Monday, January 31, 2011

फिट फॉर 50+ फॉर मेन


ज्यांना निरोगी आणि दीर्घायुषी व्हायचं आहे अशा पुरुषांसाठी
चालणं या व्यायामाच्या प्रकारात जलद गतीनं चालणं, हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. जलद चालल्यामुळे धावण्याच्या व्यायामाचे बरेचसे फायदे मिळतातच, पण त्याच्यापासनं होणारे संभाव्य धोके टाळता येतात.

मध्यमवयीन व्यक्तींनी किमान 20 मिनिटं चालण्याचा व्यायाम केला, तरच त्याचा फायदा होतो; हे आता अनेक उदाहरणांनी सिद्ध झालेलं आहे. माझ्या मते मात्र अगदीच काही न करण्यापेक्षा, रोज दहा ते पंधरा मिनिटं चालणं हे केव्हाही चांगलं.

द अॅन्टीआॅक्सिडंट रेव्होल्युशन या पुस्तकाचे सुप्रसिद्ध लेखक डॉ. केन कूपर या अमेरिकन डॉक्टरनी, 1960 साली अमेरिकेत तंदुरुस्तीची चळवळ सुरूकेली होती. त्यांच्या मते, धावण्याचा व्यायाम घेणार्यांसारखे जर तुम्ही जोरात चाललात, तर तुम्ही दर किलोमीटरमागे जास्त कॅलरीज खर्च करता.
मी स्वत: कधीच धावत नाही, पण चालतो मात्र भरपूर. मी आठवड्यातनं दोन दिवस गोल्फ खेळतो, त्यामुळे आठवड्याच्या सातांपौकी दोन दिवस तर मी नक्कीच चालतो. याशिवाय मी दोन दिवस वीस मिनिटं किंवा जास्त चालतो.

जलद चालण्याचा व्यायाम करणं केव्हाही आदर्शवत ठरेल. त्यामुळे नाडीचे ठोके जलद पडतात आणि हृदयाला व्यायाम मिळतो. जर तुम्हाला मानवलं, तर तुमच्या चालण्याच्या मार्गात उंचवटे असतील असं बघा. चालत असताना तोंडातनं शब्द फुटणार नाही, इतके अतिश्रम करू नका. धाप लागेपर्यंत दमू नका.
आपल्याला ठाऊकच आहे की चालण्यानं शरीरातली ऊर्जा खर्ची पडते आणि चरबी कमी होते. अर्थात हा व्यायाम नियमितपणे केलात, तरच हे शक्य आहे. जलद चालण्यानं शरीरातली चयापचयाची प्रक्रिया कल्पनेपेक्षाही जलद होते. आपल्या श्वसनामार्फत घेतला जाणारा प्राणवायू हे याचं उत्तम परिमाण आहे. तुम्ही जेव्हा आरामात खुर्चीत बसलेले असता, तेव्हा तुमचं शरीर साधारणपणे एक तृतीयांश लिटर प्राणवायू प्रत्येक मिनिटाला उपयोगात आणतं; पण जेव्हा खुर्चीतनं उठून बाहेर रस्त्यावर चालता, तेव्हा तुम्ही एक पूर्णांक एक तृतीयांश लीटर प्राणवायू उपयोगात आणता, म्हणजेच तीन ते चार पटींनी प्राणवायूचा उपयोग वाढतो.

अनेक वर्षे शास्त्रज्ञांची अशी ठाम समजूत होती की, व्यायाम करायचा थांबवल्यावरही, चयापचयाची क्रिया प्रदीर्घ काळ कायम राहते. या प्रक्रियेला आफ्टर ग्लो असं शास्त्रीय नाव आहे. यानुसार तुम्ही जरी वीस मिनिटं चालण्याचा व्यायाम केलात, तरी पुढे चोवीस तास तुमच्या चरबीचं ज्वलन होत राहतं.
पण दक्षिण आॅस्ट्रेलियातले फ्लांडर्स विश्वविद्यालयातल्या खेळाच्या संबंधित विषयातले तज्ज्ञ डॉ. õिख्रस्तोफर गोर, यांनी मात्र आफ्टर ग्लोची कल्पना साफ नाकारली आहे. त्यांचे मते, हा परिणाम व्यायाम थांबवल्यानंतर फार अल्प काळ टिकतो.
चालणार्यांना ही बातमी जरा निराशाजनक वाटेल, पण डॉक्टर गोर हे पुढे जाऊन असंही सांगतात की, यामुळे होणारा फायदा मात्र कमी होत नाही आणि त्यात काही फरक पडत नाही.

मूळ लेखक : ग्रेग चॅपेल
अनुवादक : सुभाष जोशी

नियमित चालण्याने आणि पोषक आहार घेतल्यानं, हृदयविकाराचा धोका कमी होतोच; पण शरीराच्या वजनावरही नियंत्रण राहतं.

No comments:

Post a Comment