Sunday, February 19, 2012

काळी



`द गुड अर्थ` या जगप्रसिध्द कादंबरीचा अनुवाद


मूळ लेखिका- पर्ल बक
अनुवाद- भारती पांडे
पृष्ठे- २८६
किंमत- २८० रुपये.


अत्यंत जीवघेण्या संघर्षानं व्यापलेलं पण त्याचवेळी अत्यंत संथ असणारं वांगलुंग या चीनी शेतक-याचं लांबलचक आयुष्य हा या कादंबरीचा गाभा आहे.
वागलुंगच्या लग्नाच्या दिवसापासून या कादंबरीची सुरवात होते. ती त्याचे प्रौढ, सुशिक्षित , शहरी मुलगे त्याच्या मरणाची वाट पाहात आहेत, इथं ती संपते....

या मधल्य़ा मोठ्या कालखंडात जमिनीवर प्रेम करत करत समृध्द आयुष्याचे टप्पे ओलांडणारा. संपन्नतेच्या काठावर उभा राहून तटस्थपणे आपल्या गतजीवनाकडे बघणारा वांगलुंग दिसतो.

हे सारं आयुष्य कोणत्याही देशात आणि कोणत्याही संस्कृतीत घडू शकेल इतकं सामान्य आहे.

एका गरीब चीनी शेतक-याच्या धकाधकीच्या आणि लांबलचक आयुष्याचं अगदी सरळ सोप्या भाषेत वर्णन करणारी ही कादंबरी...
अमेरिकन साहित्याचा मानदंड ठरली आहे.

सहा संशयित

हत्येतही जातीची उतरंड असते.
विकी रायचा, एका अत्यत प्रतिष्ठित मंत्र्याच्या मुलाचा त्यानेच आयोजित केलेल्या झगमगत्या पार्टीत खून होतो.
पार्टीला आलेल्या पहुण्यांपैकीच एकाने हा खून केला आहे.
सगळे पाहुणे अतिशय प्रतिष्ठित.:..पण त्यात पोलिसांना सहा आशा त-हेवाईक व्यक्ती आढळतात ज्यांच्याकडे पिस्तुल होते आणि मनात विकी रायच्या हत्येची छुपी, पण धगधगती प्रेरणा!

भारतातील एक नामवंत शोधपत्रकार अरुण अडवाणी यांने खूनी कोण याचा छडा लावण्याचे व्रतच घेतले आहे!
या प्रयत्नामागे आपल्यासमोर उलगडच जातो, तो त्या सहा व्यक्तींच्या आयुष्याचा बहुरंगी,
कधी सुन्न करणारा, तर कधी मन हेलावणारा जीवनपटच1
पण अडवीणी तरी विश्वासार्ह आहे?
का काही वेगळा हेतू, अजेंडा त्याच्याही मनात आहे?
समकालीन भारताच्या बहुरंगी समाजजीवनाचे सुन्न चकित करणारे चित्रण!



मूळ लेखक- विकास स्वरुप
अनुवाद- वन्दना अत्रे
पृष्ठे- ४२६
किंमत- ४५० रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी.


समकालीन भारतातील गंध आणि दृष्टी यामुळे समृध्द असलेली ही रहस्यकथा.... विकास स्वरुप यांची शैली आणि कथानक- हाताळ्ण्याची धाटणी यांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकते. वाचक नक्कीच याला दाद देतील!
-लायब्ररी जर्नल

बिट्रेयल




डब्लीनमधील हार्मन सुधारणागृह हा युरोपमधील सर्वात भयानक तुरुंग..
डॉ. फ्रॅंक रयान यांच्याकडे बंदिजनांच्या आरोग्य़ाची जबाबदारी आहे.
फार जोखमीचे काम. ह्याआधीच्या डॉक्टरचा खून झाला होता.
डॉ. रयान याने मात्र ही जबाबदारी आव्हान म्हणून स्वीकारली आहे.

एका पहाटे रयानला फोन करून तुरुंगात बोलावण्यात येते.
सुखशय्येतील प्रेयसीचा निरोप घेऊन डॉ. रयान तडक निघतो.
पण तो सापडतो एका सापळ्यात...
शुध्दीवर आल्यावर त्याला वाटतं, की तो हॉस्पीटलमध्ये आहे .पण काहीतरी चुकतयं.
परिचारिका खोलीचे दार कुलूप लावून का बंद करते.? लिसा का भेटायला येत नाही?
रयान तुरुंगात तर नाही?...

परस्परविरोधी आणि गोंधळात टाकणा-या पुराव्यामुळे डॉ. रयान चक्रावून जातो.
त्याचा माग काढताना डॉ. रयान तुरुंगातील संवेदनाशील `जे` कक्षापर्यंत पोहोचतो.
तिथे एका गूढव्यक्तीचे वास्तव्य आहे...

मूळ लेखक- पॉल कार्सन
अनुवाद- मुकुंद कुर्लेकर
पृष्ठ- २०८
किंमत- २२० रुपये.


`ह्दयाचे ठोके वाढविणारी..गोठवून टाकणारी भयकथा`...म्हणजे `बिट्रेयल`!
-द आयरिश इन्डिपेन्डन्ट

पॉल कार्सन यांचे `बिट्रेयल` हे पुस्तक म्हणजे उत्कृष्ट भयकथा आहे. कथेचा शेवट सौम्य असला तरी तेवढाच हादरवून टाकणारा आहे. कथा वाचताना मला खूप आनंद मिळाला.
-जे रॉबर्ट इवबॅंक

युरोपमधील डब्लिनचे `हार्मन` सुधारणागृह म्हणजे विशेष सुरक्षाव्यवस्था असलेललं भयानक कारागृह होतं. या कारगृहात ड्रग माफिया, दहशतवादी, टोळीयुध्दाचे प्रमुख, लेंगिक शोषण करणारे अशा कुख्यात लोकांचा भरणा होता. या अशा भयानक कारागृहात जिथे आधीच्या डॉक्टरचा खून झाला होता तेथेच डॉ. रयानची `चीफ मेडिकल ऑफीसर` म्हणून नेमणूक झाली होती. अशा परिस्थीतीत काम करणे म्हणजे वैद्यकीय आणि वैयक्तिक दृष्ट्या डॉ. रयान यांच्यापुढे एक आव्हानच होते. हार्मन कारागृहात `जे` विंगमध्ये एक व्यक्ति नजरकैदेत होती. त्याभोवती देशांतर्गत राजकीय आणि आंतरराष्ठीय हितसंबंध बंदिस्त झाले होते...
`बिट्रेयल`च्या वेगवाने कथानकाच्या माध्मातून कार्सन यांनी हार्मनच्या तुरुंगातील भयानक वास्तव मांडले आहे
.- सेंट मार्टिन्, प्रेस