Tuesday, August 14, 2012

गीतांजली



भावानुवादित काव्यसंग्रह

रविंद्रनाथांचे भाषेवरील प्रभुत्व, परमेश्वराच्या भेटीची अनिवार्य ओढ, एका बाजुला मृत्यूबद्दलची भीती, तिरस्कार
तर दुसरीकडे त्याच्या प्राप्तीची तळमळ, स्वतःच्या उणीवांची आणि मलिनतेची जाणीव , अंतःकरण सूचितेची उत्कट इच्छा, कुठलेही अवजड अलंकार ,उपमा, उत्प्रेक्षा न वापरता निसर्गात आढळणा-या चंद्र, सूर्य, तारे, आकाश, प्रकाश, भरती-ओहोटी यासारख्या प्रतिमांचा समर्पक वापर करुन सहजपणे सांगितलेले जीवनविषयक सत्य व तत्वज्ञान
या सर्वच गोष्टी थक्क करणा-या होत्या.
स्वतः एक उत्तम चित्रकार आणि संगीतकार असल्यामुळे कुंचल्यानी रेखाटलेल्या चित्रासारखे,
काव्यातून नादमय शब्दचित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करण्याची त्यांची हातोटी केवळ अवर्णनिय !

मूळ बंगाली लेखक-रवींद्रनाथ टागोर
भावानुवाद- डॉ. अमिता गोसावी
पृष्ठे- १०८
किंमत- १०० रुपये.



हे छोटंसं फुल पटकन खुडून घे, विलंब करु नकोस ! अन्यथा ते कोमेजून जमीनावर धुळीत पडेल, अशी मला भिती वाटते.
त्याला तुझ्या गळ्यातील हारात जागा मिळाली नाही तरी चालेल., पण तुझ्या हाताने खुडून घेताना होणा-या वेदनेने बहुमानित कर आणि खुडून घे.
मी सावध होण्य़ाआधी बघता-बघता दिवस ढळेल आणि तुझ्या अर्चनेसाठी अर्पण होण्याची वेळ निघून जाईल, अशी मला भिती वाटते.

या फुलाचा रंग जरासा उडालेला असला आणि गंध मंद झाला असला , तरी त्याला तुझ्या पूजेत सहभागी व्हायची संधी दे.वेळेतच त्याला खुडून घे.




No comments:

Post a Comment