Thursday, March 10, 2011

चुटक्याच्या गोष्टी


लेखक : द. मा. मिरासदार
गावात आलेल्या भोंदू "महाराजा'ची साक्ष शिवा जमदाडेबाबत खरी ठरते, तेव्हा...
घरात शिरलेल्या चोरांना एक " धोरण' ठरवून रामभाऊ किल्ल्या देतात, तेव्हा...
गावाचा "विकास' करायला विकास-योजना अ­धिकारी नकार देतो, तेव्हा...
अपघातात सापडलेल्या तलाठ्याविषयी गावक-यांना वाटणारी "हळहळ' तिरस्कारात बदलते, तेव्हा...
पैज लावणा-या दामूची फजिती होते अन् ती त्याच्या जीवावर बेतते, तेव्हा...
बायको आजारी पडावी यासाठी खटाटोप करणा-या नव-याच्या प्रयत्नांना यश येते, तेव्हा...
पारावरच्या पाटलांची थाप खरी ठरते, तेव्हा... ग्रामसु­धार योजनेच्या माध्यमातून शाळेची "प्रगती' होते, तेव्हा...
"हेळातील भीषण प्रकार' पोरखेळ ठरतो, तेहा... भविष्य बघण्याचा "नाद' असलेल्या दत्तूचं भविष्य खरं ठरतं,
तेव्हा....
द.मां.च्या "चुटक्याच्या गोष्टी'मधून मानवी स्वभावाचे विवि­ध पैलू आपल्या समोर येतात.

त्यातील काही आपल्याला अंतर्मुख करतात... तर काही हसवतात...!

पृष्ठे : 124 किंमत : 125

No comments:

Post a Comment