Friday, November 18, 2011

सामान्य वाचकाला सहजपणे कळेल

तरुणांना स्फूर्ती देणारे पुस्तक..




मेहता पब्लिशींग हाऊसच्या वतीने ११ नोव्हेंबरला प्रकाशित झालेल्या स्टीव्ह जॉब्ज यांच्या वरच्या पुस्तकाबाबात माहिती देण्यासाठी शुक्रवारी पुण्यात प्रकाशकांच्या कार्यालयात लेखक अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते या पुस्तकाबाबत बोलताना,यात आम्ही
संगणकाच्या तांत्रिक बाबींपेक्षा त्याच्या आयुष्यातील चढउतार, जॉब्जची उद्योजकता, कल्पकता यांच्यावर भर देऊन तो रंजक करण्यावर आम्ही भर दिलाय. त्यामुळे तो कोणालाही आवडेल याची आम्हांला खात्री आहे,असे म्हटले.

स्टीव्ह जॊब्ज बाबतीतील मराठी माणसांची उत्सुकता पूर्ण व्हावी म्हणून प्रकाशक सुनिल मेहता यांनी असे पुस्तक काढायचा निर्णय घेतला. आणि आम्ही दोघांनी आठ दिवसात स्टीव्ह बाबतची एकूणच माहिती गोळा केली. वाचकांना अधिकाधिक सोप्या भाषेत आणि सहजपणे कळेल अशा शब्दात या पुस्तकात सारी माहिती दिली असल्याचे लेखकद्वयी सांगते.
क्ल्पकता आणि उद्योजकता याचे दर्शन त्यांच्या आयुष्याचा महत्वाचे गुण होते. तेच हायलाईट करण्याचे आम्ही ठरविले. कुठलीही आतिशयोक्ती न करता पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केल्याचे ते सांगतात.

अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते यांनी पाचएक पुस्तकाबाबात एकत्रित लेखन केल्याचे सांगताना...पुस्तकातील माहितीचे एकमेकात देवाणघेवाण करुन अच्युत गोडबोले यांनी सामान्य वाचकाला सहजपणे कळेल आणि अचूक पुस्तक होईल याकडे विशेषत्वाने लक्ष अधिक दिल्याचे गोडबोले सांगतात.
पुढच्या आवृत्तीत आवश्यक असेल तर अधिक आणि नव्याने द्यावीशी वाटलेली माहिती जरुर पडली तर वाढविण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही ते सांगतात.
यावेळी मेहता प्रकाशनातर्फे अखिल मेहता उपस्थित होते.

Thursday, November 17, 2011

राजा रवि वर्मा




लेखक- रणजित देसाई
आठवी आवृत्ती- सप्टेंबर,२०११
पृष्ठे- ३००
किंमत- ३२० रुपये

अशा कादंब-या सत्त्यावरच आधारलेल्या असाव्यात हा माझा आजवरचा अट्टाहास. स्वामी, श्रीमान योगी, राधेय हे त्या ऐतिहासिक सत्त्यांशीच जखडलेले होते. पण जेव्हा एका कलावंताचे चरित्र आपण लिहायला घेतो, तेव्हा नुसत्या सत्त्याचाच आधार घेऊन चालत नाही. तेथे कलावंताच्या कल्पकतेचा आधार मला शोधावा लागला. यातल्या सा-याच व्यकितरेखा वास्तवातल्या नाहीत. काही कल्पनेतून साकारलेल्या आहेत. याची वाचकांनी नोंद घ्यावी.

एवढेच सांगावेसे वाटते- आजवर भारतीय साहित्यात चित्रकाराच्या जीवनावर कोणीही काही लिहले नाही. पण ज्यांनी भारतीय चित्रकलेला एक वेगळे वळण लावले त्या चित्रकाराच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याचा मी प्रयत्न केला. त्यामध्ये पाच वर्षे खर्ची पडली. पण एका चांगल्या कामासाठी पाच वर्षे गेली याचे मला समाधान आहे.
आयुष्य नेहमी जातच असते. पण ते कोणत्या मोलाने जाते याला महत्व असतें.

रणजित देसाई

१९८४


- लेखक- रणजित देसाई
- आठवी आवृत्ती- सप्टेंबर,२०११
- पृष्ठे- ३००
- किंमत- ३२० रुपये

“बाईसाहेब, आपल्याला मी पाहिलं, आणि राहवलं नाही. दररोज मी आपल्याला पाहात होतो, आणि घरी जाऊन आठवणीने आपलं तित्र पुरं करण्याचा प्रय्तन करीत होतो”.
सुगंधा आपल्या दासीकडे वळली. तिच्या कानात तिनं काहीतरी सांगितलं. क्षणात दासी देवळाबाहेर निघून गेली. रवि वर्म्यानं विचारलेल्या प्रश्नानं सुगंधा बानावर आली.
“अपल्याला हे चित्र आवडलं नाही?”
सुगंधानं नकळत मान हालवली.
“बाईसाहेब, प्रत्यक्ष रुप आणि कल्पनेतलं रुप यांत पुष्कळ फरक पडतो, हे मी जाणतो. पण एक सांगावसं वाटतं. परमेश्वरानं आपल्याला उपजत असामान्य रुप-लावण्यं दिलं आहे. ऐश्वर्यही दिलं आहे. पण ते ऐश्वर्य आणि लावण्यं या जगातील कोणतीही शक्ती चिरंतन टिकवू शकणार नाही. दीर्घायुष्य लाभलं तर, आपल्या चेह-यावरचं लावण्य वृध्दापकाळाकडे झुकेल. त्या चेह-यावर सुरकुत्यांची जाळी विणली जातील. आजच्या मादक डोळ्यांत क्षीणता येईल. तिथं पाणावलेले, थिजलेले नेत्र दिसू लागतील. त्या नेत्रात असाह्यता दिसू लागेल. ती अवस्था झाली तर, हे चित्र तुम्हाला तुमच्या हरवलेल्या तारूण्याची, रुपसंपन्न्तेची आठवण देत राहील. हे चित्र त्यासाटी तुम्ही जतन करा. आज नाही तरी, केव्हातरी तुम्हाला ते उपयोगी पडेल. तुम्हाला जगण्याचं बळ देईल.”
आणि एवढं बोलून रवि वर्मा मंदीराच्या बाहेर पडला.
झालेल्या प्रसंगानं आवाक् बनलेली सुगंधा तिथचं उभी होती. दासीच्या बोलण्यानं ती भानावर आली.
“बाईसाहेब, तो राजा रवि वर्मा होता.”
--------------------------------------------

सकाळच्या वेळी शिसवी कोरीवकाम केलेल्या मेजासमोर मंचकावर बसून सुगंधा समोरच्या आरशासमोर आपले केस विंचरत होती. आरशातून स्वतःच्या चेह-याबरोबर तिला मागील चित्रही दिसत होतं. आपल्यापेक्षा ते चित्र अधिक सुंदर तिला वाटत होतं....
किती सुंदर हे चित्र!.. आपण एवढ्या सुंदर वाटतच नाही...
----------------------------------
डाव्या गोलाकार जिन्यावरुन येत असलेले रवि वर्मा पाहताच सुगंधा उठून उभी राहिली.
“बाईसाहेब, मी एक अतृप्त चित्रकार आहे. चित्रकलेखेरीज मला काही दिसत नाही. सुचत नाही. तुम्हाला मी पाहिलं. महाराष्ट्रीय पोशाखातील तुमचे दर्शन मला मोठं विलोभनीय वाटलं. देवानं तुम्हाला नुसतं सौंदर्य दिलं नाही. त्याबरोबरच सात्विकतेचा, नीरागसतेचा भावही दिलेला आहे.”
“आपल्याला काय म्हणायचं आहे?”
“ बाईसाहेब, मी एका श्रीमंत घराण्यात वाढलो असलो तरी माझे आईवडील... त्यांनी मला फार निरळे संस्कार दिले. वेदपठण, कथाकीर्तन ऐकत मी वाढलो. त्यामुळं ती नलदमयंती, हंस-दमयंती, ती सैरंध्री, द्रौपदी ही सारी रुपं माझ्या मनाच रेंगाळत होती. पण ती द्रौपदी, सीता, ती लक्ष्मी, सरस्वती आणू कुठून? ते सामर्थ्य देवानं तुमच्या रुपाला दिलेलं आहे. तुम्ही मला सहाय्य केलं तर, माझी सारी स्वप्नं साकार होतील, मी तुम्हाला आस्वासन देतो की, माझ्या कलेव्यतिरिक्त कोणताही अन्य विचार माझ्या मनात येणार नाही. माझ्या चित्राचं मोल द्यायचं असेल तर तेवढंच मला मिळावं.”
सुगंधानं एक दीर्घ निःश्वास सोडली. ती म्हणाली,
“मी विचार करते.:”
( पुस्तकातील काही अंश )