Thursday, March 1, 2012

अनोखे सस्तन प्राणी





सस्तन प्राणी हे प्राणीसृष्टीतील प्रगत आणि विकसित प्राणी म्हणून ओळखले जातात. परंतु त्यांचे विश्व पाहिले म्हणजे आश्चर्य़ वाटल्याशिवाय राहत नाही.
त्यांचे वैशिष्ठ्य़पूर्ण जीवन, परिस्थितीशी केलेले समायोजन, शत्रूला हुलकावणी देण्याती पध्दत या गोष्टी विस्मयकारक वाटतात.
ध्रुवीय अस्वल बर्फाळ प्रदेशात राहते, तर मिरकॅट, आईलांडगा बिळात राहतात.
अफ्रिकन शिकारी कुत्रे समूहाने मोठ्या प्राण्याची सहज शिकार करतात.
नासके-कुचके खाद्य खाऊन तरस जंगलाचे आरोग्य राखतो. वालरस, समुद्रसिंह, पाणघोडा यांसारखे सस्तन प्राणी जलचर जीवन जगतात.
हरणांचे जग अजब आहे. वायुवेगाने धावणारे काळवीट, चारशिंगाचा चौशिंगा आणि कस्तुरीमृग अतिशय वैशिष्ठ्य़पूर्ण आहेत.
उंट हा रखरखीत बाळवंटाचा सम्राट म्हणून ओळखला जातो.
डोंगराळ प्रदेशात कड्याकपरारीच्या जागी रानबोकड, बार्बरी मेंढी, डोंगरी मेंढी सुखासमाधानाने राहतात.
या प्राण्यांच्या दुनियेत भूतलावरचा सर्वात उंच प्राणी जसा जिराफ आहे, तसा गवा हा दणकट व शक्तिशाली प्राणीही आहे.

यासारख्या अनेक प्राण्यांच्या लकबी, सवयी आणि जीवन-संघर्ष याची मनोरंजक माहिती वाचकांना नक्कीच आवडेल!


लेखक- प्राचार्य डॉ. किशोर पवार, प्रा. सौ. नलिनी पवार
पृष्ठे- १३२
किंमत- ११० रुपये.

जलसम्राट मासे





जलसृष्ठीचे अनभिषिक्त सम्राट म्हणजे मासे!
नाना रंगांचे, रुपांचे, आकाराचे हे मासे पाहून माणूस थक्क होतो.
काहींचे सुंदर शरीर कूर्चांनी बनलेले, तर काहींचे अस्थींनी!
हे मासे जसे जलपृष्ठावर राहतात, तसेच सागरतळाशी... जेथे प्रकाशाचा किरणही पोहोचत नाहीत, तेथे ते सुखासमाधानाने निवास करतात.
प्रजोप्तादन व वंशवृध्दीसाठी मागराकडून नदीच्या उगमाकडे, तर नदीकडून सागराकडे हजारो किलोमिटर प्रवास करणारे हिल्सा, ईल, सामन यासारखे स्थलांतर करणारे मासे म्हणजे निसर्गाचा चमत्कारच म्हटला पाहिजे.
असंख्ये मासे अत्यंत टोकाचे समायोजन दर्शवितात.
काही दलदलीत राहतात, तर काही काळ्याकुट्ट गुहेत. कित्येक मासे अत्यंत गरीब, तर कित्येक शार्कसारखे मासे म्हणजे हिंस्त्र, नरभक्षक !
काही मासे विजेचा झटका देतात, तर काही मासे प्रकाशनिर्मिती करतात.
अनेक मासे ममतेचे मनोज्ञ दर्शन घडवितात..

अशा या अजब, अदभूत जिवांची, मनोरंजक आणि वेधक माहिती या पुस्तकात वाचकांना वाचता येईल.

लेखक- प्राचार्य डॉ. तिशोर पवार, प्रा. सौ. नीलिनी पवार
पृष्ठे- ६४
किंमत- ११० रुपये.

मनोरंजक सस्तन प्राणी




प्राणीसृष्टीत उत्क्रांतीच्या सर्वात वरच्या टप्प्यावर सस्तन प्राणी आहेत.
अनेक अजब, विचित्र आणि विविधतेने नटलेले सस्तन प्राणी, त्याच्या सवयी, वर्तन, जिवन जगण्याच्या पध्दती पाहिल्यावर निसर्गाच्या किमयेचे कौतुक वाटते.
अनेक सस्तन निशाचर आणि झाडनिवासी आहेत.
प्लॅटिपससारखे अप्रगत सस्तन प्राणी पक्ष्यांप्रमाणे अंडी घालतात.
साळींदर, काटेरी मुग्य़खाऊ, खवल्या मांजर, अर्माडिलो यांसारख्या प्राण्यांवर संरक्षणासाठी केसांऐवजी तिक्षण काटे, खवले किंवा चिलखत असते. वटवाघूळ , उडणा-या खारी आकाशात उड्डाण घेतात, तर अनेक सस्तन बिळांत राहतात.
भूतलावारचा प्रचंड व सर्वात मोठा प्राणी निळा देवमासा समुद्रात राहतो.
मानवाचे निकटचे नातेवाईक म्हणजे विविध प्रकारची माकडे. त्यांचे वैशिष्ठ्यपूर्ण वर्तन थक्क करणारे आहे.
वाघ, सिंह, चित्ता, बिबळ्या यांसारख्या हिंस्त्र श्वापदांचे महत्व निसर्गात अन्नन्यसाधारण असेच आहे.
एक ना दोन, अशा अनेक अदभूत, आगळ्यावेगल्या व विस्मयकारक सस्तन प्राण्यांची माहिती वाचकांना मनोरंजक वाटल्याशिवाय रहाणार नाही.

लेखक- प्राचार्य डॉ. किशोर पवार, प्रा. सौ. नलिनी पवार
पृष्ठे- १२४
किंमत- ११० रुपये.

अजब सर्पसृष्टी




सर्पसृष्टी खरोखरच अदभूत, अजब आणि चमत्कृतिजन्य आहे.
भूतलावर नानाविध प्रकारचे साप असून, काही झाडांवर निवास करतात, तर काही आपल्या बिळात!
काही साप उडते आहेत, तर काही चक्क सागरात राहणारे.
काही साप अंडी गिळणारे, काही साप विष थुंकणारे.
त्यांचे चित्तकर्षक रंग पाहून निसर्गाच्या किमयेचं कौतुक वाटतं.
या अजब सापंबाबत लोकांच्या मनात अजूनही बरेच गैरसमज आहेत.
जगात एकूण सापांपैकी फक्त पाच टक्के विषारी आहे, तरीही अज्ञान, अंधश्रध्दा आणि भीतीमुळे माणसं सापाला लाठाबुक्क्यांनी, दगडांनी ठेचून ठार मारतात आणि याच अंधश्रध्देमुळे सापांची पूजाही करतात.
अशा या अजब सर्पसृष्टीची ओळख करुन घ्यायला वाचकांना नक्कीच आवडेल.

लेखक- प्राचार्य डॉ. किशोर पवार, प्रा. सौ. नलिनी पवार
पृष्ठे- १०८
किंमत- ११० रुपये

अनोखी मत्स्यसृष्टी




आकर्षक रंगरुपाच्या, नानाविध आकारांच्या माशांचे चित्रविचित्र विश्व पाहून कुणीही थक्क झाल्याशिवाय राहत नाही.
चपटे, साळिंदरसारखे काटेरी, चेंडूसारखे गोल, तर काहीचा आकार चक्क पेटीसारखा!
काही सापासारखे लांब!
हत्तीच्या सोंडेसारखे तोंड असलेले हत्ती मासे,
वटवाघळासारखा आकार असलेले वटवाघूळ मासे,
घोड्याच्या तोंडाच्या आकारासारखे घोडतोंडाच्या मासे, तसेच समुद्री ड्रॅगन पाहून निसर्गाच्या चमत्काराचे आश्चर्य वाटते!

आंधळे मासे, सूर्याच्या आकाराचे सूर्य मासे, आयुष्यभर परावलंबी जीवन जगणारे परजीवी रेमूरा मासे, भक्ष्य़ापुढे आमिषाचा गळ टाकून त्याला लीलया फस्त करणारे गळ मासे, विजेचा शॉक देणारे मासे, विंचवासारखा दंश करणारे विंचू मासे, आवाज करणारे मासे...... असे मासे पाहिले म्हणजे निसर्गाच्या किमयेचे कौतुक वाटते.

अशा या अदभूत, वेधक, मनोरंजक व विस्मयकारक माशांच्या अनोख्या सृष्टीची माहिती वाचकांना नक्कीच आवडेल.

लेखक- प्राचार्य डॉ. किशोर पवार, प्रा. सौ. नलिनी पवार
पृष्ठे- ७२
किंमत. रु. ११०

सरपटणा-या प्राण्यांचे जग




रंग बदलणारा सरडा, पाण्यावर आणि पाण्याखाली पळणारा पाणसरडा,
अजस्त्र सरडा ड्रग्वाना, तीन डोळ्यांचा सरडा, उडणारा ड्रॅगन सरडा, झालरवाला, दाढीवाला व काटेरी सरडा,
घोपरड आणि जिवंत जीवाश्म टुआटारा सरडा यांसारखे सरपटणारे प्राणी म्हणजे निसर्गाचा अनोखा नजराणा म्हटला पाहिजे.
Aligeter, मगर, धडियाल, केमन यांसारख्या क्रुर व आक्रमक सरीसृप प्राण्यांच्या मगरमिठीतून सुटका होत नाही. पाण्यात बुडवून भक्ष्याला ठार मारण्याची मगरीची कला आगळीवेगळी आहे.

हे प्राणी आपली अंडी उबविण्याचे कामदेखील निसर्गाकडून मोठ्या कौशल्याने करुन घेतात.
२० कोटी वर्षापूर्वी कासवे भूतलावर आवतरली, परंतु त्यांच्यात कोणताही बदल दिसत नाही.
जमिनीवर तसेच गोड्या व खा-या पाण्यात राहणारी विविध रंगरुपांची, आकारांची कासवे १५० ते २०० वर्षे जगतात... हेदेखील आश्चर्यच आहे!

या अनोख्या वैचित्र्यपूर्ण जीवसृष्टीची माहिती वाचकांना नक्कीच आवडेल.

लेखक-प्राचार्य डॉ. किशोर पवार, प्रा. सौ. नलिनी पवार
पृष्ठे- ७२
किंमत- ११० रुपये.

पाणथळीतले पक्षी




बर्फासारखे पांढरे शुभ्र बगळे, काळे कुळकुळीत पाणकावळे,
अत्यंत लांब व बारीक मानेचे रोहित तथा अग्रिपंख, सुंदर हंस, सुरव,
कुरव यांसारखे नानाविध प्रकारचे चित्ताकर्षक पक्षी म्हणजे वसुंधरेचे अलंकारच!
हे पक्षी जलाशय, पाणवठे, पाणवळ तथा दलदलीच्या ठिकाणी हजारो, लाखोंच्या संख्येने जमतात.
मासे, जलचर कृमी, किडे, शंख-शिंपले, खेकडे यांसारखे भक्ष्य ते मोठ्या सुबीने शोधतात.
अशा जीवनशैलीसाठी निसर्गाने काहींना चमच्यासारखी चोच व उंच पायांची देणगी बहाल केली आहे.
काहींच्या चोची कुदळीसारख्या, तर काहींच्या वर वाकलेल्या असतात.

असंख्य परदेशी पक्षी अन्नशोधार्थ व प्रजोत्पादनासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात कतीत हजारो किलोमिटर अंतर स्थलांतर करतात.
परिस्थिती अनुकूल झाली म्हणजे मायभूमीकडे परततात. राणथळीतील पक्ष्यांची जीवनशैली वाचकांनी अजब आणि विस्मयकारक वाटल्याशिवाय राहणार नाही.

लेखक- प्रायार्य डॉ. किशोर पवार, प्रा. डॉ. सौ. नलिनी पवार
पृष्ठे- ७६
किंमत- ११० रुपये.

Wednesday, February 29, 2012

उभयचरांचे अनोखे विश्व




उभयचर म्हणजे जमीनीवर आणि पाण्यात राहणारे प्राणी.
बेडूक, भेक हे उभयचर कुणाच्या परिचयाचे नाहीत?
पावसाळा सुरु झाला म्हणजे बेडकांचे निसर्गगान सुरु होते ते `डराव डराव` अशा आवाजाने!
३५ कोटी वर्षापूर्वी त्यांचा विकास झाला तो माशांपासून.
हेच ते पहिले प्राणी की, ज्यांनी जमीनीवर आपल्या जीवनाचा प्रारंभ केला;
परंतु प्रजोत्पादनासाठी त्यांना पाणी आवश्यक असते. नानाविध प्रकारचे उभयचर पाहून आपण थक्क होतो.
काहीना चार पाय असतात, तर काहीना दोन पाय.
काही बिनपायांचे असतात, सापकिरम, न्यूट यांसारखे उभयचर अनोखेच आहेत.
काही बेडूक झाडावर राहतात, तर काही उड्डाण करतात.
काही शिरधारी असतात, तर काही अत्यंत विषारी!
उभयचरांमधील पिलांचे संगोपन समतेचे मनोज्ञ दर्शन घडविते.

अशा या अनोख्या जिवांची माहिती वाचकांना नक्कीच आवडेल.

लेखक- प्रायार्य डॉ. किशोर पवार, प्रा. सौ. नलिनी पवार
पृष्ठे- ७२
किंमत- रु.११०

आकाशसम्राट पक्षी




पक्षी म्हणजे आकाशाचे अनभिषिक्त सम्राट!
चपळाईने, वेगाने गगनात भरारी घेणा-या या पक्षांना पाहूनच मानवाला विमानाचा शोध लावता आला.
भुतलावरील नाना प्रकारच्या, नाना जातींच्या पक्षांचं अनोखं विश्व पाहिलं म्हणजे, निसर्गाचं आश्चर्य वाटतं.
प्राचीन काळी प्रचंड देहयष्टीचे उंच हत्ती पक्षी होते. परंतु ते पक्षी काळाच्या उदरात नामशेष झाले.
शहामृग, एमू, किवी यांसारखे उड्डाण करता न येणारे पक्षी आहेत, तिथे हचारो किमी. अंतर पार करणारे सारस, रोहित, आर्क्टिटसारखे पक्षीही आहेत.
हमिंगबर्ड सारखा सर्वात छोटा पक्षी जसा भूतलावर आहे, तसे गरुडासारखे बलदंड, शिकारी पक्षीही आहेत.
बैलाच्या शिंगासारखी भलीमोठी चोच असलेला टाऊकन पक्षी हा निसर्गाची देणगी आहे.
सुंदर पिसा-याचा मोर, चित्ताकर्षक रंगाचे पोपट, कुहुकुहु आवाज करणारा कोकीळ,
माळरांनांचे वैभव असलेला माळढोक, सुंदर सारस अशा कितीतरी पक्ष्यांनी वसुंधरेचं वैभव वाढवलं आहे.

अशा वैशिष्ठपूर्ण पक्षांची शास्त्रीय व मनोरंजक माहिती वाचकांना नक्कीच भुरळ घालेल.

लेखक- प्रायार्य डॉ. किशोर पवार, प्रा. सौ. नलिनी पवार
पृष्टे- ९६
किंमत- ११० रुपये.

डायनोसॉरचे अदभुत विश्व




`ज्युरॅसिक पार्क` या सुप्रसिध्द चित्रपटामुळेच डायनोसॉर या अदभुत, अजब आणि अनोख्या प्राण्याची ओळख जगाला झाली.
मध्यजीव महाकल्पातील ज्युरासिक कालखंड हा डायनोसॉर्सचा सुवर्णकाळ होता.
आजमितीला मात्र शिल्लक आहेत त्यांचे फक्त जीवाश्म!
कोंबडीएवढ्या आकारापासून प्रचंड, थिप्पाड देहयष्टीच्या असंख्य डायनोसॉर्सचा वावर भुतलावर होता.
काही भूचर, तर काही जलचर होते.
काही मात्र आकाशात पक्ष्यांप्रमाणे उड्डाण करणारे होते.
काही शाकाहारी होते, तर काही क्रुर, हिंस्त्र व मासांहारी होते.
त्यांच्या जीवाश्मांवरुन त्यांचे वर्तन, सवयी, आगार-विहार, पर्यावरण व प्रजोप्तादन इत्यादी गोष्टींचा अभ्यास करता आला.
हे भीमकाय सरीसृप अचानक का व कसे नष्ट झाले हे एक गूढच आहे.

अशा या डायनोसोर्सच्या अदभूत विश्वाची सफर वाचकांना नक्की आवडेल असा विश्वास वाटतो.

लेखक- प्राचार्य डॉ. किशोर पवार, प्रा. सौ. नलिनी पवार
पृष्ठे-६०
किंमत- ११० रुपये