Saturday, June 25, 2011

अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी


वैयक्तीक बदलातील शक्तिशाली धड़े

अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी या पुस्तकात लेखक स्टीफन आर कवी हे
वैयक्तीक व व्यवसायीक प्रश्नांची उकल करण्याचा एक संपूर्ण
एकात्म, तत्त्व-केन्द्रित मार्ग आपल्यासमोर मांडतात.


मूळ लेखक : स्टीफन आर. कवी
अनुवादक : विदुला टोकेकर

पृष्ठे : 400 किंमत : 295

चिकन सूप फॉर द सोल(भाग-५)


....... जगभरात कोट्यवधी प्रतींची विक्री झालेली मालिका

मनाला अतिशय भावणाऱ्या हृदयस्पर्शी, स्फूर्तिदायक अशा पुढील कथांचा तुम्हाला आनंद प्राप्त करून देण्यासाठी
सादर आहे तुमच्या आवडत्या 'चिकन सूप फॉर द सोल' या पुस्तकाचा पाचवा भाग!

मानवी आयुष्याला व माणुसकीला मानाचा मुजरा करणाऱ्या या कथारूपी पुष्पगुच्छाचा सुगंध
प्रत्येकाच्या मनात दरवळेल व असाच अनेकांच्या मनात दरवळत जाऊन साऱ्या पृथ्वीतलावर
सुगंधित वातावरण निर्माण होईल, शांती प्रस्थापित होईल अशी खात्री आहे.

हे 'चिकन सूप' चव घेत घेत चमचा-चमचा पिऊ शकता. हवं तर वाडगाभर सूप प्राशन करू शकता
आणि वाटलंच तर सूपचं भरलेलं पूर्ण पातेलंच एका बैठकीत संपवू शकता!

या भागातील सामान्य लोकांच्या जीवनातले असामान्य अनुभव वाचताना एखाद्या वेळी तुम्हाला आलेल्या अनुभवाची
आठवण जागी होईल आणि मग त्या कथेचा खरा गर्भितार्थ तुमच्या मनाला अधिक चांगल्या प्रकारे स्पर्श करून जाईल.
एक लक्षात ठेवा तुमच्या व तुमच्या जिवलगांच्या आयुष्यात प्रेमासाठी, स्फूर्तीसाठी भरपूर जागा आहे.

तेव्हा ह्या पाचव्या भागातील कथांचा ठेवा मनात जरूर जपून ठेवा.

मूळ लेखक : मार्क व्हिक्टर हॅन्सन
अनुवादक : उषा महाजन

पृष्ठे : 360 किंमत : 300

चिकन सूप फॉर द सोल(भाग-4)


जगभरात कोट्यवधी प्रतींची विक्री झालेली मालिका.....

'चिकन सूप फॉर द सोल' या पुस्तकाच्या पहिल्या तीन भागांप्रमाणे या चौथ्या भागात
जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन ह्यांनी देशविदेशातनं, आत्मबळ वाढवणाऱ्या नव्या कथा मागवून
त्यांची मेजवानीच वाचकांना दिली आहे.

प्रेम, शिकवणूक, पालकत्त्व, बुद्धिमत्ता, अडचणींवर मात, स्वप्नपूर्ती, मृत्यू, वाइटातनं चांगलं शोधण्याची कला
अशा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडित असलेल्या हृदयस्पर्शी कथांचा नवा ठेवा या चौघांनी मिळून
वाचकांसमोर उलगडला आहे.

या कथांवर मनन-चिंतन करून तुम्हा-आम्हा सर्वांचाच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल
आणि बिकट सद्य:परिस्थितीमध्ये अशाच परिवर्तनाची निकडीची आवश्यकता आहे,याबद्दल वादच नाही.

मूळ लेखक : जॅक कॅनफिल्ड
मार्क व्हिक्टर हॅन्सन
अनुवादक : उषा महाजन
पृष्ठे : 286 किंमत : 250

Friday, June 24, 2011

गर्नसी वाचक मंडळ


गर्नसी - इंग्लिश चॅनल आयलंड वरील एक निसर्ग रमणीय, चिमुकले बेट.
1946, जानेवारी, दुसरं महायुद्ध नुकतंच संपलंय आणि गर्नसीलाही या युद्धाच्या झळा बसल्यात.
लंडनही या युद्धाच्या छायेतून वर येतंय. पुन्हा "जीवनाला' सामोरं जातंय.
"इझ्झी गोज टू वॉर' या पुस्तकाने प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आलेली ज्युलिएट आता तिच्या पहिल्या पुस्तकासाठी
विषय शो­धतीये आणि तसा तिला तो मिळालाही गर्नसीकडून.
चार्लस् लँबचा नि:स्सीम भक्त असलेला डॉसी एका प्रतीवर ज्यूलिएटचं नाव पाहून तिला पत्र ­धाडतो.
त्याला लँबची अन्य पुस्तकं कुठं मिळतील विचारायचं असतं आणि इथून सुरूहोतो हा पत्रांचा सिलसिला.
"गर्नसी लिटररी अॅण्ड पोटॅटो पील- पाय सोसायटी' असे लांबलचक आणि मजेदार नामकरण झालेल्या
या वाचक मंडळातले अन्य सभासदही डॉसीच्या पाठोपाठ ज्यूलिएटचे "पत्रमित्र' बनतात.
युद्धाच्या गडद काळोख्या रात्रींमध्ये त्यांना जवळ आणलं या वाचक मंडळानं, त्यांना जिवंत ठेवलं या भेटीगाठींनी.
लोभस, गहिरी माणुसकी असलेली ही पात्रं एखाद्या सत्यकथेइतकी जिवंत उतरली आहेत.
त्यांच्या साध्यासुध्या आयुष्यातील करुण युद्धाच्या कहाण्या, मजेदार प्रसंग सारं काही ते आपल्या या नव्या
मौत्रिणींशी शेअर करतात.
त्यांच्या पत्रांतून ज्यूलिएटसमोर त्या अनोख्या बेटाविषयी, त्यांच्या आवडीनिवडी,
त्यांची आवडती पुस्तकं आणि "नाझी अंमला'तून नुकत्याच स्वतंत्र झालेल्या, मोकळा श्वास घेतलेल्या समाजजीवनाविषयी माहितीपट उलगडत जातो आणि विलक्षण भावबं­धानी हे रहिवासी तिच्याशी बांधले जातात. मग आपसूकच ज्यूलिएट गर्नसीच्या जलप्रवासाला निघते आणि याच बेटावर तिच्या आयुष्याला एक निर्णायक कलाटणी मिळते. काही करुणरसात भिजलेली, तर काही सौम्य विनोदाची पखरण असलेली ही स्नेहाद्र्र पत्रं म्हणजे शब्दांचा आनंदोत्सव आहे.
हा जल्लोष रसिक वाचकांनाही तितकाच भावेल यात कसलीही शंका नाही.

मूळ लेखक : मेरी अन शाफर
अनी बरोज
अनुवादक : मैत्रेयी जोशी
पृष्ठे : 248 किंमत : 250

Thursday, June 23, 2011

सॉल्ट अँड हनी


एक विचार प्रवृत्त करणार तसच मनाला गुंगवून टाकणारं पुस्तक

कोबा! वर्णद्वेषाच्या वणयात होरपळणाऱ्या दक्षिणी आफ्रिकेतील कलहारी वाळवंटातल्या
भटक्या आदिवासी जमातीतली एक लहानगी!
गो-या लोकांच्या एका शिकारी चमूकडून आपल्या आईवडिलांची झालेली निर्घृण हत्या
स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्यावर तिला तिच्या स्वत:च्या जगापासून दूर, त्या गो-याच्या जगात नेलं जातं.
त्यांच्या त्या सुंदर पण तिच्यासाठी ­धोक्याच्या असलेल्या जगाशी जुळवून घ्यायला.
त्यात टिकाव ­धरायला ती हळूहळू शिकते. तरीही एक जीवघेणी जाणीव तिला सतत टोचणी लावून असते
ती म्हणजे जर तिला स्वत:च्या जमातीकडून बहिष्कृत हायचे असेल,
त्यांच्यापासून पूर्णपणे तोडले जायचे नसेल तर तिला त्या माणसांचा, ज्यांच्यावर तिचा जीव जडला आहे,
त्यांचा त्याग करावाच लागेल.

अखेर तिलाच दोषी ठरवणार्या गो-याच्या त्या अत्याग्य कायद्यांच्या मा­यमातून सर्वस्व पणाला लावणे
हाच कदाचित त्यावर उपाय असू शकतो. एका नष्ट होऊ घातलेल्या संस्कृतीच्या जीवनशौलीच्या अंतरंगाची
दुर्मिळ झलक दाखवणारी ही कादंबरी हे महाकायच आहे सहनशक्ती आणि चिवटपणा तसेच सामंजस्य व सहिष्णुतेची
ही एक मन हेलावून टाकणारी रोमहर्षक कहाणी आहे.

कँडी मिलरचं श्रेय हेच आहे की एका छोट्याश्या पुस्तकात तिने फार मोठा आशय यक्त केला आहे.
ह्या महत्वाकांक्षी कादंबरीचा आवाका फार मोठा आहे आणि तिला मातीचा स्पर्श आहे.



मूळ लेखक : Candi Miller
अनुवादक : वैजयंती पेंडसे

पृष्ठे : 222 किंमत : 200

हात विधात्याचे


"टेनफिंगर्स फॉर गॉड' हे पुस्तक म्हणजे डॉ. पॉल ब्रँन्ड या कर्म तपस्याची विलक्षण जीवनगाथा.
त्यांना वैद्यकीय व्यवसायातील संतच म्हणावे लागेल. कारण आपलं संपूर्ण आयुष्य आणि वौद्यकीय ज्ञान त्यांनी जगभरातल्या अगणित कुष्ठरोग्यांच्या हालअपेष्टा दूर करण्यासाठी वेचलं.
शस्त्रक्रियांद्वारे, संशोधनाद्वारे, इतरांना दिलेल्या प्रेरणेद्वारे - आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
समाजानं दूर लोटलेल्या गरीब कुष्ठरोग्यांना दाखविलेल्या सहानुभूतीमुळे त्यांना वैद्यकीय जगतातच नहे तर
जनमानसातही अलौकिक किर्ती लाभली आहे.

डॉ. ब्रँन्ड यांच्या यावसायिक आयुष्याच्या केंद्रस्थानी आहे एक अनोखा विषय -
वि­धात्यानेच निर्माण केलेला एक अविष्कार - वेदना. ते एका वेगळ्याच नजरेने या विषयाकडे बघतात.
वेदनेचं मानवी आयुष्यातील स्थान त्यांना फार महत्त्वाचं वाटतं.

ते म्हणतात, शारीरिक वेदना हे मनुष्यमात्राला परमेश्वरानं दिलेलं एक वरदान आहे.
वेदना आहे म्हणूनच माणूस टिकून आहे. डॉ. ब्रँन्ड हे एक शल्यविद्या विशारद तर आहेतच,
पण ते एक उत्कृष्ट शिक्षक आणि पर्यावरणवादी ही आहेत.

स्वार्थ, त्याग आणि विनम्रता यांचं विलक्षण मिश्रण म्हणजेच डॉ. पॉल ब्रँन्ड!

मूळ लेखक : डोरोथी क्लार्क विल्सन
अनुवादक : नीला चांदोरकर
पृष्ठे : 264 किंमत : 250

द गिफ्ट ऑफ रेन


पेनांग 1939. सोळा वर्षाचा फिलिप हटन हा एकलकोंडा तरुण. अर्धा इंग्रज, अर्धा चिनी; पण स्वत:ला दोन्ही न समजणारा. हयातो एंडो या जपानी अधिकाऱ्याशी झालेल्या अनपेक्षित मैत्रीमध्ये त्याला स्वत्व सापडते.
फिलिप त्याच्या नव्या मित्राला त्याचे आवडते पेनांग बेट दाखवतो आणि त्या बदल्यात एंडो त्याला आयकिडोचे
शास्त्र व कला शिकवतो. पण या शिक्षणासाठी भयंकर मोल मोजावे लागते.

गूढ व्यक्तिमत्त्वाचा एंडो स्वत:च्या शिस्तीने बांधलेला असतो. जपानने मलायावर केलेल्या चढाईत
फिलिपचे कुटुंब आणि सर्वस्व पणाला लागते तेव्हा आपण ज्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवला
आणि ज्यांच्याशी पूर्ण एकनिष्ठ राहिलो त्या आपल्या गुरूचे एक भयानक गुपित त्याला कळते.
आपल्यामुळे ज्यांचा जीव धोक्यात आला आहे, त्यांना आपण वाचवले पाहिजे,
तसेच एंडो कोण व काय आहे याचा छडा लावला पाहिजे असे त्याला वाटते.

पावसाने वरचेवर धुतले जाणारे समुद्रकिनारे, डोंगरावरील गूढ मंदिरे, मसाल्याची गोदामे,
ऐश्वर्यशाली बॉल रूम्स आणि पर्जन्यारण्ये तसेच तान त्वान एंग यांची दगाबाजी, पाशवी क्रौर्य,
निधडे शौर्य व चिरंतन प्रेम यांची मनाला चटका लावणारी कहाणी.

मूळ लेखक : तान त्वान एंग
अनुवादक : अशोक पाथरकर
पृष्ठे : 441 किंमत : 440

Tuesday, June 21, 2011

एका परिसाची कथा


.... विलक्षण बारकाव्यांनी मनाचं विश्लेषण करणा-या वेधक कथा



लेखक-मिलिंद जोशी

या आपल्या गूढ जगात आणि या साऱ्या कोलाहलात माणूस वेगवेगळ्या नात्यांशी,
वेगवेगळ्या संस्थांशी, संस्कृतींशी,
ही नाती या संस्था या संस्कृती हे सारं एकमेकांशी आणि सगळं काही सगळ्यांशी असं काही जखडलं गेलंय
आणि सारा गुंता एवढ्या मोठ्या प्रचंड अनामिक वेगानं फिरतोय की
माणसानं या सा-यातून पाऊल बाहेर टाकायचं ठरवलं तर क्षणात तो लांब बाहेर फेकला जाईल...
अगदी लांब...

कदाचित पार या विश्वाच्याही बाहेर...

पृष्ठे : 200 किंमत : 200

इन्फ़ीडेल


मृत्यूची पर्व न करता निर्भयपणे मुस्लीम रुढी, परंपरा, पिंज-यातले स्त्रीजीवन यांचे दर्शन घडवणारे
मनोवेधक आत्मकथन....

आयान हिरसी अली एक झुंझार वृत्तीची इस्लाम­धर्मीय स्त्री... आई-वडिलांकडून झुंजार वृत्तीचं बाळकडू मिळालेली
आयान वडिलांच्या पसंतीच्या तरूणाशी लग्न करायला नकार देते. तिच्या अनुपस्थितीत झालेल्या निकाहला
ती जिवाच्या आकांतानं विरो­ध करते तो हॉलंडमधील निर्वासितांच्या छावणीत. मुस्लिमांच्या ­धर्मपंचायतीसमोर ती
­धीटपणे सांगते, ""मला हा निकाह मंजूर नाही. कारण माझे मन तो मान्य करत नाही.'' या तिच्या निर्भीड
जबाबाला ­धर्ममार्तंड थोर मनानं स्वीकारतात आणि तिला या बेडीतून मुक्तता मिळते...
हॉलंडम­ये राज्यशास्त्र विषयातील पदयुत्तर शिक्षणानंतर तेथील नागरिकत्व...
आयानचा निवडणुकीच्या रिंगणातून प्रवेश. तिच्या दुर्दैवानं तिच्या राजकीय आस्तत्वालाच धोका निर्माण होतो
आणि नागरिकत्वही रद्द होण्याची भीती समोर ठाकते... त्यातून सहीसलामत सुटका झाल्यानंतर आता आयाननं
अमेरिकेत राहाण्याचा निर्णय घेतला आहे... परंपरावादी इस्लामनं स्त्रीच्या तनमनावर आणि स्वातंत्र्यावर ज्या बेड्या
ठोकल्या आहेत त्या तोडण्यासाठी प्राणपणानं लढणाऱ्या आधुनिक लढवय्या स्त्रीची कहाणी म्हणजेच इन्फिडेल.

तिनं अशा धर्माचा त्याग केला जो तिच्या समाजातील पन्नास टक्के लोकांना कुठलंही स्वातंत्र्य देऊ इच्छित नाही...
त्या झुंजार स्त्रीला जाणून घेण्यासाठी प्रत्येक स्त्रीनं हे पुस्तक वाचायलाच हवं...

मूळ लेखक : आयान हिरसी अली
अनुवादक : नीला चांदोरकर
पृष्ठे : 466 किंमत : 410

कथा गुर्जरी



अनुवादक : अंजनी नरवणे

संवेदनशील गुर्जर संस्कृतीतल्या भावभावनांचे अंत:करणाला स्पर्श करणारे विविधरंगी मनस्वी चित्रण

----------------

स्वत:चं अफाट दु:ख मनात लपवून पोटापाण्यासाठी जिथे गरज असेल तिथं जाऊन, मन लावून काम करणारी वृद्धा.... दिवस गेलेली, मूल हवं असलेली वेश्या; आणि मुलगी असेल तर दर वेळी गर्भपाताची सक्ती केली जाणारी "घरंदाज' सून... मन:स्तापानं डोकं फिरलेल्या आईच्या अत्यंत तापदायक वागण्याला कंटाळून तिला कुंभमेळ्यात "हरवून'
येणारा मुलगा... येऊ घातलेल्या निवडणुकीत हटकून जिंकण्यासाठी गावात जातीय दंगलघडवून आणणारे नेते
आणि त्यामुळं हकनाक बरबाद होणारी कुटुंबं... कारगिलम­ये शहीद झालेल्या जवानाचा मुलगा मनानं का होरपळतो?...

ऐन तारुण्यात पतीनं टाकून दिल्यावरची अनेक वर्ष अतिशय सुखी वौवाहिक जीवन जगत असल्याचं
बेमालूम नाटक करणारी सुस्वरूप प्रौढा... अशा अनेक कथा. प्रत्येक कथा एका वेगळ्याच जगाचं,
वेगळ्याच सुखदु:खांचं दर्शन घडवणारी, तर "बदल', "झाड', "नारायण! नारायण!' ह्या कथा
निखळ मनोरंजन करणा-या !
वेगवेगळ्या गुजराती लेखकांच्या, मनाला भिडणा-या कथांचा हा नजराणा गुणग्राही,
चोखंदळ मराठी वाचकांना सादर!

पृष्ठे : 298 किंमत : 250

Monday, June 20, 2011

दिवा


मनोव्यापार आणि नात्यांमधले तानेबाणे यांची गुंफन उलगडून दाखवणा-या कथा....

लेखक : प्रमोदिनी वडके कवले
गेल्या पन्नास-साठ वर्षात भारतीय स्त्रियांचं मनोविश्व खूप बदललं आहे. वेगाने बदलत आहे.
पण तरीही त्यांच्या भोवतीचं वातावरण मात्र पूर्ण बदललेलं नाही.
समाजाच्या अपेक्षा बदललेल्या नाहीत. जगण्याची आ­धुनिक शौली स्वीकारताना
त्यातला पारंपरिक बाज मात्र स्त्रियांनीच सांभाळावा आणि मध्यममार्गी जगण्याच्या चौकटीतून बाहेर न पडताच
त्यांनी जगाचा वे­ध घ्यावा, अशी समाजाची अपेक्षा असते.

अशा तळ्यात-मळ्यात जगणा-या स्त्रियांचा आणि त्यांनी आपल्या परीने सोडवलेल्या काही सामाजिक गणितांचा
वे­ध या कथांमध्ये घेतल्याचं जाणवतं. स्त्रियांनी आपल्या निर्णयक्षमतेची ताकद ओळखल्याची खूण
या कथांमधून उमटलेली आहे. सहजसुंदर भाषा आणि ओळखीचं वातावरण,
यामुळे या कथेतली पात्रं परकी न वाटता अलगद मनात येऊन बसतात.

पृष्ठे : 258 किंमत : 270