Saturday, November 5, 2011

सेक्रेड हार्टस-वेगळ्या विषयावरची अनोखी कादंबरी.....

इटलीतील शहरांमधील अर्ध्याअधिक उच्चकुलीन स्त्रियांना मठात जोगिणी म्हणून येणं क्रमप्राप्त ठरलं आणि मठातील आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.

`तपासणी` किंवा `पाहाणी`साठी येणा-या अधिका-यांनी नवे कायदे आणले. बाहेरच्या जगाशी असलेला सारा संपर्क निष्ठुरपणे तोडून टाकला गेला. भिंतीवरील गवाक्षे आणि खिडक्या विटांनी बंद करण्यात आल्या. सगळीकडे संरक्षक लोखंडी जाळ्या बसविल्या गेल्या. मठोभावती तटबंदीची उंची वाढविण्यात आली. कधीकधी तर विटांचे वरचे थर चुन्यानं पक्के न करता, नुसतेच एकावर एक रचले जात. त्यावर शिडी टेकवून त्याच्यावरुन पलिकडे जाता येऊ नये यासाठीची ही युक्ती होती. चर्चची अंतर्रचना बदलण्यात आली आणि तेथे आलेल्यांना जोगिणीचं नखसुध्दा दृष्टीस पडणार नाही अशी तजवीज केली गेली. भेटीला येणा-यांच्या स्वगतकक्षाचंही लोखंडी जाळ्या आणि पडद्यांनी विभाजन केलें गेले; त्यामुळे भेटीला आलेल्या कुटुंबियांसमवेत जोगिणींना मुक्तपणे गप्पागोष्टी करणं अशक्य झालं. मठात जोगिणी करत असलेले नाट्यप्रयोग आणि त्याचं संगीत यावर निर्बध घातले गेले. कांही मठाद्वारे यांना पूर्णपणे मज्जाव केला गेला आणि मठातील वाद्यवृंद बंद करुन फक्त ऑर्गनला (पायपेटी) परवानगी ठेवली गेली. तपासणी अधिकारी जोगिणींच्या कोठड्यांची तपासणी करुन तेथील सामान, पुस्तकं, विलासाच्याच्या गोष्टी आणि खाजगी वस्तू जप्त करु लागले.

ह्या दंडेलशाहीला विरोध केला जाऊ लागला. तपासणी अधिकारी निघून जाऊन, मठाचे दजरनाजे बंद केले गेले की अनेक मठांमध्ये वातावरणात ढिलाई येऊन थोडी सूट दिली जाऊ लागली. ही रस्सिखेच अनेक वर्ष चालू राहिली. काही मठांमध्ये जोगिणींनी अशा बदलांना कडाकडून विरोध केला; काहींनी तर स्वातंत्र्य टिकवून धरण्यासाटी शारिरीक प्रतिकारही केला. परंतू सरतेशेवटी त्यांना नमवलं जात असे.

(पुस्तकात लेखिकेने केलेल्या आपल्या प्रस्तावनेतून)


१५३० साल. इटलीतील एक बेनेडिक्टिन मठ. त्या मठात जोगीण म्हणून इच्छेविरुध्द डोंबली गेलेली एक उच्चकुलीन, देखणी, तरुण, बंडखोर युवती.
मठातून निसटून आपल्या प्रेमिकाशी विवाह करण्यासाठी तिनं लढविलेल्या हजार हिकमती आणि मठातील राजकारणामुळं तिच्या प्रयत्नांमध्ये आलेली विघ्नं. पाकळीपाकळीनं उमलत उत्कंठा वाढवत नेणारं कथानक तुम्हाला सोळाव्या शतकातील इटलीच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक पार्श्वभूमीचं यथार्थ दर्शन घडवून मंत्रमुग्ध करेल.
देवतार्पण झालेल्या जोगिणीची ` सक्रेड हार्टस्` -
पवित्र अंतःकरण- कशी राजनैतिक खेळी खेळताना ह्यात गुंगलेला वाचक कादंबरीच्या अनपेक्षित सुखान्त समारोपानं हर्षोत्फुल्ल होईल.
वेगळ्या विषयावरची अनोखी कादंबरी.....


मूळ लेखक- सारा ड्युनांट
अनुवाद- सुनीति काणे
पृष्ठे- ४०८ ,किंमत- ४०० रु.

Tuesday, November 1, 2011

शॅपेल





वस्तुस्थिती, पुरावा, सत्य

एक साधीशा सफर प्रत्येक माणसासाठी एक दुःस्वप्न कशी बनली ? शॅपेलनं आता कुणाची मदत घ्यावी ?

शॅपेल कार्बोच्या बॅगेत देनपसार एअरपोर्टवर ड्रग्ज सापडल्यावर, इंडोनेशियात तिला विस वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली गेली आणि सा-या जगाचं लक्ष तिच्याकडे गेले.
क्विन्सलंडमध्ये ब्यूटी थेरपीचं प्रशिक्षण घेणारी ही मुलगी सध्या केरोबोकनच्या तुरुंगात एक-एक दिवस मोजत असताना, नरकप्राय यातना भोगत आहे. तरीही उमेद न हारता आब राखून जगायचा प्रयत्न करते आहे. असं धीरानं जगणं सोपं नाही , कारण सध्या तरी ती २०२४ पूर्वी सुटेल अशी शक्यता दिसत नाही.
शॅपेलच्या खटल्यासंदर्भात कोर्टानं लावलेल्या शोधामागचं सत्य..
प्रसारमाध्यमानी केलेले दोषारोप आणि वस्तुस्थिती यातली तफावत..
ह्या खटल्याबाबतच्या अतिरंजित वावड्या..
या सर्वांचं अत्यंत वस्तुनिष्ठ, संयत वर्णन ` SCHAPELLE` या पुस्तकात शोध-पत्रकार टोनी विल्सन यांनी केलेलं आहे.
टोनी विल्सन यांचा शॅपेलच्या निर्दोषत्वावर नेहमीच दृढविश्वास राहिला.
आणि शॅपेलच्या हादरवून टाकणा-या खटल्याबाबतच्या मथळ्यांमागचं सत्य जगापुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी ह्या पुस्तकात केलेला आहे.
मुळ लेखक- टोनी विल्सन
अनुवाद- सुनीति काणे
पृष्ठे- २१४
किंमत- २४० रुपये

शत्रुशी दोन हात



ग्वांटानामोत डांबलेल्या ब्रिटिश नागरिकांची थरारक सत्यकथा

ग्वांटानामो बे मधील छावण्यांमध्ये जे नऊ ब्रिटिश नागरिक डांबले होते, त्यापैकी मोआझ्झम बेग हे एक होते. जो गुन्हा त्यांनी केलाच नव्हता आणि ज्या गुन्ह्याचं नेमकं स्वरुप कधीही स्पष्ट झालं नाही, त्यासाठी त्यांना तिथं डांबून ठेवण्यात आलं.
९/११ च्या हल्ल्यानंतर एक वातावरण तयार झालं, त्या काळात पाकिस्तानमध्ये तात्पुरतं बि-हाड करुन ते राहात असताना तिथून त्यांचं अपहरण करण्यात आलं.
मोआझ्झम बेग तिन वर्ष तुरुंगात राहिले. यातला बराच काळ मोठ्या एकांतवासात गेला. तिथे डांबलेल्या दोघांचा खून करताना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्या घटनेने आणि त्यामुळे त्यांना मृत्यूच्या धमक्या दिल्या गेल्या तसचं भयंकर छळालाही सामोरं जावं लागलं.
२००५ साली सुरुवातीला त्यांना कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण वगैरे न देता किंवा त्यांची माफी न मागता त्यांची सुटका करण्यात आली.
`Enemy Combatant` या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद
मुळ लेखक- मोआझ्झम बेग
अनुवाद – योगिनी वेंगुर्लेकर
पृष्ठे- ४२४
किंमत- ४०० रुपये

Monday, October 31, 2011

संवाद परमेश्वराशी


Concersations With God या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद

एक अलौकिक संवाद


जीवनाला कलाटणी देणारा अनुभव. एक असामान्या संवाद.
संवाद परमेश्वराशी.
कल्पना करा तुम्ही देवाला अस्तित्व, प्रेम आणि श्रध्दा, विश्वास, जन्म आणि मृत्यू, चांगलं आणि वाईट या बद्दल गोंधळात टाकणारे प्रश्न विचारलेत-
कल्पना करा देवानं त्यांची अगदी निःसंदिग्ध, स्पष्ट आणि सहज समजतील अशी उत्तरं दिली-
नील डॉनाल्ड वॊल्श यांच्या बाबतीत हे घडलं-
तुमच्याही बाबतीत हे घडू शकतं
तुम्हीसुध्दा असा संवाद करु शकता..
वॊल्शनं जेव्हा देवाला पत्र लिहायचं ठरवलं तेव्हा आयुष्यात ते निराशेच्या गर्तेत सापडलेले होते. त्यांना अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. त्यांचं पत्र लिहून पूर्ण झालं--आणि मग त्यांना लिहितचं रहावसं वाटलं..त्यातूनच त्यांच्या प्रश्नांना
ही अलौकिक, असामन्य उत्तरं मिळाली.
ही अर्थपूर्ण, तत्वनिष्ठ आणि सत्याधिष्टित उतरं तुम्हाला चकित करतील. आपल्या सर्व श्रध्दा आणि परंपरांचा सखोल अर्थ त्यातून उलगडत जाईल.
ही उत्तरं तुमच्या बरोबरच तुमचं आयुष्य, अन्य गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टकोन बदलून टाकतील.
खुलं मन, असीम उत्सुकता आणि सत्यान्वेषणाची प्रामाणिक इच्छा असणा-यांसाठी हे पुस्तक दिव्य अनुभव ठरावं.

मूळ लेखक- नील डॉनाल्ड वॊल्श
अनुवाद- डॊ. वृषाली पटवर्धन
पृष्ठे- २२०
किंमत-२४०