Wednesday, February 2, 2011

प्रकाशन व्यवसायातील डिजिटल क्रांती


स्वागत 2011 चे करताना ग्रंथव्यवहाराच्या क्षेत्रात यापुढे पारंपरिक छापील पुस्तकांच्या तुलनेत डिजिटल पुस्तकांचे प्रमाण वाढत जाणार आहे, ही खूणगाठ बांधूनच पुढे जायला हवे अशी नि:संदिग्ध लक्षणे दिसत आहेत.

भारतात किंवा महाराष्ट्रात छापील पुस्तकांचाच वरचष्मा आणखी काही काळ राहणार आहे, त्यामुळे आपल्या वाचक-लेखकांनी किंवा प्रकाशक-ग्रंथविक्रेत्यांनी फारशी चिंता करण्याचे कारण नाही; कारण इंटरनेटचा आणि ई-बुक रीडर्सचा, स्मार्टफोन आणि आयपॅड, आयफोन वगैरेंचा भारतात अजूनही मर्यादित प्रमाणातच उपयोग होत आहे; परंतु भारतात मोबाईलची ग्राहकसंख्या पन्नास कोटीच्या घरात गेली आहे हे लक्षात घेता, इंटरनेट-स्मार्टफोनचे दर खाली येऊन ग्राहकसंख्येत वेगाने वाढ होत जाईल असे मानायला हरकत नाही. तसे झाल्यावर छापील पुस्तकांच्या ऐवजी डिजिटल पुस्तकांच्या मागणीत झपाट््याने वाढ होत जाईल हे स्पष्टच आहे.

आॅक्टोबर महिन्यात झालेल्या फ्रँकफर्ट बुक फेअरमध्ये डिजिटल पुस्तकांचीच सर्वदूर चर्चा होती. छापील पुस्तकांच्या हक्कांची देवाणघेवाण करण्यासाठी ही ग्रंथजत्रा आजवर प्रसिद्ध होती; आता डिजिटल हक्कांची देवाणघेवाण सर्रास सुरूझाल्याचे दिसून येत होते. तेथे झालेल्या परिसंवादात आणि चर्चासत्रात ङडिजिटल बुक्स आणि डिजिटल राइट्सछ यांच्यावरच सवा|चे लक्ष एकवटलेले होते आणि सवा|ना त्याबद्दल औत्सुक्य होते. डिजिटल पुस्तकांकडे प्रतिस्पर्धी किंवा शत्रुत्वाच्या भावनेने न पाहता, आपल्या छापील पुस्तकांच्या जोडीने, डिजिटल पुस्तकांद्वारे आपल्या व्यवसायाची प्राप्ती सहजगत्या कशी विस्तारता येईल या स्वागतशील मानसिकतेचे प्रत्यंतर या ग्रंथजत्रेत पदोपदी येत होते.

हार्लेकिन मिल्स अँड बून या प्रकाशन संस्थेचे विक्रीप्रमुख म्हणाले, ङङया जत्रेत फेरफटका मारताना लोक डिजिटल पुस्तकांमध्ये रस घेत आहेत आणि डिजिटल पुस्तकांच्या स्टँडवर चर्चा करीत आहेत, हे दृश्य सर्रास दिसत होते. या आधीच्या वर्षात ते कधी दिसले नव्हते. यंदा ङडिजिटलछचे स्टॉल जास्त होते आणि छोट््या छोट््या नव्या संस्थांचेही प्रमाण जास्त होते. डिजिटल क्षेत्रात नवनवे प्रयोग करणार्या ताज्या दमाच्या तरुणांची गजबज या ग्रंथजत्रेला तरुणाई बहाल करणारी होती. त्या तरुणांचा उत्साह आणि आशावाद बगताना, ङग्रंथव्यवहारात इतके पावसाळे मी काढले आहेतछ किंवा ङआमच्या प्रकाशन संस्थेने गेल्या पन्नास वर्षात अमुक अमुक बेस्टसेलर लेखकांची पुस्तके काढली आहेतछ अशी शेखी मिरवणे व्यर्थ आहे, असेच एकूण वातावरण होते.छछ

या क्षेत्रात नवे एजंटही येत आहेत. नव्या लेखकांना, नव्या कल्पनांना, नव्या वाङ्मयप्रकारांना ते प्रमोट करीत आहेत, प्रकाशनाच्या नव्या शक्यता दाखवून देत आहेत, त्यांनाही फ्रँकफर्टमध्ये नवीन प्रकल्पांचा सूतोवाच करण्याची संधी मिळाली. आधी केवळ विशिष्ट पुस्तकांचे मार्केटिंग करावे लागत होते. आता डिजिटल हक्कांचे मार्केटिंग अधिक भाषांसाठी आणि वेगवेगळ्या प्रदेशांसाठी होत असल्याने आणि पुस्तकांच्या संख्येला सीमा नसल्याने एकूण उलाढाल खूप वाढलेली आहे. प्रकाशन व्यवसायाचे स्वरूपच बदलत आहे. कन्टेन्ट निर्मिती हे मुख्य काम छापील वा डिजिटल दोन्हींसाठी पायाभूत आहे, परंतु मुद्रणाची गरज नसल्याने कागद खरेदी, बांधणी, गोडाऊन, वितरण यांचा व्याप कमी झाला आहे.

गुगलने 4 लाख पुस्तकांचे डिजिटल एडिशनचे हक्क प्रकाशकांकडून मिळवले असून, कॉपीराइटच्या कक्षेत न येणार्या 20 लाख पुस्तकांचे डिजिटलायझेशन पूर्ण केले आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये लौकरच गुगल एडिशन्सचे लाँचिंग केले जाईल असे जाहीर केले आहे. मात्र नक्की तारीख अजून जाहीर केलेली नाही. ही डिजिटल पुस्तके सुविहितपणे, कुठलीही अडचण न येता ग्राहकांना वापरता यावीत यासाठी तांत्रिकदृष्ट्या कुठलीही त्रुटी राहू नये या दृष्टीने गुगल स्वत:ची खातरजमा करून गेत आहे. ई-रीडरची गरज भासू नये, कुठल्याही स्मार्टफोनवर, आयपॅडवर, ई-फोनवर, मोबाईलवर, इंटरनेटवर गुगल वेबरीडर ई-बुक्स डाऊनलोड करता यावीत, एकदा विकत घेतल्यावर ग्राहकाला ती जगात कोठेही या वेगवेगळ्या साधनांद्वारे आपल्या सोयीनुसार वाचता यावीत, अशी गुगलची संकल्पना आहे. अमेरिकेत त्यासाठी एजन्सी मॉडेलच्या धर्तीवर प्रकाशकांशी करार करण्यात येत आहेत.
अॅमेझानच्या किंडल वाचन यंत्रावर गुगल एडिशन्स उपलब्ध होणार नाही असेही जाहीर करण्यात आले आहे.

अॅमेझॉनने लेखकांच्या ऐवजी प्रकाशकांशी डिजिटल हक्कांबाबतचे करार करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी लेखकांच्या एजन्टांची एक बौठक घेऊन, विचारविमर्श केला. अॅमेझॉन स्वत:च प्रकाशन क्षेत्रात पदार्पण करण्याचाही विचार करीत आहे. स्वयंप्रकाशन करणार्या लेखकांची पुस्तके वितरित करण्याची जबाबदारी घेऊन अॅमेझान एजंट तसेच पारंपरिक प्रकाशक यांना दूर ठेवण्याचा मार्गही अवलंबणार आहे असे सांगण्यात येते. एजंटांना अॅमेझॉनने पुस्तकांवर सत्तर टक्के रॉयल्टी देण्याचे आमिष दाखवले आहे. फ्रँकफर्टला अॅमेझॉनचे बरेच अधिकारी आलेले होते, आणि ते सवा|शी संपर्क साधत होते.

अॅमेझॉन ही संस्था जगातील सवा|त मोठी रिटेल ग्रंथविक्री करणारी संस्था म्हणून गेली 12 वर्षे कार्यरत आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडीची प्रचंड माहिती या संस्थेकडे आहे. त्यामुळे मार्केटिंगबाबत अॅमेझॉनची व्यूहरचना कमालीची कार्यक्षम असेल असे एजंट आणि लेखक यांच्या मनावर बिंबवण्याचा अॅमेझॉनचा प्रयत्न होता. ई-बुक्स ही छापील पुस्तकापेक्षा तीस ते चाळीस टक्के स्वस्त असायला हवीत, तशी स्वस्त असली तरच ई-बुक्सचे मार्केट खर्या अर्थाने उसळी घेईल असे अॅमेझॉन फ्रान्सचे प्रमुख झेव्हियर गॅरॅम्बोइस यांनी म्हटले आहे. सध्या अॅमेझॉन एका पुस्तकासाठी 9.99 डॉलर्स घेते. काही पुस्तके मोफत देते. या 10 डॉलर्सपौकी निम्मी रक्कम प्रकाशक-लेखकांना देण्यात येते.
फ्युचर बुक या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ई-बुक्सच्या ग्राहकांपौकी साठ टक्के ग्राहकांनी अॅमेझॉनकडून एक तरी ई-बुक घेतल्याचे आढळून आले.

नोव्हेंबर 2010मध्ये झालेल्या फ्युचर बुक कॉन्फरन्स मध्ये डिजिटल पुस्तकांची निर्मिती, वितरण यावर जाणकारांनी आपापली मते मांडली. प्रकाशन म्हणजेछापील पुस्तक हे समीकरण गेल्या 5 वर्षात मागे पडले असून कन्टेन्ट (आशय) हा मुद्रणाबरोबरच आॅनलाइन, ई-रीडर, मोबाईल याद्वारेही वाचकग्राहकांना मिळू शकतो हे मान्य झाले आहे. 2010 हे वर्ष त्या दृष्टीने ई-रीडर आणि ई-बुक्सचे ठरले आहे.
ई-बुकमुळे पुस्तक छपाईचा व्याप कमी होऊन, प्रकाशकांना कर्मचार्यांची संख्या कमी करता येईल, किंवा नवनव्या पुस्तकांची निर्मिती करण्याची सवड सापडेल. ई-बुकमुळे लेखक, प्रकाशक, संपादक, एजंट, ग्राहक, वाचक आणि विक्रेते या सवा|चाच फायदा होईल असाही तर्क केला जातो. काही घटकांना काही बाबतीत फटकाही बसेल, परंतु दीर्घकालीन विचार केला तर या व्यवसायाची द्रुत गतीने वाढ होत राहील असे स्पष्ट दिसते.
गतवर्षाचा आढावा घेताना मराठी किंवा भारतीय प्रकाशन क्षेत्राचा विचारही व्हायला हवा. परंतु जागतिक डिजिटल पुस्तकांकडे आपण वेळीच वळायला हवे, हा विचार नव्या वर्षाचे स्वागत करताना मनात हवा.


सुनील मेहता
(मेहता पब्लिशिंग हाऊस)

No comments:

Post a Comment