Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Wednesday, October 12, 2011
अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम
राम आणि रावण ह्यांच्या वैचारिक सहअस्तित्वाची अभिनव पुराणकथा
रामकथेच्या नावाने आजमितीला वेगवेगळ्या भाषांत, वेगवेगळ्या प्रदेशात आणि वेगवेगळ्या धर्मात मिळून सुमारे तीनेकशे रामायणे उपलब्ध आहेत., असा अंदाज आहे. सोळाव्या वर्षी रामाला वैराग्य येते, राम गृहत्याग करतो, वनवासी होतो आणि नंतर कुलगुरु वसिष्ठ त्याची समजूत घालून, त्याला उपदेश करुन जीवनाचा अर्थ समजावून देतात अशी कथा आपल्याकडे प्रसिध्द म्हणता येईल अशा योगवसिष्ठ रामाय़णात आहे.
कृष्णाच्या रामायणात अत्यंत भारावून गेलेल्या लेखणीबहाद्दरांनी रासलीला करणारा रामही रंगवायला कमी केलेले नाही. रामायणाच्या नावाखाली हे सगळे चालत आले आहे.
पुढे जाता, ललित साहित्य म्हटले जातील असे अनेक असामान्य काव्यात्मक ग्रंथही लिहले गेले आहेत. भवभूती आणि कालिदासही त्यातच आले.
`समग्र रामकथा हीच मुळात निव्वळ पुराणकथा आहे, यात सत्त्याचा लवलेश नाही, असा कोणी राम कधी झालाच नव्हता आणि अयोध्या म्हणजे उत्तर प्रदेशातील गाव नाहीच, जावा बेटावरचे जोग्या नावाचे ते एक नगर आहे, थायलंडमधील अयुथ्या (आयोध्या) नावाचे गाव हीच रामजन्मभूमी आहे.`..असली विधाने `पुराव्यानिशी` करणारेही कमी नाहीत.
रामकथा तपासून, पडताळून पाहणे हा प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश नाहीच. वाल्मीकीची मूळ रामकथा हा माझ्यापुढचा आदर्श आहे. मूळ रामकथेच्या पात्रांची, तिच्या कथानकाची ह्यात भले पुष्टी झाली नसेल, निष्ठापूर्वक समर्थनही नसेल, क्वचित कुठे तिच्यावर नगण्य जुलूम झाला असेल, पण तरीसुध्दा कुठेही कृत्रिम विरोधाभास वाटू नये अशा अकृत्रिम सहजतेने ह्या कथेचे विणकाम करण्याचा हा निष्ठापूर्वक केलेला प्रयत्न आहे.
मुळ गुजराती लेखक- दिनकर जोषी
अनुवाद- सुषमा शाळिग्राम
पृष्ठे- १२६ ,
किंमत- रु. १२०.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment