इटलीतील शहरांमधील अर्ध्याअधिक उच्चकुलीन स्त्रियांना मठात जोगिणी म्हणून येणं क्रमप्राप्त ठरलं आणि मठातील आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.
`तपासणी` किंवा `पाहाणी`साठी येणा-या अधिका-यांनी नवे कायदे आणले. बाहेरच्या जगाशी असलेला सारा संपर्क निष्ठुरपणे तोडून टाकला गेला. भिंतीवरील गवाक्षे आणि खिडक्या विटांनी बंद करण्यात आल्या. सगळीकडे संरक्षक लोखंडी जाळ्या बसविल्या गेल्या. मठोभावती तटबंदीची उंची वाढविण्यात आली. कधीकधी तर विटांचे वरचे थर चुन्यानं पक्के न करता, नुसतेच एकावर एक रचले जात. त्यावर शिडी टेकवून त्याच्यावरुन पलिकडे जाता येऊ नये यासाठीची ही युक्ती होती. चर्चची अंतर्रचना बदलण्यात आली आणि तेथे आलेल्यांना जोगिणीचं नखसुध्दा दृष्टीस पडणार नाही अशी तजवीज केली गेली. भेटीला येणा-यांच्या स्वगतकक्षाचंही लोखंडी जाळ्या आणि पडद्यांनी विभाजन केलें गेले; त्यामुळे भेटीला आलेल्या कुटुंबियांसमवेत जोगिणींना मुक्तपणे गप्पागोष्टी करणं अशक्य झालं. मठात जोगिणी करत असलेले नाट्यप्रयोग आणि त्याचं संगीत यावर निर्बध घातले गेले. कांही मठाद्वारे यांना पूर्णपणे मज्जाव केला गेला आणि मठातील वाद्यवृंद बंद करुन फक्त ऑर्गनला (पायपेटी) परवानगी ठेवली गेली. तपासणी अधिकारी जोगिणींच्या कोठड्यांची तपासणी करुन तेथील सामान, पुस्तकं, विलासाच्याच्या गोष्टी आणि खाजगी वस्तू जप्त करु लागले.
ह्या दंडेलशाहीला विरोध केला जाऊ लागला. तपासणी अधिकारी निघून जाऊन, मठाचे दजरनाजे बंद केले गेले की अनेक मठांमध्ये वातावरणात ढिलाई येऊन थोडी सूट दिली जाऊ लागली. ही रस्सिखेच अनेक वर्ष चालू राहिली. काही मठांमध्ये जोगिणींनी अशा बदलांना कडाकडून विरोध केला; काहींनी तर स्वातंत्र्य टिकवून धरण्यासाटी शारिरीक प्रतिकारही केला. परंतू सरतेशेवटी त्यांना नमवलं जात असे.
(पुस्तकात लेखिकेने केलेल्या आपल्या प्रस्तावनेतून)
१५३० साल. इटलीतील एक बेनेडिक्टिन मठ. त्या मठात जोगीण म्हणून इच्छेविरुध्द डोंबली गेलेली एक उच्चकुलीन, देखणी, तरुण, बंडखोर युवती.
मठातून निसटून आपल्या प्रेमिकाशी विवाह करण्यासाठी तिनं लढविलेल्या हजार हिकमती आणि मठातील राजकारणामुळं तिच्या प्रयत्नांमध्ये आलेली विघ्नं. पाकळीपाकळीनं उमलत उत्कंठा वाढवत नेणारं कथानक तुम्हाला सोळाव्या शतकातील इटलीच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक पार्श्वभूमीचं यथार्थ दर्शन घडवून मंत्रमुग्ध करेल.
देवतार्पण झालेल्या जोगिणीची ` सक्रेड हार्टस्` -
पवित्र अंतःकरण- कशी राजनैतिक खेळी खेळताना ह्यात गुंगलेला वाचक कादंबरीच्या अनपेक्षित सुखान्त समारोपानं हर्षोत्फुल्ल होईल.
वेगळ्या विषयावरची अनोखी कादंबरी.....
मूळ लेखक- सारा ड्युनांट
अनुवाद- सुनीति काणे
पृष्ठे- ४०८ ,किंमत- ४०० रु.
No comments:
Post a Comment