Thursday, June 7, 2012

छोटा जवान




सुभेदार असलेल्या तुळोजीरावांनी युध्दभूमीवर शौर्य गाजविले...
त्यांचाच वारसा पुढे चालवत मुलगा बाजीरावही सैन्यात दाखल झाला.
भारत-चीन युध्दात शौर्य गाजवताना बाजीरावही...

शौर्याची परंपरा असणा-या मोहित्यांच्या घरातच यामुळे सावट पसरले..

बालपणापासून पराक्रम, शौर्य़ यांच्या कथा ऐकणा-या शिवाजीवर या घटनेचा खोलवर परिणाम झाला.
आपल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी हा छोटा जवान.. निघाला..
सीमेवर..
देशावर निस्सीम प्रेम करणा-या शूरांची ही शौर्य़गाथा...

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ४२
किंमत- ४० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
दुसरी आवृत्ती- मे, २०१२

जनावनातली रेखाटणे




मी रेषांकडे केव्हा, कसा वळालो ?
आज आठवतं ते इतकंच की, लहान वयातच वळलो.
शब्दांकडे वळण्याआधी रेषांकडे वळलो.
घरात कोणी चित्रकार नव्हते.
कोणामुळे हा नाद लागला ?
काही सांगता येत नाही.
आठवणी उकरु लागल्यावर ध्यानात येतं की,
ही आवड निर्माण व्हायला माझी आई
थोडीफार कारणीभूत झालेली आहे.
रांगोळ्या, गव्हा-तांदळानी भरलेले चौक,
रंगविलेले संक्रांतीचे घट, हिरवी पाने, नारळ,
सुपा-या, खणांच्या घड्या, काचेच्या बांगड्या,
बुक्का, गुलाल, हळद-कुंकू, चैत्रगौरी,
त्यांच्यापुढील आरास, सारवलेल्या अंगणात
रेखलेली पावले...

आकृती, रंग, रेषा किती विविध आणि
सुंदर रुपं मनाला बघायला मिळायची !

मला आज वाटतं,
चित्रकलेचं माझं शिक्षण इथून सुरू झालं...


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
किंमत- १४० रुपये
मुखपृष्ठावरील रेखाटन- व्यंकटेश माडगूळकर
मुखपृष्ठ, मांडणी व रचना- चंद्रमोहन कुलकर्णी
दुसरी आवृत्ती- मे, २०१२

सीताराम एकनाथ




एकनाथबाबानं गाव लेकरागत जपला. त्याच्यासारखा माणूस पुन्हा होणार नाही, म्हणून गावं रडलं. त्या सूर्यापोटी हा शनी जन्मला..

सुंद्रा माळिणीसारख्या कैक जणांचे तळतळाट त्याच्या माथी होते आणि तरीही तो तेच काम करीत होता. त्याचं लक्षण खोटं होतं. चिंचाळ्यातली बरी दिसणारी एक बाई सोडली नाही. कुणाच्या जमिनी व्याजात बळकावल्या. कुणाच्या मोटेची चालती बैलं सोडून आणून आपल्या गोठ्यात बांधली. कुणाच्या मळ्यातली झाडं तोडून तिस-याच्या जागेत अरेरावीनं स्वतःचे इमले उठविले!

चिंचाळ्याची उभी रयत त्यानं गांजली. गरीबगाव नाडलं, पिडलं. बापाची पुण्याई, ढीगभर पैका, सरकारदरबारी वजन ह्यामुळं मनातून जळणारं गाव अजून गप्प होतं. पण असं ते किती दिवस गप्प रहाणार?

इतक्या जणांचे तळतळाट माथ्यावर असताना तो किती दिवस जगणार!
धनदौलत, परंपरा कशी जपणार?
इनामदारांच्या घराण्य़ाचा वंशवेल कसा वाढणार?


लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १३२
किंमत- १३० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती- मे,२०१२

Wednesday, June 6, 2012

सुमीता



`साहित्य अकादमी पारितोषिक` विजेती श्रेष्ठ कादंबरी The Shadow from Ladakh या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद

तू आमचे नेतृत्व कर, असं म्हणून भास्करनं आपल्या हाततातील मशाल सुमीतत्च्या हाती दिली.
गांधीग्रामध्ये प्रवेश करता करता तिच्या हातातील कंदील आपल्या हातात घेतला...
त्याच्या मनात आलं की, आपल्या ओळखीची सुमीता ही नव्हे...

प्रथम आपल्याला गावच्या सडकेवर दिसली,
ती ही नव्हे..
त्या जुन्या देवळाबाहेर पडताच थोडी अधिक शहाणी झालेली, ती ही नव्हेच..
हिच्यात नेमका कोणता बदल झालेला आहे, हे त्याला सांगता येत नव्हतं;
पण आत्ताची सुमीता ही नवी होती, एक चमत्कार होता.....


मूळ भारतीय लेखक- डॉ. बी. भट्टाचार्य
अनुवाद- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- ३३४
किंमत- ३५० रुपये
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
तिसरी आवृत्ती- मे, २०१२








Monday, June 4, 2012

जंगलातील दिवस




आपल्या जीवनाला फुरसदीचा एक लाबंलचक, भरजरी पदर असावा, असं मनापासून वाटत असलं, तरी चरितार्थ चालविण्यासाठी कामधंदा करण्यातच आपण फार खर्ची पडतो.
आपलं सगळं जीवन एकता विलक्षण यांत्रिक गतीनं झपाटून टाकलं आहे.
कधी अंगावर चांदणे पडत नाही,
कधी झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येत नाही.
कधी ओढ्यात अंघोळ होत नाही,
कधी उताणं झोपून चांदण्यांनी गच्च भरलेलं आभाळ पाहता येत नाही....

मी कुणी मृग-पक्षी-शास्त्रवेत्ता नव्हे किंवा वनशास्त्रांचा अभ्यासकही नव्हे. परंतु तरीही रानावनातील अदभुत जगाविषयी माझ्या छंदिष्ट मनात जे अनिवार आणि न संपणारं कुतूहल आहे..
त्याचा हा वृत्तान्त आहे..

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे- १६४
किंमत- १७० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे, २०१२

बेलवण




चहूकडे विकासकामांचा धडाका सुरू झाला. अमक्या गावाने शाळा बाधली, तमक्या गावाने रस्ता करुन घेतला, तर फलाण्या गावाने धरण उठविले. अन् मग हिव-याच्या बेलवण नदीवर पूल बांधायची कल्पना वाण्यानं काढली. पूल नाही, पण फरशी बांधण्याकडे गावाचा कल झुकू लागला..

घरटी किती वर्गणी.. याचा खल झाला. ..अन् भीमा वस्तादाने एकाएकी आवाज टाकला- “पूल टाकायंच काम जो करेन, त्येचं कल्यान व्हनार न्हाई!”

झालं.. हिव-याच्या बेलवणचं घोडं अडलं. सगळ्यांच्या फायद्याचं अन् सोय होण्याचं हे काम- मग भीम्या अन् त्याच्या बरोबरच्या पोरांना ते होऊ नये, असं का वाटलं होतं ?

बरं, नको तर नको..पण या पुलाचं काम न होण्यानं विरोध करणा-या भीमाचा तरी त्यापुढं किती फायदा झाला, की... झालं आयुष्य़ाचंच नुकसान?


विकासकांमांना आडव्या टाळक्याची अन् स्वार्थी मनोवृत्ती कशी खोडा घालते, याचं हुबेहूब चित्रण...

बेलवण..
.

लेखक- व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठे-२०
किंमत- ३० रुपये
मुखपृष्ठ व मांडणी- चंद्रमोहन कुलकर्णी
चौथी आवृत्ती- मे, २०१२