Thursday, August 16, 2012

याला जीवन ऐसे नाव




इतिहासात डोकवा, जी मंडळी आशावादी होती त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढलेला दिसेल.
शिवाजी महाराजांचे उदाहरण पहा. प्रचंड आशावादी होते म्हणूनच हातात काहीही नसताना सुध्दा
विजापूर आणि मोगल हया दोन मोठ्या साम्राज्यवाद्यासी ते य़शस्वी झुंज देऊ शकले.

दुस-या महायुध्दात जर्मनीमध्ये ज्याच्या यातनातळात जी ज्यू मंडळी वाचली ती आशावादी होती.
आठ-नऊ वर्षे त्यांनी प्रचंड प्रतिकूल परिस्थितीशी झुंज दिली.

कोणाही यशस्वी माणसांचे उदाहरण घ्या., तुम्हाला याच सिध्तांताची प्रचिती येईल.
तुम्ही तुमचे स्वतःचे आयुष्यही पहा.
जेव्हा जेव्हा कठीण परिस्थितीशी मुकाबला करुन तुम्ही यशस्वी झाला आसाल तेव्हा तुमच्याकडे आशेची शिदोरीच असेल.


लेखक- संजीव परळीकर
पृष्ठे- ७६
किंमत- ८० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी


तुम्ही जर माझ्याशी सहमत असाल तर हे पुस्तक तुम्हाला निश्चितपणे आवडेल.
ह्या पुस्तकात मी छोट्या चौदा गोष्टी लिहल्या आहेत. काही गोष्टी काल्पनिक आहेत, काही सत्यकथा आहेत,
तर काही प्राण्यांच्या आहेत, तर काही इमेलद्वारे माझ्यापर्यत पोहोचल्या आहेत.

ह्या गोष्टीतून मोठे धडे घ्यायचे आहेत, ते तात्पर्यामध्ये लिहलेच आहे,
पण तेही धडे अमलात आणले तर आयुष्यावर दुरगामी परिणाम काय होतील ते मी सारांशामध्ये लिहले आहे...

(लेखकाच्या प्रस्तावनेतून)

Wednesday, August 15, 2012

द पेशंट



एका रुग्णाचा ऑस्ट्रेलियाच्या आरोग्यव्यवस्थेमधला प्रवास


सत्तेचाळीस वर्षांच्या जोनाथन ब्य्रुस्टरला जग मुठीत आल्यासारखं वाटतं, त्याच्याजवळ काय नाही ?
लठ्ठ पगाराची नोकरी, सुखी संसार, खासगी शाळेत जाणा-या दोन मुली, झकास बंगला आणि आलिशान गाडी!
त्याच्यावर कर्जाचा बोजाही आहे; पण त्याची त्याला काळजी नाही.
मात्र, एक पहाटे त्याला लघवीवाटे रक्त जातं. रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात डॉक्टरांच्या भेटीसाठी आठ तास थांबावं लागतं.
ह्या यशस्वी आयुष्यात जोनाथनचं आरोग्याकडे दुर्लक्ष झालयं. युरॉलॉजिस्ट डॉ. मोहम्मद खाद्रा त्याच्या संपर्कात येतात. निदान आणि उपचार ह्यांच्या जंजाळात त्याला मूत्राशयाचा कॅन्सर असल्याचं निष्पन्न होतं; पण डॉ. खाद्रांच्या दृष्टीनं जोनाथन आजाराच्या मानानं तरुण असला, तरी एक सामान्य रुग्ण राहत नाही. त्यांच्या आयुष्यातली साम्यस्थळं दिसू लागतात.
डॉ. खाद्रांचं आयुष्यही एका ठरविक वळणावर जातं, आयुष्यही नश्वर आणि बेभरवशांचं असल्याचं त्यांचा आजार त्यांना शिकवून जातो.
स्वतःच्या मर्त्यपणाची जाणीव झाल्यावर त्या दोघांनाही आजवर लाभलेल्या आयुष्याबद्दल कृतज्ञता वाटू लागते.

मुळ लेखक- डॉ. मोहम्मद खाद्रा
अनुवाद- डॉ. देवदत्त केतकर
पृष्ठे- १८०
किंमत- १९० रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी.


Tuesday, August 14, 2012

गीतांजली



भावानुवादित काव्यसंग्रह

रविंद्रनाथांचे भाषेवरील प्रभुत्व, परमेश्वराच्या भेटीची अनिवार्य ओढ, एका बाजुला मृत्यूबद्दलची भीती, तिरस्कार
तर दुसरीकडे त्याच्या प्राप्तीची तळमळ, स्वतःच्या उणीवांची आणि मलिनतेची जाणीव , अंतःकरण सूचितेची उत्कट इच्छा, कुठलेही अवजड अलंकार ,उपमा, उत्प्रेक्षा न वापरता निसर्गात आढळणा-या चंद्र, सूर्य, तारे, आकाश, प्रकाश, भरती-ओहोटी यासारख्या प्रतिमांचा समर्पक वापर करुन सहजपणे सांगितलेले जीवनविषयक सत्य व तत्वज्ञान
या सर्वच गोष्टी थक्क करणा-या होत्या.
स्वतः एक उत्तम चित्रकार आणि संगीतकार असल्यामुळे कुंचल्यानी रेखाटलेल्या चित्रासारखे,
काव्यातून नादमय शब्दचित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करण्याची त्यांची हातोटी केवळ अवर्णनिय !

मूळ बंगाली लेखक-रवींद्रनाथ टागोर
भावानुवाद- डॉ. अमिता गोसावी
पृष्ठे- १०८
किंमत- १०० रुपये.



हे छोटंसं फुल पटकन खुडून घे, विलंब करु नकोस ! अन्यथा ते कोमेजून जमीनावर धुळीत पडेल, अशी मला भिती वाटते.
त्याला तुझ्या गळ्यातील हारात जागा मिळाली नाही तरी चालेल., पण तुझ्या हाताने खुडून घेताना होणा-या वेदनेने बहुमानित कर आणि खुडून घे.
मी सावध होण्य़ाआधी बघता-बघता दिवस ढळेल आणि तुझ्या अर्चनेसाठी अर्पण होण्याची वेळ निघून जाईल, अशी मला भिती वाटते.

या फुलाचा रंग जरासा उडालेला असला आणि गंध मंद झाला असला , तरी त्याला तुझ्या पूजेत सहभागी व्हायची संधी दे.वेळेतच त्याला खुडून घे.