Sunday, January 22, 2012

साहित्यिक जडण-घडण

जीवन जगताना माणसाने गतानुगतिक पध्दतीने, सांकेतिक रीतीने जगू नये.
जीवनात येणा-या अनुभवांना संवेदनशील वृत्तीने सामोरे जावे.
जीवनात अनेक घडामोडी घडत असतात; त्यांचा अनुभव स्वतंत्र वृत्तीने, आपल्या आवडी-निवडीनुसार घ्यावा. असे केले तर जीवनातील एरवी साधे, सरळ, सांकेतिक वाटणारे अनुभवसुद्ध्दा नवनव्या संवेदना, नवनवे जीवनार्थ, नवनवे चिंतन देऊन जातात....
परिणामी आपण नेहमीच्या सांकेतिक, सरळ, सोप्या, साध्या जीवनातसुध्दा अनुभव-समृध्द होऊन जातो.
याची एकदा सवय झाली की, आपण तथाकथित चाकोरीतील जीवनातही अनुभवसमृध्द बनतो...
यासाठीच ललित आणि चिंतनशील साहित्याचे वाचन आणि मनन केले पाहिजे..
तरच आपले जीवन विविध सौंदर्यांने संपन्न होऊ शकेल...


लेखक- डॉ. आनंद यादव
पृष्ठ- १४८
किंमत- १५० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी





मी मोठा झालो, लौकिक मिळविला. लोक मानू सागले, तरी मी खेडूतच आहे. सतत माझ्या डोक्यात तोच विचार असतो; म्हणून डोक्यात हवा शिरली नाही. इथलं भडक जग मला माझं कधीच वाटलं नाही. त्याचं आकर्षण नाही. माझा जीव इथं गुंतत नाही. माझी मुलं शहरात जन्मली- दोन मुली, एक मुलगा. बायको शिक्षिका आहे. इथं बंगला बांधलाय, त्याचं नाव मी `भूमी` ठेलवय.
मी नेहमी म्हणतो- हे घर मला माझं घर वाटत नाही. खेड्यातलं माझं साधं घर तेच आपलं वाटतं. मी इथं करामापुरता राहाणार. रोजगार-हमीचे कामगार जसे कामासाठी राहतात तसं- धरणाचं काम चालू असलं की. तात्पुरता निवारा करतात, काम संपलं की, झोपडं मोडतात. तिथं कामापुरतं ते झोपडं असतं, तसा पुण्यातला माझा बंगला कामापुरता आहे. काम संपलं ती चाललो माझ्या गावाला. मला इथलं आकर्षण नाही. करमणुकीशिवाय मी जगू शकतो.
चटणी-भाकर, खर्डा हे माझं साधं अन्न आहे. हे देशी अन्नच मला गोड लागतं. साधे कपडे चालतात. फार रुबाबदार राहून मी दुस-यावर छाप पाडत नाही. खेड्यातली माणसं श्रीमंती लपवतात. शहरी माणसं भपकेबाज कपडे वापरून गरिबी लपवतात. मला त्याचे काही वाटत नाही..
जसा आहे तसा खरा.....

(मी कोण आहे....यातला हा काही भाग)

No comments:

Post a Comment