शिक्षकांच्या चैतन्याचा आविष्कार घडविणा-या आणि त्यांचं ह्दगत् व्यक्त करणा-या कथा
शिक्षकाचा वैताग
प्रिय गुरुवर्य,
जखमी अवस्थेत माझं अवसान गळालं आहे. येणारा कोणताही क्षण माझ्या आयुष्यातील अखेरचा क्षण असू शकेल आणि अशा आणीबाणीच्या वेळी मला तुमची आठवण होते आहे., ही केवढी नवलाची गोष्ट आहे ! ` स्वतःवरचा अविश्वासच आपल्या अपयशाला कारणीभूत होतो, असं तुम्ही एकदा मला म्हणाला होतात. `ज्यांचा स्वतःवर, स्वतःच्या ताकदीवर भरवसा नसतो, तीच माणसं सर्वात दुबळी म्हटली पाहिजेत,` असही तुम्ही म्हणाला होतात. पण केवळ तुमच्या मार्गदर्शनामुळे मी माझ्या ऊभ्या आयुष्यात कधीही असा दुबळा झाले नाही. याबद्दल तुम्हाला फार पूर्वी मी धन्यवाद द्यायला हवे होते`.
शालेय शिक्षणानंतर विद्यार्थ्य़ांच्या वाटा वेगळ्या होतात. नंतर कदाचित कधीच त्यांच्या भेटीही होत नाहीत. `रायन`च्या बाबतीतही तसचं झालं होतं. मी नंतर त्याला कधीही पाहिलं नव्हतं. दर वर्षी रायनसारखे कोणी ना कोणी गरज असलेले विद्यार्थी जास्तीच्या अभ्यासासाठी येत असत. त्याच्यामागे मी असे. कारण कुठल्याही बक्षिसाची अपेक्षा न ठेवता शिक्षक निरपेक्षपणे आपल्या विद्यार्थ्य़ांसाठी असे कष्ट करत असतातच. त्यामुळे माझीही गोष्ट त्यांच्यापेक्षा वेगळी नव्हती.
पण त्यादिवशी त्यावेळी माझ्या हातात रायनचं पत्र होतं. मी विचारांच्या तंद्रीत उभी होते. विचार करत होते की, त्याली माझी, एका निवृत्त, म्हाता-या शिक्षिकेची आठवण का बरं झाली असेल?
त्यानं पुढं लिहलं होतं की, तो कारगिलच्या लढाईच्या ऐन रणधुमाळीत होता. अजुबाजूला तोफांची धुमश्र्चक्री चालू होती. एका खंदकात बसून तो ते पत्र लिहित होता.
`मला नेहमी तुम्हाला भेटावसं वाटतं असे. धन्यवाद द्यावेसे वाटत असे. पण मी त्यासाटी एखादी चांगली संधी शोधत होतो. पण आता तर अशी वेळ आली आहे की, केव्हाही माजी घटका भरेल. या क्षणी आपल्या मनात किती व्यक्ती आणि प्रसंग दाटून येत असतात. मला तुम्हाला सांगायचंय की, ठरवल्याप्रमाणे मी काही इंजीन ड्रायव्हर झालो नाही. पण हे सगळं अधिकच रोमांचक आहे. देशासाठी लढणारा मी एक जवान आहे आणि तुम्ही शिकवल्याप्रमाणे मोठ्या धीरानं, सा-या संघर्सषाला मी तोंड देत, जीवाजी बाजी लावून लढत आहे.`
`गुरुवर्य, माझा तुम्हाला अखेरचा प्रणाम`.
मी थरथरत्या हातानं, कशा तरी अक्षरात त्याला पत्र लिहायला सुरवात केली.
`प्रिय मुला,
`तुझं पत्र वाचून आनंद झाला. चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्तीतील हजारो मुलांपैकी फक्त तूच असा निघालास की , ज्यानं माझे आभार मानले आणि माझ्या म्हातारीच्या रुक्ष, एकाकी आयुष्यात आनंद आणला. या तुझ्या कठीण काळातही धीर सोडू नकोस. शत्रूला पाठ दाखवू नकोस.`
...
वर्षभरानंतरची गोष्ट...
`टीचर`, हातातलं चुरगाळलेलं पाकिट फडकावत तो लांबून ओरडला, `मी लढाईवरून परतलोय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शत्रुला मुळीच पाठ दाखविलेली नाही`.
मी त्याला प्रेमानं जवळ घेतलं. मला हेन्री Adam यांचे बोल आठवले. तो म्हणतो, `शिक्षकाचा प्रभाव अनंत काळपर्यंत असतो. तो प्रभाव कधी संपुष्टात येईल, हे त्या शिक्षकाला स्वतःलाही सांगता येत नाही.`
...........................
मुळ लेखक- जॅक कॅनफिल्ड
मार्क व्हिक्टर हॅन्सन
वोडी एम. डिक्सन
अनुवाद – सौ. सुषमा सुरेश जोशी
पृष्ठे- २९४
किंमत- २५० रुपये.
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
शिक्षकांचा विद्यार्थ्य़ांवर नकळत पडणारा प्रभाव, कळत-नकळत होणारे संस्कार यामुळे विद्यार्थ्य़ांचं आयुष्य समृध्द होत असतं.
शिक्षकी पेशातील अशाच विविध अनुभवांचं अनोखं मिश्रण या पुस्तकात आहे.
No comments:
Post a Comment