Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Saturday, December 31, 2011
अ प्रिझनर ऑफ बर्थ
मित्राचा खून केल्याच्या आरोपावरुन तुरुंगात जाणा-या व आश्चर्यकारकरित्या बाहेर येऊन ख-या गुन्हेगारांना धडा शिकविणा-या डॅनची उत्कंठावर्धक कथा
डॅनी कार्टराईटने बेथ विल्सनला लग्नाची मागणी आदल्या दिवशी किंवा दुस-या दिवशी घातली असती, तर त्याच्यावर आपल्या जिवलग मित्राचा खून केल्याच्या आरोप ठेवण्यात आला नसता आणि त्याला अटकसुध्दा झाली नसती.
जेव्हा फिर्यादी पक्षाकडून चार नामांकित साक्षीदार आणण्यात येतात; एक बॅरिस्टर, एक लोकप्रिय अभिनेता, एक उच्चकुलीन प्रतिष्ठित व्यक्ती आमि एक नावाजलेल्या फर्ममधला तरुण, धडाडीचा पार्टनर....
तेव्हा तुमची बाजू कोर्टात कोण ऐकून घेणार ?
डॅनीला बावीस वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा होते.त्याला वेलमार्श तुरुंगात पाठवणायत येतं. देशातल्या सर्वात जास्त कडक सुरक्षाव्यवस्थेसाठी प्रसिध्द असलेला हा तुरुंग!
आजवर कोणताही कैदी तिथून पळून जावू शकला नाही.
पण डॅनीच्या अंतर्यामी एक आग भडकलेली आहे.
आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घण्याची आग.
ती आग त्याला जाळते आहे; पण याची किंचितही कल्पना स्पेन्सर क्रेन, लॉरेन्स देवनपोर्ट, जेरॉल्ड पेन आणि टीवी मोर्टिमर यांनी नाही.
डॅनीला साथ आहे त्याच्या प्रेयसीची, बेथची.
डॅनीच्या नावाला लागलेला कलंक धुवून काढण्साठी तिनेही न्यायालयाची दारं ठोठावलेली आहेत. सच्चा दिलाच्या या प्रेमिकांच्या अथक् प्रयत्नांनी अखेर त्या चौघांना पळता भूई थोडी होते.
जिवावर उदार होऊन अखेर रणांगणातून पळ काढावा लागतो.
वाचकांची मती गुंग करणारी; शेवटच्या पानापर्य़ंत वाचकांच्या मनाचा ताबा घेऊन त्यांना खिळवून टाकणारी ही कादंबरी!
मूळ लेखक- जेफ्री आर्चर
अनुवाद- लीना सोहोनी
पृष्ठे- ५८२
किंमत- ५०० रुपये
Subscribe to:
Posts (Atom)