Mehta Publishing House is the most important Publisher in Marathi Books History
Saturday, February 5, 2011
मेहतांच्या दोन पुस्तकाला पुरस्कार
मराठी वाङ्मय परिषद, बडोदे, यांच्या वतीने घेणयात आलेल्या साहित्यस्पर्धेत मेहता पब्लिशिंग हाऊस यांची `मना सर्जना` (डॉ. अनिल गांधी) या पुस्तकाला प्रथम तर `ज्याचं करावं भलं` (निरंजन घाटे) यांच्या कथासंग्रहाला दुसरे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
हे दोन्ही पुरस्कार 6 फेब्रुवारीला बडोदा येथे देण्यात आले.
डॉ. अनिल गांधी यांच्या `मना सर्जना` पुस्तकात त्यांनी आपल्या वौद्यकीय विषयाखेरीज, आर्थिक गुंतवणूक, व्यावसायिक नीतिमत्ता, पृथ्वीची व्युत्पत्ती, आदिवासींसाठी आश्रमशाळा, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी अशा इतरही विषयांवरील आपले चिंतन व्यक्त केले आहे. एकूणच ही आत्मकथा मननीय, चिंतनीय आणि वाचनीय अशी आहे.
`मना सर्जना` या मूळ मराठी पुस्तकाचा गुजराथी आणि हिंदीमध्ये अनुवाद झाला आहे. इंग्रजीमधेही याचा अनुवाद प्रसिद्ध होणार आहे.
निरंजन घाटे यांच्या मूळ स्वभावाचा परिचय करून देणाऱ्या या एक प्रकारे गप्पाच आहेत. ते विज्ञान लेखनाकडे वळले आणि त्यांचं असं हलकं फुलकं लेखन मागं पडलं. `ज्याचं करावं भलं` द्वारा या त्यांच्या कथांना पुन्हा उजाळा मिळतोय, या कथांमुळे तत्कालीन तरुणाईचेही दर्शन आजच्या वाचकाला होईल.
Friday, February 4, 2011
'मना सर्जना'ला पहिले पारितोषिक
बडोदा येथील मराठी वाड्मय परिषदेतर्फे ज्येष्ठ डॉक्टर अनिल गांधी लिखित ' मना सर्जना ' या आत्मचरित्रास प्रथम क्रमांकाचे ( विभागून ) पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे . येत्या ६ फेब्रुवारीला नियोजन मंडळाचे सदस्य डॉ . नरेंद जाधव यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे . बडोदा येथे संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल .
वाचकांनी या आत्मचरित्राला चांगला प्रतिसाद दिला आहे . त्यामुळे ' मना सर्जना ' ची तिसरी आवृत्ती अवघ्या पाच महिन्यांत आली . डॉ . गांधी यांचे शब्दांकर चित्रलेखा पुरंदरे यांनी केले आहे . पुण्यातील मेहता पब्लिकेशन हाऊसने याचे प्रकाशन केले आहे .
' मना सर्जना ' या मूळ मराठी पुस्तकाचा गुजराथी आणि हिंदीमध्ये अनुवाद झाला आहे . तसेच , इंग्रजी वाचकांसाठी लवकरच इंग्रजीमधीलही याचा अनुवाद प्रसिद्ध होणार आहे .
Thursday, February 3, 2011
आनंदाचं पासबुक-श्याम भुर्के
आनंदाचं पासबुक दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस अनेक क्षेत्रात यश प्राप्त करूशकतो. श्याम भुर्के यांनी बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये यशाची अनेक उत्तुंग शिखरे गाठली. साहित्य व कला क्षेत्रात भरारी मारली.
वि.स. खांडेकर, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, रणजित देसाई, जगदीश खेबूडकर, राम गबाले, भीमसेन जोशी, शरद तळवळकर, सुरेश भट, वामनराव चोरघडे, प्रा. शिवाजीराव भोसले अशा अनेक नामवंतांसंबंधीच्या आठवणी आनंददायी आहेत. डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्या समाजकार्यात सहभागी होता आले.
खुमासदार अत्रे, पु.ल. एक आनंदयात्रा, नंदादीप वि.स. खांडेकर, साहित्यिक सावरकर, गोनीदां-एक झंझावात, व्यंकटेश माडगुळकरांची गोष्ट, मिरासदारी, शरद तळवळकर गुदगुल्या असे हजारो कार्यक्रम पत्नीसमवेत करून जेष्ठ लेखकांचे साहित्य व जीवन रसिकांपय|त पोहोचविले. असं हे आनंददायी घटनांचं समृद्ध लिखाण आहे.
ज्याला आयुष्यात मोठं व्हावंसं वाटतं, यशस्वी व्हावंसं वाटतं, आनंदी रहावं वाटतं; त्याला हे पुस्तक नक्कीच प्रेरणा देईल.
पृष्ठे : 312 किंमत : 300
Wednesday, February 2, 2011
प्रकाशन व्यवसायातील डिजिटल क्रांती
स्वागत 2011 चे करताना ग्रंथव्यवहाराच्या क्षेत्रात यापुढे पारंपरिक छापील पुस्तकांच्या तुलनेत डिजिटल पुस्तकांचे प्रमाण वाढत जाणार आहे, ही खूणगाठ बांधूनच पुढे जायला हवे अशी नि:संदिग्ध लक्षणे दिसत आहेत.
भारतात किंवा महाराष्ट्रात छापील पुस्तकांचाच वरचष्मा आणखी काही काळ राहणार आहे, त्यामुळे आपल्या वाचक-लेखकांनी किंवा प्रकाशक-ग्रंथविक्रेत्यांनी फारशी चिंता करण्याचे कारण नाही; कारण इंटरनेटचा आणि ई-बुक रीडर्सचा, स्मार्टफोन आणि आयपॅड, आयफोन वगैरेंचा भारतात अजूनही मर्यादित प्रमाणातच उपयोग होत आहे; परंतु भारतात मोबाईलची ग्राहकसंख्या पन्नास कोटीच्या घरात गेली आहे हे लक्षात घेता, इंटरनेट-स्मार्टफोनचे दर खाली येऊन ग्राहकसंख्येत वेगाने वाढ होत जाईल असे मानायला हरकत नाही. तसे झाल्यावर छापील पुस्तकांच्या ऐवजी डिजिटल पुस्तकांच्या मागणीत झपाट््याने वाढ होत जाईल हे स्पष्टच आहे.
आॅक्टोबर महिन्यात झालेल्या फ्रँकफर्ट बुक फेअरमध्ये डिजिटल पुस्तकांचीच सर्वदूर चर्चा होती. छापील पुस्तकांच्या हक्कांची देवाणघेवाण करण्यासाठी ही ग्रंथजत्रा आजवर प्रसिद्ध होती; आता डिजिटल हक्कांची देवाणघेवाण सर्रास सुरूझाल्याचे दिसून येत होते. तेथे झालेल्या परिसंवादात आणि चर्चासत्रात ङडिजिटल बुक्स आणि डिजिटल राइट्सछ यांच्यावरच सवा|चे लक्ष एकवटलेले होते आणि सवा|ना त्याबद्दल औत्सुक्य होते. डिजिटल पुस्तकांकडे प्रतिस्पर्धी किंवा शत्रुत्वाच्या भावनेने न पाहता, आपल्या छापील पुस्तकांच्या जोडीने, डिजिटल पुस्तकांद्वारे आपल्या व्यवसायाची प्राप्ती सहजगत्या कशी विस्तारता येईल या स्वागतशील मानसिकतेचे प्रत्यंतर या ग्रंथजत्रेत पदोपदी येत होते.
हार्लेकिन मिल्स अँड बून या प्रकाशन संस्थेचे विक्रीप्रमुख म्हणाले, ङङया जत्रेत फेरफटका मारताना लोक डिजिटल पुस्तकांमध्ये रस घेत आहेत आणि डिजिटल पुस्तकांच्या स्टँडवर चर्चा करीत आहेत, हे दृश्य सर्रास दिसत होते. या आधीच्या वर्षात ते कधी दिसले नव्हते. यंदा ङडिजिटलछचे स्टॉल जास्त होते आणि छोट््या छोट््या नव्या संस्थांचेही प्रमाण जास्त होते. डिजिटल क्षेत्रात नवनवे प्रयोग करणार्या ताज्या दमाच्या तरुणांची गजबज या ग्रंथजत्रेला तरुणाई बहाल करणारी होती. त्या तरुणांचा उत्साह आणि आशावाद बगताना, ङग्रंथव्यवहारात इतके पावसाळे मी काढले आहेतछ किंवा ङआमच्या प्रकाशन संस्थेने गेल्या पन्नास वर्षात अमुक अमुक बेस्टसेलर लेखकांची पुस्तके काढली आहेतछ अशी शेखी मिरवणे व्यर्थ आहे, असेच एकूण वातावरण होते.छछ
या क्षेत्रात नवे एजंटही येत आहेत. नव्या लेखकांना, नव्या कल्पनांना, नव्या वाङ्मयप्रकारांना ते प्रमोट करीत आहेत, प्रकाशनाच्या नव्या शक्यता दाखवून देत आहेत, त्यांनाही फ्रँकफर्टमध्ये नवीन प्रकल्पांचा सूतोवाच करण्याची संधी मिळाली. आधी केवळ विशिष्ट पुस्तकांचे मार्केटिंग करावे लागत होते. आता डिजिटल हक्कांचे मार्केटिंग अधिक भाषांसाठी आणि वेगवेगळ्या प्रदेशांसाठी होत असल्याने आणि पुस्तकांच्या संख्येला सीमा नसल्याने एकूण उलाढाल खूप वाढलेली आहे. प्रकाशन व्यवसायाचे स्वरूपच बदलत आहे. कन्टेन्ट निर्मिती हे मुख्य काम छापील वा डिजिटल दोन्हींसाठी पायाभूत आहे, परंतु मुद्रणाची गरज नसल्याने कागद खरेदी, बांधणी, गोडाऊन, वितरण यांचा व्याप कमी झाला आहे.
गुगलने 4 लाख पुस्तकांचे डिजिटल एडिशनचे हक्क प्रकाशकांकडून मिळवले असून, कॉपीराइटच्या कक्षेत न येणार्या 20 लाख पुस्तकांचे डिजिटलायझेशन पूर्ण केले आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये लौकरच गुगल एडिशन्सचे लाँचिंग केले जाईल असे जाहीर केले आहे. मात्र नक्की तारीख अजून जाहीर केलेली नाही. ही डिजिटल पुस्तके सुविहितपणे, कुठलीही अडचण न येता ग्राहकांना वापरता यावीत यासाठी तांत्रिकदृष्ट्या कुठलीही त्रुटी राहू नये या दृष्टीने गुगल स्वत:ची खातरजमा करून गेत आहे. ई-रीडरची गरज भासू नये, कुठल्याही स्मार्टफोनवर, आयपॅडवर, ई-फोनवर, मोबाईलवर, इंटरनेटवर गुगल वेबरीडर ई-बुक्स डाऊनलोड करता यावीत, एकदा विकत घेतल्यावर ग्राहकाला ती जगात कोठेही या वेगवेगळ्या साधनांद्वारे आपल्या सोयीनुसार वाचता यावीत, अशी गुगलची संकल्पना आहे. अमेरिकेत त्यासाठी एजन्सी मॉडेलच्या धर्तीवर प्रकाशकांशी करार करण्यात येत आहेत.
अॅमेझानच्या किंडल वाचन यंत्रावर गुगल एडिशन्स उपलब्ध होणार नाही असेही जाहीर करण्यात आले आहे.
अॅमेझॉनने लेखकांच्या ऐवजी प्रकाशकांशी डिजिटल हक्कांबाबतचे करार करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी लेखकांच्या एजन्टांची एक बौठक घेऊन, विचारविमर्श केला. अॅमेझॉन स्वत:च प्रकाशन क्षेत्रात पदार्पण करण्याचाही विचार करीत आहे. स्वयंप्रकाशन करणार्या लेखकांची पुस्तके वितरित करण्याची जबाबदारी घेऊन अॅमेझान एजंट तसेच पारंपरिक प्रकाशक यांना दूर ठेवण्याचा मार्गही अवलंबणार आहे असे सांगण्यात येते. एजंटांना अॅमेझॉनने पुस्तकांवर सत्तर टक्के रॉयल्टी देण्याचे आमिष दाखवले आहे. फ्रँकफर्टला अॅमेझॉनचे बरेच अधिकारी आलेले होते, आणि ते सवा|शी संपर्क साधत होते.
अॅमेझॉन ही संस्था जगातील सवा|त मोठी रिटेल ग्रंथविक्री करणारी संस्था म्हणून गेली 12 वर्षे कार्यरत आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडीची प्रचंड माहिती या संस्थेकडे आहे. त्यामुळे मार्केटिंगबाबत अॅमेझॉनची व्यूहरचना कमालीची कार्यक्षम असेल असे एजंट आणि लेखक यांच्या मनावर बिंबवण्याचा अॅमेझॉनचा प्रयत्न होता. ई-बुक्स ही छापील पुस्तकापेक्षा तीस ते चाळीस टक्के स्वस्त असायला हवीत, तशी स्वस्त असली तरच ई-बुक्सचे मार्केट खर्या अर्थाने उसळी घेईल असे अॅमेझॉन फ्रान्सचे प्रमुख झेव्हियर गॅरॅम्बोइस यांनी म्हटले आहे. सध्या अॅमेझॉन एका पुस्तकासाठी 9.99 डॉलर्स घेते. काही पुस्तके मोफत देते. या 10 डॉलर्सपौकी निम्मी रक्कम प्रकाशक-लेखकांना देण्यात येते.
फ्युचर बुक या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ई-बुक्सच्या ग्राहकांपौकी साठ टक्के ग्राहकांनी अॅमेझॉनकडून एक तरी ई-बुक घेतल्याचे आढळून आले.
नोव्हेंबर 2010मध्ये झालेल्या फ्युचर बुक कॉन्फरन्स मध्ये डिजिटल पुस्तकांची निर्मिती, वितरण यावर जाणकारांनी आपापली मते मांडली. प्रकाशन म्हणजेछापील पुस्तक हे समीकरण गेल्या 5 वर्षात मागे पडले असून कन्टेन्ट (आशय) हा मुद्रणाबरोबरच आॅनलाइन, ई-रीडर, मोबाईल याद्वारेही वाचकग्राहकांना मिळू शकतो हे मान्य झाले आहे. 2010 हे वर्ष त्या दृष्टीने ई-रीडर आणि ई-बुक्सचे ठरले आहे.
ई-बुकमुळे पुस्तक छपाईचा व्याप कमी होऊन, प्रकाशकांना कर्मचार्यांची संख्या कमी करता येईल, किंवा नवनव्या पुस्तकांची निर्मिती करण्याची सवड सापडेल. ई-बुकमुळे लेखक, प्रकाशक, संपादक, एजंट, ग्राहक, वाचक आणि विक्रेते या सवा|चाच फायदा होईल असाही तर्क केला जातो. काही घटकांना काही बाबतीत फटकाही बसेल, परंतु दीर्घकालीन विचार केला तर या व्यवसायाची द्रुत गतीने वाढ होत राहील असे स्पष्ट दिसते.
गतवर्षाचा आढावा घेताना मराठी किंवा भारतीय प्रकाशन क्षेत्राचा विचारही व्हायला हवा. परंतु जागतिक डिजिटल पुस्तकांकडे आपण वेळीच वळायला हवे, हा विचार नव्या वर्षाचे स्वागत करताना मनात हवा.
सुनील मेहता
(मेहता पब्लिशिंग हाऊस)
Monday, January 31, 2011
फिट फॉर 50+ फॉर मेन
ज्यांना निरोगी आणि दीर्घायुषी व्हायचं आहे अशा पुरुषांसाठी
चालणं या व्यायामाच्या प्रकारात जलद गतीनं चालणं, हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. जलद चालल्यामुळे धावण्याच्या व्यायामाचे बरेचसे फायदे मिळतातच, पण त्याच्यापासनं होणारे संभाव्य धोके टाळता येतात.
मध्यमवयीन व्यक्तींनी किमान 20 मिनिटं चालण्याचा व्यायाम केला, तरच त्याचा फायदा होतो; हे आता अनेक उदाहरणांनी सिद्ध झालेलं आहे. माझ्या मते मात्र अगदीच काही न करण्यापेक्षा, रोज दहा ते पंधरा मिनिटं चालणं हे केव्हाही चांगलं.
द अॅन्टीआॅक्सिडंट रेव्होल्युशन या पुस्तकाचे सुप्रसिद्ध लेखक डॉ. केन कूपर या अमेरिकन डॉक्टरनी, 1960 साली अमेरिकेत तंदुरुस्तीची चळवळ सुरूकेली होती. त्यांच्या मते, धावण्याचा व्यायाम घेणार्यांसारखे जर तुम्ही जोरात चाललात, तर तुम्ही दर किलोमीटरमागे जास्त कॅलरीज खर्च करता.
मी स्वत: कधीच धावत नाही, पण चालतो मात्र भरपूर. मी आठवड्यातनं दोन दिवस गोल्फ खेळतो, त्यामुळे आठवड्याच्या सातांपौकी दोन दिवस तर मी नक्कीच चालतो. याशिवाय मी दोन दिवस वीस मिनिटं किंवा जास्त चालतो.
जलद चालण्याचा व्यायाम करणं केव्हाही आदर्शवत ठरेल. त्यामुळे नाडीचे ठोके जलद पडतात आणि हृदयाला व्यायाम मिळतो. जर तुम्हाला मानवलं, तर तुमच्या चालण्याच्या मार्गात उंचवटे असतील असं बघा. चालत असताना तोंडातनं शब्द फुटणार नाही, इतके अतिश्रम करू नका. धाप लागेपर्यंत दमू नका.
आपल्याला ठाऊकच आहे की चालण्यानं शरीरातली ऊर्जा खर्ची पडते आणि चरबी कमी होते. अर्थात हा व्यायाम नियमितपणे केलात, तरच हे शक्य आहे. जलद चालण्यानं शरीरातली चयापचयाची प्रक्रिया कल्पनेपेक्षाही जलद होते. आपल्या श्वसनामार्फत घेतला जाणारा प्राणवायू हे याचं उत्तम परिमाण आहे. तुम्ही जेव्हा आरामात खुर्चीत बसलेले असता, तेव्हा तुमचं शरीर साधारणपणे एक तृतीयांश लिटर प्राणवायू प्रत्येक मिनिटाला उपयोगात आणतं; पण जेव्हा खुर्चीतनं उठून बाहेर रस्त्यावर चालता, तेव्हा तुम्ही एक पूर्णांक एक तृतीयांश लीटर प्राणवायू उपयोगात आणता, म्हणजेच तीन ते चार पटींनी प्राणवायूचा उपयोग वाढतो.
अनेक वर्षे शास्त्रज्ञांची अशी ठाम समजूत होती की, व्यायाम करायचा थांबवल्यावरही, चयापचयाची क्रिया प्रदीर्घ काळ कायम राहते. या प्रक्रियेला आफ्टर ग्लो असं शास्त्रीय नाव आहे. यानुसार तुम्ही जरी वीस मिनिटं चालण्याचा व्यायाम केलात, तरी पुढे चोवीस तास तुमच्या चरबीचं ज्वलन होत राहतं.
पण दक्षिण आॅस्ट्रेलियातले फ्लांडर्स विश्वविद्यालयातल्या खेळाच्या संबंधित विषयातले तज्ज्ञ डॉ. õिख्रस्तोफर गोर, यांनी मात्र आफ्टर ग्लोची कल्पना साफ नाकारली आहे. त्यांचे मते, हा परिणाम व्यायाम थांबवल्यानंतर फार अल्प काळ टिकतो.
चालणार्यांना ही बातमी जरा निराशाजनक वाटेल, पण डॉक्टर गोर हे पुढे जाऊन असंही सांगतात की, यामुळे होणारा फायदा मात्र कमी होत नाही आणि त्यात काही फरक पडत नाही.
मूळ लेखक : ग्रेग चॅपेल
अनुवादक : सुभाष जोशी
नियमित चालण्याने आणि पोषक आहार घेतल्यानं, हृदयविकाराचा धोका कमी होतोच; पण शरीराच्या वजनावरही नियंत्रण राहतं.
Sunday, January 30, 2011
फिट फॉर 50+ फॉर विमेन
ज्यांना निरोगी आणि दीर्घायुषी व्हायचं आहे अशा स्त्रीयांसाठी
एक सुवार्ता आहे की, तुम्ही कार्यक्षम होण्यासाठी केव्हाही सुरुवात करायला हरकत नाही, उशीर झालेला नसतो; असा निष्कर्ष अनेक ठिकाणच्या अभ्यासावरून काढता येतो. पन्नाशीनंतर करायच्या साध्या हलक्या व्यायामांचे प्रचंड फायदे होतात.
उदा : हृदयरोग, मधुमेह आणि आतड्याचा कॅन्सर यासारखे गंभीर आजार बळावण्याचा धोका कमी होतो.
कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी होतो.
काळजी आणि निराशा कमी होऊन प्रसन्न वाटतं.
वजनावर नियंत्रण राहून तुम्ही सुदृढ राहता.
स्नायू, सांधे आणि हाडं कायमची बळकट होतात.
सध्याच्या प्रकृतीविषयक किरकोळ तक्रारींचं निवारण होतं आणि त्या परत उद्भवत नाहीत.
जीवनशौलीचा दर्जा उंचावतो आणि अकाली मरण येण्याची शक्यता दुरावते.
वाढत्या वयाबरोबर आपले स्नायू वजनाने आणि आकाराने कमी-कमी होत जातात. मध्यम वय उलटून गेल्यानंतर सर्वसाधारणपणे दर दहा वर्षाला तीन किलो स्नायू वजनाने घटतात. अर्थात ही घट होण्यामागे वयापेक्षाही बौठं काम जास्त जबाबदार आहे. वयस्क व्यक्तींनी व्यायाम केल्यास त्यांच्या स्नायूंच्या वजनात वाढ होऊ शकते.
सत्तर वर्षांचा सक्षम माणूस हा बैठे काम करणाऱ्या तीस वर्षाच्या व्यक्तींइतकाच सक्षम असतो. कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची दर वर्षी सुमारे अर्धा टक्का शारीरिक घट होते, तर नसणार्यांची ती दोन टक्के होते.
लठ्ठपणामुळे हृदयरोग, मधुमेहासारखे अनेक रोग बळावण्याची शक्यता असते. वयाच्या चाळिशीनंतर हाडांची घनता कमी होऊ लागते आणि पन्नाशीनंतर ही क्रिया अधिक वेगाने होते. याच कारणामुळे वयस्क व्यक्तींची हाडं मोडण्याची शक्यता जास्त असते. वजन उचलण्याचे व्यायाम केल्याने सशक्त आणि निरोगी राहायला मदत होते.
तुमच्या शरीरातले सांधे लवचीक आणि सक्षम राहण्यासाठी त्यांची नियमित हालचाल होणं आवश्यक आहे. लवचीकपणा टिकून राहावा म्हणून करायचे व्यायाम नियमितपणे केल्यास स्नायूबंध आणि कुर्चा यांसारख्या मऊ पेशींना बळकटी येते आणि इजा होण्याची शक्यता दुरावते.
तुमचं वय कितीही असो; थोडीफार दमछाक करणारे व्यायाम जर नियमितपणे केले, तर हृदयाचं आणि फुप्फुसांचं आरोग्य सुधारतं. तरुण माणसापेक्षा वयस्क व्यक्तींना याचे फायदे थोडे उशिरा दिसतील, पण दोघांनाही सारखेच फायदे मिळतील.
असा एक समज सर्वत्र पसरलेला पाहायला मिळतो की, फक्त दमछाक करणाऱ्या आणि दीर्घ काळ केलेल्या व्यायामांचाच फायदा होतो. या गैरसमजापायी कित्येक जण व्यायामाची सुरुवात करण्यापासून दूर राहिले आहेत. सुदैवाने हे खरं नाही. साधारणपणे केलेल्या शारीरिक कसरतींमुळेही लक्षणीय फायदा होऊ शकतो.
मूळ लेखक : शेन गुड
अनुवादक : सुभाष जोशी
पृष्ठे : 88 किंमत : 80
या पुस्तकात दिलेले व्यायामाचे प्रकार हे मध्यमवयीन स्त्रियांना डोळ्यांसमोर ठेवूनच आखलेले आहेत
Subscribe to:
Posts (Atom)