Thursday, March 10, 2011

बेंडबाजा



लेखक : द. मा. मिरासदार
अडाणीपणा, बेरकीपणा, मूर्खपणा, भोळसरपणा इ. माणसांचे "सदगुण' म्हणजे विनोदी लेखनासाठीचा कच्चा मालच.
ग्रामीण आणि नागर दोन्ही भागात हा कच्चा माल भरपूर प्रमाणात असतो.
प्रत्येक विनोदी लेखकामागे एक मिश्किल माणूस दडलेला असतो
आणि तो हा कच्चा माल बरोब्बर हेरून त्यातली विसंगती खेळकर पद्धतीने शब्दबद्ध करतो.

पंढरपूरसारख्या अर्धग्रामीण भागात बालपण घालवलेल्या द..मा. मिरासदारांना असा कच्चा माल
भरपूर प्रमाणात गवसला असल्यास नवल नाही.
अशा "सदगुणी' माणसांचे वेचक अनुभव ते आपल्या खुमासदार शौलीत कथन करतात.
तेहा सामान्यांना अगदी सा­ध्या सु­ध्या वाटणा-या"ना सुद्धा मजेशीर परिमाण घेऊन आपल्यासमोर येतात.

द.मां.च्या लेखनाचे एक वौशिष्ट्य असे की ते केवळ इतरांच्याच अनुभवाकडे मिश्किल नजरेने पाहतात असे नहे,
तर स्वत:चीही फिरकी घेतात.
अशा स्वत:च्या घेतलेल्या अनेक फिरक्यांचे हसवणारे सूर या "बेंडबाजा' म­धुन ऐकू येतील.


पृष्ठे : 156 किंमत : 140

चुटक्याच्या गोष्टी


लेखक : द. मा. मिरासदार
गावात आलेल्या भोंदू "महाराजा'ची साक्ष शिवा जमदाडेबाबत खरी ठरते, तेव्हा...
घरात शिरलेल्या चोरांना एक " धोरण' ठरवून रामभाऊ किल्ल्या देतात, तेव्हा...
गावाचा "विकास' करायला विकास-योजना अ­धिकारी नकार देतो, तेव्हा...
अपघातात सापडलेल्या तलाठ्याविषयी गावक-यांना वाटणारी "हळहळ' तिरस्कारात बदलते, तेव्हा...
पैज लावणा-या दामूची फजिती होते अन् ती त्याच्या जीवावर बेतते, तेव्हा...
बायको आजारी पडावी यासाठी खटाटोप करणा-या नव-याच्या प्रयत्नांना यश येते, तेव्हा...
पारावरच्या पाटलांची थाप खरी ठरते, तेव्हा... ग्रामसु­धार योजनेच्या माध्यमातून शाळेची "प्रगती' होते, तेव्हा...
"हेळातील भीषण प्रकार' पोरखेळ ठरतो, तेहा... भविष्य बघण्याचा "नाद' असलेल्या दत्तूचं भविष्य खरं ठरतं,
तेव्हा....
द.मां.च्या "चुटक्याच्या गोष्टी'मधून मानवी स्वभावाचे विवि­ध पैलू आपल्या समोर येतात.

त्यातील काही आपल्याला अंतर्मुख करतात... तर काही हसवतात...!

पृष्ठे : 124 किंमत : 125