Saturday, February 5, 2011

मेहतांच्या दोन पुस्तकाला पुरस्कार



मराठी वाङ्मय परिषद, बडोदे, यांच्या वतीने घेणयात आलेल्या साहित्यस्पर्धेत मेहता पब्लिशिंग हाऊस यांची `मना सर्जना` (डॉ. अनिल गांधी) या पुस्तकाला प्रथम तर `ज्याचं करावं भलं` (निरंजन घाटे) यांच्या कथासंग्रहाला दुसरे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
हे दोन्ही पुरस्कार 6 फेब्रुवारीला बडोदा येथे देण्यात आले.


डॉ. अनिल गांधी यांच्या `मना सर्जना` पुस्तकात त्यांनी आपल्या वौद्यकीय विषयाखेरीज, आर्थिक गुंतवणूक, व्यावसायिक नीतिमत्ता, पृथ्वीची व्युत्पत्ती, आदिवासींसाठी आश्रमशाळा, महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी अशा इतरही विषयांवरील आपले चिंतन व्यक्त केले आहे. एकूणच ही आत्मकथा मननीय, चिंतनीय आणि वाचनीय अशी आहे.
`मना सर्जना` या मूळ मराठी पुस्तकाचा गुजराथी आणि हिंदीमध्ये अनुवाद झाला आहे. इंग्रजीमधेही याचा अनुवाद प्रसिद्ध होणार आहे.



निरंजन घाटे यांच्या मूळ स्वभावाचा परिचय करून देणाऱ्या या एक प्रकारे गप्पाच आहेत. ते विज्ञान लेखनाकडे वळले आणि त्यांचं असं हलकं फुलकं लेखन मागं पडलं. `ज्याचं करावं भलं` द्वारा या त्यांच्या कथांना पुन्हा उजाळा मिळतोय, या कथांमुळे तत्कालीन तरुणाईचेही दर्शन आजच्या वाचकाला होईल.

No comments:

Post a Comment