Sunday, January 30, 2011

फिट फॉर 50+ फॉर विमेन


ज्यांना निरोगी आणि दीर्घायुषी व्हायचं आहे अशा स्त्रीयांसाठी

एक सुवार्ता आहे की, तुम्ही कार्यक्षम होण्यासाठी केव्हाही सुरुवात करायला हरकत नाही, उशीर झालेला नसतो; असा निष्कर्ष अनेक ठिकाणच्या अभ्यासावरून काढता येतो. पन्नाशीनंतर करायच्या साध्या हलक्या व्यायामांचे प्रचंड फायदे होतात.

उदा : हृदयरोग, मधुमेह आणि आतड्याचा कॅन्सर यासारखे गंभीर आजार बळावण्याचा धोका कमी होतो.
कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी होतो.
काळजी आणि निराशा कमी होऊन प्रसन्न वाटतं.
वजनावर नियंत्रण राहून तुम्ही सुदृढ राहता.
स्नायू, सांधे आणि हाडं कायमची बळकट होतात.
सध्याच्या प्रकृतीविषयक किरकोळ तक्रारींचं निवारण होतं आणि त्या परत उद्भवत नाहीत.

जीवनशौलीचा दर्जा उंचावतो आणि अकाली मरण येण्याची शक्यता दुरावते.
वाढत्या वयाबरोबर आपले स्नायू वजनाने आणि आकाराने कमी-कमी होत जातात. मध्यम वय उलटून गेल्यानंतर सर्वसाधारणपणे दर दहा वर्षाला तीन किलो स्नायू वजनाने घटतात. अर्थात ही घट होण्यामागे वयापेक्षाही बौठं काम जास्त जबाबदार आहे. वयस्क व्यक्तींनी व्यायाम केल्यास त्यांच्या स्नायूंच्या वजनात वाढ होऊ शकते.

सत्तर वर्षांचा सक्षम माणूस हा बैठे काम करणाऱ्या तीस वर्षाच्या व्यक्तींइतकाच सक्षम असतो. कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची दर वर्षी सुमारे अर्धा टक्का शारीरिक घट होते, तर नसणार्यांची ती दोन टक्के होते.

लठ्ठपणामुळे हृदयरोग, मधुमेहासारखे अनेक रोग बळावण्याची शक्यता असते. वयाच्या चाळिशीनंतर हाडांची घनता कमी होऊ लागते आणि पन्नाशीनंतर ही क्रिया अधिक वेगाने होते. याच कारणामुळे वयस्क व्यक्तींची हाडं मोडण्याची शक्यता जास्त असते. वजन उचलण्याचे व्यायाम केल्याने सशक्त आणि निरोगी राहायला मदत होते.

तुमच्या शरीरातले सांधे लवचीक आणि सक्षम राहण्यासाठी त्यांची नियमित हालचाल होणं आवश्यक आहे. लवचीकपणा टिकून राहावा म्हणून करायचे व्यायाम नियमितपणे केल्यास स्नायूबंध आणि कुर्चा यांसारख्या मऊ पेशींना बळकटी येते आणि इजा होण्याची शक्यता दुरावते.

तुमचं वय कितीही असो; थोडीफार दमछाक करणारे व्यायाम जर नियमितपणे केले, तर हृदयाचं आणि फुप्फुसांचं आरोग्य सुधारतं. तरुण माणसापेक्षा वयस्क व्यक्तींना याचे फायदे थोडे उशिरा दिसतील, पण दोघांनाही सारखेच फायदे मिळतील.
असा एक समज सर्वत्र पसरलेला पाहायला मिळतो की, फक्त दमछाक करणाऱ्या आणि दीर्घ काळ केलेल्या व्यायामांचाच फायदा होतो. या गैरसमजापायी कित्येक जण व्यायामाची सुरुवात करण्यापासून दूर राहिले आहेत. सुदैवाने हे खरं नाही. साधारणपणे केलेल्या शारीरिक कसरतींमुळेही लक्षणीय फायदा होऊ शकतो.

मूळ लेखक : शेन गुड
अनुवादक : सुभाष जोशी

पृष्ठे : 88 किंमत : 80

या पुस्तकात दिलेले व्यायामाचे प्रकार हे मध्यमवयीन स्त्रियांना डोळ्यांसमोर ठेवूनच आखलेले आहेत

No comments:

Post a Comment