ असल्याचा उल्लेखही श्याम भुर्के यांनी केला.

कार्यक्रमात सुनील मेहता यांनी पाहुण्यांचे आणि अध्यक्षांची माहिती आपल्या प्रास्ताविकात सांगितली, तर मान्यवरांचे स्वागत अखिल मेहता यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
प्रकाशन समारंभाचे संपूर्ण सूत्रसंचालन विनिता आपटे यांनी केले.

No comments:

Post a Comment