Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Friday, June 17, 2011
द गॉड ऑफ़ अँनिमल्स
ही गोष्ट 12 वर्षाच्या अॅलिस विंस्टनची. मोठी बहीण एका मुलाबरोबर लग्न करण्यासाठी पळून गेलेली,
मानसिक रुग्ण म्हणून अंथरुणावर असलेली आई अन तापट, घुम्या स्वभावाचे वडील हे तिचं कुटुंब.
जोडीला मोडकळीस आलेला घोड्यांचा तबेला. गुजराण करण्यासाठी विंस्टन कुटुंबीय इतरांच्या घोड्यांची देखभाल
करण्याचा निर्णय घेतात अन त्या घोड्यांच्या मालकांशी (बहुतेक स्त्रिया!)
आयुष्याशी त्यांची विलक्षण भावनिक गुंतागुंत होते.
लहानगी अॅलिस शाळेत असताना वयाने मोठ्या असलेल्या माणसाच्या प्रेमात पडते.
त्यातला आनंद मिळवत असतानाच कठोर वास्तवाची तिला जाणीव होते.
क्रौर्य, खोटेपणा, फसवणूक याबरोबरच कमालीचा चांगुलपणा, हळवेपणा प्रत्येकात असतो याचीही जाणीव तिला
या प्रवासात होते.
पौगंडावस्थेतल्या निसरड्या वाटेवरची स्वप्नाळू मुलीची वाटचाल अतिशय सुरेख रीतीने लेखिकेने वर्णन केली आहे.
अद्भुत अनुभवांचा प्रत्यय देणारी अविस्मरणीय कादंबरी.
अनुवादक : गीतांजली वैशंपायन
मूळ लेखक : आर्यन कायले
पृष्ठे : 284 किंमत : 280
मेकिंग द कट
एका सर्जनच्या आयुष्यातील थरार,,,,,
सर्जन असण्याचा अर्थ असतो, मानवी यातनांच्या सागरात अविचल उभं राहणं.
आपलं ज्ञान, कौशल्य आणि बुद्धिमत्ता पणाला लावून त्याच्याशी झुंज देणं. एक इंटर्न, त्याचा पहिला छेद घेतो
आणि शिक्षक त्याची खिल्ली उडवतात.
आठवड्यानंतर, एका वृद्धेच्या इच्छेविरुद्ध तिचा जीव वाचवण्याची अनपेक्षित घटना घडते.
मेंदूच्या कर्करोगामुळे एका कुप्रसिद्ध सर्जनला वेड लागतं. ल्युकेमिया झालेल्या मुलाची आई अगतिक होऊन जाते.
या खिळवून ठेवणाऱ्या अप्रतिम स्मृतिचित्रांमधून , मोहम्मद खाद्रा सर्जन म्हणून त्यांचं आयुष्य उलगडून दाखवतात.
खडतर प्रशिक्षणापासून ते निद्रानाश करणाऱ्या अविरत कामापर्यंत .
त्यांचं आयुष्य घडवणा-या डॉक्टर आणि रुग्णांच्या स्मृती ते जागवतात.
मानवतेचा अखंड ओघ धैर्यवान, केविलवाणी, कौतुकास्पद, तिरस्कार उत्पन्न करणारी
अशा अनेक माणसांच्या या कहाण्या आहेत. ऑपरेशन थिएटरमये घडणाऱ्या धक्कादायक चुकांच्या
आणि तणावामुळे उद्वस्त झालेल्या डॉक्टरांचे हे कथानक आहे.
राजकारणामुळे आरोग्यसेवेची झालेली दैना आपल्याला इथे दिसते.
मृत्यु समोर दिसत असताना; रुग्णांनी घेतलेले आत्मनाशी निर्णय, बाळगलेल्या वेड्या आशा दिसतात.
त्यांच्या स्वत:च्याही दैनंदिन आयुष्यात घडलेल्या असाधारण घटनांमुळे निर्माण होणारं नाट्य इथे दिसतं.
मूळ लेखक : डॉ. मोहम्मद खाद्रा
अनुवादक : डॉ.देवदत्त केतकर
पृष्ठे : 182 किंमत : 200
Thursday, June 16, 2011
फिफ्टी इअर्स ऑफ़ साइलेंस
दुस-या जागतिक महायुध्दादरम्यान अनेक वेळा बलात्कार झालेल्या स्त्रीची आठवणगाथा.....
मनातल्या खोल कप्प्यात दडवून ठेवलेली, नव्हे , गाडलेली ही गोष्ट आपल्या मुलींना, नातवंडांना कशी सांगायची?
ही गोष्ट साधी सुधि नव्हतीच मुळी. ती एक अत्यंत लाजिरवाणी, दुर्दैवी भोगवटा होता.
असा भोगवटा ज्याचं दु:ख, अपमान, लाज इतक्या प्रदीर्घ काळानंतरही तब्बल पन्नास वर्षानंतरही यत्किंचितही
कमी झालेली नाही. एक दिवस आपलं मन त्यांच्याजवळ मोकळं करावंच लागणार आहे, त्याची जाणीव मला होतीच
पण मी कुठल्या तोंडानं त्यांना हे सांगणार होते..
""मग ठरवलं, ते सगळं आपण लिहून काढायचं, कागदावर उतरवायचं.''
आयुष्याचं अर्ध शतक थोडीथोडकी नहे, पन्नास वर्ष जॅननं मनात धूमसत राहिलेला कोंडमारा सहन केला.
पण 1992 साली या कोंडमा-याचा उद्रेक झाला.
ऐन तारुण्यात जॅनला जो शारीरिक आणि मानसिक छळ सोसावा लागला त्याचं हृदयद्रावक कथन
या पुस्तकात वाचायला मिळतं.
"सुखदायिनी' हे गोड बिरुद ज्या स्त्रियांना लावण्यात आलं ते एखाद्या इंगळीप्रमाणे त्यांना जन्मभर डसत राहिलं
पण त्यांना तोंडातून वेदनेचा हुंकार काढण्याचीही सोय नहती. कारण मृत्यूची टांगती तलवार तर त्यांच्या डोक्यावर होतीच शिवाय घरादाराची अब्रू वेशीवर टांगली जाईल ही भीतीही होती.
लौंगिक अत्याचारांमुळे जो अपमान, जे दु:ख तिला सोसावं लागलं त्याची ही कहाणी.
मूळ लेखक : Jan Ruff-O'Herne
अनुवादक : नीला चांदोरकर
पृष्ठे : 216 किंमत : 270
Monday, June 13, 2011
लेखक पळवापळवीचे विपर्यस्त वर्तमान
-विश्वास पाटील
' लेखकांची पळवापळवी' या गेल्या पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या प्रकाशन व्यवसायातील वादावरील लेखाला लेखकांच्या बाजूने दिलेले उत्तर...
(म टा 12 जून २०११)
*******************
गेल्या रविवारी आमचे मित्र मुकुंद कुळे यांनी मराठीतील लेखकांच्या पळवापळवींचे विपर्यस्त वर्तमान दिले आहे. ते बरेचसे वस्तुस्थितीला सोडून व ऐकीव गप्पांवर रचलेले आहे. एखादा साहित्यिक म्हणजे कोणा एकाच्या गोठ्यात बांधलेली गाय नसते. जर बाईंडरचा टाका ढिसाळ असेल अगर कागदवाला काळपट कागद पुरवत असेल तर तो बाईंडर वा कागदवाला बदलण्याचा जसा अधिकार प्रकाशकाला असतो, त्याच प्रकारे एखादा प्रकाशक वेळेत ग्रंथाच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित करत नसेल, वर्षानुवषेर् रॉयल्टी बुडवण्याचाच धर्म पाळत असेल तर असा प्रकाशक बदलण्याचा पूर्ण अधिकार लेखकाला आहे.
विशेषत: श्री. कुळे यांनी माझ्याबाबत केलेली विधाने चुकीची आहेत. प्रकाशन क्षेत्रातील कोणीतरी त्यांना ही माहिती खोडसाळपणे दिलेली दिसते. श्री. मेहता यांनी मला पळवायचा प्रश्नच उद्भवत नाही. आजही मी 'राजहंस प्रकाशन'चाही लेखक आहे. राजहंसने प्रकाशित केलेल्या माझ्या सर्व कादंबऱ्या त्यांच्याकडेच असून आमच्यातील व्यवहार व मैत्री तशीच दृढ आहे. 'संभाजी'बाबत जी दहा लाखाची गोष्ट कुळे सांगतात, ती कहाणी 'महानायक'ची. १९९७मध्ये माझ्या 'महानायक'साठी रॉयल्टीची आगाऊ रक्कम म्हणून श्री. अनिल मेहता यांनी दहा लाख रुपये देऊ केले होते. त्या गोष्टीस माधव गडकरी, शंकर सारडा व सदा डुंबरे हे साक्षीदार होते. मात्र मी त्या कादंबरीचे हस्तलिखित आधीच श्री. माजगावकर यांच्याकडे दिले असल्यामुळे कितीही मोठ्या रकमेला भुलून ते परत घेणे; मला सदाचाराचे वाटले नाही. तसेच 'संभाजी' पुढे नऊ वर्षांनी, २००६मध्ये प्रकाशित झाली. तेव्हा ती अन्य प्रकाशकाकडे द्यायचा निर्णय माझा स्वत:चा आहे. त्यासाठी मला भेटलेल्या तीन प्रकाशकांमधून मी स्वत:च श्री. सुनिल मेहता यांची निवड केली. माझी एखादी कादंबरी मी कोणाला एकरकमी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 'संभाजी' कादंबरीचे अंतरंग माहित नसतानाही माझ्या शब्दांवर भरवसा ठेऊन अकरा हजारांहून अधिक वाचकांनी प्रत्येकी ३८० रुपयांप्रमाणे अॅडव्हान्स बुकिंग केले होते. आयकर विभागाकडे सादर केलेल्या कागदपत्रांची साक्ष काढून सांगायचे तर आत्तापर्यंत सात मोठ्या आवृत्त्या प्रकाशित होवून 'संभाजी' या माझ्या एकाच कादंबरीची एकूण सत्तावीस लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे सदतीस रुपयांची रॉयल्टी मला धनादेशाद्वारे प्रकाशकांकडून प्राप्त झाली आहे. माजगावकर आणि मेहता या दोन्ही प्रकाशकांकडे मी सुखी आहे.
एका प्रकाशकाकडून आपले ग्रंथ काढून दुसऱ्या प्रकाशकाला देणे, या पळवापळवीचा पहिला बळी मी असल्याचे श्री. कुळे जाहीर करतात. मात्र श्री. रणजित देसाई यांनी आपल्या हयातीमध्येच आपले ग्रंथ मेहतांना तर पु. ल. देशपांडे यांनी आपले बरेच ग्रंथ दुसऱ्यांकडून काढून मधूकाकांना दिले होते. त्यामुळे अशा तथाकथित पळवापळवीही पहिल्या बळीचा मान माझ्या वाट्याला येत नाही. या निमित्ताने रणजित देसाईंनी सांगितलेला किस्सा आठवतो. ते एकदा म्हणाले होते, 'माझी 'स्वामी'सारखी कादंबरी मागणी असूनही सलग आठ वर्ष बाजारात उपलब्ध नव्हती. मग मी लिहितो ते माझ्या वाचकांसाठी की प्रकाशकांच्या लहरीसाठी असा प्रश्न पडतो!'
अकारण पहिला बळी (मासे पुस्तक काढून मी दुसऱ्या कोणाला देण्याचा तथाकथित अपराध केला नसतानाही) मला ठरवले गेले आहेच, तर या निमित्ताने चार गोष्टी स्पष्ट लिहिण्याचा गुन्हा मी करतोच. तसे कोणीतरी या विषयाला वाचा फोडणे आवश्यक होतेच. फक्त मराठीतीलच नव्हे तर अनेक भारतीय भाषेतील साहित्यिक व कवी प्रकाशकाकडे लाखात येणे असताना हलाखीत मृत्यू पावल्याची अनेक उदाहरणे आहेत. अलीकडेच मराठीतील एका मातब्बर लेखकांना डायलिसीसवर असतानाही व त्यांचे लाखात येणे असतानाही ऐन वेळी त्यांना आपले हक्काचे मानाचे धन मिळालेच नाही. लेखकाने फक्त मानसन्मान, वार्धक्यात विविध मंडळांनी दिलेले आणि एका रात्रीत सुकून जाणारे हार याच्यावरच जगायचे? त्याने किंवा त्याच्या वारसाने प्रकाशकादारी जावून घाबरत घाबरत रॉयल्टी मागायची? काव्यसंग्रह खपतच नाहीत असे जणू त्रिकालाबाधित गृहीत मनी धरायचे, तर दुसरीकडे विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात, झेडपी, राजाराममोहन रॉय ट्रस्टमध्ये कवींची नावे वापरून खूप काव्यसंग्रह खपवायचे. अन् मानधनाच्या पंगतीतून कवींना कायमच रिकाम्या दोण-पत्रावळीवरून तसेच उठवायचे हे प्रकार सर्रास चालू आहेत.
श्री. अरुण जाखडे व श्री. मुकुंद कुळे यांनी प्रकाशकाची 'कल्पकता - प्रयोगशीलता' व 'लेखक घडवणे किंवा लेखकावर मेहनत घेण्याची' मिठ्ठास भाषा केली आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, जणू वि. स. खांडेकर, रणजित देसाई आणि व्यंकटेश माडगुळकर अशा लेखकांचा जन्म केवळ प्रकाशकीय मेहरबानीवर झाला होता असे समजायचे काय? अशाच तुमच्या प्रकाशकीय कल्पकतेतून व प्रयोगशीलतेतून वरील तीन लेखकांच्या ताकदीचा किंवा आवाक्याचा एखादा तरी लेखक श्री. जाखडे यांनी घडवून दाखवावा, आम्ही त्यांचे जन्माचे ऋणी राहू. लेखकाचे वेळच्या वेळी मानधन देणाऱ्या काही चांगल्या प्रकाशन संस्था मराठीत आहेत. मात्र अशांची संख्या खूपच कमी.
एकीकडे प्रकाशन व्यवसाय टिकला पाहिजे याचा अर्थ दुसरीकडे स्वत:च्या हक्काच्या मानधनाला वंचित राहून लेखकाने दारिद्यातच श्वास सोडायला हवा असा होत नाही. श्री. कुळे यांच्या लेखात 'जुने लेखक नैतिकमूल्यं जपणारे', 'पुढच्या पिढ्या मात्र सॉफ्ट टागेर्ट', 'ग्रंथव्यवसायाचे पावित्र्य', 'नैतिकता' अशी उच्च शब्दांची मांदियाळी मांडली गेली आहे. पण वास्तव मात्र भयानक आहे. एका महान लेखकाच्या अंत्यविधीला हजेरी लावण्यासाठी प्रकाशन व्यवसायाला वळण देणारे एक मातब्बर प्रकाशक एका जिल्ह्याच्या गावी गेले होते. तेथे त्यांनी हॉटेलात दोन दिवस मुक्काम केला. अन् त्या दोन दिवसांचा निवासखर्च त्या मृत लेखकाच्या रॉयल्टीतून वजा केल्याचे लेखी पत्र लेखकाच्या वारसांना तात्काळ धाडले गेले. मात्र गेल्या दोन-अडीच दशकांत प्रकाशकबुवांनी त्याच मृत लेखकाच्या शिल्लक मानधनांपैकी एकही छदाम अद्यापि दिलेला नाही.
केवळ साहित्यसेवेची भाषा, साहचर्य वा पावित्र्याच्या बातांवर जनव्यवहार चालत नाहीत. सैनिकांप्रमाणेच लेखकालाही पोट असते. खपाच्या मोजक्या लेखकांचे मानधन देऊन इतरांचे बुडवणे असाही याचा अर्थ होत नाही! अनेक थोर वाङ्मयसेवकांनी आपल्या संसाराकडे, मुलाबाळांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. अहोरात्र शब्दांशी जणू संसार मांडला. समाजाने त्यांना नानासाहेब, अण्णासाहेब, तात्यासाहेब, भाऊसाहेब अशा बिरुदावल्या देऊन मानपान दिले. त्यांचे ग्रंथ वर्षानुवषेर् खपत राहिले. मानधन बिचारे तसेच साचत राहिले. त्याचा ओघ लेखकांच्या उंबरठ्यापर्यंत पोचलाच नाही. मग व्याख्याने, स्नेहसंमेलने, काव्यवाचन तर कोणी कथाकथन करायचे. प्रेमाने मिळालेल्या त्या तुटपुंज्या रकमेवर कष्टाने संसार चालवायचे. अशा महाराष्ट्र भटकंतीचा अनेकांच्या आरोग्यावर पुन्हा परिणाम झालाच. तर अनेकांनी पुस्तके खपत असतानाही रॉयल्टीच्या रकमेवर फाजील भरवसा न ठेवता कोणी मास्तरकी तर कोणी प्राध्यापकी स्वीकारून अंगातल्या साहित्यसेवेच्या झटक्याला वेळेतच मुरड घातली, अशांच्या कुटुंबियांचे भाग्य थोरच मानायचे.
श्री. कुळे म्हणतात त्याप्रमाणे प्रकाशन क्षेत्रात त्सुनामी आल्या असतील तर अशा अनिष्ट प्रवृत्तींशी संघर्ष करायलाच हवा. त्या लढ्यामध्ये उतरायला अनेक कवी व लेखक मित्रांनी माझ्याकडे संमती दर्शवली आहे. मात्र या संघर्षाची सुरुवात करण्यापूवीर् मराठीतील प्रकाशक मित्रांंनी किमान कागदावर दाखवलेल्या वर्षानुवषेर् तुंबलेल्या वा नजरचुकीने राहून गेलेल्या सर्वच लेखकांच्या रॉयल्टीच्या रकमा चुकत्या कराव्यात, म्हणजे आपल्या नैतिक संघर्षाला खऱ्या अथीर् धार चढेल.
केवळ मराठी प्रकाशन व्यवसायाच्या जोरावर अनेकांनी माड्या-हवेल्या उभारल्या. त्यांच्या त्या यशकर्तृत्वाबद्दल माझ्या पोटात दुखायचे कारण नाही. पण या महालांचे चिरे रचताना अनेक साहित्यिकांनी आपले रक्त, घाम आणि अश्रू वेचले आहेत.
अलीकडे मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेला एक भयंकर प्रसंग आठवतो. ज्या एका महान मराठी साहित्यिकाने मराठी भाषेलाच नव्हे, तर भारतीय साहित्याला वळण दिले. ज्यांच्या कादंबऱ्यांवर आमच्या काही पिढ्या पोसल्या, त्या कादंबऱ्यातील नायक-नायिकांची नावे जनांनी आपल्या मुलांना ठेवली. अशा थोर लेखकाच्या वारसदारांनी त्यांचा मौल्यवान ग्रंथसंग्रह, त्यांना भेटीदाखल अन्य भाषेतील लेखकांनी दिलेले ग्रंथराज रद्दीत विकत घातले. आपल्या युगप्रवर्तक पित्याचा असा अमूल्य ग्रंथसंग्रह रद्दीत काढताना त्यांच्या मुलांना काय कमी दु:ख झाले असेल? पण तीस-तीस वर्ष मानधनाचा छदाम मिळणार नसेल तर ते बापुडे तरी दुसरे करणार काय! सुदैवाने माझ्या मानसिंग कुमठेकर नामक एका जागरुक ग्रंथप्रेमी मित्राच्या निदर्शनास ही बाब वेळीच आली. त्याने दामदुपटीने तो ग्रंथसंग्रह विकत घेतला आहे. मोठ्या पावित्र्याने आपल्या घरी जिवापाड जपला आहे. मायमराठीच्या त्या अग्रगण्य कादंबरीकाराला भगवान बुद्ध आणि हिटलर - अहिंसा आणि हिंसा या विषयावर एक दीर्घ पल्ल्याची कादंबरी लिहायची होती. त्यासाठी त्यांनी काढलेली टाचणे, त्या टिपण्या आणि आराखडे त्याच ग्रंथसंग्रहाच्या पिवळ्या, जुनाट पानाआड जेव्हा मला आढळून आले तेव्हा मला अश्रूंचा बांध आवरता आला नाही! ही घटना कपोलकल्पित वाटत असेल तर टीव्हीचा कॅमेरा सोबत घेऊया. आधुनिक युगात खऱ्या अथीर् माझ्या मराठीचा वेलू गगनावर नेणाऱ्या त्या थोर साहित्यिकाचा केवळ नशिबाने वाचलेला तो ग्रंथसंग्रह श्री. मुकुंद कुळे आणि श्री. अरुण जाखडे या दोघांना प्रत्यक्ष नेऊन दाखवायची माझी तयारी आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8818374.cms

लेखकांची पळवापळवी
' मेहता पब्लिशिंग हाऊस'चे सुनील मेहता एकरकमी मानधन देऊन इतर प्रकाशकांचे लेखक आपल्याकडे खेचत असल्यामुळे मराठी
प्रकाशन व्यवसायात सध्या खळबळ माजली आहे. एवढंच नाही, तर मेहता यांच्या या कृतीच्या विरोधात एकत्र येऊन प्रकाशकमंडळी कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाशन व्यवसायात कुणाचं काय चुकतंय, याचा घेतलेला धांडोळा.
-मुकुंद कुळे (म टा ४ जून २०११ )
------------------------------
मराठी प्रकाशन व्यवसायात सध्या त्सुनामी आल्याचं वातावरण आहे आणि त्याला कारणीभूत ठरलेत पुण्यातील 'मेहता पब्लिशिंग हाऊस'चे सुनील मेहता. आजवर वि.स. खांडेकर, शंकर पाटील, व.पु. काळे अशा नामांकित आणि खपाऊ लेखकांच्या पुस्तकांचे सर्वाधिकार सुनील मेहता एकरकमी खरेदी करत आलेत. त्यांच्या या कृतीबद्दल मराठी प्रकाशकांत नाराजी असली, तरी आतापर्र्यंत त्याबद्दल कुणी जाहीरपणे आवाज उठवला नव्हता. परंतु नुकतेच मेहतांनी व्यकंटेश माडगूळकर यांच्या सर्व पुस्तकांचे सर्वाधिकार एकरकमी खरेदी केले आणि प्रकाशकांचं धाबं दणाणलं. कारण व्यंकटेश माडगूळकर खपाऊ लेखक होतेच, पण त्यांच्या पुस्तकांचे हक्क वेगवेगळ्या प्रकाशकांकडे होते. माडगूळकरांनी तर आपली अनेक पुस्तकं तेव्हा मुद्दाम अनेक नवख्या प्रकाशकांनाही दिली होती. त्यामागे नव्याने या व्यवसायात येणारा प्रकाशक आणि मराठी साहित्य व्यवहार तगला पाहिजे, ही त्यांची भावना होती. परंतु सुनील मेहता यांनी त्या उद्देशालाच हरताळ फासल्यामुळे, त्यांच्या या धंदेवाईर्क वृत्तीची झळ बसलेले सगळे प्रकाशक सध्या एकत्र आले आहेत आणि त्यांनी सुनील मेहता यांना कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत मराठी प्रकाशन व्यवसाय मुख्यत: लेखक आणि प्रकाशकांच्या वैयक्तिक संबंधांवर आधारलेला होता. त्यामुळे पुस्तक काढताना कागदोपत्री करार-मदार झाले, तरी एकूणच व्यवहारात व्यावसायिक भाग कमी असायचा. महत्त्वाचं म्हणजे लेखन हे आजवर कधीच कुठल्याही लेखकाचं उदरनिर्वाहाचं साधन नसल्याने कागदोपत्री व्यवहाराकडे लेखकाने कधीच काटेकोरपणे पाहिलेलं नव्हतं. तसंच प्रकाशकही याकडे धंद्यापेक्षा एक 'साहित्य व्यवहार' म्हणूनच पाहात होते. परिणामी लेखक-प्रकाशकांमध्ये आथिर्क व्यवहारावरून कधी फारसे वाद उद्भवले नव्हते.
मात्र पुस्तकविक्रेता म्हणून प्रकाशन व्यवसायात आलेल्या मेहतांनी या 'व्यवसाया'तला 'धंदा' ओळखला आणि काही वर्षांपूवीर् 'मेहता पब्लिशिंग हाऊस' ही स्वत:ची प्रकाशनसंस्था सुरू करुन अल्पावधीतच जमही बसवला. पाच-दहा वर्षांपूवीर् जेव्हा सारेच प्रकाशक ' पुस्तकं खपत नाहीत', अशी बोंब मारत होते, तेव्हा जाहिरातीच्या बळावर सुनील मेहता आपल्या पुस्तकांची जोरदार विक्री करत होते. तसंच अनुवादित पुस्तकांचा यशस्वी फंडाही राबवत होते. मात्र त्याच वेळी त्यांनी आपला पक्का मारवाडी व्यावसायिक 'पैंतरा' वापरायला सुरुवात केली. त्यात पहिला बळी गेला तो 'पानिपत'कार विश्वास पाटील यांचा. तोपर्यंत 'राजहंस प्रकाशन'चे लेखक अशी ओळख असलेल्या विश्वास पाटील यांना सुनील मेहता यांनी एकरकमी दहा लाख रुपये मानधन देण्याचं आमिष दाखवलं आणि पाटील यांची 'संभाजी' कादंबरी मेहतांकडे गेली. त्यानंतर मेहतांनी 'कॉन्टिनेन्टल प्रकाशन'चे लेखक 'मृत्युंजय'कार शिवाजी सावंत यांना 'युगंधर'साठी , 'मॅजेस्टिक'च्या 'अन्नपूर्णा'कार मंगला बवेर्, 'उत्कर्ष प्रकाशन'चे डॉ. ह.वि. सरदेसाई अशा अनेकांना एकरकमी मानधन देऊन आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जातं.
हे जुने लेखक नैतिक मूल्यं जपणारी असल्यामुळे त्यांनी मेहतांना नकार दिला. परंतु हयात नसलेल्या लेखकांची पुढची पिढी मात्र 'सॉफ्ट टागेर्ट' ठरली. वि.स. खांडेकर, रणजित देसाई, शंकर पाटील. व. पु. काळे हे लेखक याच पद्धतीने मेहतांकडे आले. कारण एका पुस्तकाच्या जेमतेम दहा-पंधरा हजार मानधनासाठी (मराठीत आजही पाच ते पंधरा टक्केच रॉयल्टी दिली जाते.) वर्षानुवर्षं वाट पाहण्यापेक्षा आणि त्याचा हिशेब ठेवण्यापेक्षा लेखकांचे वारसदार पुस्तकाचे हक्क मेहतांना हक्क विकून मोकळे होतात.
याच धोरणानुसार अनिल मेहता यांनी अलीकडच्या काळात द.मा. मिरासदार व व्यंकटेश माडगुळकरांच्या पुस्तकांचे हक्क एकरकमी किंमत देऊन विकत घेतले आणि प्रकाशनविश्वात खळबळ माजली. कारण माडगूळकरांच्या पुस्तकांना कायम मागणी असते.
पण मूळात पैशाच्या बळावर असे हक्क विकत घेणे, हेच नैतिकदृष्ट्या बरोबर नाही, असं मेहतांच्या विरोधातल्या प्रकाशकांचं म्हणणं आहे. यातही मुख्यत: व्यंकटेश माडगुळकर यांच्या तब्बल ४६ पुस्तकांच्या संदर्भात बोलायचं झालं, तर त्यांचे कॉपिराइटस् त्यांची मुलगी ज्ञानदा नाईक यांच्याकडे असले, तरी पुस्तकप्रकाशनाचे हक्क त्या-त्या प्रकाशकांकडे आहेत. यासंदर्भात आपली बाजू मांडताना 'कॉन्टिनेन्टल प्रकाशन'च्या संचालक देवयानी अभ्यंकर म्हणतात-'व्यंकटेश माडगूळकर व माझे आजोबा अनंतराव कुलकणीर् यांच्यात कागदोपत्री झालेल्या करारनुसार माडगूळकरांंच्या पुस्तकांच्या सर्व आवृत्त्यांचे हक्क आमच्याकडे आहेत. तेव्हा वारसाहक्काने पुस्तकाचे कॉपिराइटस् ज्ञानदा नाईकांकडे असले, तरी त्या मेहतांना पुस्तकछपाईचे हक्क देऊ शकत नाहीत.'
एखादं पुस्तक तीन वर्षांपेक्षा अधिक काळ बाजारात उपलब्ध नसेल, तर अन्य प्रकाशक मूळ प्रकाशकाच्या परवानगीने ते पुस्तक छापू शकतो. मात्र या व्यवहारात मूळ प्रकाशकाचं परवानगीपत्र अत्यावश्यक असतं. हाच मुद्दा धरून माडगुळकरांची १८ पुस्तकं प्रकाशित केलेले 'उत्कर्ष प्रकाशन'चे सुधाकर जोशी म्हणतात, 'मेहतांकडे मराठी पुस्तकाचे हक्क असलेल्या कमलाबाई ओगले यांच्या 'रुचिरा' पुस्तकाच्या हिंदी-इंग्रजी आवृत्तीचे हक्क मी ओगलेबाईर्ंकडूनच विकत घेतले होते. पण हिंदी-इंग्रजीत पुस्तकं छापण्याआधी मी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आणि कुणाचं ऑब्जेक्शन आहे का ते विचारलं. तेव्हा मेहतांनी रुचिरा हिंदी-इंग्रजीत छापलं, तर मराठी पुस्तकावर त्याचा परिणाम होईल, असं म्हटलं होतं आणि त्यांची बाजू समजून घेऊन मी हिंदी-इंग्रजी आवृत्ती काढण्याचा विचार बदलला होता. पण आता तेच मेहता आमच्याकडची पुस्तकं मात्र आम्हाला न विचारताच पळवत आहेत.'
तर 'पद्मगंधा प्रकाशन'चे अरुण जाखडे म्हणतात- 'प्रत्येक प्रकाशक नवनवीन लेखक आणि विषयांसाठी धडपडत असतो. त्यासाठी स्वत: वेगवेगळ्या कल्पना सुचवून त्यावर जाणत्या लेखकांडून लिहून घेत असतो. पण जो प्रकाशक स्वत: प्रयोगशील नसतो, तो दुसऱ्यांच्या घरात डोकावतो आणि त्यांचे लेखक-विषय चोरतो. मेहतांचं आताचं वागणं असंच आहे. कारण त्यांच्याकडे स्वत:ची काहीच कल्पकता-प्रयोदशीलता नाहीय.'
लेखक घडवणं, लेखकावर मेहनत घेणं असे प्रकार बहुतेक प्रकाशक मंडळी करत असतात. तसंच लेखक-प्रकाशकाचं जिव्हाळ्याचं नातंही मराठी प्रकाशन व्यवसायात महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळेच मेहता प्रकरणात नाडल्या गेलेल्या प्रकाशकांचं म्हणणं आहे की, प्रकाशन व्यवसायाकडे पूर्णपणे धंदेवाईक वृत्तीतून पाहू नका. हा व्यवसाय आजवर लेखक-प्रकाशकाच्या नैतिक संबंधांवरच टिकलेला आहे.
मात्र लेखक-प्रकाशक संबंध कितीही भावमधुर असले तरी प्रकाशन हा 'व्यवसाय'च आहे, हे आता प्रत्येक प्रकाशकाने लक्षात घ्यायला हवं. या संदर्भात ज्या 'देशमुख आणि कंपनी'चे वि.स. खांडेकर, रणजित देसाई यांच्यासारखे खपणारे लेखक सुनील मेहतांनी उचलले, त्या देशमुख कंपनीचे सध्याचे संचालक रवी गोडबोले मात्र संयमी भूमिका घेतात. ते म्हणतात, 'प्रोफेशन आणि बिझनेसमध्ये जो फरक आहे, तोच व्यवसाय आणि धंदा यांत आहे. व्यवसाय म्हटला की त्यात सामाजिक बांधिलकी वगैरे येते आणि मूल्य सांभाळून व्यवसाय करणं कठीण होऊन बसतं. तेव्हा प्रकाशकांनी आता ठरवायला हवं की, आपल्याला व्यवसाय करायचाय की धंदा! '
आणि सुनील मेहतांचं हेच म्हणणं आहे. आपल्याविरुद्ध बोंब मारणाऱ्या प्रकाशकांना उद्देशून ते म्हणतात, 'आपले प्रकाशक प्रकाशनाचा व्यवसाय नीट करत नाहीत. त्यांना आपले लेखक सांभाळत येत नाहीत. त्यांचे आथिर्क व्यवहार नीट नसतात. मग त्यांचे लेखक माझ्याकडे येतात. तेव्हा आपल्या लेखकांना थांबवणं आपल्या हाती का नाही, याचा विचार त्या त्या प्रकाशकांनीच करावा.'
सुनील मेहता म्हणतात, ते तांत्रिकदृष्ट््या बरोबर असलं, तरी मेहताही अर्धसत्यच सांगतात. लेखक किंवा त्यांचे वारसदार मेहतांकडे येतात हे पूर्णपणे खरं नाही. मेहताच सगळीकडे कोरा चेक घेऊन जातात, असं या क्षेत्रातली मंडळी सांगतात. त्यांचा हा उद्योग लेखक किंवा त्यांच्या वारसदारांच्या हिताचा असला, तरी भविष्यातील मराठी साहित्य व्यवहाराच्या दृष्टीने धोकादायक आहे. कारण यामुळे आगामी काळात 'मेहता पब्लिशिंग हाऊस'ची मोनोपॉली निर्माण होऊ शकते. आजवर एकाच लेखकाची पुस्तकं वेगवेगळ्या प्रकाशकाकडे असल्यामुळे सर्वच प्रकाशकांचं पुस्तकविक्रेत्यांशी सौहार्दाचं वागणं असायचं आणि असतं. मात्र वि.स. खांडेकर, रणजित देसाई अशा नावाजलेल्या लेखकांच्या पुस्तकांच्या संदर्भात सुनील मेहतांचं वागणं आतापसूनच अरेरावीचं असतं. विक्रेत्याने आपल्याकडे येऊन आणि तेही कॅश देऊनच माल नेला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. पुढच्या काळात खांडेकर, देसाई, वपु, मिरासदार, माडगुळकर यांच्यासारखेच आणखी नामांकित लेखक गळाला लागले, तर सुनील मेहता पुस्तक विक्रेत्यांना आपल्या तालावर नाचवायला कमी करणार नाहीत आणि त्यामुळे मेहता यांची एकाधिकारशाही निर्माण होऊन एकूणच साहित्य व्यवहार धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र असं व्हायला नको असेल, तर आता सर्वच प्रकाशकांनी पारदशीर् पुस्तक व्यवहार करायला हवा आणि आपापले लेखक जपायला हवेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8727270.cms

Subscribe to:
Posts (Atom)