Friday, November 18, 2011

तरुणांना स्फूर्ती देणारे पुस्तक..




मेहता पब्लिशींग हाऊसच्या वतीने ११ नोव्हेंबरला प्रकाशित झालेल्या स्टीव्ह जॉब्ज यांच्या वरच्या पुस्तकाबाबात माहिती देण्यासाठी शुक्रवारी पुण्यात प्रकाशकांच्या कार्यालयात लेखक अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते या पुस्तकाबाबत बोलताना,यात आम्ही
संगणकाच्या तांत्रिक बाबींपेक्षा त्याच्या आयुष्यातील चढउतार, जॉब्जची उद्योजकता, कल्पकता यांच्यावर भर देऊन तो रंजक करण्यावर आम्ही भर दिलाय. त्यामुळे तो कोणालाही आवडेल याची आम्हांला खात्री आहे,असे म्हटले.

स्टीव्ह जॊब्ज बाबतीतील मराठी माणसांची उत्सुकता पूर्ण व्हावी म्हणून प्रकाशक सुनिल मेहता यांनी असे पुस्तक काढायचा निर्णय घेतला. आणि आम्ही दोघांनी आठ दिवसात स्टीव्ह बाबतची एकूणच माहिती गोळा केली. वाचकांना अधिकाधिक सोप्या भाषेत आणि सहजपणे कळेल अशा शब्दात या पुस्तकात सारी माहिती दिली असल्याचे लेखकद्वयी सांगते.
क्ल्पकता आणि उद्योजकता याचे दर्शन त्यांच्या आयुष्याचा महत्वाचे गुण होते. तेच हायलाईट करण्याचे आम्ही ठरविले. कुठलीही आतिशयोक्ती न करता पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केल्याचे ते सांगतात.

अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते यांनी पाचएक पुस्तकाबाबात एकत्रित लेखन केल्याचे सांगताना...पुस्तकातील माहितीचे एकमेकात देवाणघेवाण करुन अच्युत गोडबोले यांनी सामान्य वाचकाला सहजपणे कळेल आणि अचूक पुस्तक होईल याकडे विशेषत्वाने लक्ष अधिक दिल्याचे गोडबोले सांगतात.
पुढच्या आवृत्तीत आवश्यक असेल तर अधिक आणि नव्याने द्यावीशी वाटलेली माहिती जरुर पडली तर वाढविण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही ते सांगतात.
यावेळी मेहता प्रकाशनातर्फे अखिल मेहता उपस्थित होते.

No comments:

Post a Comment