Tuesday, January 24, 2012

लेनिनग्राडचा वेढा

दुस-या महायुध्दाच्या काळातील पूर्व आघाडीवरील भिषण वास्तवात दिसून आलेली विलक्षण ताकद

८ सप्टेंबर १९४१.
राक्षसी महत्वाकांक्षा असणा-या हिटलरच्या फौजांनी सोव्हएत महासंघाचा मानबिंदू असणा-या लेनिनग्राड शहराभोवती पक्का फास आवळला... यामागे होती एक थंड डोक्यानं आखलेली क्रुर योजना आणि लोकांची उरपासमार करुन शहर नष्ट करण्याची निर्दयी नाझी विचारसरणी...
सलग ८७२ दिवस पडलेला हा वेढा , हे मानवी इतिहासातील भीषण पर्व आहे. विनाशासाठी टपलेलं शत्रुसैन्यआणि अत्यंत भ्रष्टाचारी नेत्यांची गलथान हुकूमशाही यांच्यात भरडले जावून, दहा लाखांपेक्षा जास्त नागरिक भुकेनं तडफडून मेले.
नैतिक अधःपतनाचं टोक गाठलं गेल्यानं नरमांसभक्षणासारखे अघोरी प्रकार घडले. पण लेनिनग्राडच्या काही नागरिकांनी आपल्यातलं माणूसपण मरु दिलं नाही. आणि अखेर त्यांनी विजय मिळविला....

लेनिनग्राडचा वेढा ही त्या विलक्षण झुंजीची, मन सुन्न करणारी कहाणी आहे.....

मूळ लेखक- मायकेल जोन्स
अनुवाद- डॉ. प्रमोद जोगळेकर
पृष्ठे- २६८
किंमत- ३२० रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी






लेनिनग्राडच्या भीषण वेढ्याचे साक्षीदार असलेल्या, पण ज्यांना त्या वेढ्याचा अंत कसा झाला याची माहिती नसलेल्या असंख्य नागरिकांची ही कहाणी आहे. त्याची आपल्याला कल्पनादेखील करता येणार नाही त्या कालखंडाचा आढावा अतिशय सशक्त कथानकांमधून जोन्सने घेतला आहे.
लेखकाने कथानकांमधून केलेले वास्तवतेचे वर्णन हेच या पुस्तकाचे मर्मस्तान आहे.

-`द हेराल्ड` (ग्लासगो)

Monday, January 23, 2012

अंतरिक्षाच्या अंतरंगात

खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा झाल्यास किचकट गणित व भौतिकशास्त्र अशा गंभीर विषयांना तोंड द्यावे लागते.
मात्र खगोलशास्त्रातील गणित व भौतिकशास्त्र वगळून जर त्यातील फक्त मनोरंजक माहिती मिळवायची इच्छा असेल,
तर त्याने प्रस्तुत पुस्तक जरुर वाचावे...


लेखिका- लीना दामले
पृष्ठे- १०८
किंमत- १५० रुपये.
मुखपृष्ठ – चंद्रमोहन कुलकर्णी


हलक्या फुलक्या भाषेत खगालशास्त्राशी तोंडओळख करुन देता देता लेखिका आपल्या सूर्यमालेतील सभासदांविषयी
माहिती देते. तसेच सूर्यमालेबाहेरील विविध परग्रह, ते शोधण्याच्या पध्दती, तारे व ता-यांचे रंग यासंबंधी माहिती देते.
विविध प्रकारच्या दुर्बिणी, त्यातून होणारे ब्रह्मांडाचे दर्शन, गुरुत्वीय भिंगासारखे चमत्कार, तर विश्वनिर्मितीसंबंधी अजूनही समाधानकारक विवेचन न मिळाल्याने शास्त्रज्ञांनी मांडलेले `बिग बॅंग`, `स्टेडी स्टेट युनिव्हर्स इ. सिध्दान्त विविध लेखांद्वारे लेखिकेने मांडले आहेत.

चिकन सूप- इंडियन टीचर्स

शिक्षकांच्या चैतन्याचा आविष्कार घडविणा-या आणि त्यांचं ह्दगत् व्यक्त करणा-या कथा

शिक्षकाचा वैताग


प्रिय गुरुवर्य,
जखमी अवस्थेत माझं अवसान गळालं आहे. येणारा कोणताही क्षण माझ्या आयुष्यातील अखेरचा क्षण असू शकेल आणि अशा आणीबाणीच्या वेळी मला तुमची आठवण होते आहे., ही केवढी नवलाची गोष्ट आहे ! ` स्वतःवरचा अविश्वासच आपल्या अपयशाला कारणीभूत होतो, असं तुम्ही एकदा मला म्हणाला होतात. `ज्यांचा स्वतःवर, स्वतःच्या ताकदीवर भरवसा नसतो, तीच माणसं सर्वात दुबळी म्हटली पाहिजेत,` असही तुम्ही म्हणाला होतात. पण केवळ तुमच्या मार्गदर्शनामुळे मी माझ्या ऊभ्या आयुष्यात कधीही असा दुबळा झाले नाही. याबद्दल तुम्हाला फार पूर्वी मी धन्यवाद द्यायला हवे होते`.

शालेय शिक्षणानंतर विद्यार्थ्य़ांच्या वाटा वेगळ्या होतात. नंतर कदाचित कधीच त्यांच्या भेटीही होत नाहीत. `रायन`च्या बाबतीतही तसचं झालं होतं. मी नंतर त्याला कधीही पाहिलं नव्हतं. दर वर्षी रायनसारखे कोणी ना कोणी गरज असलेले विद्यार्थी जास्तीच्या अभ्यासासाठी येत असत. त्याच्यामागे मी असे. कारण कुठल्याही बक्षिसाची अपेक्षा न ठेवता शिक्षक निरपेक्षपणे आपल्या विद्यार्थ्य़ांसाठी असे कष्ट करत असतातच. त्यामुळे माझीही गोष्ट त्यांच्यापेक्षा वेगळी नव्हती.
पण त्यादिवशी त्यावेळी माझ्या हातात रायनचं पत्र होतं. मी विचारांच्या तंद्रीत उभी होते. विचार करत होते की, त्याली माझी, एका निवृत्त, म्हाता-या शिक्षिकेची आठवण का बरं झाली असेल?

त्यानं पुढं लिहलं होतं की, तो कारगिलच्या लढाईच्या ऐन रणधुमाळीत होता. अजुबाजूला तोफांची धुमश्र्चक्री चालू होती. एका खंदकात बसून तो ते पत्र लिहित होता.

`मला नेहमी तुम्हाला भेटावसं वाटतं असे. धन्यवाद द्यावेसे वाटत असे. पण मी त्यासाटी एखादी चांगली संधी शोधत होतो. पण आता तर अशी वेळ आली आहे की, केव्हाही माजी घटका भरेल. या क्षणी आपल्या मनात किती व्यक्ती आणि प्रसंग दाटून येत असतात. मला तुम्हाला सांगायचंय की, ठरवल्याप्रमाणे मी काही इंजीन ड्रायव्हर झालो नाही. पण हे सगळं अधिकच रोमांचक आहे. देशासाठी लढणारा मी एक जवान आहे आणि तुम्ही शिकवल्याप्रमाणे मोठ्या धीरानं, सा-या संघर्सषाला मी तोंड देत, जीवाजी बाजी लावून लढत आहे.`
`गुरुवर्य, माझा तुम्हाला अखेरचा प्रणाम`.

मी थरथरत्या हातानं, कशा तरी अक्षरात त्याला पत्र लिहायला सुरवात केली.
`प्रिय मुला,
`तुझं पत्र वाचून आनंद झाला. चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्तीतील हजारो मुलांपैकी फक्त तूच असा निघालास की , ज्यानं माझे आभार मानले आणि माझ्या म्हातारीच्या रुक्ष, एकाकी आयुष्यात आनंद आणला. या तुझ्या कठीण काळातही धीर सोडू नकोस. शत्रूला पाठ दाखवू नकोस.`

...
वर्षभरानंतरची गोष्ट...
`टीचर`, हातातलं चुरगाळलेलं पाकिट फडकावत तो लांबून ओरडला, `मी लढाईवरून परतलोय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शत्रुला मुळीच पाठ दाखविलेली नाही`.
मी त्याला प्रेमानं जवळ घेतलं. मला हेन्री Adam यांचे बोल आठवले. तो म्हणतो, `शिक्षकाचा प्रभाव अनंत काळपर्यंत असतो. तो प्रभाव कधी संपुष्टात येईल, हे त्या शिक्षकाला स्वतःलाही सांगता येत नाही.`
...........................

मुळ लेखक- जॅक कॅनफिल्ड
मार्क व्हिक्टर हॅन्सन
वोडी एम. डिक्सन
अनुवाद – सौ. सुषमा सुरेश जोशी
पृष्ठे- २९४
किंमत- २५० रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी



शिक्षकांचा विद्यार्थ्य़ांवर नकळत पडणारा प्रभाव, कळत-नकळत होणारे संस्कार यामुळे विद्यार्थ्य़ांचं आयुष्य समृध्द होत असतं.
शिक्षकी पेशातील अशाच विविध अनुभवांचं अनोखं मिश्रण या पुस्तकात आहे.

Sunday, January 22, 2012

असामान्य य़शप्राप्तीसाठी दहा सामान्य सूत्रे



`Ten Much` या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद


नशीब ही घटना असते. योगायोगनं घडणारी, पण काळाच्या कसोटीवर ख-या उतरलेल्या विशिष्ट प्रक्रिया अत्यंत परिश्रमपूर्वक अनुसरल्या तर य़श साध्य होऊ शकते...
अगदी आखीवरेखील, योजल्याप्रमाणे...
हे काही सुप्रसिध्द व काही अगदी अपरिचित व्यक्तींच्या स्फूर्तीदायी यशोगाथांचं संकलन आहे.
या व्यक्तींनी काही अगदी मूलभूत सूत्र अनुसरुन अत्यंतिक प्रतिकूलतेवर मात केली आणि यश खेचून आणलं.
अशा विलक्षण व्यक्तींमुळेच भारताची यशोगाथा रचली गेली आहे.
आपली ओळख, आपली पार्श्वभूमी काहीही असली तरी या व्यक्तींनी अत्यंत खडतर परिस्थितीवर विजय मिळवून, भारत ही प्रचंड संधीची भूमी असल्याचं सिध्द केलं आहे.

ही अशी भूमी आहे. जिथं तुम्ही भव्य स्वप्न असून चालणार नाही
तर यशाच्या शिखरावर जाण्यासाठी नकाशाही आखलेला हवा...
आणि काही सूत्रांचा संचही हवा.

मूळ लेखक- ए.जी. कृष्णमूर्ती
अनुवाद- सुप्रिया वकील
पृष्ठे- १९०
किंमत- १०० रुपये.


*स्वप्न पाहा. भव्य स्वप्न पाहा..
*तुमच्या उद्योगात प्रवीण बना..
*सकारात्मक बना..
*मी हे करु शकतो/शकते..
*पैसा हे जोड उत्पादन आहे..
*तुमच्या स्वप्नावर पकड मिळवा..
*तुमच्या टीमच्या भरवशावर धोके पत्करा..
*आव्हानांचं स्वागत करा...
*प्रत्येकाची भरभराट झाली पाहिजे...
*आयुष्य फक्त एकदाच मिळते..

साहित्यिक जडण-घडण

जीवन जगताना माणसाने गतानुगतिक पध्दतीने, सांकेतिक रीतीने जगू नये.
जीवनात येणा-या अनुभवांना संवेदनशील वृत्तीने सामोरे जावे.
जीवनात अनेक घडामोडी घडत असतात; त्यांचा अनुभव स्वतंत्र वृत्तीने, आपल्या आवडी-निवडीनुसार घ्यावा. असे केले तर जीवनातील एरवी साधे, सरळ, सांकेतिक वाटणारे अनुभवसुद्ध्दा नवनव्या संवेदना, नवनवे जीवनार्थ, नवनवे चिंतन देऊन जातात....
परिणामी आपण नेहमीच्या सांकेतिक, सरळ, सोप्या, साध्या जीवनातसुध्दा अनुभव-समृध्द होऊन जातो.
याची एकदा सवय झाली की, आपण तथाकथित चाकोरीतील जीवनातही अनुभवसमृध्द बनतो...
यासाठीच ललित आणि चिंतनशील साहित्याचे वाचन आणि मनन केले पाहिजे..
तरच आपले जीवन विविध सौंदर्यांने संपन्न होऊ शकेल...


लेखक- डॉ. आनंद यादव
पृष्ठ- १४८
किंमत- १५० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी





मी मोठा झालो, लौकिक मिळविला. लोक मानू सागले, तरी मी खेडूतच आहे. सतत माझ्या डोक्यात तोच विचार असतो; म्हणून डोक्यात हवा शिरली नाही. इथलं भडक जग मला माझं कधीच वाटलं नाही. त्याचं आकर्षण नाही. माझा जीव इथं गुंतत नाही. माझी मुलं शहरात जन्मली- दोन मुली, एक मुलगा. बायको शिक्षिका आहे. इथं बंगला बांधलाय, त्याचं नाव मी `भूमी` ठेलवय.
मी नेहमी म्हणतो- हे घर मला माझं घर वाटत नाही. खेड्यातलं माझं साधं घर तेच आपलं वाटतं. मी इथं करामापुरता राहाणार. रोजगार-हमीचे कामगार जसे कामासाठी राहतात तसं- धरणाचं काम चालू असलं की. तात्पुरता निवारा करतात, काम संपलं की, झोपडं मोडतात. तिथं कामापुरतं ते झोपडं असतं, तसा पुण्यातला माझा बंगला कामापुरता आहे. काम संपलं ती चाललो माझ्या गावाला. मला इथलं आकर्षण नाही. करमणुकीशिवाय मी जगू शकतो.
चटणी-भाकर, खर्डा हे माझं साधं अन्न आहे. हे देशी अन्नच मला गोड लागतं. साधे कपडे चालतात. फार रुबाबदार राहून मी दुस-यावर छाप पाडत नाही. खेड्यातली माणसं श्रीमंती लपवतात. शहरी माणसं भपकेबाज कपडे वापरून गरिबी लपवतात. मला त्याचे काही वाटत नाही..
जसा आहे तसा खरा.....

(मी कोण आहे....यातला हा काही भाग)