Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Tuesday, October 11, 2011
द लास्ट ज्यूरर
मिसिसिपीमधल्या मनोरंजक, ढंगदार अशा साप्ताहिकांपैकीच एक ` द फोर्ड कौंटी टाईम्स` हे १९७० मध्ये दिवाळखोरीत निघतं. पुष्कळांना वाईट वाटत असतं तरीही सगळ्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, कॉलेज सोडलेला एक तेवीस वर्षीय तरुण विली ट्रेनॉर त्याचा मालक बनतो. साप्ताहिकाचं भविष्य धड दिसत नसतं. याच सुमारास कुख्यात पॅडगिट फॅमिलीमधला डॅनी पॅडगिट एका तरुण विधवा स्त्रीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करतो. विली ट्रेनॉर या घटनेची भीषण कथा त्याच्या पेपरमधून प्रसिध्द करतो. साप्ताहिकाचा खप वाढतो.
मिसिसिपी, क्लॅन्टनमधल्या भरगच्च कोर्टात खुनी डॅनी पॅडगिटवर खटला उभा राहतो. धक्कदायक, पण खटल्याला नाट्यपूर्ण कलाटणी देणारी गोष्ट घडते. तो ज्यूरर्सना उघड धमकी देतो की, त्याला दोषी ठरविण्यात आलं, तर तो एकेकाचा सूड घेईल. तरीही त्याला दोषी ठरविण्यात येते आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा होते.
पण मिसिसिपीमध्ये १९७० च्या काळी जन्मठेप म्हणजे सारा जन्म तुरंगात काढणं असं नव्हतं. नऊ वर्षानंतर डॅनी पॅडगिट पॅरोलवर सुटतो, फोर्ड कौंटीमध्ये परत येतो आणि शेवटी, केलेल्या अपराधांमुळे परमेश्वरी न्यायाची बळी ठरतो.
मूळ लेखक- जॉन ग्रिशॅम
अनुवाद- विभाकर शेंडे
पृष्ठे- ३३६ , किंमत- ३०० रुपये
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment