Friday, June 17, 2011

मेकिंग द कट


एका सर्जनच्या आयुष्यातील थरार,,,,,

सर्जन असण्याचा अर्थ असतो, मानवी यातनांच्या सागरात अविचल उभं राहणं.
आपलं ज्ञान, कौशल्य आणि बुद्धिमत्ता पणाला लावून त्याच्याशी झुंज देणं. एक इंटर्न, त्याचा पहिला छेद घेतो
आणि शिक्षक त्याची खिल्ली उडवतात.
आठवड्यानंतर, एका वृद्धेच्या इच्छेविरुद्ध तिचा जीव वाचवण्याची अनपेक्षित घटना घडते.
मेंदूच्या कर्करोगामुळे एका कुप्रसिद्ध सर्जनला वेड लागतं. ल्युकेमिया झालेल्या मुलाची आई अगतिक होऊन जाते.

या खिळवून ठेवणाऱ्या अप्रतिम स्मृतिचित्रांम­धून , मोहम्मद खाद्रा सर्जन म्हणून त्यांचं आयुष्य उलगडून दाखवतात.
खडतर प्रशिक्षणापासून ते निद्रानाश करणाऱ्या अविरत कामापर्यंत .
त्यांचं आयुष्य घडवणा-या डॉक्टर आणि रुग्णांच्या स्मृती ते जागवतात.
मानवतेचा अखंड ओघ ­धैर्यवान, केविलवाणी, कौतुकास्पद, तिरस्कार उत्पन्न करणारी
अशा अनेक माणसांच्या या कहाण्या आहेत. ऑपरेशन थिएटरम­ये घडणाऱ्या धक्कादायक चुकांच्या
आणि तणावामुळे उद्­वस्त झालेल्या डॉक्टरांचे हे कथानक आहे.

राजकारणामुळे आरोग्यसेवेची झालेली दैना आपल्याला इथे दिसते.
मृत्यु समोर दिसत असताना; रुग्णांनी घेतलेले आत्मनाशी निर्णय, बाळगलेल्या वेड्या आशा दिसतात.
त्यांच्या स्वत:च्याही दैनंदिन आयुष्यात घडलेल्या असा­धारण घटनांमुळे निर्माण होणारं नाट्य इथे दिसतं.


मूळ लेखक : डॉ. मोहम्मद खाद्रा
अनुवादक : डॉ.देवदत्त केतकर

पृष्ठे : 182 किंमत : 200

No comments:

Post a Comment