Thursday, June 23, 2011

द गिफ्ट ऑफ रेन


पेनांग 1939. सोळा वर्षाचा फिलिप हटन हा एकलकोंडा तरुण. अर्धा इंग्रज, अर्धा चिनी; पण स्वत:ला दोन्ही न समजणारा. हयातो एंडो या जपानी अधिकाऱ्याशी झालेल्या अनपेक्षित मैत्रीमध्ये त्याला स्वत्व सापडते.
फिलिप त्याच्या नव्या मित्राला त्याचे आवडते पेनांग बेट दाखवतो आणि त्या बदल्यात एंडो त्याला आयकिडोचे
शास्त्र व कला शिकवतो. पण या शिक्षणासाठी भयंकर मोल मोजावे लागते.

गूढ व्यक्तिमत्त्वाचा एंडो स्वत:च्या शिस्तीने बांधलेला असतो. जपानने मलायावर केलेल्या चढाईत
फिलिपचे कुटुंब आणि सर्वस्व पणाला लागते तेव्हा आपण ज्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवला
आणि ज्यांच्याशी पूर्ण एकनिष्ठ राहिलो त्या आपल्या गुरूचे एक भयानक गुपित त्याला कळते.
आपल्यामुळे ज्यांचा जीव धोक्यात आला आहे, त्यांना आपण वाचवले पाहिजे,
तसेच एंडो कोण व काय आहे याचा छडा लावला पाहिजे असे त्याला वाटते.

पावसाने वरचेवर धुतले जाणारे समुद्रकिनारे, डोंगरावरील गूढ मंदिरे, मसाल्याची गोदामे,
ऐश्वर्यशाली बॉल रूम्स आणि पर्जन्यारण्ये तसेच तान त्वान एंग यांची दगाबाजी, पाशवी क्रौर्य,
निधडे शौर्य व चिरंतन प्रेम यांची मनाला चटका लावणारी कहाणी.

मूळ लेखक : तान त्वान एंग
अनुवादक : अशोक पाथरकर
पृष्ठे : 441 किंमत : 440

No comments:

Post a Comment