Wednesday, October 12, 2011

अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम




राम आणि रावण ह्यांच्या वैचारिक सहअस्तित्वाची अभिनव पुराणकथा

रामकथेच्या नावाने आजमितीला वेगवेगळ्या भाषांत, वेगवेगळ्या प्रदेशात आणि वेगवेगळ्या धर्मात मिळून सुमारे तीनेकशे रामायणे उपलब्ध आहेत., असा अंदाज आहे. सोळाव्या वर्षी रामाला वैराग्य येते, राम गृहत्याग करतो, वनवासी होतो आणि नंतर कुलगुरु वसिष्ठ त्याची समजूत घालून, त्याला उपदेश करुन जीवनाचा अर्थ समजावून देतात अशी कथा आपल्याकडे प्रसिध्द म्हणता येईल अशा योगवसिष्ठ रामाय़णात आहे.

कृष्णाच्या रामायणात अत्यंत भारावून गेलेल्या लेखणीबहाद्दरांनी रासलीला करणारा रामही रंगवायला कमी केलेले नाही. रामायणाच्या नावाखाली हे सगळे चालत आले आहे.

पुढे जाता, ललित साहित्य म्हटले जातील असे अनेक असामान्य काव्यात्मक ग्रंथही लिहले गेले आहेत. भवभूती आणि कालिदासही त्यातच आले.

`समग्र रामकथा हीच मुळात निव्वळ पुराणकथा आहे, यात सत्त्याचा लवलेश नाही, असा कोणी राम कधी झालाच नव्हता आणि अयोध्या म्हणजे उत्तर प्रदेशातील गाव नाहीच, जावा बेटावरचे जोग्या नावाचे ते एक नगर आहे, थायलंडमधील अयुथ्या (आयोध्या) नावाचे गाव हीच रामजन्मभूमी आहे.`..असली विधाने `पुराव्यानिशी` करणारेही कमी नाहीत.

रामकथा तपासून, पडताळून पाहणे हा प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश नाहीच. वाल्मीकीची मूळ रामकथा हा माझ्यापुढचा आदर्श आहे. मूळ रामकथेच्या पात्रांची, तिच्या कथानकाची ह्यात भले पुष्टी झाली नसेल, निष्ठापूर्वक समर्थनही नसेल, क्वचित कुठे तिच्यावर नगण्य जुलूम झाला असेल, पण तरीसुध्दा कुठेही कृत्रिम विरोधाभास वाटू नये अशा अकृत्रिम सहजतेने ह्या कथेचे विणकाम करण्याचा हा निष्ठापूर्वक केलेला प्रयत्न आहे.

मुळ गुजराती लेखक- दिनकर जोषी
अनुवाद- सुषमा शाळिग्राम
पृष्ठे- १२६ ,
किंमत- रु. १२०.

युवराज्ञी



` प्रिन्सेस` या कादंबरीचा अनुवाद
सौदी अरेबियातील महिलांच्या निर्घृण छळाची कहाणी

एका सौदी अरेबियन राजकुमारील मनश्र्चक्षृंसमोर आणा, काय दिसतं तुम्हाला ?
चमचमत्या हिरेमाणकांनी मढलेली, विश्वास बसणार नाही अशा ऐशाआरामात
राहणारी स्त्री; .....
पण प्रत्यक्षात मात्र सोनेरी मुलामा चढविलेल्या पिंज-यात राहणारी.
तिला स्वातंत्र्य नाही, स्वतःचे मन नाही, स्वतःच्या आयुष्यावर अधिकार नाही;
फक्त पुत्र जन्माला घालणारी एवढीच तिची किंमत.
सुलताना ही मौदी राजघराण्यात जन्माला आलेली, राजेसाहेबांची अगदी निकटवर्ती.
आपल्या वादग्रस्त बाल्यापासून नियोजित विवाहापर्यंत आयुष्याबद्दल सांगताना तो बुरखा
बाजूला सारुन...स्त्रियांचे निर्घृण छळ, तसेच सक्तीचे विवाह, लैंगिक गुलामगिरी व
तत्काळ देहान्तशासन यांसारख्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणा-या घटनांचा
धक्कादायक इतिहास घउड करतो.
`प्रिन्सेस` ही स्त्रीच्या निर्भिड वृत्तीचा आणि प्रचंड साहसाचा पुरावा आहे. सुलतानाने स्त्रियांच्या अत्त्याचाराविषयी स्पष्टपणे बोलून स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या माथी सौदी समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. याच कारणास्तव तिने तिची कहाणी अनामिकपणे सांगितली आहे.
मानवी हक्कांची किमान जाणीव असलेल्या कुणाचेही काळीज पिळवटून टाकेल असेच हे पुस्तक आहे. एक अत्यंत प्रभावीपणे लिहिलेली खासगी कथा जी तिथल्याच स्त्रीकडून आल्यामुळे, विश्वसनीय ठरलेली!

-बेट्टी महमूदी
(` नॉट विदाऊट माय डॉटर` या सुप्रसिध्द पुस्तकाची लेखिका)

मूळ लेखिका- जीन सॅसन
अनुवाद- संयुक्ता कैकिणी

Tuesday, October 11, 2011

अ-मृत पंथाचा यात्री



`शांतीनिकेतन-विश्वभारती`चे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक रवीन्द्रनाथ ठाकूर यांचा जीवनपट

रवीन्द्रनाथ ठाकूर, विश्वकवी.
नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय.
आपल्या राष्ट्रगीताचे रचनाकर्ते!
हा आहे त्यांचा शब्दबध्द केलेला जीवनप्रवास.
भरलेल्या घरात लहानपणापासून एकटे पडलेले रवीन्द्र
आपल्या कवितांमध्येच रमणारे, कवितांसाटी प्रेरणा देणा-या
भामीराणीमुळे मिळालेली उभारी आणि त्यांच्या जाण्यामुळे
परत निर्माण झालेली पोकळी, वडिलांच्या आज्ञेखातर पण
मनाविरुध्द बघितलेले जहागिरीचे काम, त्यातूनच येत गेलेली
आजूवाजूच्या समाजाची जाण त्यांना घडवत गेली.
रविन्द्रनाथांच्या संपूर्ण आयुष्यावरच मृत्यूचे मोठे सावट राहिले आहे.
एकामागून एक प्रियजनांचा चिरवियोग त्यांना अजूनच
एकटे करत गेला.
शांतिनिकेतन शाळा, तिच्यासाठी करावी लागणारी धडपड;
वेगवेगळ्या कलांची आवड, त्या निमित्ताने देशोदेशींच्या
लोकांशी भेटी. संपर्क, नोबेल पुरस्कार,
त्यामुळे मिळणारे मानसन्मान अशा वाटांवर
त्यांचे आयुष्य चालत राहिले.
अ-मृत पंथाचा हा यात्री मात्र एकला चालो रे म्हणत चालत राहिला....

मुळ गुजराती लेखक- दिनकर जोषी
अनुवाद- डॉ. सुषमा करोगल

पृष्ठे- २००, किंमत १८० रुपये.

द लास्ट ज्यूरर



मिसिसिपीमधल्या मनोरंजक, ढंगदार अशा साप्ताहिकांपैकीच एक ` द फोर्ड कौंटी टाईम्स` हे १९७० मध्ये दिवाळखोरीत निघतं. पुष्कळांना वाईट वाटत असतं तरीही सगळ्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, कॉलेज सोडलेला एक तेवीस वर्षीय तरुण विली ट्रेनॉर त्याचा मालक बनतो. साप्ताहिकाचं भविष्य धड दिसत नसतं. याच सुमारास कुख्यात पॅडगिट फॅमिलीमधला डॅनी पॅडगिट एका तरुण विधवा स्त्रीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करतो. विली ट्रेनॉर या घटनेची भीषण कथा त्याच्या पेपरमधून प्रसिध्द करतो. साप्ताहिकाचा खप वाढतो.
मिसिसिपी, क्लॅन्टनमधल्या भरगच्च कोर्टात खुनी डॅनी पॅडगिटवर खटला उभा राहतो. धक्कदायक, पण खटल्याला नाट्यपूर्ण कलाटणी देणारी गोष्ट घडते. तो ज्यूरर्सना उघड धमकी देतो की, त्याला दोषी ठरविण्यात आलं, तर तो एकेकाचा सूड घेईल. तरीही त्याला दोषी ठरविण्यात येते आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा होते.
पण मिसिसिपीमध्ये १९७० च्या काळी जन्मठेप म्हणजे सारा जन्म तुरंगात काढणं असं नव्हतं. नऊ वर्षानंतर डॅनी पॅडगिट पॅरोलवर सुटतो, फोर्ड कौंटीमध्ये परत येतो आणि शेवटी, केलेल्या अपराधांमुळे परमेश्वरी न्यायाची बळी ठरतो.

मूळ लेखक- जॉन ग्रिशॅम
अनुवाद- विभाकर शेंडे
पृष्ठे- ३३६ , किंमत- ३०० रुपये